इ.१ ली ते ८ वी साठी (प्राथमिक स्तर) सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धती लागू करण्याबाबत cce evaluation shasan paripatrak 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इ.१ ली ते ८ वी साठी (प्राथमिक स्तर) सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धती लागू करण्याबाबत cce evaluation shasan paripatrak 

प्रस्तावना

महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शिक्षणाच्या सुधारित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सन २००६-०७ पासून सुरू असून नवीन अभ्यासक्रमाबरोबरच इयत्ता पहिली ते आठवीच्या (प्राथमिक स्तर) विद्यार्थ्यांसाठी दिनांक ३१ ऑगस्ट, २००४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मूल्यमापनपद्धती विहित करण्यात आली होती.

१. केंद्र सरकारने सन २००२ च्या ८६ व्या संविधान विशोधन अधिनियमान्वये अनुच्छेद २१ (अ) मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचा समावेश केला आहे. त्यानुसार सहा ते चौदा वर्षे वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा अधिनियम, [Right of Children to Free and Compulsory Education. ACT 2009 (No. 35. 2009)) केंद्र शासनाने पारित करून तो भारत सरकारच्या २७/०८/२००९ च्या राजपत्रात प्रसिद्ध केला आहे. तसेच भारत सरकारच्या दिनांक १६/०२/२०१० च्या राजपत्रात सदर अधिनियम दिनांक ०१-०४-२०१० पासून संपूर्ण भारतात (जम्मू व काश्मीर वगळता) लागू केला असल्याचे नमूद केले आहे.

२. समता, सामाजिक न्याय, लोकशाही आणि मानवी समाजामध्ये न्यायाची प्रस्थापना ही मूल्ये सर्व मुलांच्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून साधली जाऊ शकतात. यादृष्टीने हा अधिनियम अंमलात आणला आहे. त्यामुळे सहा ते चौदा वर्षे वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण पुरविण्याची,

त्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्याची, उपस्थितीची आणि प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारली आहे.

३. संदर्भाधीन दिनांक १६ जून, २०१० च्या शासन निर्णयान्वये इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील अनुत्तीर्ण विदद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देणे व त्यांची संपादणूक पातळी वाढविण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सदर अधिनियमातील कलम २९ (१) व (२) नुसार इयत्ता पहिली से आठवीसाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धती लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय

शासन परिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. विकाक-२००९/प्र.क्र.२९२/प्राशि-१, दि. १० मे, २०१० अन्वये बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९, दिनांक १ एप्रिल २०१० पासून लागू करण्यात आला आहे. त्यानुसार इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना कोणत्याही बोर्डाची परीक्षा दयावी लागणार नाही. सदर अधिनियमामधील कलम २९ (१) व (२) नुसार सन २०१०-२०११ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते आठवीसाठी पुढीलप्रमाणे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे.

सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाचा हेतू

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या सर्व पैलूंचे सातत्याने आणि विविध अंगांनी मूल्यमापन करण्यासाठी वापरावयाची शाळास्तरावरील कार्यपद्धती म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन होय.

त्यामध्ये दोन प्रकारच्या उद्दिष्टांवर भर देणे आवश्यक आहे. त्यापैकी पहिले उ‌द्दिष्ट वि‌द्यार्थ्यांच्या व्यापक अध्ययनप्रक्रियेचे सातत्यपूर्ण मूल्यमापन (Continuity in Evaluation and Assessment of Broad based Learning) आणि दुसरे उद्दिष्ट वर्तनातील दृश्यरूप किंवा वर्तन निष्पत्ती (Behavioural Outcomes).

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामध्ये आकारिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन पद्धतींचा समावेश

राहील.

कार्यपद्धती

(अ) आकारिक मूल्यमापन (Formative Evaluation)

(विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व आकार घेत असताना नियमितपणे करावयाचे मूल्यमापन)

सर्व शिक्षकांनी पुढील साधने तंत्रे उपयोगात आणून वर्गपातळीवर विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापन करावे

आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्यासंबंधीच्या आवश्यक नोंदी ठेवाव्यात.

१) दैनंदिन निरीक्षण.

२) तोंडी काम (प्रश्नोत्तरे, प्रकट वाचन, भाषण-संभाषण, भूमिकाभिनय, मुलाखत, गटचर्चा इत्यादी)

३) प्रात्यक्षिके/प्रयोग.

४) उपक्रम/कृती (वैयक्तिक, गटात, स्वयं-अध्ययनाद्वारे)

५) प्रकल्प

६) चाचणी (वेळापत्रक जाहीर न करता अनौपचारिक स्वरूपात घ्यावयाची छोट्या कालावधीची लेखी चाचणी/पुस्तकासह चाचणी (Open book Test)

७) स्वाध्याय /वर्गकार्य (माहितीलेखन, वर्णनलेखन, निबंधलेखन, अहवाललेखन, कथालेखन, पत्रलेखन, संवादलेखन व कल्पनाविस्तार इत्यादी)

८) इतर : प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, स्वयंमूल्यमापन, गटकार्य अशा प्रकारची अन्य साघने

आकारिक मूल्यमापनात वरील मूल्यमापनाची साधने तंत्रे यांपैकी इयत्ता, विषय आणि उद्दिष्टे विचारात घेऊन अधिकाधिक साघन-तंत्रांचा वापर करावा, यात किमान पाच साधने तंत्रे यांचा वापर करावा. कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयांसाठी किमान तीन साधने-तंत्रे यांचा वापर करावा. प्रत्येक साधन-तंत्रास योग्य भारांश दयावा. तसेच विद्यार्थी वर्षभरात किमान एक प्रकल्प करतील असे पाहावे. प्रत्येक सत्रात किमान एक छोट्या कालावधीची लेखी चाचणी/पुस्तकासह लेखी चाचणी (Open book Test) घ्यावी. विद्यार्थी, विषय आणि उ‌द्दिष्टे इत्यादींनुसार उपरोक्त साधन-तंत्रांच्या उपयोगाबाबत आकारिक मूल्यमापनात लवचीकता राहील.

(ब) संकलित मूल्यमापन (Summative Evaluation)

(ठरावीक काळानंतर एकत्रित स्वरूपात करावयाचे मूल्यमापन)

प्रथम सत्राच्या अखेरीस पहिले संकलित मूल्यमापन करावे. दुद्वितीय सत्राच्या अखेरीस दुसरे संकलित मूल्यमापन करण्यात यावे. संकलित मूल्यमापनात विषयांच्या उद्दिष्टांनुसार लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक प्रश्नांचा समावेश करावा.

आकारिक आणि संकलित मूल्यमापनाचा भारांश पुढीलप्रमाणे राहील.

आकारिक व संकलित मूल्यमापन भारांश: प्रत्येक सत्रासाठी व प्रत्येक विषयासाठी

(कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण व आरोग्य हे विषय वगळून)

सर्वसाधारण सूचना

मूल्यमापन हे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचे एक अविभाज्य अंग असल्याने आनंददायी अध्ययनाचरोबर मूल्यमापनदेखील आनंददायी असावे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन पूर्णपणे वर्ग/शाळा पातळीवरच गांभीर्याने करण्यात यावे. मूल्यमापन हे उद्दिष्टानुवर्ती असावे आणि ते वर्षभर सातत्याने करावे.

आकारिक मूल्यमापनासाठी सूचना

१. आकारिक मूल्यमापन :-

विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक असा सर्वागीण विकास होऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे आकाराला येत आहे हे नियमितपणे पडताळून पाहणे म्हणजेच आकारिक मूल्यमापन, शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये आकारिक मूल्यमापनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापन गांभीयनि करणे आवश्यक आहे.

१.१ आकारिक मूल्यमापन करण्यासाठी आठ साधने-तंत्रे वापरून केलेल्या मूल्यमापनामधील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद / सहभाग विचारात घ्यावा. मूल्यमापनाचा विचार जीवन कौशल्यांच्या अंगाने करावा. विद्यार्थ्यांची जिज्ञासा, शोधक वृत्ती, चिकित्सक वृत्ती, सर्जनशील विचार करण्याची क्षमता, संवेदनशीलता, विदद्यार्थ्यांचे परस्परांशी असलेले संबंध, सहज संवाद साधण्याची क्षमता, ताणतणावांना तोंड देण्याची भावनिक ताकद या सर्व गोष्टींची दखल घ्यावी. ही सर्व कौशल्ये विद्यार्थ्यांच्या वर्तनात दृश्य स्वरूपात येण्याच्या दृष्टीने विदद्यार्थ्यांशी वेळोवेळी सुसंवाद साधावा. त्यामुळे शिक्षणप्रक्रिया उद्दिष्टांनुरूप व

जीवनाभिमुख होण्यास मदत होईल.

१.२ आकारिक मूल्यमापनामधून संविधानातील मूल्ये, गाभाघटक व जीवन कौशल्ये यांचे मूल्यमापन व्हावे,

१.३ प्रत्येक सत्रातील आकारिक मूल्यमापनामध्ये सातत्य राहावे. वरील आकारिक मूल्यमापनाच्या आठ साधन-तंत्रांपैकी विषय व उद्दिष्टांनुसार उपयुक्त मूल्यमापन साधनांद्वारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात यावे.

१.४ कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. शिक्षणप्रक्रिया जीवनाशी जोडली जाते व मूल्यांचा परिपोष होतो. त्यामुळे या विषयांचे मूल्यमापन योग्य प्रकारे करून विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन दद्यावे.

१.५ आकारिक मूल्यमापन करताना शिक्षकांच्या मार्गदर्शनातील उणिवा आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी दूर होऊन विद्यार्थ्यांचे मूलभूत संबोध (Concepts) व कौशल्ये दृढ होण्यासाठी योग्य ते नियोजन करून कृती करावी.

१.६ प्रत्येक व्यक्तीमध्ये विविध स्वरूपाच्या सुप्त क्षमता असतात. त्या सुप्त क्षमतांचा शोध घेण्यासाठी व त्यांचा विकास साधण्यासाठी विविध अध्ययन अनुभव व उपक्रम योजावेत, त्यांतून साधल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्त्वविकासाचे वेळोवेळी मूल्यमापन करावे.

१.७ अतिरिक्त पूरक मार्गदर्शन आकारिक मूल्यमापन करताना जे विद्यार्थी संपादणुकीमध्ये मागे असल्याचे आढळून येईल अशा विदयार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी/त्रुटींचा शोध घ्यावा व त्यानुसार वेळच्या वेळी विद्यार्थ्यांना वैयक्तिक अथवा गटात अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून त्यांना अपेक्षित संपादणूक पातळीपर्यंत आणावे.

२.

संकलित मूल्यमापन :-

संकलित मूल्यमापन प्रथम व द्वितीय सत्राच्या अखेरीस लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक स्वरूपात करण्यात यावे. लेखी स्वरूपातील साधनांमध्ये मुक्तोत्तरी प्रश्नांचा (Open ended questions) अधिक वापर करण्यात यावा, संविधानातील मूल्ये, गाभाघटक, जीवन कौशल्ये व दूरगामी उद्दिष्टे या संदर्भातील मूल्यमापन होण्याच्या दृष्ट्रीक विवरि करण्यात

१.१ पहिले संकलित मूल्यमापन प्रथम सत्राच्या अखेरीस व दुसरे संकलित मूल्यमापन दद्वितीय सत्रार्थया अखेरीस तोंडी प्रात्यक्षिक वर्ग स्तरावर / शाळा स्तरावर शिक्षक व मुख्याध्यापक योनी ठरवून करब्रि

२.२ संपूर्ण शिक्षणप्रक्रियाच आनंददायी असणे आवश्यक आहे, विद्यार्थ्याला आपली मते मुक्तपणे व सहजतेने देता येतील/व्यक्त करता येतील अशा रीतीने मूल्यमापन करावे. मूल्यमापनामुळे मुलांना भीती, दडपण वाटणार नाही याची दक्षता घ्यावी.

२.३ प्रत्येक शिक्षकाने मूल्यमापन करण्यासाठी विषयांची उद्दिष्टे पाहावीत व त्यानुसार मूल्यमापनाची कार्यपद्धती ठरवावी.

२.४ विहित विषयांचे ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्ये, अभिरुची, अभिवृत्ती, रसग्रहण इत्यादी उद्दिष्टांचे मूल्यमापन करण्यापूर्वी त्या विषयीचा वर्गात आवश्यक तो पुरेसा सराव घ्यावा.

२.५ संकलित मूल्यमापनासाठी प्रश्न तयार करताना सर्व उ‌द्दिष्टांना योग्य प्रमाणात भारांश दयावा. तसेच वस्तुनिष्ठ, लघुत्तरी व दीर्घोत्तरी प्रश्नांसाठी इयत्तानिहाय योग्य प्रमाणात भारांश निश्चित करावा. इयत्ता पहिली दुसरीसाठी व इयत्ता तिसरी-चौथीसाठी वस्तुनिष्ठ व लघुत्तरी प्रश्न अधिक असावेत. इयत्ता पाचवी ते आठवीसाठी वस्तुनिष्ठ, लघुत्तरी व दीर्घोत्तरी प्रश्नांसाठी अनुक्रमे सर्वसाधारणपणे २०%, ६०% व २०% भारांश असावा.

२.६ प्रत्येक शाळेतील त्या त्या वर्गाना शिकविणाऱ्या शिक्षकांनी विषयनिहाय, वर्गनिहाय संकलित मूल्यमापन करावे. कोणत्याहीं अन्य यंत्रणेकडून तयार करण्यात आलेली मूल्यमापनाची साधने-तंत्रे आणि प्रश्नपत्रिका वापरल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

२.७ संकलित मूल्यमापनासाठी साधने तयार करताना विद्यार्थ्यांची चिकित्सक वृत्ती, सर्जनशीलता आणि बहुविध बुद्धिमत्तेला (Multiple intelligence) वाव ठेवावा. त्यासाठी आवश्यकतेनुसार मुक्तोत्तरी प्रश्नांचा (Open Ended Questions) उपयोग करावा. यांत्रिक प्रतिसाद, घोकंपट्टी यावर भर देणाऱ्या आणि स्मरणावर आधारित प्रश्नांना वाव देऊ नये.

२.८ संकलित मूल्यमापनाचे वेळापत्रक वर्ग/शाळा पातळीवर निश्चिंत करावे. मूल्यमापन करताना वेळेबाबत लवचीकता ठेवावी.

२.९ मूल्यमापनातून निदर्शनास आलेल्या उल्लेखनीय बाबी तसेच वैयक्तिक गुणांची आवर्जून दखल घ्यावी आणि विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन अशा गुणांच्या विकासासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन ट्यावे.

२.१० अतिरिवत्त पूरक मार्गदर्शन संकलित मूल्यमापन करताना जे विद्यार्थी संपादणुकीमध्ये मागे असल्या आढळून येईल अशा विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी/त्रुटींचा शोध घ्यावा व त्यानुसार वेळच्यावे विद्यार्थ्यांना वैयक्तिक अथवा गटात अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून त्यांना अपेक्षित संपादणूक पातळीपर्यंत आणावे.

श्रेणी पद्धतीचा वापर

विद्याथ्यांना द्यावयाच्या प्रगतिपत्रकात विद्यार्थ्यांची विषयवार संपादणूक त्यांनी प्राप्त केलेल्या गुणांवरू खालील कोष्टकात दर्शविल्यानुसार श्रेणीमध्ये लिहावी. सर्व विषयांची सरासरी काढून संकलित श्रेणी नोंदवू नये.

विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रकात शैक्षणिक प्रगतीचे वर्णनात्मक फलित नोंदवावे. तसेच त्यामध्ये वैयक्तिक गुणांची (Quality) नोंद करावी. मूल्यमापन करताना सकारात्मक शेऱ्यांचा वापर करावा. तसेच इतर विद्यार्थ्यांर्श तुलना करू नये. पालकांना मुलांच्या प्रगतीबाबत वेळच्यावेळी माहिती द्यावी.

जे विद्यार्थी मूल्यमापनाच्यावेळी अनुपस्थित राहतील त्यांचे पुन्हा मूल्यमापन करण्यात यावे.

* सर्व विद्यार्थी वरच्या श्रेणीकडे वाटचाल करतील यासाठी शाळा व शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे. विशेष करून ‘ड’ व त्याखालील श्रेणींतील विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून किमान ‘क २ श्रेणीपर्यंत आणणे हे शाळा व शिक्षकांवर बंधनकारक राहील. मात्र अशा विद्यार्थ्यांना कोणत्याह परिस्थितीत त्याच इयत्तेत ठेवता येणार नाही.

वरील मूल्यमापन कार्यपद्धती महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्य मान्यताप्राप्त शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना लागू राहील.

सदर शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आता असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक 2010082019134801 असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(ना. ऊ. रौराळे)

उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रति.

मा. मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव

मा. उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव

मा. मंत्री (शा.शि.) यांचे खाजगी सचिव

मा. राज्यमंत्री (शा.शि.) यांचे खाजगी सचिव

मा. मुख्यसचिव, महाराष्ट्र शासन

सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव मंत्रालयीन विभाग

मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), म.रा.पुणे. शिक्षण संचालक (प्राथमिक), म. रा. पुणे

संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे

सर्व जिल्हाधिकारी,

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा

सर्व आयुक्त, महानगरपालिका

सर्व मुख्याधिकारी, नगरपालिका/नगरपरिषदा

सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक

सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक)

सर्व प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ, महानगरपालिका

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई

ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई

आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

निवड नस्ती-प्राशि-५