महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण धोरण जाहीर नवीन शैक्षणिक सत्रापासून सीबीएसई अभ्यासक्रम लागू cbse curriculum in maharashtra state 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण धोरण जाहीर नवीन शैक्षणिक सत्रापासून सीबीएसई अभ्यासक्रम लागू cbse curriculum in maharashtra state 

राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० अनुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) यांचा अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांची परिक्षा पध्दती स्विकारण्याविषयीची भूमिका

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक बंधुभगिनीनी अतिशय कमी माहिती उपलब्ध असताना सुध्दा नविन शैक्षणिक धोरणाबाबत शासनाची भूमिका समजुन घेतली त्याबाबत आभार

राज्यातील सुजाण पालक यांचा सहभाग व शिक्षक बंधुभगिनींची सकारात्मक प्रयत्नांची भूमिका या माध्यमातून नविन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी प्रगतीशील महाराष्ट्रात करण्यात येईल.

तथापि माहिती पूर्ण न मिळाल्यामुळे काही समज-गैरसमज निर्माण झालेत त्यासाठी हा खुलासा करण्यात येत आहे.

१ राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत बनविलेल्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) यांच्या आधारे महाराष्ट्राचे स्वतःचे अभ्यासक्रम आराखडे बनवण्यात आले आहेत. यामध्ये आपल्या राज्यासाठी सकारात्मक विद्यार्थी हिताचे आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत.

२ महाराष्ट्र राज्य मंडळाची पाठ्यपुस्तके बालभारती मार्फत बनविताना राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी बनवलेली पाठ्यपुस्तके बालभारती तज्ञ समितीमार्फत अभ्यासून राज्यासाठी स्वतःची पाठ्यपुस्तके आवश्यक ते सर्व बदल करून बनविण्यात येत आहेत.

३ राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये अपेक्षित कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये येण्यासाठी घोकंपट्टीवर आधारीत परीक्षा पद्धती न ठेवता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांच्या परीक्षा पध्दतीप्रमाणे सर्वंकष प्रकारचे मुल्यमापन महाराष्ट्राच्या राज्य मंडळाच्या पध्दतीत आणून आणि त्यातही आवश्यक ते बदल / सुधारणा करुन त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल.

४ राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० चा स्विकार करुन महाराष्ट्राने दिनांक २४ जून २०२२ रोजी चा शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यानंतर तज्ज्ञ समित्यांच्या मदतीने राज्यातील शैक्षणिक पार्श्वभूमी व राज्याच्या गरजा विचारात घेऊन राज्य अभ्यासक्रम आराखड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच पायाभूत स्तर अभ्यासक्रम / पाठ्यक्रम निर्मिती करण्यात आली.

सर्व मसुदे SCERT च्या संकेतस्थळावर ठेवून जनतेच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या व त्यानुसार दोन्ही आराखडा मसुदे अंतिम करण्यात आले व त्यास राज्यस्तरीय सुकाणू समितीची मान्यता दि. ०९.०९.२०२४ मिळाली आहे. राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तराचा आक्षेप व सूचनांसाठीचा कालावधी दि. २०/१०/२०२३ ते दि. ०४/११/२०२३ ठेवण्यात आला. यासाठी एकूण २८४३ प्रतिक्रिया आल्या होत्या. पायाभूत शिक्षण अभ्यासक्रमचा आक्षेप व सूचनांसाठीचा कालावधी दि.१७/०२/२०२४ ते दि. ०३/०३/२०२४ ठेवण्यात आला. यासाठी एकूण २७५ प्रतिक्रिया आल्या होत्या. राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण साठी आक्षेप व सूचनांसाठीचा कालावधी दि.२३/०५/२०२४ ते दि. ०३/०६/२०२४ ठेवण्यात आला. यासाठी एकूण ३६०६ प्रतिक्रिया आल्या होत्या.

राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) मसुद्यास मंजुरी देण्यापूर्वी तत्कालिन मंत्री, शालेय शिक्षण यांनी विविध शिक्षक संघटना प्रतिनिधींसोबत चर्चा केली होती. तज्ज्ञ समित्यांच्या मदतीने पायाभूत स्तरासाठी (बालवाटिका १.२.३. इ. १ ली व २ री) अभ्यासक्रम / पाठ्यक्रम निर्मिती करण्यात आली व अंतिम आराखड्यास राज्यस्तरीय सुकाणू समितीची मान्यता मिळाली आहे.

नवीन पाठ्यक्रमानुसार बालभारतीमार्फत इ. १ ली पाठ्यपुस्तक निर्मिती कामकाज सुरु आहे. राज्यासाठी इ. १ री ते १० वी साठी अभ्यासक्रम / पाठ्यक्रम निर्मिती SCERTM मार्फत करण्यात येत आहे.

५ CBSE च्या परीक्षापध्दतीची वैशिष्टये :-

अ) संकल्पनांवर भर पाठांतरापेक्षा संकल्पनांच्या समजुतीवर अधिक लक्ष दिले जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळते.

ब) सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापन (CCE Continuous and Comprehensive Evaluation) – विद्यार्थ्यांच्या सततच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जाते. केवळ अंतिम परीक्षांवर भर न देता, प्रकल्प, उपक्रम आणि इतर मूल्यांकन तंत्रांचा समावेश केला जातो.

क) राज्य, देश व जगाच्या पातळीवरचे ज्ञान मिळते.

ड) स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सीबीएसई अभ्यासक्रम JEE, NEET, UPSC यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी फायदेशीर ठरतो.

इ) सॉफ्ट स्किल्स आणि सम्पदेशनावर भर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित केले जाते, त्यांना संवाद कौशल्ये, नेतृत्वगुण, सृजनशीलता आणि तणाव व्यवस्थापन शिकवले जाते.

ई) CBSE पॅटर्नमुळे विदयार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळते व त्यांचे भविष्य घडविण्यास मदत होते.

६. नवीन राज्य अभ्यासक्रमावर आधारीत पाठयसाहित्य पुढील वेळापत्रकाप्रमाणे अंमलात आणण्याचे नियोजन करण्यात येत आहे:

महाराष्ट्राला उज्ज्वल शैक्षणिक परंपरा आहे. त्यामुळे आपल्या राज्याचे अस्तित्व दाखवणारे राज्यमंडळ बंद करण्याचा कोणताही विचार नाही. याउलट, राज्यमंडळ या सर्व उपक्रमांमुळे अधिक सक्षम होईल जे २१ व्या शतकातील गुणवैशिष्ट्ये विद्यार्थ्यांमध्ये आणण्यास मदतच करेल. राज्यातील इ.१० वी व इ.१२वी परीक्षा आयोजनाची जबाबदारी प्रचलित पद्धतीनुसार राज्यमंडळाकडेच असेल.

राज्यमंडळ अस्तित्वात राहणार असल्याने पालकांनी आपल्या पाल्यास कोणत्या बोर्डातून शिक्षण घ्यावे किंवा कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा याबाबत कोणतेही बंधन नाही.

महाराष्ट्राला संत-समाजसुधारकांची फार मोठी परंपरा आहे. नवीन अभ्यासक्रमात महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, संत, समाजसुधारक, ऐतिहासिक व्यक्तिरेखा इत्यादी सर्व बाबींना इतिहास, भूगोल, भाषा विषय इ. सर्व संबंधीत विषयामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. SCF-SE मध्ये सदर बाब स्पष्टपणे नमूद आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व परीक्षा मंडळांचे अभ्यासक्रम असलेल्या, सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे मराठी भाषा विषयाचे महत्व कुठेही कमी होत नाही. अभिजात दर्जा मिळालेल्या आपल्या मराठी भाषेला सन्मानाचेच स्थान मिळेल व हा निर्णय हा मराठी साहित्य, कला, संस्कृतीच्या उज्ज्वल परंपरेला योग्य ठरणार आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक बाची, पुरेशा भौतिक सुविधा उपलब्ध, पुरेशी शिक्षक संख्या, अशैक्षणिक कामाचा बोजा आणि त्यांच्या अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी विविध उपाययोजना शासन स्तरावरुन करण्यात येत आहेत. शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या वर्गीकरणाबाबत शासन निर्णय दि. २३/०८/२०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. अशैक्षणिक कामाचा ताण कमी करून शैक्षणिक कामच शिक्षकांकडून केले जाईल अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. शिक्षक पदभरतीसाठी स्वतंत्र पवित्र प्रणाली सुरु करण्यात आलेली आहे ज्यातून हजारो शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. अनेक नाविन्यपूर्ण प्रशिक्षणे, तंत्रज्ञानाची जोड व निपुण महाराष्ट्र सारखे अभियानही सुरु करण्यात आले आहे.

शाळांच्या भौतिक सुविधा उदा. पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, वर्ग खोल्या, किडांगण, कुंपन इ-सुविधा वगैरे या संदर्भात आराखडा तयार केला जात आहे, यावर शासन प्राधान्याने काम करेल.

मा. मुख्यमंत्री महोदय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा. उपमुख्यमंत्री महोदय श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि मा. श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या जिव्हाळयाचा हा विभाग असल्याने चांगल्या कामांसाठी पुर्ण समर्थन असेल आणि याकरीता कुठलाही निधी कमी पडणार नाही. येणाऱ्या काही वर्षात या विभागाचे चित्र पुर्णपणे बदललेले दिसेल.

वेळापत्रकासंदर्भात खुलासा करण्यात येतो की आपल्या सध्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार व हवामानानुसार शाळांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळा शासन मान्यता प्राप्त अनुदानित शाळा यामधील मुलांना दहावीपर्यंतचे शिक्षण आणि मुलींना बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जात आहे.

शिक्षकांचे प्रशिक्षण संदर्भात नमूद करण्यात येते की नवीन अभ्यासक्रम धोरणानुसार शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू असून शिक्षकांना ब्रिज कोर्स द्वारे सुद्धा अतिरिक्त प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना नवीन अभ्यासक्रम अवघड जाणार नाही कारण की सर्वांना ज्ञात असेल की बऱ्याच क्षेत्रांमध्ये वरील पातळीवर स्पर्धा परीक्षांद द्वारे निवड होणारे विद्यार्थी हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांमधीलच आहेत तसेच नवीन अभ्यासक्रम आराखडा यात आणखी भर घालणार असून विद्यार्थ्यांना अधिकाधिक स्पर्धाक्षम होता येईल.

राज्य शासनाने एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेतलेला आहे की मराठी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना इंग्रजीचे धडे गिरवण्याचा आता संधी मिळणार आहे ही संधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे आता मुले इंग्रजी सीबीएससी च शाळेमध्ये जे शिकवले जाते ते मराठी शाळेमध्ये मिळणार असल्यामुळे विद्यार्थी पालक शिक्षक यांच्यामध्ये उत्साहाची भावना जागृत झालेली आहे कारण इंग्रजी माध्यमातून शिकल्यामुळे भविष्यातील अडचणी दूर होतील तसेच इंग्रजी पहिल्या वर्षीपासून असल्यामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकण्यास सोपे जाईल इंग्रजी सोबतच आपल्या मातृभाषा देखील शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे तसेच महाराष्ट्रातील ऐतिहासिक गोष्टींचे जतन करण्यासाठी महाराष्ट्रातील घडलेला इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास गड किल्ले यांचा देखील यामध्ये समावेश करण्यात येणार आहे सदर अभ्यासक्रमामध्ये 30 टक्के अभ्यासक्रम हा स्थानिक पातळीवर असणारा आहे यामुळे विद्यार्थी व पालक यांच्यामधील उत्साहाचे वातावरण तयार झालेले आहे पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे असल्यामुळे मराठी शाळा ऊस पडू लागल्या होत्या तसेच मराठी शाळेमध्ये ऍडमिशन मिळणे कठीण झाले होते त्यामुळे शासनाने हा चांगल्या प्रकारचा उपक्रम प्रकल्प हाती घेतलेला आहे व याची घोषणा शासनाने देखील केलेली आहे सदर अभ्यासक्रम हा येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून लागू केला जाणार आहे त्यामध्ये शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच इंग्रजी अध्ययनाची पुस्तके देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे हा अभ्यासक्रम इयत्ता पहिलीपासून शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 या वर्षापासून लागू करण्यात आलेला आहे नवीन सत्र सुरू होताच इयत्ता पहिली मध्ये प्रवेश होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने सर्व इक्तांमध्ये लागू केला जाणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनाही इंग्रजी लेखन वाचनाचे दिले मिळणार आहेत त्यातून विद्यार्थ्यांची प्रगती साधली जाणार आहे तसेच पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे शाळांकडे जाण्याचा कर कमी होऊन मराठी शाळांमध्येच विद्यार्थी जास्तीत जास्त येतील असा शासनाचा प्रयत्न असणार आहे त्यामुळे सर्व प्रशासन झपाटून कामाला लागलेले आहेत शिक्षकांना देखील एप्रिलमध्ये आपल्या शाळेचे ॲडमिशन करून घ्यायचे आहेत यासाठी शाळा मेळावा विद्यार्थ्यांमध्ये जागृती येण्यासाठी पालकांमध्ये जागृती येण्यासाठी पालक भेटी घेतल्या जाणार आहेत या पालक भेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमध्ये मिळणाऱ्या सुख सुविधा मोफत पाठ्यपुस्तके असतील मोफत गणवेश असेल शालेय पोषण आहार अशा प्रकारच्या सुविधायुक्त जिल्हा परिषद च्या शाळांमध्ये मिळणार आहे याची जाणीव जागृती करण्यासाठी शिक्षकांना प्रयत्न करावे लागणार आहेत शिक्षक देखील यामध्ये समरस होऊन जास्तीत जास्त मराठी शाळेमध्ये विद्यार्थी कसे वाढतील याकडे लक्ष देणार आहेत सदर उपक्रम हा राज्य शासनाने घोषित केलेला आहे यामध्ये सीबीएससी अभ्यासक्रम कशा प्रकारे राबवला जाणार आहे यासाठी शासनाने परिपत्रक निर्गमित केलेले आहे या परिपत्रकानुसार इयत्ता पहिलीसाठी हा अभ्यासक्रम सुरुवातीला लागू केला जाणार आहे पुढे टप्प्याटप्प्याने विक्रीचे सहावी बारावी पर्यंत हा अभ्यासक्रम वाढवत नेऊन वर्गानुसार याची पातळी वाढवली जाणार आहे यामुळे शिक्षकांमध्ये व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे शिक्षकांना देखील इंग्रजी धडे देण्यासाठी तयार राहावे लागणार आहे सदर प्रकारचे प्रशिक्षण देतील घ्यावे लागणार आहे विविध कलागुणांनी शाळा आता उदाहरणार्थ ज्या गोष्टी इंग्रजी शाळांमध्ये मिळणार होत्या त्या आता मराठी शाळांमध्ये मिळणार आहेत यामुळे पालकांचे आर्थिक नुकसान ठरणार आहे विद्यार्थ्यांचे हाल कमी होणार आहेत कारण विद्यार्थ्यांना परगावी शिक्षण घेण्यासाठी जावे लागत असायचे यामध्ये स्कूल बसचा खर्च शाळेची फी द्यावी लागत असेल हा सर्व खर्च आता पालकांचा वाचणार आहे व विद्यार्थी गावातच राहून इंग्रजी माध्यमाची धडे इंग्रजी पुस्तकांची धडे देणार आहेत यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजेच शारीरिक बौद्धिक मानसिक विकास होऊन विद्यार्थ्यांना भवितव्याची भविष्याची भविष्यावेळी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे या संधीचा फायदा घेण्यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाचा प्रवेश आजच जिल्हा परिषद शाळांमध्ये निश्चित करावयाचा आहे ही एक सुवर्णसंधी ग्रामीण भागातील सर्व पालकांना मिळालेली म्हणजेच राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेली संधी म्हणावी लागेल यामध्ये राज्य शासनाने या तील आर्थिक भार स्वीकारणार आहे.

आपल्या पाल्याची विद्यार्थ्याची भवितव्य घडवण्याची पालकांची शिक्षकांची धडपड असते ती धडपड आता कमी होणार आहे कारण गावातच इंग्रजी माध्यमाची धडे विद्यार्थी गिरवणार आहेत यातून नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे कारण उच्च महाविद्यालयीन शिक्षण हे सर्व इंग्रजीमध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्यासाठी जर विद्यार्थी पूर्वीपासून म्हणजे इयत्ता पहिली पसून इंग्रजीचे धडे घेऊन विद्यार्थ्यांना उत्कृष्ट रीतीने अध्ययन अध्यापनाच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे शाळा आता डिजिटल स्वरूपात बनलेले आहेत प्रत्येक शाळेमध्ये संगणक आलेले आहेत प्रत्येक शाळेमध्ये प्रोजेक्टर साहेब लर्निंग रूम्स आहेत प्रयोगशाळा आहेत या सर्वांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी होणार आहे शाळा आहे माध्यम आहे शाळा हे माध्यम शिक्षणाचे असून यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याचं कार्य शिक्षकांना करावी लागते यामध्ये शिक्षक विद्यार्थी शिक्षक पालक शिक्षक अधिकारी यांची आंतरक्रिया योग्य रीतीने घडून आली तर नक्कीच विद्यार्थ्यांचा विकास घडवून येतो त्यामुळे पालकांमध्ये ही जागरूकता येणे गरजेचे आहे जर ही जागरूकता पालकांमध्ये आली तर नक्कीच विद्यार्थ्यांचा विकास होण्यास वेळ लागणार नाही त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे शाळेमध्ये शिक्षक खूप मेहनत घेतात परंतु पालकांनी जर दुर्लक्ष केले तर त्या मेहनतीचे चीज होत नाही याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर होतो व विद्यार्थी अभ्यासक्रमामध्ये मागे पडतात यामुळे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे वर्गामध्ये शिकवलेल्या भागावर घरी आल्यानंतर विद्यार्थ्यांचा सराव घेणे प्रश्न उत्तरांचे पाठांतर घेणे इत्यादी बाबी जर पालकांनी घरी आपल्या स्तरावर थोडेफार लक्ष देऊन केल्या तर विद्यार्थी नक्कीच कुशाग्र बनतील व येणाऱ्या भविष्यावेळी शिक्षणासाठी ते तयार राहतील. भारताला जर जागतिक महासत्ता व्हायचे असेल तर खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाकडे लक्ष देणे गरजेचे आहे आणि शासनाने त्याकरिता या सुखसुव सुख सुविधा उपलब्ध करून दिलेले आहेत याचा पालकांनी चांगल्या प्रकारे उपयोग करून आपल्या पाल्याचे सर्वांगीण विकास साधावा यासाठी प्रयत्न करावेत.

शाळेला वेळोवेळी येणारे अडचणी शिक्षकांना येणाऱ्या अडचणी या शाळा व्यवस्थापन समिती स्तरावर सोडवल्या जाणार आहेत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा शिक्षकांना वेळोवेळी शालेय समिती समोर ठेवावा लागणार आहे शासनाने विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत यामध्येच उन्हाळ्यामध्ये होणारा उपक्रम म्हणजे चावडी वाचन होय यातून विद्यार्थ्यांची वाचन गती सुधारणार आहे जे वाचनाच्या गतीत मागे पडलेले विद्यार्थी आहेत त्यांना देखील याचा फायदा होणार आहे अशा प्रकारचे विद्यार्थी पिसा स्तरापर्यंत घेऊन जाणे हे जबाबदारी शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांची असणार आहे त्यामुळे सर्वांनी आपापली जबाबदारी स्वीकारून नक्कीच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सतर्क राहायचे आहे.