महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एकूण ३८५ पदांची भरती संपुर्ण जाहिरात अर्ज करण्यासाठी लिंक उपलब्ध mpsc recruitment

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एकूण ३८५ पदांची भरती संपुर्ण जाहिरात अर्ज करण्यासाठी लिंक उपलब्ध mpsc recruitment 

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५

जाहिरात क्रमांकः ०१२/२०२५

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण ३८५ पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५, रविवार, दिनांक २८ सप्टेंबर, २०२५ रोजी महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल:-

३. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवगांतील सर्व पदांचा सविस्तर तपशील सोचतच्या परिशिष्ट-एक मध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे.

४. संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे संबंधित सेवेच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येईल. संबंधित

सेवानिहाय मुख्य परीक्षांचा दिनांक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.

५. जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणा-या उमेदवारांकडून विहित पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

६. पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी :-

६.१ पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे.

६.२ प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवगपिकी जाहिरातीच्या दिनांकापर्यंत प्राप्त झालेली पदे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केली आहेत. जाहिरातीमध्ये नमूद सेवा व संवर्गातील पांव्यतिरिक्त प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणा-या उर्वरित संवर्गातील पदांचा तसेच विद्यमान सेवा व संवर्गाव्यतिरिक्त काही नवीन सेवा व संवर्गातील पदांचा नंतरच्या टण्यावर समावेश होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित अतिरिक्त अथवा नवोन सेवा व संवर्गाच्या मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील व अशा सुधारित/अतिरिक्त मागणीपत्रांचा तपशील पूर्व परीक्षेच्या निकाल प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात येईल, त्याच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीला भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

६.३ जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणा-या मागणीपत्रांमध्ये जाहिरातील नमूद नसलेल्या सेवा व संवर्गासाठी तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरीता पदे उपलब्ध होण्याचो आणि विद्यमान सेवेतील व संवर्गातील पदसंख्येमध्ये बदल/वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरीता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित/अतिरिक्त/स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व सेवेतील पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील.

६.४ पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित/अतिरिक्त/स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त सेवा व संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धिपत्रकाद्वारे करण्यात येईल. वास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या कमी असल्यामुळे

अथवा सेवा व संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टण्यावर विचारात घेतली जाणार नाही.

६.५ जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी प्रस्तुत परीक्षा योजनेतील सेवांपैकी नवीन सेवेसाठी शासनाकडून मागणीपत्र प्राप्त झाल्यास सदर सेवेचा समावेश करताना देण्यात येणाऱ्या शुद्धिपत्रकानुसार मूळ जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर केलेल्या संबंधित सेवेसाठो पात्र उमेदवारांकडून सेवेचा विकल्प घेण्यात येईल. नव्याने समाविष्ट केलेल्या संत्रेयावत विकल्प सादर न केल्यास पूर्व परीक्षेकरीता अर्ज करताना दिलेला विकल्प अंतिम समजण्यात येईल व अशा उमेदवारांचा नव्याने समाविष्ट केलेल्या सेवेकरीता विचार केला जाणार नाही

६.६ भरावयाच्या उपरोक्त संवर्ग पदांचा सामाजिक समांतर आरक्षणावाचतचा तपशील शासनाकडून प्राप्त संबंधित मागणीपकानुसार आहे. तसेच, वर नमूद पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल/वाढ होऊ शकेल,

६.७ पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये करण्यात येईल, तसेच याबाबतची घोषणा सूचना वेळोवेळी

आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या घोषणा / सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

६.८ पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित/अतिरिक्त/स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील.

६.९ विविध सामाजिक प्रवर्ग, महिला, प्राविण्यप्राप्त खेळाडू, दिव्यांग व अनाथ इत्यादीसाठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोत्रजी जारी करण्यात येणाऱ्या अत्देशानुसार राहील

६.१० शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग, क्रमांक-महिआ२०२३/प्र.क्र.१२३/कार्या-२. दिनांक ०४ में. २०२३ अन्यये विहित कार्यपद्धतीनुसार अराखीव महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीसाठी, अराखीव महिला तसेच सर्व मागास प्रवगांतील महिलांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर

करण्याची अट रद्द करण्यात आली आहे. ६.११ अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणान्या महिलांना संबंधित मागास प्रवर्गासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन-क्रोमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्याबाबतच्या तरतुदी लागू राहतील.

६.१२ महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणा-या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domiciled) असल्याबाबत तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून इतर सर्व मागास प्रवर्गातील महिलांसाठी नॉन-क्रिमिलेअरमध्ये मोडत असल्याबाबतचा स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे.

६.१३ विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती. (व), भटक्या जमाती (क) व भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.

६.१४ अर्ज करताना एखादी जात/जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यासच तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान कलेल प्रमाणपत्र उमेदवाराकडे उपलब्ध असेल तर संबंधित जात/जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील,

६.१५ समांतर आरक्षणाचाबत शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही १०१२/प्र.क्र.१६/१२/१६.अ. दिनांक १३ ऑगस्ट, २०१४ तसेच शासन शुध्दीपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण- १११८/प्र.क्र.३९/२६-अ. दिनांक १९ डिसेंबर, २०१८ आणि तदनंतर शासनाने पासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.

६.१६ आर्थिकदृ‌ष्टया दुर्वल घटकांतील (इंडनूएस) उमेदवारांकरीता शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांकः राआधी-४०१९/प्र.क्र. ३१/१६-अ, दिनांक १२ फेब्रुवारी, २०१९ व दिनांक ३१ मे, २०२१ आणि तदनंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या अत्देशानुसार कार्यवाहो करण्यात येईल. तसेच सदर संवगांतील उमेदवारांकरीता शासन निर्णयान्वये विहित्त करण्यात आलेले प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.

६.१७ सदर जाहिरात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अधिनियम दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ व संबंधित शासन निर्णय दिनांक २७ फेब्रुवारी, २०२४ संदभर्भात मा. उच्च न्यायालयात दाखल झालेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे. या जाहिराती संबंधित शिफारशी व नियुक्त्या उक्त उल्लेखित न्यायिक प्रकरणाच्या अधीन राहून करण्यात येतील, त्या अनुषंगाने आयोगामार्फत दिनांक २६ एप्रिल, २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले प्रसिद्धीपत्रक जाहीरातीस लागू राहतील.

६.१८ शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांकः बीसीसी/प्र.क्र.७५/१६-क, दिनांक २७ फेब्रुवारी, २०२४ अन्वये सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरीता आरक्षण विहित करण्यात आले असून शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रांक बोसीसी-२०२४/प्र.क्र.७५/आरक्षण-५, दिनांक २८ जून, २०२४ व ०५ जुलै, २०२४ अन्वये विहित करण्यात आलेले जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

६.१९ शासन शुद्धिपत्रक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, क्रमांक संकीर्ण-२०२३/प.क्र.७६/मावक, दिनांक ०९ मार्च, २०२३ अन्वये शासनाकडून नारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्यावाचतची पडताळणी करण्यासाठो सन २०२४-२०२५ व २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाचे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.

६.२० सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या व्योमर्यादमध्ये सवलत घेतलेल्या उमेदवारांचा अराखीव (खुला) पदाचरील निवडीकरीता विचार करणेबाबत शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात येईल. याबावतचा तपशील वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

६.२१ अराखीव (खुला) सर्वसाधारण पदावरील शिफारशीकरीता गुणवत्तेच्या आधारे सर्व उमेदवारांचा (मागासवर्गीय उमेदवारांसह) विचार होत असल्याने, सर्व आरक्षित प्रवगांतील उमेदवारांनी त्यांच्या प्रवगांसाठी पद आरक्षित उपलब्ध नसले तरी, अर्जामध्ये त्यांच्या मूळ प्रवगांसंदर्भातील माहितो अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे.

६.२२ कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय अहे. सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधत्व कायदा १९५० चा कलम २० अनुसार जो अर्थ अहे तोच अर्च असेल.

६.२३ सामाजिक अथवा समांतर आरक्षणाचा अथवा सोयी सवलतीचा दावा करणा-या उमेदवाराकडे संबंधित कायदा नियम / आदेशानुसार विहित नमुन्यातील पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूचीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे. वैध प्रमाणपत्रांचा कालावधी संबंधित शासन आदेशावरील तरतुदीनुसार (लागू असेल त्याप्रमाणे) प्राह्य समजण्यात येईल.

६.२४ सामाजिक व सांत्तर आरक्षणासंदर्भात विविध न्यायालयामध्ये दाखल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदभरतीची कार्यवाही

करण्यात येईल.

६.२५ खेळाडू आरक्षण

६.२५.१ शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः राक्रोयो-२००२/प्र.क्र. ६८/क्रीयुसे-२, दिनांक १ जुलै, २०१६, तसेच शासन शुब्दीपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक: राक्रोधो-२००२/प्र.क्र.६८/कीयुसे-२, दिनांक १८ ऑगस्ट, २०१६, शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक संकीर्ण-१७१६/प्र.क्र.१८/कोयूसे-२, दिनांक ३० जून, २०२२ आणि तदनंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्राविण्य प्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादितील सवलतीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल.

६.२५.२ प्राविण्य प्राप्त खेळाडू व्यक्तीसाठी आरक्षणाचा दावा करणा-या उमेदवारांच्या वाचतीत क्रीडा विषयक विहित अहंता धारण करीत असल्याचाचत सक्षम प्राधिका-याने प्रमाणित केलेले पात्र खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र पूर्व परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचे किंवा तत्पूर्वीचे असणे बंधनकारक आहे.

६.२५.३ खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य दर्जाचे असल्याबाबत तसेच तो खेळाडू उमेदवार खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरीता पात्र ठरतो, याविषयीच्या पडताळणीकरोता त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र संबंधित विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे पूर्व परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या अंतिम

दिनांकापूर्वीच सादर केलेले असणे बंधनकारक आहे. अन्यथा प्राविण्य प्राप्त खेळाडू आरक्षणाकरीता पात्र समजण्यात येणार नाही. ६.२५.४ पूर्व परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचे किचा तत्पूर्वीचे सक्षम क्रोडा प्राधिकरणाने निर्गमित केलेले क्रीडा प्रमाणपत्र सादर केले नसल्यास

आरक्षित पदावर विचार करण्यात येणार नाही.

अथवा सदर प्राधिकरणाकडे झोडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी केलेल्या अर्जाची पोचपावती सादर केली नसल्यास, संबंधित उमेदवाराचा खेळाडूंकरीता ६.२५.५ कागदपत्रे पडताळणी/मुलाखतीच्यावेळी खेळाडू उमेदवारांनी विहित अहंता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिका-याने प्रमाणित केरलेले प्राविण्य

प्रमाणपत्र तसेच त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य असल्याचाचत तसेच खेळाडू कोणत्या संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरीता पात्र ठरतो, याविषयीचा सक्षम प्राधिका-याने प्रदान केलेले प्राविण्य प्रमाणपत्र पडताळणीबाबतचा अहवाल सादर केला तरच उमेदवारांचा संबंधित संवगांतील खेळाडूसाठी आरक्षित पदावर शिफारशी नियुक्तीकरीता विचार करण्यात येईल.

संबंधित उपसंचालक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे.

६.२५.६ एकापेक्षा जास्त खेळांची प्राविण्य प्रमाणगने असणा-या खेळाडू उमेदवाराने एकाच वेळेस सर्व खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे प्रमाणित करण्याकरीता

६.२६ दिव्यांग आरक्षण :-

६.२६.१ दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या आधारे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक दिव्यांग २०१८/प्र.क्र.११४/१६ अ. दिनांक २९ मे, २०१९ तसेच यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुरवर दिव्यांग व्यक्तीच्या आरक्षणासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल.

६.२६. २ प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणा-या विविध संवर्ग पदांकरीता दिव्यांग सुनिश्चिती संदभांतील तपशील सोबतच्या परिशिष्ट-दोन प्रमाणे आहे.

६.२६.३ दिव्यांग व्यक्तीसाठी असलेली पदे भरावयाच्या एकूण पदसंख्येपैकी असतील,

६.२६.४ दिव्यांग व्यक्तींची संबंधित संघर्ग/पदाकरीता पात्रता शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहील.

६.२६.५ दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित पर्यावर शिफारस करताना उमेदवार कोणत्या सामाजिक प्रवर्गातील आहे, याचा विचार न करता दिव्यांग गुणवत्ता

क्रमांकानुसार त्यांची शिफारस करण्यात येईल,

६.२६.६ संबंधित दिव्यांगत्वाच्या प्रकारचे किमान ४०% दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र धारक उमेदवार / व्यक्ती आरक्षण तसेच नियमानुसार अनुज्ञेय सोची।

सचलतीसाठी पात्र असतील,

६.२६.७ लक्षणीय दिव्यांगाच असलेले उमेदवार व्यक्ती खालील सवलतीच्या दाव्यास पात्र असतोल:-

(१) दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४०% अथवा त्यापेक्षा जास्त असल्यास तसेच पद लक्षणीय दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित असल्यास नियमानुसार अनुज्ञेय आरक्षण व इतर सोयी सवलती.

(२) दिव्यांगत्याचे प्रमाण किमान ४०% अथवा त्यापेक्षा जास्त असल्यास तसेच पद संबंधित दिव्यांग प्रकारासाठी सुनिश्चित केले असल्यास नियमानुसार अनुशेब सोयी सवलती.

६.२६.८ लक्षणीय दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या वयोमर्यदिया अथवा इतर कोणत्याही प्रकारचा फायदा घेऊ इच्छिणा-या उमेदवारांनी शासन निर्णय, स्तर्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक अप्रकि-२०१८/प्र.क्र.४६/आरोग्य-६, दिनांक १४ सप्टेंबर, २०१८ मधील आदेशानुसार केंद्र शासनाच्या www.swavlambancard.gov.in अथवा SADM या संगणकीय प्रणालीदवारे वितरित करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणणे अनिवार्य आहे.

६.२६.९ शासन परिपत्रक, दिव्यांग कल्याण विभाग, क्रमांकः दिव्यांग-२०२४/प्र.क्र.८६/दि.क. २. दिनांक २७ जून, २०२४ अन्वये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक १४ सप्टेंबर, २०१८ च्या शासन निर्णयान्वये / भविष्यात वेळोवेळी स्थापन करण्यात आलेल्या / येणाऱ्या वैद्यकीय मंडळामार्फत दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID Card) प्राप्त करुन घेणे अनिवार्य आहे. वैश्विक ओळखपत्र (UDID Card) प्राप्त करुन घेण्यासाठी नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्षात सदर ओळखपत्र प्राप्त होईपर्यन्तच्या कालावधीसाठी दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्वाच्या सवलती / योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांचेकडे असलेले दिव्यांगत्व प्रमाणपत्रासोवत वैश्विक ओळखपत्रासाठीचा नाव नोंदणी क्रमांक (Enrollment Number) सादर करणे अनिवार्य राहील. दिव्यांग उमेदवारांनी अर्ज करताना शासन परिपत्रक, दिव्यांग कल्याण विभाग, क्रमांकः दिव्यांग २०२४/प्र.क्र.८६/ दि.क.२, दिनांक २७ जून, २०२४ मधील सर्व तरतुदींचे अवलोकन करण्यात पावे. त्यातील

तरतुदीनुसार दिव्यांग व्यक्तीच्या आरक्षणासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. ६.२६.१० लक्षणीय दिव्यांगात्च असणा-या उमेदवारांना अर्जामध्ये नमूद केलेला दिव्यांगत्वाचा प्रकार / उप प्रकार बदलणे अनुज्ञेय नाही.

६.२७ दिव्यांग उमेदवार लेखनिक आणि / अथवा अनुग्रह कालावधीबाबत

६.२७.१ लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या उमेदवारांना परीक्षेच्यावेळी लेखनिक व इतर सोयी सवलती उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक दिव्यांग २०१९/प्र.क्र. २००/दि.क. २. दिनांक ०५ ऑक्टोबर, २०२१ अन्वये जारी करण्यात आलेल्या लक्षणीय (Benchmark) दिव्यांग व्यक्तीच्याबाबत लेखी परीक्षा घेण्याबाबतची मार्गदर्शिका-२०२१’ तसेच तदनंतर शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल,

६.२७.२ प्रत्यक्ष परीक्षेच्यावेळी उत्तरे लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या, पात्र दिव्यांग उमेदवारांना, लेखरिकाची मदत आणि अथवा अनुह कालावधीची आवश्यकता असल्यास संबंधित उमेदवाराने ऑनलाईन पध्दतीने आयोगास अर्ज सादर केल्याच्या दिनांकापासून सात (७) दिवसाच्या आत आवश्यक प्रमाणपत्र/कागदपत्रांसह विहित नमुन्यामध्ये आयोगाकडे लेखी विनंती करुन पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.

६.२७.३ लेखनिकाची व्यवस्था उमेदवारांकडून स्वतः केली जाणार आहे की आयोगाच्या कार्यालयामार्फत लेखनिकाची व्यवस्था करावी लागणार आहे, याचा स्पष्ट उल्लेख जाहिरातीस अनुसरुन ऑनलाईन पध्द‌तीने केलेल्या अर्जामध्ये असल्यासच विहित नमुन्याद्वारे प्राप्त लेखो विनंतीचा विचार केला जाईल,

६.२७.४ अर्जामध्ये मागणी केली नसल्यास तसेच आयोगाची विहित पध्दतीने पूर्व परवानगी घेतली नसल्यास ऐनवेळी लेखनिकाची मदत घेता येणार नाही अथवा अनुग्रह कालावधी अनुज्ञेय असणार नाही.

६.२७.५ परीक्षेकरीता लेखनिकाची मदत आणि/अथवा अनुग्रह कालावधीची परवानगी दिलेल्या पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या

संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच लेखनिकाची मदत्त आणि/अथवा अनुग्रह कालावधीच्या परवानगीचाबत संबंधित उमेदवाराला आयोगाकडील नोंदणीकृत ई-मेलवर फळविण्यात येईल.

६.२७.६ प्रत्यक्ष परीक्षेच्यावेळी लेखनिक व अनुग्रह कालावधीचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यापूर्वी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या दिव्यांग उमेदवारांकरीता मार्गदर्शक सूचना चे अवलोकन करणे उमेदवारांचे हिताचे राहील.

६.२८ अनाथ आरक्षण ६.२८.१ अनाथ व्यक्तींचे आरक्षण शासन निर्णय, महिला व बालविकास विभाग, क्रमांक अनाथ-२०२२/प्र.क्र.१२२/का-०३, दिनांक ०६ एप्रिल, २०२३, दिनांक १० मे, २०२३ अनुसार तसेच शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणा-या आदेशानुसार राहील.

६.२८.२ अनाथ आरक्षण धोरण शासन निर्णय, महिला व बालविकास विभाग, पूरक पत्र, क्रमांक अनाथ-२०२२/प्र.क्र.१२२/का-०३, दिनांक १० मे, २०२३ अन्त्रये एखाद्या भरती प्रक्रियेमध्ये अनाथ आरक्षणाच्या एका प्रवर्गासाठी उपलब्ध जागांवर गुणवत्तेनुसार त्या प्रवर्गातील अनाथ उमेदवार पर्याप्त

प्रमाणात उपलब्ध होऊ शकले नाहीत, तर त्या भरती प्रक्रियेमध्ये ती पदे अनाथांच्या दुसऱ्या प्रवर्गातील उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येतील. ६.२८.३ अनाथांसाठी आरक्षित पदावर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गाचा आहे; त्या प्रवर्गातून करण्यात येईल,

६.२८.४ पूर्व परीक्षेच्या अर्जादारे अनाच आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांनी दिनांक ०६ सप्टेंबर, २०२२, दिनांक ०६ एप्रिल, २०२३ आणि दिनांक १० मे, २०२३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे विहित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार विहित नमुन्यातील अनाथ प्रमाणपत्र व महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आयोगाकडून निश्चित करण्यात येणाऱ्या विहित कालावधीत सादर करणे आवश्यक राहील, अन्यथा अनाथ आरक्षणाचा दावा विचारात घेतला जाणार नाही.

७.५.२ महाराष्ट्र वनसेवा :-

(१) वनक्षेत्रपाल गट-व संवर्गाकरीता

(एक) वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्य, उद्यानविद्या शास्व, कृषिशास्त्र, कृषि अभियांत्रिको, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विदयुत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक अॅप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यांपैकी कोणत्याही विषयातील सॉविधिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा

(दोन) विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक,

(तीन) विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवाराने विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

(चार) शासन पत्र, महसूल व वन विभाग, क्रमांक एफएसटी-०२/१५/प्र.क्र.४६/पा-४, दिनांक ११ फेब्रुवारी, २०१६ नुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलि

कम्यूनिकेशन अभियांत्रिकी तसेच संगणक विज्ञान व तंत्रज्ञान अभियांत्रिकी अशी अहंता धारण करणारे उमेदवार बनक्षेत्रपाल पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील.

(पाच) शासन पत्र, महसूल व वन विभाग, क्रमांक एफएसटी-०९/१८/प्र.क्र.३६६/फ-४, दिनांक ८ सप्टेंबर, २०२१ अन्वये प्राप्त अभिप्रायानुसार खालील विद्याशाखेतील पदवीधर उमेदवार पदवीमध्ये गणित विषय घेवून उत्तीर्ण झाले असल्यास व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान शाखेत असल्यास वनक्षेत्रपाल संवर्ग पदासाठी पात्र असतील:-

(1) BE/B.Tech. Automobile Engineering (3) BE/B.Tech. Power. (4) BE/B.Tech. Production, (४) BE/B.Tech. Metallurgy and Material (4) BE/B.Tech. Textile. (5) BE- Information Technology, (৩) RE- Instrumentation, (८) B.Sc. Biotechnology, (९)

B. Pharmacy, (१०) B.Tech. Food Science सहा) वनशास्त्र पदवी प्रवर्गाकरीता आरक्षित असलेल्या वनक्षेत्रपाल पांकरीता वनशास्त्र पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद परिच्छेद

( क्रमांक ७.५.२(१) मधील क्रमांक एक ते पाच मध्ये नमूद अर्हता धारकामधून भरण्यात येईल.

७.५.३ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा:-

(१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्या पदवीशी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम

अहंता.

(२) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकिर्ण-२०१३(४५/१३)/भाग-१/तांशि-२, दिनांक १८ ऑक्टोबर, २०१६ नुसार खालील शैक्षणिक अहंता स्थापत्य अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाशी समतुल्य आहेतः-

(35) B.E./B. Tech. (Civil and Water Management) (4) B.E./B. Tech. (Civil and Environmental) (3)B.E./B. Tech. (Construction Engineering/Technology)

(फ) B.E/B.Tech. (Structural)

७.५.४ मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

७.५.५ पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अहंताप्राप्त उरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिचार्य राहील.

७.५.६ आंतवर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पच्ची धारकाने शैक्षणिक अर्हतेबाबतची अट मुख्य परीक्षेची

माहिती/अर्ज स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केलो असली पाहिजे,

७.६ अहंता/पात्रता गणण्याचा दिनांक:-

मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठो विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे.

७.७ शारीरिक मोजमापे/अर्हता :-

७.८ राज्य सेवा मुख्य परीक्षेतोल विविध संवर्गाच्या मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणी मुलाखतीपूर्वी किंवा मुलाखतीनंतर प्राधिकृत

वैद्यकीय मंडळाकडून आयोजित करण्यात येईल. यासंबंधीची माहिती स्वतंत्रपणे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. तसेच सदर वैद्यकीय चाचणीमध्ये त्याच्याशी संबंधित संवर्गाच्या मानक निकषनुसार उमेदवारांची पात्रता निर्धारित केली जाईल, आणि त्यानुसार पसंतीक्रम निश्चित केला जाईल.

७.९ मुख्य परीक्षेच्या अर्जातील माहिती आणि शारीरिक मोजमाप लक्षात घेऊन लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारावर उमेदवाराची वैद्यकीय चाचणीसाठी पात्रता ठरवली जाईल.

७.१० ज्या संवर्गाकरीता शारिरीक अहेता आवश्यक आहे, अशा पदांसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची नियुक्ती करण्यापूर्वी त्यांची शारीरिक

मोजमापे शासनाच्या संबंधित विभागाद्वारे सक्षम प्राधिका-याकडून तपासून घेतली जातील,

७.११ एखाद्या संवर्गाकरीता विहित/आवश्यक शारीरिक मोजमापे पूर्ण न भरल्यास उमेदवार संबंधित संवर्गामध्ये नियुक्तीसाठी अपात्र ठरेल.

७.१२ शासनाच्या सूचनेनुसार सेवा संवर्ग वाढण्याची शक्यता विचारात घेता विद्यमान जाहिरातीमध्ये समाविष्ट नसलेल्या सेवा संवर्गाची अर्हता परीक्षा

योजनेमवोल परिच्छेद ३.३ अनुसार राहील.

८. निवडप्रकिया:-

८.१ जाहिरातीमध्ये नमूद अहंता/पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली महणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही. ८.२ सेवा भरती बाबतची संपूर्ण प्रक्रिया संबंधित संवर्ग/पदाच्या सेवाप्रवेश नियम आणि या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा, आरक्षणासंदर्भातील शासनाचे प्रचलित धोरण तसेच आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार राबविण्यात येईल.

९. परीक्षेचे टप्पे :-

९.१ प्रस्तुल परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवगांकरीता भरती प्रक्रिया खालीलप्रमाणे त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या टण्यामध्ये राबविण्यात येईल

९.२ राज्य सेवा मुख्य परीक्षा सुधारित पद्धतीनुसार वर्णनात्मक स्वरुपाची घेण्यात येणार असून प्रस्तुत परीक्षेचा सविस्तर तपशील आयोगाच्या

संकेतस्थळावरील परीक्षा योजना व अभ्यासक्रम या सदरामध्ये नमूद आहेत.

९.३ संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज करणा-या उमेदवारांना, शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र असल्यास ते वरीलपैकी एकापेक्षा जास्त संवर्ग/सेवेसाठी बसू इच्छितात किंवा कसे याबाबत विकल्प (Option) द्यावा लागेल,

९.४ संबंधित संवर्गाच्या पदभरतीकरीता उमेदवाराने दिलेलाले विकल्प हा हे संबंधीत संवर्ग भरतीच्या परीक्षेसाठी अर्ज समजण्यात येईल/येतील.

१.५ राज्य सेवा मुख्य परीक्षा व वनसेवा मुख्य परीक्षेकरीता वैकल्पिक विषयांची निवड करण्यासाठी, पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करताना वैकल्पिक विषय निवडणे व नमूद करणे अनिवार्य आहे. सदर निवडलेल्या व नमूद केलेल्या वैकल्पिक विषयामध्ये बदल करण्याची विनंती पूर्व परीक्षेकरीता अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही टप्प्यावर मान्य करण्यात येणार नाही.

९.६ संयुक्त पूर्व परीक्षेस अर्ज करताना सेवेसाठी दिलेला विकल्प तसेच, संबंधित संवर्गाच्या परीक्षेमधून भरावयाची पदसंख्या लक्षात घेऊन मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करण्यात येते. तसेच सामाईक पूर्व परीक्षेमधील गुणांच्या पात्रतेच्या आधारे उमेदवारांनी दिलेल्या विकल्पानुसार प्रत्येक सेवानिहाय स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल.

९.७ आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजना/पद्धती तसेच अभ्यासक्रमानुसार भरतीप्रक्रिया

व निकाल प्रक्रिया राबविण्यात येईल.

१०. पूर्व परीक्षेकरीता अर्ज करण्याची पध्दत

१०.१ अर्ज सादर करण्याचे टाये :-

(एक) खाते निर्माण करणे अथवा आवश्यक असल्यास खाते अद्ययावत करणे,

(दोन) पूर्व परीक्षेस अर्ज करताना सेवा व संवर्गाचा विकल्प देणे तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षा व वन सेवा मुख्य परीक्षा करीता वैकल्पिक

विषयांची निवड करणे व भाषेचे माध्यम निवडणे.

(तीन) विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने खालीलप्रमाणे लागू असेल त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अर्ज सादर करणे,

(चार) परीक्षा शुल्काचा भरणा विहित्त पध्दतीने करणे.

(पाच) जिल्हा केंद्र निवड करणे,

१०.२ विहित कागदपत्रे/प्रमाणपत्रे अपलोड करणे:

(एक) प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाच्यांच्या अनुषंगाने पूर्व परीक्षेकरीता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक व अनाथ

आरक्षणाचा दावा करणान्या उमेदवारांव्यतिरिक्त अन्य उमेदवारांना कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

(दोन) खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक व अनाथ आरक्षणाचा दावा करणान्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर (Check eligibility) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे प्रमाणपत्र (लागू असलेली) अपलोड करणे अनिवार्य

(तीन) उपरोक्त प्रमाणपत्र/कागदपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना प्रकरण क्रमांक चार तसेच प्रस्तुत

जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे,

(चार) खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक व अनाथ आरक्षणाच्या सवलतीच्या दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.

१०.३ सर्वसाधारण:-

(एक) अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.

(दोन) अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ https://mpsconline.gov.in

(लीन) अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच [utps://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. (

चार) आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही,

१०.४ जिल्हा केंद्र निवड:-

(एक) अर्ज सादर करतानाच जिल्हा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.

(दोन) जिल्हा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही

(तीन) एखादे जिल्हा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा केंद्रांवर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर ते जिल्हाकेंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था जवळच्या दुस-या जिल्हा केंद्रावर करण्यात येईल.

(चार) एकदा निवडलेल्या अथवा आयोगाने निश्चित केलेले जिल्हा केंद्र परीक्षा उपकेंद्र यामध्ये बदल करण्याची विनंती कोणत्याही कारणास्तव

मान्य करण्यात येणार नाही.

(पाच) वरीलप्रमाणे जिल्हा केंद्रनिवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जामध्ये दिलेल्या कायमस्वरुपी रहिवासाच्या पत्त्याच्या आधारे संबंधित महसुली मुख्यालयाच्या जिल्हाकेंद्रावर किंवा नजिकच्या जिल्हाकेंद्रावर प्रवेश देण्यात येईल याबाबत आयोगाचे त्या त्या वेळचे धोरण व आयोगाचा निर्णय अंतिम मानण्यात येईल,

२०.५ परीक्षा शुल्काचा भरणाः-

१०.५.१ परीक्षा शुल्क (रुपये):

(एक) अमागास – रु. ५४४/-

(दोन) मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग रु. ३४४/-

(तीन) उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बैंक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.

१०.५.३ परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.

१०.५.४ अर्ज सादरीकरणाचे टप्पे पूर्ण झाल्यावर उपलब्ध होणान्या ‘Submit and Pay foes’ या बटनवर क्लिक केल्यानंतर किचा मुख पृष्ठावरील माझे खाते या सदराखालील अर्ज केलेल्या पदांच्या यादीतील ‘Fees not Paid अशी सद्यस्थिती लिहिलेल्या जाहिरात/पद/परीक्षेसमोरील Pay Noa’ या लिकवर क्लिक करुन परीक्षा शुल्काचा भरणा करता येईल.

१०.५.५ परीक्षा शुल्काचा भरणा खालोल दोन पध्दतीने करता येईल:-

(एक) ऑनलाईन पध्दतीने :-

(१) भारतीय स्टेट बैंक तसेच प्रणालीद्वारे उपलब्ध करुन दिलेल्या कोणत्याही एका पेमेंट गेटवेच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अथवा नेटवंकिंगद्वारे परीक्षा शुल्क अदा करता येईल.

(२) परीक्षा शुल्काचा भरणा करताना बँक खात्यामधून परीक्षा शुल्काच्या रकमेची वजावट झाल्यावर परीक्षा शुल्काचा भरणा चशस्वीपणे झाला (Payment Successful) असल्याचा संदेश आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या पृष्ठावर प्रदर्शित झाल्याशिवाय व परीक्षा शुल्काची पावती तयार झाल्याशिवाय संकेतस्थळावरील संबंधित पृष्ठावरून आणि/अथवा खात्यातून लॉग आऊट होऊ नये,

(३) परीक्षा शुल्काचा भरणा केल्यानंतर उमेदवाराला त्याच्या प्रोफाईलमध्ये परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वी झाला आहे किवा कसे, याची स्थित्ती (status) लगेचच अवगत होईल. खात्यातून Logout होण्यापूर्वी परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बँकेकडून व्यवहार (Transaction) पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी उमेदवाराची आहे.

( ४) कोणात्याही कारणामुळे विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीपणे करणे शक्य न झाल्यास अर्ज करण्याच्या

अंतिम दिनांकानंतर दोन दिवसापर्यंत परीक्षाशुल्काचा भरणा ऑफलाईन पद्धतीने करण्याकरीता चलनाची प्रत घेता येईल.

(दोन) ऑफलाईन पध्दतीने: चलनाद्वारे

चलनाद्वारे परीक्षा शुल्काचा भरणा करण्याचा विकल्प निवडल्यास उपलब्ध होणारी चलनाची प्रत घेऊन भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही

शाखेत बँकेच्या कार्यालयीन वेळेत्त विहित ऑतम दिनांकापूर्वी परीक्षा शुल्काचा भरणा करता येईल. तथापि, चलनाची प्रत घेणे व बँकेस

शुल्क जमा करणे, यामध्ये किमान तीन तासांचे कालावधी राहील, याची दक्षता घ्यावी.

१०.५.६ परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वी न झाल्यास पुन्हा शुल्क भरण्याची अथवा चलन घेण्यावाचतची कार्यवाही प्रस्तुत जाहिरातीच्या/अधिसूचनेच्या

अनुषंगाने चिहित दिनांकापूर्वीच करणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणास्तव व्यवहार अयशस्वी उरल्यास यासंदर्भातील तक्रारीची

आयोगाकडून दखल घेतली जाणार नाही,

१०.५.७ विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित भरतीप्रक्रियेकरीता विचार केला जाणार नाही. यासंदर्भात

आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचनांमधील संबंधित तरतुदीचे अवलोकन करणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

११. मुख्य परीक्षेस प्रवेश:-

११.१ मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी आयोगाकडून निश्चित केलेल्या गुणांची किमान सीमांकन रेषा व मर्यादनुसार मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी

अर्हताप्राप्त वरणान्या तसेच जाहिरात/अधिसूचनेतील तरतुदीनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता व अन्य अटींची पूर्तता करणा-या

उमेदवारांस मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल.

११.२ मुख्य परीक्षेकरीता आयोगाच्या कार्यालयाकडून अधिसूचना निर्गमित झाल्यानंतर आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळाद्वारे

मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईलदारे अर्ज करता येईल. त्यावेळी मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी आयोगाने विहित केलेल्या पद्धतीने परीक्षा केंद्र निवडून परीक्षा-शुल्क विहित मुदतीत सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या

प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही.

११.३ मुख्य परीक्षेच्या जाहिरात/अधिसूचनेस अनुसरून अर्ज सादर करताना उमेदवारास ज्या परीक्षेकरीता अर्ज सादर करावयाचा असेल त्या परीक्षेलील/सेवेतील संवर्गाचा पसंतीक्रम मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करतेवेळी नमूद करणे अनिवार्य राहील.

११.४ संबंधित सेवेच्या/संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारास प्रत्येक सेवेसाठी संवर्गासाठी घेण्यात येणाच्या मुख्य परीक्षेकरीता त्रिहित पद्धतीने स्वतंत्रपणे अर्ज सादर करून प्रत्येक परोक्षेसाठी स्वतंत्र विहित परीक्षा शुल्क भरावे लागेल.

११.५ जाहिरातीस अनुसरून पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्ज करतेवेळी आवश्यक ती शैक्षणिक अर्हता नसल्यास व मुख्य परीक्षेकरीता आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत संबंधित शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यास, अशा उमेदवाराला शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्याचा दिनांक नमूद करता येईल. याव्यतिरिक्त पूर्व परीक्षेच्या अर्जामधील इतर कोणत्याही दाव्यामध्ये बदल करता येणार नाही.

१२. सेवाप्रवेशोत्तर शती:-

१२.१ नियुक्त झालेल्या व्यक्तीस खालील अहंता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहोल

(एक) जेथे प्रचलित नियमानुसार विभागीय व्यावसाविक परीक्षा विहित केली असेल अथवा आवश्यथवा असेल तेथे त्यासंबंधी केलेल्या

नियमानुसार विभागीय व्यावसायिक परीक्षा

(दोन) हिंदी आणि मराठी भाषा परीक्षेसंबंधी केलेल्या नियमानुसार जर ती व्यक्ती अगोदर परीक्षा उत्तीर्ण झाली नसेल किंवा तिला उत्तीर्ण

होण्यापासून सूट मिळाली नसेल तर ती परीक्षा

(तीन) शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.), क्रमांकः मातंर्स-२०१२/प्र.क्र. २७७/३९, दिनांक ०४ फेब्रुवारी, २०१३, शासन पुरकपत्र, क्रमांक मार्तसं-२०१२/प्रक्र.२७७/३९, दिनांक ०८ जानेवारी, २०१८ व १६ जुलै, २०२१ अथवा महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने यासंदर्भात वेळोवेळी विहित केलेली संगणक हाताळणीबायतची प्रमाणापत्र परीक्षा

१२.२ शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक टीआरएन ००५१४/प्र.क्र.७/१४/१८-ब, दिनांक २४ एप्रिल, २०१५ अन्वये निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दतीनुसार राज्य सेवा परीक्षेतून परिविक्षायीन नियुक्तीवर रुजू होणा-या उमेदवारांस उराविक रकमेचे बंधपत्र (Bood) देणे

आवश्यक राहील,

१२.३ महाराष्ट्र नागरी सेवा (महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत येण्यात येणा-या राज्य सेवा परीक्षेद्वारे गट “अ” आणि गट-व” (राजपत्रित), वा

पदाकरीता निवड होऊन सरळसेवेने नियुक्त होणा-या व एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण घेणा-या उमेदवारांची सेवा ज्येष्ठता निश्चित करणे) नियम, २०१५ तसेच तद्नंतर शासनाकडून यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, निषड झालेल्या उमेदवारांची संबंधित संवर्गातील परस्पर सेवा ज्येष्ठता निश्चित करण्यात येईल.

१२.४ कक्ष अधिकारी गट-ब हे पद वगळता इतर संवर्ग पदांकरीता ‘महाराष्ट्र शासकीय गट-अ व गट-ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसुली विभाग वाटप नियम, २०२१० तसेच तद्नंतर यासंदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार विभाग वाटपाचाबतची कार्यवाही शासनाकडून करण्यात येईल.

१२.५ शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांकः परिची-२७१५/प्र.क्र.३०२/कार्या ८. दिनांक २२ जून, २०२१ अन्वये विहित करण्यात

आलेल्या कार्यपद्धतीनुसार परिवीक्षा धोरणासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल.

१२.६ वनक्षेत्रपाल, गट-ब पदाकरीता परिविक्षाधीन कालावधी ३ वर्षांचा असेल.

१२.७ वनक्षेत्रपाल, गट-ब पदावर नियुक्त उमेदवाराने केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या बनशास्त्र प्रशिक्षण महाविदयालयातील दीड वर्ष कालावधीचे प्रशिक्षण तसेच प्रधान मुख्य वन संरक्षक किंवा मुख्य वनसंरक्षक यांनी विहित केलेले दीड वर्षाचे क्षेत्रीय प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणे व विहित विभागीय परीक्षा उत्तीर्ण करणे आणि परिविक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील.

१३. प्रवेशप्रमाणपत्र:

१३.१ परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशप्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर (https://mpsconline.gov.in) उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे परीक्षेपूर्वी सर्वसाधारणपणे ७ दिवस अगोदर उपलब्ध करुन देण्यात येईल. प्रवेशप्रमाणपत्र परीक्षेपूर्वी डाऊनलोड करुन घेणे व परीक्षेच्या वेळी डाऊनलोड केलेले मूळ प्रवेश प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

१३.२ परीक्षेच्या वेळी उमेदवाराने स्वतःचे प्रवेशप्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे. त्याशिवाय, परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.

१३.३ प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर उमेदवाराला त्याच्या आयोगाकडील नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे कळविण्यात येईल, याबाबतची घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर परीक्षेपूर्वी एक सप्ताह अगोदर प्रसिद्ध करण्यात येईल,

१३.४ परीक्षेच्या दिनांकापूर्वी ३ दिवस अगोदर प्रवेश प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास अर्ज सादर केल्याच्या आवश्यक पुराव्यासह आयोगाच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा,

१३.५ परीक्षेच्यावेळो स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतः चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसेन्स वापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.

१३.६ आधार कार्डच्या ऐवनी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड केलेले ई-आधार सादर करणा-या उमेदवारांच्या बाबतील ई-आधार वर उमेदवाराचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्मदिनांक या तपशीलासह आधार निर्मितीचा दिनांक (Date of Aadhaar generation) व आधार डाऊनलोड केल्याचा दिनांक असल्यासच तसेच सुस्पष्ट फोटोसह रंगीत प्रिंट मध्ये आधार डाऊनलोड केले असल्यासच ई-आधार वैध मानण्यात येईल.

१३.७ नावांमध्ये चदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला (विवाहित स्त्रियांच्या बाबतीत), नावांत बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र किया राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावांत बदल झाल्यासंबंधीचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्यावेळी सादर करणे आवश्यक आहे…

१४. परीक्षेस प्रवेश

संबंधित परीक्षेच्या प्रवेश प्रमाणपत्रवर नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून उमेदवारांना परीक्षेच्या उपस्थितीसाठी पात्र समजण्यात येईल,

१५. प्रस्तुत जाहिरातीमध्ये परीक्षेसंदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे. अर्ज स्वीकारण्याची पध्दत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा योजना, अभ्यासक्रम इत्यादीबाबतच्या सविस्तर तपशिलासाठी आगोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील उमेदवारांकरीता माहिती विभागातील सूचना अंतर्गत सर्वसाधारण सूचना तसेच परीक्षा या सदराखालील परीक्षा योजना” विभागातील महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीचे कृपया अवलोकन करावे. १६. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ च्या आयोजनाच्या दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारास कोणती परीक्षा

द्यावयाची आहे, याबाबतचा निर्णय उमेदवाराने स्वतः पेणे आवश्यक राहील.

१७. पदभरतीसंदर्भात काही अनुचित प्रकार पडल्यास महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) अधिनियम, २०२४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून कार्यवाही करण्यात येईल.

१८. आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली माहिती जाहिरात अधिकृत समजण्यात येईल.

१९. सदर जाहिरात आयोगाच्या https://mpsc.gov.in तसेच https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग जाहिरात येथे पहा