महात्मा ज्योतिबा फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य संपूर्ण माहिती mahatma jotiba fule sampurn jivanpat
शालेय जीवनामध्ये तसेच सामाजिक जीवनामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी भाषण करण्याची किंवा निबंध लिहीण्यासाठी ची माहिती आवश्यक असते त्यावेळेस सदर मुद्दे महत्त्वाचे आहेत भाषणासाठी पण आपण चांगल्या प्रकारे तयारी करू शकतो महात्मा फुले जयंतीनिमित्त भाषण असेल निबंध स्पर्धा असेल या सर्व स्पर्धेकरिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेले शैक्षणिक कार्य व सामाजिक कार्य तसेच सनवळ्या त्यांनी लिहिलेली पुस्तके ग्रंथ यांची सर्व माहिती सदर ब्लॉगमध्ये देण्यात आलेली आहे ही माहिती पाठांतर करून किंवा मुद्दे सूट लक्षात ठेवून आपण चांगल्या प्रकारे निबंध स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतो व क्रमांक पटकावू शकतो तसेच भाषण करताना देखील यातील मुद्दे आपल्याला गरजेचे असणार आहेत हे मुद्देसूद भाषण आपण करू शकतो व प्रेक्षकांच्या टाळ्या तसेच पारितोषिके देखील मिळू शकतो त्यासाठी शालेय जीवनामध्ये अत्यंत आवश्यक असे मुद्देसूद मांडणी या ठिकाणी केलेली आहे.
एकोणिसाव्या शतकात अस्पृश्यता निर्मूलन आंदोलनाची पायाभरणी महात्मा फुले यांनी केली. या मुक्ती
संग्रामाचे मूळ स्त्रोत ज्योतीरावांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यातच आढळतात.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी महात्मा फुलेंचा गौरव करताना म्हणतात, हिंदू समाजातील बहुजन समाजात आत्मप्रत्यय व आत्मावलोकन उत्पन्न करणारा पहिला माणूस म्हणजे महात्मा फुले.
• जन्म : ११ एप्रिल १८२७, पुणे. मूळ गाव कटगुण (जि. सातारा) •
मुळ आडनाव : गो-हे
जोतिबा क्षत्रिय माळी समाजातील होते.
जोतिबांचे पूर्वज पुणे येथे फुलांचा व्यवसाय करत, त्यामुळे गोन्हे आडनाव मागे पडून ते फुले बनले..
जोतिबांचे आजोबा : शेरीबा; पिता गोविंदराव, माता चिमणाबाई (जोतिबा १ वर्षाचे असताना मातोश्रींचे निधन
१८४० : वयाच्या १३ व्या वर्षी धनकवडीच्या खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाईंशी विवाह.
१८४१ : उर्दू शिक्षक गफार बेग मुन्शी व धर्मोपदेशक लिजिट साहेच यांच्या प्रयत्नाने जोतिबांच्या शिक्षणास पुन्हा सुरुवात. (पुण्यात स्कॉटिश मिशनरी शाळेत प्रवेश)
महात्मा फुले यांचे समाजकार्य :
अ) स्त्री शिक्षण : जोतिबांनी समाजकार्यास सुरुवात करताना सर्वप्रथम स्त्रीशिक्षणास प्राधान्य दिले.
१८४८ : पुण्यात बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू ३ जुलै १८५१ : बुधवार पेठेतील चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरू.
१७ सप्टेंबर १८५१ : रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा सुरू. ९५ मार्च १८५२ : वेताळ पेठेत मुलींची आणखी एक शाळा सुरू
. ब) विधवा पुनर्विवाह : १८६४: पुण्यातील गोखल्यांच्या बागेत फुल्यांनी पहिला पुनर्विवाह घडवून आणला.
क) बाल हत्याप्रतिबंधक गृहाची स्थापना, १८६३ : चुकून वाकडे पाऊल पडलेल्या विधवांची आपत्तीतून सुटका करण्यासाठी जोतिबांनी स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले.
जोतिबांना अपत्य नव्हते. काशिबाई या विधवेच्या यशवंत या मुलास त्यांनी दत्तक घेतले.
अस्पृश्योद्धार : १८५१ : अस्पृश्यांच्या मुलांसाठी नाना पेठेत पहिली शाळा सुरू, ती बंद पडली.
१८५२ : अस्पृश्यांच्या मुलांसाठी वेताळ पेठेत शाळा सुरू केली.
१८५३ : महार मांग इ. लोकांस विद्या शिकवणारी मंडळी या नावाची संस्था पुण्यात स्थापन केली.
१८५८ : अस्पृश्यांच्या मुलांसाठी तिसरी शाळा सुरू.
महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्यास दक्षिणा प्राइझ फंडातून आर्थिक सहाय्य मिळाले.
१८६८ : स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
१८७३ : म. फुले यांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
म. फुलेंचे शेतकऱ्यांसाठी कार्य :
शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याविषयी जोतिबांनी सरकारला पुढील सूचना केल्या होत्या.
१) तलाव, बंधारे, धरणे बांधून शेतीला योग्य पाणी पुरवठा उपलब्ध करून द्यावा.
२) पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बंदुकीचे परवाने मिळावेत. ३) कालव्याचे पाणी वेळेवर मिळावे.
४) पशुपालनासाठी चालना द्यावी.
५) सुधारित शेतीसाठी सुधारित अवजारे, अल्पव्याजी कर्जे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी. १८७७ च्या दुष्काळात धनकवडी येथे दुष्काळ पीडीत विद्यार्थ्यांसाठी जोतिबांनी कैंप उभारला होता.
१८८८ मध्ये ड्यूक ऑफ कॅनॉट भारताच्या भेटीवर आले असता जोतिरावांनी पारंपरिक शेतकऱ्याच्या वेषात त्यांची पुणे येथे भेट घेऊन भारतीय शेतकऱ्यांच्या हालाखीचे दर्शन घडविले.
• शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथात शिक्षणाअभावी समाजाची कशी परवड होते ते खालीलप्रमाणे स्पष्ट केले आहे. विद्येविना मती गेली। मतीविना नीति गेली। नीतिविना गती गेली। गतीविना वित्त गेले।
वित्ताविना शुद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जोतिबा हे महाराष्ट्रातील पहिले कर्ते सुधारक होते.
शिक्षणविषयक विचार, १८८२ : भारतातील शिक्षणासंबंधी पाहणी करण्यासाठी विल्यम हंटर कमिशन नेमण्यात आले होते.
• जोतिबा फुलेंनी हंटर कमिशन समोर साक्ष देताना पुढील विचार मांडले-
१) सरकार शेतकऱ्यांकडून जो सारा वसूल करते, त्यातील उत्पन्न कनिष्ठांच्या (शेतकरी वर्गाच्या) शिक्षणावर
खर्च केले पाहिजे.
२) १२ वर्षांखालील मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत दिले पाहिजे.
३) प्राथमिक शाळेतील शिक्षक शेतकरी वर्गातील व प्रशिक्षित असावेत.
जोतिबांचे धर्मविषयक विचार जोतिबा कट्टर एकेश्वरवादी होते व ईश्वराचे अस्तित्व मानणारे होते.
जोतिबांनी ईश्वराला निर्मिक असे संबोधले आहे. समतेवर आधारलेल्या मानवधर्माचा जोतिबांनी पुरस्कार केला.
म. फुलेंचे राजकीय विचार : इंग्रजांच्या सामाजिक, शैक्षणिक सुधारणाधोरणामुळे जोतिबांना त्यांच्याबद्दल सहानुभूती
होती; मात्र शासन सत्ता समाजाच्या उन्नतीच्या विशेषतः शेतकऱ्यांच्या हितसंबंधांच्या आड येईल असे वाटले त्या त्या वेळी त्यांनी सरकारवर टीकादेखील केली.
• १८८९ च्या राष्ट्रीय सभेच्या मुंबई येथील अधिवेशनात जोतिबांनी ‘जोपर्यंत शेतकऱ्यांना राष्ट्रीय सभेतसामावून घेतले जात नाही तोपर्यंत राष्ट्रीय म्हणवून घेण्याचा अधिकार सभेस पोहोचत नाही’ असे परखड विचार मांडले.
मुलींसाठी शाळा सुरू करण्याच्या जोतिबांच्या कार्यामागे अहमदनगरच्या मिस फरार या बाईंनी मुलींसाठी सुरू केलेल्या
कैफियत, खतफोडीचे बंड, सत्यशोधक
समाज हे ग्रंथदेखील जोतिबांनी लिहिले.
शाळेची प्रेरणा होती. १६ नोव्हेंबर १८५२: जोतिबांच्या शिक्षण कार्याची दखल घेऊन इंग्रज सरकारने पुण्यातील विश्रामबाग येथे मेजर कॅन्डीच्या हस्ते त्यांचा सत्कार
केला. १८६५ : विधवांच्या केशवपन बंदीसाठी प्रयत्न करताना तळेगाव ढमढेरे येथे न्हाव्यांचा • डिसेंबर १८७३ : मध्ये सिताराम आल्हाट व राधाबाई निंबकर या जोडप्याचा • १८७५: न्या. रानडे यांनी पुण्यात स्वामी दयानंद सरस्वतींची
संप घडवून आणला. सत्यशोधक पद्धतीने विवाह लावला. हत्तीवरून मिरवणूक काढली, त्यावेळी जोतिबांनी
न्या. रानडे यांना सहकार्य केले. • रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा अर्ज जोतिबांनी केला होता
जुन्नर (पुणे) येथील शेतकऱ्यांचा सावकारशाहीविरुद्धचा लढा जोतिबांनी यशस्वी केला. १८७७ च्या दुष्काळात धनकवडी येथे व्हिक्टोरिया बालकाश्रमाची स्थापना केली.
१८७६ ते १८८२ : या काळात फुले पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. नगरसेवक असताना फुलेंनी पुणे मार्केटची इमारत बांधण्यास व लॉर्ड रिपनला मानपत्र देण्यास विरोध दर्शविला
व त्यावरील खर्च शिक्षणासाठी वापरावा, अशी शिफारस केली.
१८७७ : दीनबंधू हे वृत्तपत्र जोतिबांच्या आशिर्वादाने चालू झाले. संपादक कृष्णराव भालेकर स्त्रीशिक्षणाविषयी महत्त्व सांगताना ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी’ असे फुले म्हणत.
आठ वर्षांच्या आतील मुलांना कामावर घेण्यात येऊ नये असे निवेदन जोतिबांनी सरकारला सादर केले. ११ मे १८८८ : मुंबईच्या जनतेच्या वतीने राव बहाद्दूर वडेकर (वड्डेदार) यांनी जोतिबांना महात्मा ही पदवी दिली.
‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा जोतिबांचा शेवटचा धर्मग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला.
पक्षाघातामुळे अंग लुळे पडल्याने जोतिबांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा ग्रंथ काही काळ डाव्या हाताने लिहिला.
सनातन्यांनी जोतिबांना जीवे मारण्यासाठी पाठविलेले रोडे व कुंभार हे रामोशी जोतिबांना शरण आले.
जोतिबांच्या कार्यात त्यांच्या अर्धांगिनी सावित्रीबाई फुले यांनी त्यांना सावलीप्रमाणे साथ दिली. सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत.
१८७६-७७ च्या दुष्काळात पुणे व अहमदनगर जिल्ह्यांत जोतिबांच्या सहकार्याने शेतकऱ्यांनी खतफोडीचे बंड यशस्वी केले.
टिळक व आगरकर यांची डोंगरी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर महात्मा फुलेंनी या द्वयींचा मुंबई येथे सत्कार केला.
जोतिबांवर थॉमस पेन यांच्या ‘राईटस ऑफ मॅन’ या ग्रंथाचा विशेष प्रभाव होता.
शालेय जीवनात जोतिबांवर ‘छ. शिवाजी महाराज’ व ‘जॉर्ज वॉशिंग्टन’ यांच्या चरित्रांचा प्रभाव पडला.
पंडिता रमाबाई यांना धर्मांतरापासून रोखण्याचा प्रयत्न फुल्यांनी केला.
३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन राज्यात ‘स्त्रीमुक्ती दिन’ म्हणून साजरा केला जातो. जोतिबा फुलेंचे निधन : २८ नोव्हेंबर १८९०
समाजातील व्यसनाधिनता दूर करण्यासाठी फुल्यांनी पुण्यातील दारूच्या गुत्त्यांना परवाना देण्यास विरोध केला.
जोतिबांनी मृत्यूपत्रात आपले दहन न करता परसदारी मिठात घालून पुरण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली
होती, मात्र ती पूर्ण होऊ
जोतिबांच्या कार्यात मदत करणारे सहकारी सदाशिव बल्लाळ गावंडे, सखाराम परांजपे, लोखंडे, केशवराव
शकली नाही.
जोतिबांबद्दलचे गौरवोद्गार : ‘ समाजक्रांतिकारक’ • ‘खऱ्या लोकशिक्षणाचा शिल्पकार’ धनंजय किर म्हणतात, “जोतिबा फुले या माळ्याने राष्ट्ररूपी बागेतील सामाजिक एकतेच्या वाढीला विरोध
करणारी तणे, बांडगुळे उपटून तेथे फुलझाडांची उत्तम जोपासना केली.”
भवाळकर, वाळवेकर इत्यादी.
महात्मा गांधी फुलेंविषयी म्हणतात, ‘जोतिबा हे खरे महात्मा होते.’
जोतिबांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून ओळखले जाते.
बडोदाधिपती सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुले यांना हिंदूस्थानचा बुकर वॉशिंग्टन असे संबोधले आहे.
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ‘हू वेअर द शुद्राज?’ (शुद्र कोण होते?) हा ग्रंथ महात्मा फुले यांना समर्पित करून त्यांच्याविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त केलेली आहे
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्वाचे कार्य केलेले आहे ते एक महान समाजसुधारक होते त्यांना महात्मा ही पदवी सामान्य लोकांनी दिली होती महात्मा फुले यांनी श्री शिक्षणासाठी खूप मोठे योगदान दिले तसेच भारतीय शिक्षण पद्धतीची देखील त्यांनी उभारणी केली महात्मा फुले यांनी हंटर कमिशन पुढे साक्ष दिली होती भारतीय शिक्षण इंग्रजी मधून पाहिजे आणि इथल्या लोकांना पण इंग्रजी शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी इंग्रजांकडे मागणी करणारे प्रथम समाज सुधारक म्हणजे महात्मा फुले होय क्रांतीसुर्य महात्मा फुले यांनी खऱ्या अर्थाने भारतीय शिक्षणाचा पाया रसला होता कारण पुण्यामध्ये सर्वात प्रथम मुलींसाठी पहिली शाळा काढणारे क्रांतीसुर्य महात्मा फुले होते या शाळेमध्ये महिला शिक्षिका नसल्यामुळे लोक मुलींना पाठवत नसायचे त्यामुळे महात्मा फुले यांनी आपली पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आदी शिकवले व नंतर त्यांनी इतर मुलींना शिकवले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पहिल्या शिक्षिका म्हणून मान मिळाला भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींसाठी 1848 मध्ये पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरू केली नंतर महात्मा फुले यांनी अनेक मुलांसाठी देखील महात्मा फुले यांनी शाळा सुरू केल्या बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केली तसेच केशव पण या चालीरीती रूढी परंपरा विरोधात मोर्चे बांधणी केली समाजातील विविध चालीरीतींना पाया बंद घालण्यासाठी त्यांनी अनेक सामाजिक चालीरीती बंद केल्या तसेच लोकांना जागृत केले शिक्षणाचे महत्त्व सांगितले शिक्षणाने लोके सुधारतील तसेच समाजामध्ये चांगल्या प्रकारचे जडणघडण होईल अशी धारणा महात्मा फुलेंची होती महात्मा फुले यांनी आपले आयुष्य गोरगरिबांच्या कल्याणासाठी उद्धारासाठी दिन दलितांसाठी वाहिले त्याकाळी महात्मा फुलेंच्या कार्याला विरोध करणारे अनेक लोक होती परंतु त्यांनी त्या व्यक्तींचा कधीही विरोध केला नाही त्यांना त्यांचे काम करू दिले पण आपले चांगले कार्य कधी सोडले नाही क्रांतीसुर्य महात्मा फुले यांनी अनेक पुस्तके लिहिली ग्रंथ लिहिले लोकांसाठी ते ज्ञान खुले करून दिले अनेक लोकांमध्ये बदल झाले तसेच अनेक विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी त्यांनी पाठवले या कार्यामुळे शासनाने देखील त्यांचा गौरव केला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आपण दोन धडाका साजरी करतो अनेक शाळांमध्ये वाचन करून जयंती साजरी केली जाते महात्मा फुले याचे विचार आचरणात आणण्यासाठी विविध प्रकारे भाषण स्पर्धा घेतल्या जातात शिक्षणाचे महत्त्व समजून सांगितले जाते विद्यार्थ्यांना शैक्षणिक गोष्टींची जाणीव करून दिली जाते पूर्वीच्या काळी कशाप्रकारे शिक्षणाची अनास्था होती लोकांचा कशाप्रकारे विरोध होता परंतु या विरोधाला जुगारून महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्ञानाची गंगा गरिबांपर्यंत पोहोचवली त्यामुळे लोक शिकले सुशिक्षित झाले आणि स्वातंत्र्य हा शब्द लोकांना समजला यामुळे लोकांमध्ये जागरूकता आली विविध पदावर लोक नवकार करून लागले खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारतीय शिक्षणाचा पाया रसला असे म्हणता येईल महात्मा फुले यांनी आपले ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक ग्रंथ लिहिले ग्रंथा मधून लोकांना उपचार केले महात्मा फुलेंचा गाजलेला ग्रंथ म्हणजे शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकांमध्ये महात्मा फुलेंनी अनेक मार्मिक गोष्टी सांगितल्या आहेत शेतकऱ्यांना कशाप्रकारे कार्य केले पाहिजे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य खूप मोठे आहे त्यांनी आपल्या कार्यात कधीही कसूर होऊ दिला नाही गोरगरिबांच्या शिक्षणासाठी ते शेवटपर्यंत जगत राहिले लढत राहिले शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी सर्वसामान्य जनतेचा विचार केला आपल्या कुटुंबासहित सर्वांना सुशिक्षित केले स्वतः सुशिक्षित झाले तर समाज सुशिक्षित होईल अशी त्यांची धारणा होती म्हणून त्यांनी सर्वप्रथम आपल्या पत्नीस म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना धडे दिले लिहिणे वाचणे शिकवले म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका झाल्या व त्यांनी आपले कार्य अविरतपणेपणे चालू ठेवले या कार्यामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा गौरव केला जातो आज दीडशे ते 200 वर्षा नंतरही त्यांच्या कार्याचा खूप मोठ्या प्रमाणावर गौरव केला जातो त्याचे कारण एवढेच होते की त्यांनी जे कार्य हाती घेतले होते ते सर्वसामान्य दिन दलित गोरगरिबांच्या शिक्षणासाठी ते लढले यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आपण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करत असतो प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक कार्यालयात त्यांची जयंती साजरी केली जाते पूर्ण देशभरामध्ये उत्सव साजरा केला जातो महात्मा ज्योतिबा फुले हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात त्यांनी कार्य केले पण त्यांच्या कार्याच्या पूर्ण आवाका हा देशाबाहेर पर्यंत पोहोचला होता त्यामुळे अशा या समाजसुधारकास माझे विनम्र अभिवादन