राज्यातील शाळामधील शैक्षणिक सत्राची सुरवात १ एप्रिल पासून हे होणार महत्वाचे बदल start educational year
शैक्षणिक वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडण्यासाठी शासन तयार आहे. शैक्षणिक वर्षाची सुरुवात जी सध्या जून महिन्यापासून होते. ते आता एप्रिल महिन्यापासून करण्याचा निर्णय सुकाणू समितीमार्फत घेण्यात आलेला आहे. राज्य शासन लवकरच याबाबत आपली भूमिका स्पष्ट करेल. सोबतच दहावी आणि बारावीच्या परीक्षा सध्या वर्षाच्या शेवटी म्हणजे मार्च एप्रिल महिन्यामध्ये घेण्यात येतात. मात्र नवीन शिफारशीनुसार या परीक्षा वर्षातून दोनदा व्हाव्यात असं सांगण्यात आलेले आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.
सध्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात जून महिन्यामध्ये होते. यापुढे ही सुरुवात एप्रिल महिन्यापासून करण्याच्या शिफारसी स्थापन केलेल्या सुकाणू समितीने केल्या आहेत. शैक्षणिक वर्षे 2026-27 पासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात यावी. अशाही सूचना या समितीमार्फत करण्यात आलेले आहेत.
सविस्तर बातमी येथे पहा Click here
शैक्षणिक धोरण 2020 आणि त्याची अंमलबजावणी याचा अभ्यास करण्यासाठी शासनामार्फत सुकाणू समितीची कठीण करण्यात आली होती. या गठीत केलेल्या समितीने आपले अहवाल राज्य सरकार यांना सादर केलेला आहे. यामधील सर्वात महत्त्वाची शिफारस म्हणजे शैक्षणिक सत्र 1 एप्रिल पासून करण्यात यावं ही आहे.
सध्या सीबीएससी पॅटर्नच्या ज्या शाळा आहेत त्या शाळाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवाती 1 एप्रिल पासून होत असते. याविषयी आपणाला कल्पना आहे. मात्र नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या सुकाणू समितीने सुद्धा ही शिफारस केली आहे की जे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र आहे ते शैक्षणिक सत्र एप्रिल महिन्यामध्ये सुरू करण्यात यावं. 2026 27 या शैक्षणिक वर्षापासून राज्यात सुद्धा या नवीन शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी असं सांगण्यात आलेला आहे.
नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत विद्यार्थ्यांच्या वयोगटा नुसार म्हणजेच बालवाडी ते इयत्ता दुसरीपर्यंत पहिला स्तर, तिसरी ते पाचवी पर्यंत दुसरा स्तर आणि नववी ते बारावीपर्यंतचा तिसरा स्तर निश्चित करण्यात आलेला आहे. इयत्ता नववी पासून विद्यार्थ्यांना एक स्थानिक भाषा व दुसरी देशाची भाषा किंवा कोणतीही परदेशी एक भाषा निवडता येणार आहे. यामुळे विषयांची मर्यादा कमी होणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडता येतील त्या विषयाचा समावेश त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये करता येणार आहे.
सीबीएससी बोर्डाच्या ज्या शाळा आहेत त्या सीबीएससी बोर्डाच्या शाळा 31 मार्चला संपतात आणि नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही १ एप्रिल पासून होत असते. त्यातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी भरपूर चांगला वेळ मिळतो आणि याच गोष्टीचा विचार करून अध्यापनाचा आणि शैक्षणिक वर्षाचा विचार करता राज्यातील शाळा एक एप्रिल पासून सुरू कराव्यात अशी शिफारस करण्यात आलेली आहे.
यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी भरपूर वेळ उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी लागणाऱ्या तासिका सुद्धा वाढवता येऊ शकतात असं सांगण्यात आलेला आहे. सध्या विद्यार्थ्यांचा सीबीएससी बोर्ड याकडे वाढता कड लक्षात घेऊन राज्य सरकारने सुद्धा गणित आणि विज्ञान हे जे दोन विषय आहेत. ते दोन विषय सीबीएससी प्रमाणे ठेवावेत असंही ठरवण्यात येणार आहे आणि यासाठी नेमण्यात आलेल्या सुकाणू समितीने सुद्धा त्याला मान्यता दिली आहे. आता या सर्व गोष्टीची अंमलबजावणी ही सन 2026-27 म्हणजे येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे
दुसरीपर्यंतचा अभ्यासक्रम या पहिल्या टप्प्यात बदलणार आहे त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने हा अभ्यासक्रम बदलत 2030 पर्यंत संपूर्ण जे नवीन शैक्षणिक धोरण आहे. ते राज्यातील शाळांमध्ये राबवलं जाणार आहे.
तिसरी ते दहावीचा अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करून असा आराखडा मंजूर करून घेतला जाणार आहे या अभ्यासक्रमासाठी तीन महिने लागणार आहेत आणि त्या तीन महिन्यांमध्ये तिसरी ते दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम आराखडा तयार करून तो मंजूर करून घेतला जाणार आहे .
अध्यापनासाठी जी ताशीक असते ती 45 मिनिटाऐवजी ती आता पाच मिनिटांनी वाढून म्हणजेच 50 मिनिटांची असेल तासिका चा वेळ दोन 17 व एका सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी हा वेगवेगळा असणार आहे .परीक्षा मधील विद्यार्थ्यांची घोकनपट्टी कमी करण्यासाठी रचनात्मक पद्धतीवर अधिक भर दिला जाणार आहे. थोडक्यात विद्यार्थ्यांनी घोखनपट्टी न करता रचनात्मक जी अभ्यासाची पद्धत आहे ती रचनात्मक अभ्यासाची पद्धती स्वीकारावी यासाठी या रचनात्मक पद्धतीवर शिक्षकांना अधिक भर द्यावा लागणार आहे.
सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची दहा दिवस दप्तरावीना शाळा भरणार आहे त्या काळात विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या कलेनुसार शिक्षण घेतील आवडीच्या कलेतून इंटरशिप करणार आहेत अशी शिफारस सुद्धा यामध्ये करण्यात आली आहे.
दहावी बारावीची बोर्ड परीक्षेची रचना बदलली जाणार असून वर्षात दोनदा परीक्षा होईल त्यात एक मुख्य व दुसरी श्रेणी सुधारणा परीक्षा असणार आहे हा एक सर्वात मोठा बदल या नवीन शैक्षणिक धोरणानुसार केला जाणार आहे .
सीबीएससी प्रमाणे राज्य मंडळाचा अभ्यासक्रम देखील साम्यआणले जाणार आहे. गणित व विज्ञान विषय सीबीएससी प्रमाणेच राहणार आहेत.
शासन आदेशानुसार अंमलबजी होण्यास सुरुवात केली जाणार आहे. राज्य अभ्यासक्रम आराखडा यासाठी नेमलेली सुकाणू समिती याने मान्यता यापूर्वी दिली आहे. राज्यातील शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिल पासून करायचे नियोजन आहे. पण त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात शासनाचा निर्णय नाही असा निर्णय काही दिवसात निघेल आणि सीबीएससी प्रमाणे राज्यातील सर्व शाळा या एक एप्रिल पासून सुरू होतील अशी आशा आहे.
छत्रपती संभाजीनगर, ता. १८ राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तिसरी ते बारावीच्या राज्य अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली. त्यानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बहुतांश अभ्यासक्रम स्वीकारण्यात येत असल्याने राज्य मंडळाशी संलग्नित शाळांचे नवीन शैक्षणिक सत्र १५ जूनऐवजी १ एप्रिलपासून सुरू होणार आहे.
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० यांचा अभ्यास करून राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तिसरी ते बारावीसाठी अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा तयार केला होता. या मसुद्यात मनुस्मृतीचा संदर्भ देण्यात
आल्याने यावरून अनेक वादविवाद झाले होते. या अभ्यासक्रम आराखड्यावर जवळपास तीन हजारांहून अधिक हरकती सूचना नोंदवण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सुकाणू समितीच्या बैठकीत चर्चा करून अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्याला अंतिम मान्यता देण्यात आली. नव्या धोरणात देशातील पारंपरिक, प्राचीन ज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी भारतीय ज्ञानप्रणाली या घटकाचा समावेश करण्यात आला आहे.
अशी असतील पाठ्यपुस्तके
राज्य मंडळाच्या शाळांसाठी सीबीएसईचा बहुतांश अभ्यासक्रम स्वीकारण्यात येणार आहे. त्यासाठी एनसीईआरटी, सीबीएसई यांच्याकडील पाठ्यपुस्तके इंग्रजी आणि हिंदी माध्यमांत उपलब्ध आहेत. अन्य माध्यमांसाठी या पाठ्यपुस्तकांचे भाषांतर
करून ती पाठ्यपुस्तके आवश्यक माध्यमांत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बालभारतीकडे सोपवण्यात आली. इतिहास, भूगोल अशा विषयांची पाठ्यपुस्तके स्थानिक, राज्य, राष्ट्रीय, जागतिक अशा आशयाचे करण्यात येणार आहे. मराठी भाषेची पाठ्यपुस्तके राज्यातच तयार करण्याचे ठरले आहे.
अशा असणार सुट्या
महाराष्ट्रात राज्य मंडळाच्या शाळांचे वार्षिक वेळापत्रक १५ जूनपासून सुरू होते. एप्रिलमध्ये वार्षिक परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्या लागतात. मात्र, आता सीबीएसईच्या वार्षिक वेळापत्रकानुसार १ एप्रिलपासून नवीन शैक्षणिक सत्राची सुरवात होईल. १ ते ३१ मे उन्हाळ्याच्या सुट्या राहतील. त्यानंतर पुन्हा १ जूनपासून शाळा सुरू होऊन मार्चमध्ये वार्षिक परीक्षा घेण्यात येतील.
अभ्यासक म्हणतात…
■ शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक डॉ रूपेश चिंतामणराव मोरे यांनी सांगितले, ‘राज्य मंडळाच्या शाळांमध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी, बारावी बोर्ड परीक्षा असतात. एप्रिलमध्ये शाळांच्या परीक्षा झाल्या की, १ मे ते १५ जून दरम्यान उन्हाळ्याच्या सुट्या असतात. १५ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू होते. प्रवेश नोंदणी, नवीन पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य खरेदी त्यानंतर प्रत्यक्ष अध्यापनाला जुलै उजाडतो. या उलट सीबीएसई शाळांचा मार्चमध्ये निकाल लागून १ एप्रिलपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होते. एप्रिलमध्येच पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्यांची खरेदी झाल्याने मुलांना नव्या वर्गाच्या अभ्यासक्रमाची प्रत्यक्ष ओळख होईल. मे महिन्याच्या दीर्घ सुटीत मुले वाटेल तेव्हा पुस्तके वाचू शकतील. त्यामुळे त्यांना स्वयम् अध्ययनाची सवय लागेल. राज्य मंडळाच्या शाळांचे शैक्षणिक वर्ष सीबीएसई शाळांप्रमाणे करणे हे शैक्षणिकदृष्ट्या । उपयुक्त ठरेल.’