तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित मराठी निबंध marathi essay on Gautam Buddha

तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित मराठी निबंध marathi essay on Gautam Buddha

बुद्ध पौर्णिमा मे महिन्यात येते. बुद्ध धम्माच्या अनुयायांसाठी ही सर्वात महत्त्वाची पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला त्रिगुणी पौर्णिमा असे म्हणतात. याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला.

महामाया marathi essay on Gautam Buddhaही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन “भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथात केले आहे. ते लिहितात : “पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्त्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी

आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या

पतीला ती म्हणाली, “माझ्या पित्याच्या देवदहनगरीला मी जाऊ

इच्छिते.” “तुझ्या इच्छेप्रमाणे होईल.” राजाने उत्तर दिले.

“सोन्याच्या पालखीत बसवून शुद्धोदनाने मोठ्या

लवाजम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले.

देवदहला जात असतांना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच

पुष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून

महामायेला जावे लागणार होते. तेच लुंबिनी वन होय.

लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय

अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या

स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते.

बुंध्यापासून फांद्यांच्या शेंड्यांपर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी

ओथंबलेले होते. त्यावर नानारंगांचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र

आवाजात गुंजारव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे

पक्षीगण मंजुळ स्वरालाप काढीत होते. तेथील मनोरम दृश्य

पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार

करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तिने पालखी वाहणा-या

सेवकास आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन

उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले. महामाया

पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या

बुंध्यापाशी चालत गेली. त्या शालवृक्षाच्या फांद्या वा-याच्या

झुळूकीने marathi essay on Gautam Buddhaवर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यांपैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले. सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली. इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली. तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली, आणि अशाप्रकारे हालल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला. त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व ५६३ व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला.

शुद्धोदन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती. परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते. आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धोदनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्हासाने थाटामाटात साजरा केला.

पुत्रजन्माच्या यावेळी कपिलवस्तूचे राजपद भूषविण्याची पाळी शुद्धोदनाची होती. अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले. याच वैशाखी पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम हा वयाच्या ३५ व्या वर्षी गया येथे निरंजना नदीच्या काठी असलेल्या उरुवेला वनामध्ये पिंपळवृक्षाखाली बसला असताना बुद्ध झाला. सिद्धार्थ

गौतमास वैशाखी पौर्णिमेच्या रात्री तिस-या प्रहरी दुःखमुक्तीचे

ज्ञान प्राप्त झाले. त्याच्या मनातील अंधःकार पूर्णपणे दूर झाला

व तो सम्यक संबुद्ध झाला. याच दिवशी सिद्धार्थ गौतमाला चार

आर्यसत्यांची अनुभूती झाली. “भगवान बुद्ध आणि त्यांचा

धम्म” या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ

गौतमाच्या बुद्ध बनण्याच्या प्रक्रियेचे सविस्तर विवेचन केलेले

आहे.

marathi essay on Gautam Buddhaयाच पौर्णिमेच्या दिवशी ख्रिस्तपूर्व ४८३ मध्ये वयाच्या ८० व्या वर्षी सिद्धार्थ गौतम बुद्धाचे मल्ल गणराज्याची राजधानी कुशीनारा येथील शाल वाटीकेत महापरिनिर्वाण झाले.

या पौर्णिमेच्या रात्री तिस-या प्रहरी मनाच्या जागरूक अवस्थेत समाधीचा अभ्यास करताना गौतम बुद्धाचा मृत्यू झाला

गौतम बुद्धाच्या जीवनात जन्म, बुद्धत्वप्राप्ती व महापरिनिर्वाण या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घडल्या आहेत. निसर्गात दुर्मिळ अशाच या घटना आहेत. या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेला घडल्यामुळे या पौर्णिमेस

त्रिगुणी पौर्णिमा असे म्हणतात.

हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे व तो आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला पाहिजे. प्रत्येकाने आपले घर स्वच्छ

केले पाहिजे, सजविले पाहिजे, गोडधोड करून इतरांना वाटले पाहिजे, मित्रांना व नातेवाईकांना आपल्या घरी आमंत्रित केले पाहिजे. मुलांसाठी नवीन कपडे केले पाहिजेत.

अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या त्रिगुणी पौर्णिमेच्या दिवशी अष्टशीलाचे पालन केले पाहिजे. संपूर्ण बुद्ध विहारे व धम्म प्रशिक्षण संस्था यांनी धम्म कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. विहारे सजविली पाहिजेत. धम्म प्रवचने आयोजित केली पाहिजेत व मने उत्साहाने व आनंदाने ओतप्रोत भरलेली असली पाहिजेत.

marathi essay on Gautam Buddhaसणांच्या दिवशी मंगल, सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहीत करणा-या भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांची स्मृती जपण्यासाठी सण साजरे केले जातात. सणांच्या दिवशीच्या भूतकाळातील घडामोडींपासून बोध घेऊन त्यानुसार स्वतःचे जीवन घडविण्यासाठी सण साजरे केले जातात.

बुद्धाने आयुष्यभर शील, समाधी व प्रज्ञेचा मार्ग शिकविला. त्याने करूणा विकसित करण्याचा व समता, स्वातंत्र्य व बंधुत्व यावर आधारित जीवन जगण्याचा धडा लोकांना दिला. त्यामुळे प्रत्येक बुद्ध सणाच्या दिवशी शीलांचे काटेकोरपणे पालन करणे व काया, वाचा व मनाची आपली कृती निष्कलंक व कुशल राहील याची खबरदारी घेणे निकडीचे आहे. सर्व सणांच्या

दिवशी प्रत्येकाचे वर्तन हे बुद्धाच्या शिकवणूकीशी सुसंगत असेच असले पाहिजे. या दिवशी धम्म प्रवचने, परिषदा, कार्यशाळा वेगवेगळ्या भागांमध्ये आयोजित केल्या पाहिजेत आणि लोकांनी धम्म शिकण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून ते स्वतःच्या व इतरांच्या कल्याणासाठी धम्मानुचरण करतील.

सर्व बारा पौर्णिमा बौद्धांचे सण आहेत. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या जीवनातील महत्वाच्या घटना पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या आहेत. बुद्ध धम्मात प्रत्येक पौर्णिमेला वेगळे असे महत्व आहे. या सर्व दिवशी उपोसथ म्हणजेच अष्टशीलाचे गांभीर्याने पालन केले पाहिजे. जेव्हा आपण प्रसन्नतेने अष्टशीलाचे पालन करतो, तेव्हा भूतकाळात त्या दिवशी घडलेल्या महत्वाच्या घटना शील व समाधीचा जास्तीत जास्त धैर्याने अभ्यास करण्याची प्रेरणा आपल्याला देत असतात. त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेचे ऐतिहासिक महत्व समजून घेणे आवश्यक आहे.

marathi essay on Gautam Buddha
marathi essay on Gautam Buddha

2.तथागत गौतम बुद्ध यांच्यावर आधारित मराठी निबंध marathi essay on Gautam Buddha

बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीय लोकांचा सण आहे. सण वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. हा

II बुध्दम् शरणम् गच्छामि II

या दिवशीच तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तिही घटना झालेल्या आहेत [१] आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी बौद्ध धम्म सिद्धांतावरून तथागत बुद्ध विश्वातील सर्वात महान महापुरुष होते, असे मानले जाते. आज बौद्ध धर्माला मानणारे, प्रामुख्याने भारत, चीन, नेपाल, सिंगापूर, व्हियतनाम, थायलंड, जपान, कंबोडिया, मलेशिया, श्रील ंका, म्यानमार, इंडोनेशिया, पाकिस्तान इत्यादी देशांतील १८० कोटींहून अधिक लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.

बिहारमधील बोधगया हे हिंदू व बौद्ध धर्मानुयायांचे पवित्र

तीर्थक्षेत्र आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी

सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर

त्यांना एका-बोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञान प्राप्ती झाली.

ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्ध

पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. [१] बुद्ध पौर्णिमेच्या वेळी कुशीनगर येथे महापरिनिर्वाण विहार एक महिना तथागत गौतम बुद्धांचे स्मरण केले जाते. हे ठिकाण गौतम बुद्ध यांच्याशी संबधित असले तरी आजूबाजूच्या परिसरातीला हिंदू लोक देखील या ठिकाणाला मोठ्या संख्येने भेट देतात. येथील बौद्ध विहारात हिंदूही आस्थापूर्वक पूजा करण्यास येतात. या विहाराचे महत्त्व तथागत गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणा शी जोडले गेले आहे. या विहाराचे स्थापत्य अजिंठा लेण्यांच्या विहारासारखे आहे. या विहारात गौतम बुद्धांची अंतिम क्षणाच्या मृत्यशय्येवर पडलेल्या अवस्थेतील (भू-स्पर्श मुद्रा) ६.१ मीटर लांब मूर्ती आहे. ही मूर्ती लाल मातीच्या प्रकारापासून बनवलेली आहे. हे विहार जेथून मूर्ती काढली आहे तेथेच तयार केले आहे. [३] विहार च्या पूर्व भागात एक स्तूप आहे. तेथे तथागत बुद्धांवर अंतिम संस्कार झाले. श्रीलंका तसेच अन्य दक्षिण-पूर्व आशियायी देशात हा दिवस ‘वेसाक’ उत्सव म्हणून साजरा केला जातो. जो ‘वैशाख’ शब्दाचा अपभ्रंश आहे. [४] या दिवशी बौद्ध अनुयायी घरावर दिवे लावतात. घरे फुलांनी सजवतात. जगभरातून या दिवशी अनुयायी बोधगया येथे येतात आणि प्रार्थना करतात. या दिवशी बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथांचे वाचन, पठन केले जाते. विहार तसेच घरातील बुद्धाच्या मूर्तीची फुले वाहून, दिवे ओवाळून पूजा केली जाते. बोधिवृक्षाचीही पूजा केली जाते आणि त्याच्या फांद्यांना

पताकांनी सुशोभित केले जाते. वृक्षाच्या आसपास दिवे लावले जातात . झाडाच्या मुळाशी दूध आणि सुगंधी पाणी घातले जाते. या दिवशी केलेल्या चांगल्या कामांमुळे पुण्य मिळते अशी समजूत आहे.

या दिवशी दिल्ली येथील संग्रहाल्यातील बुद्धाच्या अस्थी बाहेर सर्वांना दर्शनासाठी ठेवल्या जातात, तिथेही येवून लोक प्रार्थना करतात.

बुद्ध जयंतीचे महत्व

जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुध्दांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.

आरंभीचा प्रथमावस्थेतील बौध्द धर्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्त्वांवर भीस्त ठेवणारा व मानवता, करुणा व समानता यांचा पुरस्कार करणारा असा होता. या काळात बुध्द हा असामान्य गुणवत्ता असलेला, पण मानवदेह धारण करणाराच मानला जात होता. त्यांना बोधीवृक्षाखाली संबोधीज्ञान प्राप्त झाले म्हणजे त्यांना या जगात कोणती

अबाधित सत्ये आहेत व जगाचे रहाटगाडगे कसे चालते, या सबंधीचे ज्ञान प्राप्त झाले. त्यांना प्रथम चार आर्य सत्यांचा साक्षात्कार झाला. जगात खोल दृष्टीने विचार करता व सर्वत्र चालू असलेले भांडण-तंटे, झगडे, हाणामारी हे दृश्य पाहून सर्वत्र दुःख पसरलेले आहे. या पहिल्या आर्य सत्याची जाणीव झाली.

दुःख कशामुळे उत्पन्न होते, यासबंधी विचार करता त्यांना

आढळून आले की, हे सर्व लोभामुळे, तृष्णेमुळे उत्पन्न होते.

एकाच वस्तूबद्दल दोन व्यक्तींच्या मनात तृष्णा उत्पन्न झाली

म्हणजे ती वस्तु स्वतःला मिळविण्याकरीता भांडण-तंटे, झगडा,

हाणामारी आलीच. तेव्हा तृष्णा हे दुःखाचे मूळ आहे, असे दुसरे

आर्य सत्य त्यांना उमजले.

ज्या ज्या गोष्टीला एखादे कारण आहे ती ती गोष्ट, कारण

नाहीसे केले म्हणजे, विरोध पावते, नष्ट होते. हे अबाधित तत्त्व

आहे. म्हणून त्या दुःखाचा निरोधही होऊ शकतो, हे तिसरे आर्य

सत्य त्यांना समजले. निरोध होऊ शकतो तर तो प्राप्त करून

घेण्याचा मार्ग असलाच पाहिजे, हे चौथे आर्य सत्यही त्यांना

कळून आले. यालाच आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतात.

सर्व भारतीय धर्माप्रमाणे बौध्दांचाही कर्मावर व पुनर्जन्मावर विश्वास आहे. तेव्हा हे जन्ममरणाचे रहाटगाडगे कसे चालते, याचे स्पष्टीकरण करणारा प्रतीत्य-समुत्पादही त्यांना समजला. प्रतीत्य-समुत्पाद म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होते ती स्वयंभू नसून काही तरी पूर्वगामी कारण परंपरेवर अवलंबून आहे. तेव्हा जन्ममृत्यु कसे होतात, याचे स्पष्टीकरण करणारी कार्यकारणपरंपरा आहे. एका जन्माचा मागील व पुढील जन्मांशी कार्यकारणपरंपरेने कसा संबंध पोहोचता, हे प्रतीत्य-समुत्पादात सांगितले आहे.

marathi essay on Gautam Buddha
marathi essay on Gautam Buddha

3.तथागत गौतम बुद्ध मराठी निबंध marathi essay on Gautam Buddha

तथागत गौतम बुद्ध (इ.स.पू. 483 – 5.7 * 0.4 ४८३) हे बौद्ध धर्माचे संस्थापक, तत्त्वज्ञ होते. बुद्धांचे मूळ नाव ‘सिद्धार्थ’ होते. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी इ.स.पू. ५६३ मध्ये राजकुमाराचा जन्म लुंबिनी येथे झाला. या राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामायाचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमीने केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण

देण्यात आले. यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा इ.स.पू. ५४७ मध्ये विवाह झाला. त्यांना राहुल नावाचा त्यांना पुत्र झाला..

‘बुद्ध’ हे नाव नाही ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ या शब्दाचा

अर्थ आहे ‘आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी’ आणि ही उपाधी

गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नांनी मिळवली आहे. ‘संबुद्ध’

म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वतः वर विजय

मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी

बुद्ध, आणि ‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान)

प्राप्त असलेला, स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष

उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. बौद्ध अनुयायी लोक

शाक्यमूनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध

म्हणजेच ‘संमासंबुद्ध’ मानतात. जगाच्या इतिहासातील

महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात.

बुद्धांच्या

अनुयायांना बौद्ध किंवा इंग्रजी भाषेत

किंवा बुद्धिस्ट म्हणतात आणि बुद्धांच्या धम्माला (धर्माला

वा तत्त्वज्ञानाला) ‘बौद्ध धर्म’ किंवा ‘बुद्धिझम्’ म्हणतात.

तथागत बुद्धांचा अनुयायांत दोन भाग पडतात. एक

बद्ध भिक्खू – भिक्खूनींचा आणि दुसरा – बौद्ध उपासक

– उपासिकांचा.

आज सर्वच खंडांत भगवान बुद्धांचे अनुयायी आहेत. आशिया खंडात तर बौद्ध धर्म हा मुख्य धर्म आहे. आशिया खंडाची जवळपास अर्धी (४९%) लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. जगभरातील बुद्ध अनुयायांची लोकसंख्या ही १८० कोटी आहे. अनुयायांच्या तुलनेत येशू ख्रिस्तानंतर (२ अब्ज) जगतात सर्वाधिक अनुयायी तथागत बुद्धांना (१.८ अब्ज) लाभलेले आहेत. परंतु भारतातील कोट्यवधी हिंदू धर्मीयांनी तसेच जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी गौतम बुद्धांचे अनुयायित्व पत्करले आहे. या सर्व बुद्ध अनुयायांची एकत्रित लोकसंख्या ही २.३ अब्जांवर आहे. म्हणजेच तथागत बुद्ध जगात सर्वाधिक अनुयायी (२.३ अब्ज) असलेले सर्वाधिक प्रभावशाली धर्म संस्थापक, तत्त्वज्ञ आहेत.

speech on buddhpornima 
speech on buddhpornima

मागील १० हजार वर्षामध्ये ज्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केली अशा जगातील टॉप १०० विश्वमानवांची यादी इंग्लंडमधीलऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केली,

त्या यादीत विद्यापीठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांना ठेवले होते. जगातील पहिल्या १०० अत्यंत महान विश्वमानवांमध्ये बुद्ध प्रथम स्थानी आहेत. आचार्य रजनीश (ओशो) बुद्धांबद्दल म्हणतात की, “बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत निर्माण केला नाही.”

शाक्यमुनी (शाक्यांचा मुनी) – हे गौतमाचेच दुसरे नाव- हा बौद्ध धर्माचा मुख्य स्तंभ. त्यांची जीवनकहाणी, त्यांची प्रवचने आणि त्यांनी घालून दिलेले विहाराचे नियम पवित्र मानून ते त्यांच्या अनुयायांनी गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर संकलित केले. गौतम बुद्धांच्या मानल्या जाणाऱ्या विविध शिकवणुकी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराद्वारे सुपूर्द होत गेल्या. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण ४०० वर्षांनंतर ही शिकवणूक लेखी स्वरूपात प्रथम मांडली गेली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top