छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन chatrapati shivaji maharaj snrutidin
*३ एप्रिल १६८०*ही तारीख काही इतर तारखे सारखी सामान्य नव्हे! अगदी मोजक्या असामान्य तारखांपैकीही ती नव्हे! ती त्याहूनही खास आहे! तिचा महिमा अपरंपार आहे, ती तारिख म्हणजे, “महाराष्ट्राच्या कातळ काळजाच्या शाईने सार्वभौम काळाच्या ललाटावर कोरला गेलेला अमीट शिलालेख आहे तो! विशाल सह्याद्रीचे भाळ म्हणजे किल्ले रायगड! त्या भाळाचे कुंकमतिलक म्हणजे स्वराज्य! अन् लालबुंद कुंकूमभरल्या भाळाचे सौभाग्य म्हणजे ‘शिवराय’!!”
अवघ्या अर्धशतकाच्या काळात बालपणातली काही वर्षे सोडली तर स्वराज्याचा वेल लावणे, तो रूजवणे, वाढवणे अनेक परकीय, स्वकीय शत्रूपासून, श्वापदापासून संरक्षिणे ,त्याची फळे मुक्तहस्ते वाटणे, हे केवढे दिव्य! स्वराज्य मोडून पडले, राजा नसला, कितीही विपरित परिस्थिती आली तरी स्वराज्याची उर्मी मनामनात तेवत ठेवणार्ं फिनिक्स पक्षाचं वेड महाराजांनी या सह्याद्रीच्या कुशीत पेरलं. हे महाराजांचं सर्वात अलौकीक काम आहे.. तीस पस्तीस वर्षात अवघ्या जगताच्या कॅनव्हॉन्सवर आपल्या अविश्वसनिय कर्तृत्त्वाचे चित्र रेखाटून शिवराय आजरामर ठरले!
यावश्चंद्रदिवाकरो किर्ती करून पुढच्या पिढ्यांसाठी अपार अभिमान मागे ठेवून शिवराय परलोकी गेले. स्वराज्याच्या अन् लौकिकाच्या ऐन तारूण्यातल्या दुपारी १२ वाजता सूर्य आपले तेजाळ प्रभामंडळ सह्याद्रीवर रोखूण कुणाचीतरी वाट पहात होता.. मलूल झालेला रायगड उन्हाळ्याच्या वणव्यात अनामिक दीवाभितीच्या सावलीला निपचित पडला होता. अलिकडंच नागानं कात टाकून सळसळावं तसं सळसळणारं रायगडाचं सळसळत’ं रुधिर ‘भर उन्हाळ्यातही थिजून गलितगात्र झालं होतं.. नगारखान्याचं वाजनं चमत्कारिक वाटतं होतं, गेले दोन पाच दिवस त्या टिपरातून पडणारा ठोका फक्त भैरवीचा नाद का आळवित होता.. हे रांगड्या रायगडावरच्या भाबड्या मावळ्यांना उमगत नव्हतं! उमगलं तेव्हा उशीर झाला होता. लवकर उमगून तरी काळजीपलिकडं काय केलं असतं त्यांनी? एरवी निर्गुण अन् निराकार जगदिश्वराला कधी नव्हे तो उमाळा दाटून आला होता.. पण प्रभू जगदीश्वराचा उमाळा मंदिराच्या चिरेबंदित विरुण गेला.. स्वराज्याचं ऊर्जस्वल सत्त्व कातळ कड्यावरून परलोकी झेपावलं! काळाची टीकटीक १२ वर येताच निमिषभर स्तब्ध झाली पण.. ती थांबत नसते, कशानेही, कुणासाठीही निमिशमात्रदेखिल! पुढच्या ठोक्यासाठी कालपुरुषाने पाऊल उचललं अन् सह्याद्रीचे सौभाग्य आकाशाच्या निर्वात पोकळीत अनंताच्या प्रवासाला निघाले.. महाराज निघाले!
शंभुराजे पोरके झाले, स्वराज्य ओकंबोकं दिसू लागलं! रयतेचा वाली गेला अन् रयत हवालदिल झाली.. प्रत्येक गडावर चिरान् चिरा पायवाटेच्या धुळीतला कण अन् कण शहारला.. सजीवाचा प्राण अन् चैतन्य निर्जिव पत्थरावर उदाशी पांघरुन अनंतात विलिन झालं. शनिवार, ३ एप्रिल १६८० रोजी शिवराय गेले.
विचार, आचाराची, कर्तुत्व अन् पराक्रमाची सत्वशिलतेची विचारधारा मागे ठेवून गेले. त्या रूपाने ते चिरंजिव ठरले! आपल्या आवतीभोवती आजही आहेत पण लौकिकासाठी आदरांजली अर्पण करु या!
शिवरायांच्या पावण स्मृतीस शतश: मुजरा 🙏🙏🙏
*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..
(19 फेब्रुवारी 1630 ते 03 एप्रिल 1680)
🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
” करु नका एवढ्यात चर्चा पराभवाची
रणात झुंजणारे आहेत अजून काही…
विझून माझी चिता युगे लोटली तरीही
विझायचे राहिले निखारे अजून काही….
जगाच्या मध्ययुगीन इतिहासातील एक भयाण काळाकुट्ट दिवस…
ह्याच दिवशी दगडाचा सह्याद्री अश्रुंनी भिजला होता…
त्या दुर्गेश्वर शिवतीर्थ रायगडाने टाहो फोडला होता !
याचदिवशी शौर्य , धैर्य , पराक्रम , नितीमत्ता , प्रजाप्रेम , स्वातंत्र्य,समता, बंधुता, न्याय यांचा ओजस्वी स्त्रोत असणारे …
गुलामीच्या साखळदंडात अडकलेल्या मानवाला मुक्त करणारे …
सृष्टीचे पालनहार , तारणहार , राजमान्य राजश्री , महापराक्रमी , महाप्रतापी , राजाधिराज , श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन झाले…
सह्याद्रीचा सिंह चिरनिद्रिस्त झाला…
बहुजन प्रतिपालक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र-अभिवादन ….
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏🚩
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
🚩 स्वराज्याचा सूर्य मावळला, पण त्याचं तेज चिरंतन आहे… 🚩
३ एप्रिल १६८० – एक काळीज चिरणारा दिवस…
रायगडावरून एक वादळ अनंतात विलीन झालं, मराठ्यांचा आधारवड कोसळला.
स्वराज्याचं स्वप्न पाहणारा राजा आज इतिहास झाला, पण त्याचा प्रत्येक श्वास या भूमीत अजूनही जिवंत आहे.
महाराज, तुम्ही दिलेला न्याय, शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याचा मंत्र आजही प्रत्येक मराठ्याच्या हृदयात धडधडतो.
तुमच्या जाण्याने डोळ्यात अश्रू असले तरी मनात अभिमान आहे, कारण शिवराय कधीच मरत नाहीत!
तुमची तलवार जरी म्यानात गेली असली, तरी तुमच्या विचारांची धार आजही तशीच तीव्र आहे.
तुमचं जीवन आमच्यासाठी प्रेरणा आहे, आणि तुमचं स्वराज्य आमच्या रक्तात आहे.
महाराज, तुम्ही दिलेला वारसा जिवंत ठेवण्याची शपथ आम्ही घेतो!
शिवराय, तुम्ही अनंत काळासाठी अमर आहात!
🚩 जय भवानी! जय शिवराय! 🚩
छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची निमित्त केले स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक मावळ्यांनी सहकार्य केले छत्रपतींनी अतिशय कमी वयामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली फक्त शपथच नाही घेतली तर ते शपथ सत्यात उतरवली खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ यांना एकत्र केले गोरगरीब तीन दलित सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र केले व स्वराज्य म्हणजे काय याचा अर्थ समजून सांगितला आणि ती स्वराज्य कसे असावे यासंबंधी सर्वांना जाणीव करून दिली स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजेच स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य स्वतः चालवून आपण स्वतः चालवायचे त्याकाळी अनेक राजवटी महाराष्ट्रावर राज्य करत होत्या निजामशाही होती आदिलशाही कुतुबशाही या सर्व मुस्लिम राजवटींनी महाराष्ट्रामध्ये हैदोस घातला होता यामुळे रयत त्रस्त झाली होती या रयतेला मुस्लिम राज्यवटीतून मुक्त करायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची सोबत सर्वांनी करून घ्यायला पाहिजे अशी सर्वांमध्ये भावना निर्माण झाली यातूनच स्वराज्याची स्थापना झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना साठी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली आणि मावळ्यांनी देखील त्यांना जीवास जीव देऊन सहकार्य केले आपल्या कुटुंबाची परवा न करत आपल्या मुलाबाळांची परवा न करता हे स्वराज्य सर्वांसाठी आहे आणि सर्वांनी ही स्वराज्य टिकवले पाहिजे वाढवले पाहिजे अशी भावना निर्माण झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या मार्गदर्शक मासाहेब जिजाऊ होत्या मासाहेब जिजाऊंची शिकवण होती रयतेला त्रासातून मुक्त करा गोरगरिबांना न्याय द्या अशा प्रकारची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणीपासून देण्यात आली होती त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना समान न्याय देऊ शकले छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले बांधले गडावर चोक बंदोबस्त ठेवण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये अनेक मावळे होते ज्यामध्ये सर्व जाती धर्मातील पंथातील मावळे एकमेकांसाठी लढले हिरोजी इंदलकर यांनी रायगड हा किल्ला बांधून काढला रायगड किल्ला बांधून झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी इंदलकर यांना विचारले बोला तुम्ही रायगड बांधून काढला स्वराज्याची राजधानी तुम्ही बांधली भागात मला काय पाहिजे ते मी देण्यास तयार आहे हिरोजी इंदुलकर यांनी महाराजांना एकच मागणी केली ती म्हणजे छत्रपती तुम्ही ज्या वेळेस जगदीश्वराच्या मंदिरात पार पडण्यास त्यावेळेस मंदिराचा उंबरा आणि त्या उंबऱ्याच्या खाली माझे नाव कोरण्याची अनुमती द्यावी बस मला एवढेच पाहिजे हिरोजी इंदुलकर यांनी स्वराज्याची राजधानी बांधली परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची हिरे मानके मोती सोने नाणे पैसा अडका मागितला नाही कारण ही स्वराज्य आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे कार्य हाती घेतले आहे ते सर्वांसाठी आहे त्यामुळे आपणही खारीचा वाटा होईना या स्वराज्यासाठी काही देणं लागतो ही भावना सर्वांमध्ये निर्माण झाली त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजाना चांगले सहकार्य मिळाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक लढाया केल्या या लढाया मध्ये अनेक मावळे धारातीर्थी पडले महाराजांनी प्रत्येक मावळ्याचा विचार करून त्यांच्या कुटुंबीयाप्रती आत्मीयता व्यक्त केली.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली ही स्वराज्याची स्थापना करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली की राजमाता जिजाऊ यांच्याकडून स्वराज्याची संकल्पना मांडली होती ती छत्रपती शहाजी महाराज यांची संकल्पना होती ती संकल्पना आणि प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ वाहिले तेव्हापासून अनेक मावळ्यांना सवंगड्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाया सुरू केल्या अनेक गड किल्ले जिंकले छत्रपती शिवाजी महाराजांनी यामध्ये अनेक आपल्या स्वतःला देखील गमावले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले होते ते स्वराज्य जनतेसाठी आहे असे प्रत्येक मावळ्यामध्ये भावना रुजवली गेली त्यामुळे मावळा हा छत्रपती शिवरायांसाठी तसेच स्वराज्यासाठी मारण्यासाठी तयार झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी हाती घेतलेले कार्य हे आपल्या सर्वांसाठी आहे अशा प्रकारची भावना प्रत्येक मनामनात आणि घराघरात पोहोचली होती त्यामुळे घरातील प्रत्येक जण स्वराज्यामध्ये सहभागी होत होता छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थाने चोख यांचा खूप मोठा बंदोबस्त करावा लागला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी अनेक यातना अनेक लढाया त्यांना भोगावे लागल्या परंतु हाती घेतलेले काम त्यांनी पूर्णत्वास नेले यामध्ये त्यांना अनेक वेळेस माघार देखील घ्यावी लागली परंतु ज्या ज्या वेळेस संधी मिळाली त्या त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाया केल्या गड किल्ले पुन्हा स्वराज्यात आणले छत्रपती शिवाजी महाराजांवरती अनेक प्रसंग आले या प्रसंगातून त्यांनी मार्ग काढत स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक केला यामध्ये स्वराज्याची राजधानी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक संपन्न झाला या राज्याभिषेकासाठी अनेक इंग्रज अधिकारी देखील उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले त्यामध्ये रयत सुखी होती रायतेला मुस्लिम राजवटी पासून होणारा त्रास कमी झाला होता महाराष्ट्रात स्वराज्याकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहत नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये न्याय सर्वांना समान मिळत होता रयत सुखी होती कारण रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राजे होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि ते स्वराज्य वाढवण्याचे काम छत्रपती संभाजी महाराज यांनी केले छत्रपती शिव संभाजी महाराजांनी अनेक वेळा लढाई केले त्या लढाईमध्ये ते कधी हरले नाहीत अजिंक्य राजे म्हणजे छत्रपती शिवाजी संभाजी महाराज होय.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे आरमार उभारले त्यांना माहीत होते की सर्वात मोठा धोका हा समुद्रमार्गाने होऊ शकतो त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारण्याचे ठरवले यामध्ये अनेक जहाजे तयार करण्यात आली समुद्र कनारा सुरक्षित राहावा म्हणून त्यांनी गड किल्ल्याची निर्मिती केली त्यामध्ये सिंधुदुर्ग हा किल्ला देखील त्यांनी बांधून काढला स्वराज्याचे रक्षण करायचे असेल तर गड किल्ले मजबूत करणे गरजेचे होते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले बांधले अनेक गड किल्ले लढाया करून जिंकून घेतले मुघलांकडून निजामाच विरोधात अनेक लढाया केल्या त्यामध्ये अनेक शूरवीर मावळे धारातीर्थी पडले परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना होती ती छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्व रयतेसाठी कार्य करत आहेत त्यामुळे प्रत्येकाने त्यांना साथ देणे गरजेचे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे काम हाती घेतले होते ते सर्वांसाठी होते अशी भावना त्यावेळी प्रत्येकाच्या मनामनात रुजवल्या गेली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नाविक दलाचे निर्माते म्हटले जाते यामध्ये खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनीच नाविक दल उभारले होते.