भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त सुंदर मराठी भाषण bharatratna do babasaheb ambedkar jayanti

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त सुंदर मराठी भाषण bharatratna do babasaheb ambedkar jayanti 

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू येथे झाला त्यांचा जन्म दिनांक 14 एप्रिल 891 रोजी मध्य प्देशातील महू या ठिकाणी एका दलित कुटुंबात झाला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच जातीय व्यवस्थेच्या प्रचंड त्रास सहन करावा लागला त्यावेळी अस्पृश्यता खूप मोठ्या प्रमाणावर होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक गोष्टीत त्यांना आपण अपमानास्पद वागणूक सहन करावी लागली त्यावेळी शाळेत सुद्धा त्यांना विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागत होते.

भेदभाव अस्पृश्यता असमानता यांचा सामना करत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई विद्यापीठामधून ते पदवीधर झाले होते त्यानंतर त्यांनी पुढे एमए साठी अमेरिकेला गेले व तेथे कोलंबिया विद्यापीठात प्रवेश मिळवला प्रवेश घेऊन त्यांनी त्या ठिकाणी पीएचडी केली पुढे त्यांनी लंडन ऑफ स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून एम एस सी डी एस सी बॅरिस्टर लॉ इत्यादी पदव्या मिळवल्या त्यावेळी भारतातील त्या काळामध्ये सर्वात सुशिक्षित व्यक्तींपैकी एक म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते त्यांचे कौतुक म्हणजे त्यांनी प्रदेशातून डॉक्टर एक पदवी घेणारे ते पहिले भारतीय ठरले.

स्पर्श अस्पृश्यता तसेच असमानतेची वागणूक त्यांना पदोपदी सहन करावी लागले त्यानंतर देखील त्यांनी लहान वयातच भारतीय समाजातून या वाईट प्रथांचे उच्चाटन करण्याचा निर्णय घेतला शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य येथील दलित समाजासाठी गोरगरीब समाजासाठी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजासाठी अर्पण केले त्यांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले अशा प्रयत्न करत असताना त्यांना अनेक अडचणी आल्या परंतु ते डगमगले नाहीत संकटावर मात करत लोकांची मने समजून घेत त्यांना आपल्या स्व ची जाणीव करून दिली. पुढे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले कायदामंत्री झाले भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी त्यांच्याकडे खूप मोठी जबाबदारी येऊन पडली भारतीय संविधानाचे मसुदा समितीचे ते अध्यक्ष झाले यामध्ये अतिशय हुशार कुशाग्र बुद्धिमत्ता असणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची त्यामध्ये निवड होणे म्हणजे एक सुवर्णसंधी होती त्यांनी या संधीचे सोने केले कारण गोरगरिबांना न्याय द्यायचा असेल तर आपल्याला चांगले निर्णय घ्यावे लागतील तसेच त्या परिस्थितीतून ते जीवन जगत असल्यामुळे त्यांना गोरगरीब अस्पृश्य लोकांची परिस्थिती काय असते याची जाणीव सर्वात जास्त होती आणि अशा व्यक्तीच्या हातामध्ये संविधान लिहिण्याचे कार्य आल्यामुळे नक्कीच अशा या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांना सोपे वाटले मसुदा समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर राज्यघटना तयार करण्यासाठी त्यांनी अनेक देशांशी संपर्क केला अनेक देशांचे संविधान समजून घेतले त्यामधील चांगल्या बाबी समजून घेतल्या संविधानाचा उद्देश महत्त्व समजून घेतले यासाठी त्यांना अनेक देश फिरावे लागले राज्यघटनांचा सूक्ष्म अभ्यास त्यांनी केला व ते एक महान अर्थशास्त्रज्ञ ही होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलित वर्गासाठीच नाही तर महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठी देखील लढले.

भारतीय संविधानाचे घटना समितीचे अध्यक्ष तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते तर मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते खऱ्या अर्थाने संविधान लिहिण्याचे कार्य मसुधा लिहिण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण केले यामध्ये त्यांनी जवळजवळ दोन वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी त्यांना संविधान देण्यासाठी लागला या काळामध्ये त्यांनी प्रत्येक भारतातील प्रत्येक व्यक्तीचा विचार करून डोळ्यासमोर ठेवून संविधान मसुदा लिहिण्याचे कार्य केले आज आपण जी सर्व अधिकार मूल्य कर्तव्य हक्क पाहतो आपल्याला अनेक प्रकारचे स्वातंत्र्य मिळालेले आहे ते फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच हे सर्व शक्य झाले.

स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये अनेक चालीरीती अनेक रूढी परंपरा होत्या यामध्ये समाज विभागला गेला होता समाजामध्ये जातीय ते निर्माण झाले होते धार्मिक भेदभाव जातीय भेदभाव याचे स्टोन वाढले होते यामुळे जनता त्रस्त झाली होती आपल्या भारतामध्ये अनेक राज्य आहेत अनेक गावी आहेत जिल्हे तालुके आहेत ही सर्व एकसघ ठेवायचे असेल तर त्यासाठी भारतीय संविधानाची गरज होती या संविधानामुळे सर्व एका क्षेत्राखाली आणण्याचे कार्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं भारतीय संविधान हा भारताचा सर्वात मोठा ग्रंथ आहेच परंतु तो जगातील सर्वात मोठी राज्यघटना सर्वात मोठे संविधान लिहिण्याचे कार्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले या संविधानामध्ये अनेक प्रशिष्ट्य आहेत कायदे कलमे भाग अशा प्रकारची रचना यामध्ये केलेली आहे भारतातील प्रत्येक नागरिक यामुळे त्या नागरिकाला त्याचे कर्तव्य हक्क अधिकार मूलभूत अधिकार मिळतात आज आपला देश भारतीय संविधानावर चालतो भारतामध्ये लोकशाही आहेत लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांकरता लोकांकडून चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय आज भारत आपणा सर्वांना एकसंघ दिसतो ते फक्त संविधानामुळेच भारतामध्ये लोकशाही परंपरा तसेच लोकसभा राज्यसभा संसद भवन व न्यायालयीन यंत्रणा या सर्वांच्या एकमताने आपला देश विकसित झालेला आहे प्रत्येक गरीब असो अस्पृश्य असो सर्वांना समान न्याय मिळतो तो फक्त संविधानामुळेच जातीय तेढ कमी करण्यासाठी सर्वच जण प्रयत्न करतात.

भारताची राज्यघटना भारताचे संविधान समजून घेताना आपण सर्वांनी मिळून याचा अंगीकार केला पाहिजे भारतीय संविधान खऱ्या अर्थाने 26 नोव्हेंबर 1949 रोजी पूर्ण झाले व ते भारताकडे सुपूर्द करण्यात आले परंतु खऱ्या अर्थाने संविधानाची अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 रोजी झाली होती या दिवसापासून भारत हा प्रजासत्ताक दिन साजरा करतो प्रजासत्ताक याचा अर्थ होतो प्रजेच्या अति सत्ता म्हणजेच प्रजासत्ताक होय आपला देश हा विविधतेमध्ये एकता निर्माण करतो आपल्या देशामध्ये अनेक राज्य आहेत अनेक बोलीभाषा आहेत अनेक चालीरीती आहेत प्रत्येकाचे खान पानाचे वेगवेगळे प्रकार आहेत परंतु या विविधतेतून एकता आपल्या भारतात दिसून येते आपण भारतामध्ये कुठेही फिरण्याचे आपणास स्वातंत्र्य मिळालेले आहे बोलण्याचे स्वतंत्र आहे व्यक्त होण्याची स्वतंत्र्य आहे आहार विहाराची स्वातंत्र्य आहे हे सर्व आपल्याला संविधानाने अर्पण केलेले आहे आपले हक्काबरोबरच आपले कर्तव्य आणि आपले अधिकार आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे हक्क आणि कर्तव्य ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे सर्व करत असताना प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा मूलभूत अधिकार आहे तो अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार होय प्रत्येकाला आपलं मत दान करण्याचा अधिकार आहे या मतदानातून लोकशाही बळकट करण्यासाठी मोठे प्रयत्न केले जातात भारतामध्ये अन्याय झाल्यास न्यायव्यवस्था कार्य करते यामधून प्रत्येकाला समान न्याय मिळेल अशी तरतुदी भारतीय संविधानात केलेल्या आहेत नक्कीच आपण सर्वांनी भारतीय संविधानाचा आदर करणे गरजेचे आहे कारण हे संविधान लिहिण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दोन वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला होता परंतु हे लिहिण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक देशांमध्ये जाऊन त्या ठिकाणचा संविधानाचा सूक्ष्म अभ्यास करून आपली संविधानाची निर्मिती केली होती आणि सर्वात मोठा ग्रंथ म्हणजेच भारतीय संविधान लिहून काढले होते हे लिहीत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला छत्रपतींनी ज्या प्रकारे सर्व धर्म समभाव सर्व जातीपातींना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला प्रत्येक नागरिकाला त्याचे हक्क मिळवन दिले कामगार सुशिक्षित बेरोजगार यांना त्यांचे हक्क मिळवून दिले भारतीय संविधान लिहीत असताना प्रत्येक जाती धर्मांचा विचार करण्यात आला गोरगरीब जनतेचे शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

आपण नेहमीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षीप्रमाणे साजरी करत असतो परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा याचा अर्थ असा होता की तुम्ही पुस्तके वाचली पाहिजेत शिकले पाहिजेत जास्तीत जास्त ज्ञान मिळवले पाहिजे आणि त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या गोरगरीब समाजासाठी केला पाहिजे आपल्या समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी केला पाहिजे सुशिक्षित बेरोजगारांना संधी उपलब्ध करून देण्यात आल्या पाहिजेत हा त्यांचा उद्देश होता शिकलेला व्यक्ती हा देशाला हातभार लावू शकतो तसेच फक्त शिकूनच सर्व मिळेल असे नाही तर त्यासाठी आपल्याला संघटित होणे देखील तेवढ्याच गरजेचे आहे आणि संघटित झाल्यानंतर एकसंघ झाल्यानंतर न होणारी कार्य होऊ शकतात हे त्यांना माहीत होते म्हणून त्यांनी जगाला संदेश दिला संघटित व्हा आणि संघटित होऊनच नाही तर संघर्ष करण्याची तयारी देखील ठेवा जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही जोपर्यंत आपले स्वप्न पूर्ण होत नाहीत जोपर्यंत आपलं ध्येय पूर्ण होत नाही आपण ध्येय दया पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत संघर्ष चालूच ठेवा अशा प्रकारची घोषणा त्यांनी केली होती म्हणून त्यांनी म्हटले होते की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यांनी एक एका ठिकाणी असे देखील म्हटले आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही याचा अर्थ असा होता की शिक्षण हे तुम्ही जर चांगल्या प्रकारे घेतले तर तुम्ही आपले अधिकार तुम्हाला समजतील आपले हक्क तुम्हाला समजतील आपले कर्तव्य समजतील आपल्या कुटुंबाचा विकास करण्यासाठी आपल्या गावाचा विकास आपल्या देशाचा विकास करण्यासाठी आपण शिकलं पाहिजे नक्कीच आपण स्वतःपुरते जरी शिकलो तरी आपण देशाला हातभार लावू शकतो या शिक्षणामुळे आपण प्रगती करू शकतो त्यामुळे त्यांनी शिक्षणावर खूप मोठा भर दिला.

अशा या महान व्यक्तिमत्त्वाची जयंती आपण दरवर्षी साजरी करतो दरवर्षी खऱ्या अर्थाने जयंती साजरी करत असताना जयंती वाचन करून साजरी केली पाहिजे विविध ग्रंथांचे वाचन केले पाहिजे ग्रंथ लिहिले पाहिजेत आणि आपल्या ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे हा त्यामागचा खरा उद्देश असला पाहिजे फक्त नाचणे गाणे डीजे वाजवणे म्हणजे जयंती झाली असे नाही तर महापुरुषांची जयंती ही वाचन करून पूर्ण केली पाहिजे प्रत्येक कार्यालयामध्ये जयंती साजरी केली जाते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श फक्त जयंती पुरता न राहता तो कायमस्वरूपी वर्षभर आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि आपले कार्य केले पाहिजे जेणेकरून गोरगरिबांना आपण न्याय देऊ शकेल अशा प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करूया जय भीम.