मराठी सामान्य ज्ञान प्रश्न General knowledge questions

मराठी सामान्य ज्ञान प्रश्न General knowledge questions

1) इटली या देशाची राजधानी कोणती ?

रोम

2) राष्ट्रध्वजावरील कोणता रंग समृद्धीचे प्रतीक आहे ?

हिरवा

3) भारतात सध्या उच्च न्यायालय किती आहेत ? 25

4) नेपाळ या देशाचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?

गाय

5) नवीन 200 रुपयाच्या नोटांवर कशाचे चित्र आहे ?

सांची स्तूप

1) अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?

गुरुशिखर

2) माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 केव्हापासून अंमलात आला ?

17 ऑक्टोबर 2000

3) ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ कोणत्या वर्षांपासून दिला जातो ?

1955

4) देशाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता ?

परमवीर चक्र

5) देशाचा दुसऱ्या क्रमांकाचा खेळ पुरस्कार कोणता ?

अर्जुन पुरस्कार

1) जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?

ग्रीनलँड

2) जर्मनी या देशाची राजधानी कोणती ?

बर्लिन

3) राष्ट्रध्वजावरील कोणता रंग शांतीचे प्रतीक आहे ?

पांढरा

4) राष्ट्रध्वजावरील अशोकचक्रात किती आरे आहेत ?

24 आरे

5) भारतीय चलनी नोटांवर किती भाषांचा उल्लेख आहे ?

15

1) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?

राष्ट्रपती

2) ‘अग्निपंख’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

डॉ ए पी जे अब्दुल कलाम

3) जगातील सर्वात मोठे पठार कोणते ?

तिबेटचे पठार

4) जगातील सर्वात उंच इमारत कोणती ?

बुर्ज खलिफा

5) जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे ?

भारत

1) संसदेच्या प्रथम सभागृहास काय म्हणतात ?

लोकसभा

2) संसदेच्या द्वितीय सभागृहास काय म्हणतात ?

राज्यसभा

3) राज्यसभेचा सभापती कोण असतो ?

उपराष्ट्रपती

4) भारतीय संघराज्याचा प्रमुख कोण असतो ?

राष्ट्रपती

5) राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

5 वर्ष

1) 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण किती आहे ? 940

2) महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या किती ?

67

3) भारतात वनांखालील सर्वाधिक भूभाग कोणत्या राज्यात आहे ?

मध्यप्रदेश

4) ‘जन्मलेल्या शिशूला आरोग्य सुविधा’ हा कोणत्या योजनेचा मुख्य हेतू आहे ?

वात्सल्य योजना

5) 1853 साली सुरू झालेल्या रेल्वेचे पहिले प्रवासी कोण होते ?

नाना शंकरशेठ

1) संविधान समितीत किती सदस्यांचा समावेश होता ?

299

2) संविधानाचा मसुदा कोणी तयार केला ?

डॉ बाबासाहेब आंबेडकर

3) संविधानाच्या प्रस्तावनेला काय म्हणतात ?

प्रास्ताविका / उद्देशपत्रिका

4) लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

5 वर्ष

5) राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

6 वर्ष

1) चोवीस तास ऑक्सिजन पुरवठा करणारा वृक्ष कोणता ?

पिंपळ

2) गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरते ?

लोकसंख्या

3) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ‘उद्योग जिल्हा’ म्हणून घोषित करण्यात आले ?

रायगड

4) ‘राज्यात प्रत्येक गावात एकतरी शाळा असली पाहिजे’ ही आज्ञा कोणी काढली ?

छत्रपती शाहू महाराज

5) भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ?

ज्ञानपीठ पुरस्कार

1) ‘लाल-बाल-पाल’ असे कोणाला म्हटले जाते ? लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बीपीनचंद्र पाल

2) ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

लोकमान्य टिळक

3) ‘भारत सेवक समाजा’ची स्थापना कोणी केली ?

ना गोपालकृष्ण गोखले

4) गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी कोणते गाव निश्चित केले ?

दांडी (गुजरात)

5) ‘स्वातंत्रवीर’ कोणाला म्हटले जाते ?

विनायक दामोदर सावरकर

1) रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते ?

वटवृक्ष

2) भावी पिढीचा शिल्पकार कोणाला म्हटले जाते ?

शिक्षक

3) ‘खेड्याकडे चला’ अशी हाक कोणी दिली ?

महात्मा गांधी

4) ऑलिम्पिक ध्वज सर्वात प्रथम कोणत्या वर्षी फडकविण्यात आले ?

1920 (बेल्जियम)

5) 1 एकर म्हणजे किती आर ?

40 आर

1) मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता ?

चंद्रगुप्त मौर्य

2) प्रसिद्ध लाल किल्ला कोठे आहे ?

दिल्ली

3) शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काशीहून कोणाला बोलावण्यात आले होते ?

गागाभट्ट

4) शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण होता ?

बहिर्जी नाईक

5) ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली ?

इस 1600

1) पंचायत राजची व्यवस्था कोणत्या साली अस्तित्वात आली ?

1962

2) शेतकऱ्यांना 7/12 व 8-अ चे उतारे कोण देतो ?

तलाठी

3) महसूल खाताचा वर्ग-2 चा अधिकारी कोण असतो ?

तहसीलदार

4) ‘तालुका दंडाधिकारी’ म्हणून कोण काम पाहतो ?

तहसीलदार

5) ‘ऑस्कर’ या पुरस्कारासाठी नामांकन झालेला पहिला मराठी चित्रपट कोणता ?

श्वास (2004)

1) भारताची राष्ट्रीय लिपी कोणती ?

देवनागरी

2) भारताचा जगप्रसिद्ध बुद्धीबळपटू कोण ?

विश्वनाथन आनंद

3) 1 टन म्हणजे किती क्विंटल ?

10 क्विंटल

4) पहिली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी झाल्या ?

इस 1896

5) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा मुख्यालय कोठे आहे ?

लुसाने (स्वित्झर्लंड)

1) आशिया खंडातील सर्वात मोठा खत कारखाना कोठे आहे ?

सिंद्री (झारखंड)

2) मुंग्यांच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?

वारूळ

3

) पक्ष्याच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?

घरटे

4) बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय ?

मुरलीधर देविदास आमटे

5) अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय ?

किसन बाबुराव हजारे

1) हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो ?

14 सप्टेंबर

2) केळीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?

तामिळनाडू

3) भारतातील सर्वात लांब धरण कोणते ?

हिराकुंड

4) कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ?

जिराफ

5) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे ?

वाशिंग्टन

1) विधानपरिषदेच्या सभासदांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

6 वर्ष

2) मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोणती ?

औरंगाबाद, नागपूर, पणजी

3) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?

राष्ट्रपती

4) राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण असतो

पोलीस महासंचालक

5) जिल्हा पातळीवर कायदा व सुव्यवस्था कोण पाहतो ?

जिल्हा पोलीस अधीक्षक

1) जागतिक जलदिन केव्हा साजरा केला जातो ?

22 मार्च

2) भारतातील सर्वात मोठा व्याघ्र अभयारण्य कोणता ?

कार्बेट

3) हिवताप कोणत्या डासांमुळे होतो ?

अनाफेलीस डास (मादी)

4) चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त आदिवासी जमात कोणती ?

गोंड

5) लिएण्डर पेस हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

टेनिस

1) ‘राष्ट्रीय युवक दिन’ केव्हा साजरा केला जातो ?

12 जानेवारी

2) विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

5 वर्ष

3) विधानसभेच्या सदस्याला काय म्हणतात ?

आमदार

4) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते ?

नागपूर

5) राज्याचा प्रमुख कोण असतो ?

राज्यपाल

1) ‘जागतिक साक्षरता दिवस’ केव्हा साजरा केला जातो ?

8 सप्टेंबर

2) ‘जागतिक साक्षरता दिवस’ कोणत्या वर्षीपासून साजरा केला जातो ? 1966

3) रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य कोणते ?

स्वावलंबी शिक्षण

4) स्वामी विवेकानंद यांच्या गुरुचे नाव काय ?

रामकृष्ण परमहंस

5) गगन नारंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

शुटींग

1) ‘शिक्षक दिन’ केव्हा साजरा केला जातो ?

5 सप्टेंबर

2) शिक्षक दिन कोणाच्या जन्म दिवसानिमित्त साजरा केला जातो ?

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन

3) जगात किती देशात शिक्षक दिवस साजरा केला जातो ?

100

4) भारतात कोणत्या वर्षी प्रथम शिक्षक दिवस साजरा केला गेला ?

1962

5) डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म केव्हा झाला ?

5 सप्टेंबर 1888

1) भारताच्या एकीकरणाचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?

सरदार पटेल

2) ‘सामाजिक न्याय दिन’ केव्हा साजरा केला जातो ?

26 जून

3) ‘कमवा व शिका’ या संकल्पनेचे जनक कोण ?

कर्मवीर भाऊराव पाटील

4) जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?

राज्यपाल

5) कोणत्या क्रिकेटपटूने एकदिवसीय सामन्यात तीन वेळा द्विशतक झळकविण्याचा पराक्रम केला ?

रोहित शर्मा

1) ‘होमरुल लीग’ ची स्थापना कोणी केली ?

डॉ अँनी बेझंट

2) शिवसेनेचे पक्षप्रमुख कोण आहेत ?

उद्धव ठाकरे

3) वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेत हवेतील कोणता वायू शोषून घेतात ?

कार्बन डायआक्साईड

4) भारतात सर्वप्रथम सूर्योदय व सूर्यास्त कोणत्या राज्यात होते ?

अरुणाचल प्रदेश

5) ‘द वाल’ असे कोणत्या क्रिकेट खेळाडूला म्हटले जाते ?

राहुल द्रविड

1) भारताचे कृषिमंत्री कोण आहेत ?

मा. राधामोहन सिंह

2) ‘देवीची लस’ कोणी शोधून काढली ?

एडवर्ड जेन्नर

3) रक्तगट कोणी शोधून काढले ?

कार्ल लँडस्टेनर

4) भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात ?

लोकमान्य टिळक

5) पी व्ही सिंधू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

बॅडमिंटन

1) महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत ?

भगत सिंह कोश्यारी

2) ‘अँटीरेबीज लस’ कोणी शोधून काढली ?

लुई पाश्चर

3) हृदयरोपणाचे जनक कोणाला म्हटले जाते ?

ख्रिश्चन बर्नाड

4) आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हटले जाते ?

राजाराममोहन राय

5) आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात ?

केशवसुत

1) महाराष्ट्राचे कृषिमंत्री कोण आहेत ?

मा. सदाशिव खोत

2) आनंदवनाची स्थापना कोणी केली ?

बाबा आमटे

3) मुलींची पहिली शाळा कोणी काढली ?

महात्मा फुले

4) ‘पोलिओची लस कोणी शोधून काढली ?

साल्क

5) कर्नाटक या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

नीलकंठ

1) श्वसनासाठी आपण कोणता वायू घेतो ?

ऑक्सिजन

2) ऑलिम्पिक खेळ दर किती वर्षांनी होतात ?

4

3) शरीराच्या हालचालीवर कोण नियंत्रण ठेवतो ?

मेंदू

4) कथकली हे कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ?

केरळ

5) गौतम बुद्धाची जन्मभूमी कोणती ?

लुम्बिनी (नेपाळ)

1) चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती कोण ?

नील आर्मस्ट्राँग

2) भारतात सर्वात शेवटी तयार झालेले राज्य कोणते ?

तेलंगाणा

3) सर्वात जास्त लोकसंख्येचा देश कोणता ?

चीन

4) सूर्य किरणांपासून कोणते जीवनसत्त्व मिळते ?

‘ड’

5) लीप वर्षात किती दिवस असतात ?

366

1) उडीसा या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

मोर

2) शिवाजी महाराजाची समाधी स्थळ कोठे आहे ?

रायगड

3) तापमापकामध्ये कशाचा वापर करतात ?

पारा

4) तंबाखूमध्ये सर्वात जास्त विषारी पदार्थ कोणता ?

निकोटिन

5) भारतीय खेळातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ?

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

1) भारतात केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती आहे ?

9

2) ‘दासबोध’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

समर्थ रामदास

3) शिवाजीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरात घेतली ?

रायरेश्वर मंदिर

4) महाराष्ट्रातील शैक्षणिक शहर कोणते ?

पुणे

5) पहिले सजीव कोठे निर्माण झाले ?

पाण्यात

1) समर्थ रामदासाचे मूळनाव काय होते ?

नारायण

2) शिवाजीचे ‘शिवाजी’ हे नाव कशावरून ठेवले ?

शिवनेरी किल्यावर जन्म झाला म्हणून

3) राष्ट्रध्वजावरील कोणता रंग त्यागाचे प्रतीक आहे ?

केशरी

4) महाराष्ट्रातील सर्वात मोठा उद्योग कोणता ?

कापड

5) भारतातील मानव निर्मित सर्वात मोठी वास्तू कोणती ?

ताजमहाल

1) गुजरात या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

रोहित

2) फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात ?

सुरवंट

3) वाघाच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?

गुहा

4) वर्षातील कोणत्या दिवशी दिवस व रात्र सारखेच असते ?

22 मार्च व 22 सप्टेंबर

5) महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली ?

श्री चक्रधर स्वामी

1) महाराष्ट्राचे राज्यफुलपाखरू कोणते ?

राणी पाकोळी

2) घोड्याच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?

तबेला

3) जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते ?

मौसीनराम व चेरापुंजी (भारत)

4) शुद्ध पाण्याला काय नसते ?

रंग, वास, चव

5) पाण्याच्या अवस्था किती व कोणत्या ?

3 ( स्थायू, द्रव, वायू)

1) ‘टायगर स्टेट’ असे कोणत्या राज्याला म्हणतात ?

मध्यप्रदेश

2) शुद्ध हवेला काय नसते ?

रंग, वास, चव

3) ज्ञानेंद्रिये किती व कोणते ?

5 (डोळे, कान, नाक, जीभ, व त्वचा)

4) ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

महात्मा फुले

5) ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ केव्हा साजरा केला जातो ?

11 नोव्हेंबर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top