महाराष्ट्र राज्य मुक्तविद्यालय मंडळाद्वारे दिल्या जाणा-या शैक्षणिक संधी व सुविधांचा प्रचार व प्रसिध्दी करणेबाबत muktamaha vidhyalay
संदर्भः- क्र.रा.नं. / संशोधन/भु.वि.नं./2024/3481, दिनांक 03/09/2024 चे परिपत्रक.
महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णय क. ममुवि 2016/प्र.क्र.08/ एस.डी.2 दिनांक 21 डिसेंबर 2018 द्वारे महाराष्ट्र राज्य मुक्त्त विद्यालय मंडळाची ओपन बोर्ड स्थापना करण्यात आली आहे. या शासन निर्णयानुसार औपचारिक शिक्षण न घेतलेल्या किंवा काही कारणाने औपचारिक शिक्षण अपुर्ण राहिलेल्या, जे दिव्यांग विद्यार्थी नियमित शाळेतील औपचारिक शिक्षण घेण्यास असमर्थ आहेत, तसेच ज्या विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षणाच्या व्यतिरिक्त इतर विषयांचे शिक्षण घ्यायचे आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना / व्यक्तींना पर्यायी शिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सद्यस्थितीत इयत्ता पाचवी व
इयत्ता आठवीसाठी, प्रवेश दिले जात असून लवकरच इयत्ता दहावी व बारावीसाठी प्रवेश उपलब्ध करून दिले जाणार आहे,
या सोबत महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाची माहितीपुस्तिका पाठविण्यात येत असुन, त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
महाराष्ट्र राज्यात शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णय क्र. ममुवि २०१६/ प्र.क्र. ०८/ एस. डी. २ दिनांक २१ डिसेंबर २०१८ व्दारे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाची (ओपन बोर्ड) स्थापना करण्यात आली आहे. या शासन निर्णयानुसार औपचारिक शिक्षण न घेतलेल्या किंवा काही कारणाने औपचारिक शिक्षण अपूर्ण राहिलेल्या, जे दिव्यांग विद्यार्थी नियमित शाळेतील औपचारिक शिक्षण घेण्यास असमर्थ आहेत, तसेच ज्या विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षणाच्या व्यतिरिक्त इतर विषयांचे शिक्षण घ्यायचे आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना/व्यक्तींना पर्यायी शिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे.
* मुक्त विद्यालयाची वैशिष्ट्ये
१. नियमित शिक्षणाच्या समकक्ष.
२. मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमातून सोय.
३. शासन मान्यताप्राप्त शाळांतील संपर्क केंद्रातून सोयीच्या वेळेनुसार शिक्षण घेण्याची संधी.
४. यापूर्वी कोणतेही शिक्षण झाले नसेल तरीही इयत्ता पाचवी, आठवीला वयाच्या
अटीनुसार प्रवेश. ५. लवकरच इयत्ता दहावी व बारावीचे प्रवेश प्रस्तावित.
६. शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या प्रौढ व्यक्ती, दिव्यांग मुले, गृहिणी, कामगार, खेळाडू यांच्यासाठी अधिक सोयीचे.
७. विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य. तांत्रिक शिक्षण व कौशल्य विकास विभागाच्या
वतीने चालवले जाणारे व्यावसायिक विषय उपलब्ध.
८ . दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष विषय योजना.
९. संचित मूल्यांकनाची व्यवस्था (Transfer of Credit).
* समकक्षता *
सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळातून (MSBOS) प्राथमिक (इयत्ता पाचवी), उच्च प्राथमिक (इयत्ता आठवी) परीक्षांना प्रवेश दिला जातो. पुढील काळात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) प्रवेश देणे प्रस्तावित आहे. सदर परीक्षांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (SSC व HSC बोर्ड) नियमित परीक्षांची समकक्षता राहील. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या परीक्षा देवून पुढील शिक्षणासाठी राज्यात, देशात, परदेशात प्रवेश घेवू शकतील..
* मुक्त विद्यालयामध्ये प्रवेशासाठी पात्रता व कागदपत्रे
) प्राथमिक स्तर (इयत्ता पाचवी समकक्ष) अ
१. नोंदणी करतांना उमेदवाराचे वय किमान १० वर्षे पूर्ण असावे. कमाल वयाची अट नाही.
पालकांचे प्रतिज्ञा पत्र सादर करावे लागेल)
२. वयाचा दाखला सादर करावा लागेल. (वयाचा दाखला उपलब्ध नसल्यास त्याबाबतचे
३. वय वर्षे १८ पेक्षा जास्त असल्यास आणि यापूर्वी शाळेत गेला नसेल, तर स्वयंघोषणापत्र लागेल.
४. वय वर्षे १८ पेक्षा कमी असल्यास आणि यापूर्वी शाळेत गेला नसेल, तर पालकांचे प्रतिज्ञापत्र द्यावे.
आ) उच्च प्राथमिक स्तर (इयत्ता आठवी समकक्ष)
१. नोंदणी करतांना उमेदवाराचे वय किमान १३ वर्षे पूर्ण असावे. कमाल वयाची अट नाही.
२. वयाचा दाखला सादर करावा लागेल. (वयाचा दाखला उपलब्ध नसल्यास त्याबाबतचे
पालकांचे प्रतिज्ञा पत्र सादर करावे लागेल) ३. वय वर्षे १८ पेक्षा जास्त असल्यास आणि यापूर्वी शाळेत गेला नसेल, तर स्वयंघोषणापत्र
लागेल.
४. वय वर्षे १८ पेक्षा कमी असल्यास आणि यापूर्वी शाळेत गेला नसेल, तर पालकांचे प्रतिज्ञापत्र द्यावे.
इ) माध्यमिक स्तर इयत्ता दहावी (महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी समकक्ष)
(मे/जून २०२५ पासून प्रस्तावित आहेत)
१. नोंदणी करतांना उमेदवाराचे वय किमान १५ वर्षे पूर्ण असावे. कमाल वयाची अट नाही.
२. वयाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.
३. उमेदवार किमान इयत्ता ५वी उत्तीर्ण असावा. इयत्ता ५वी उत्तीर्ण झाल्यानंतर जी इयत्ता उमेदवार उत्तीर्ण झाला असेल त्या इयत्तेचे गुणपत्रक अथवा शाळा सोडल्याचा दाखला सादर करावा लागेल.
४. उमेदवार किमान २ वर्षे महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्यसाठी योग्य तो रहिवास पुरावा सादर करावा लागेल. उदा. तहसीलदार यांच्या सहीचा रहिवास (डोमिसाईल) दाखला/बँकेचे पासबुक/दूरध्वनी बिल/वीज बिल / रेशन कार्ड, इत्यादी.
५. राज्यमंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत (इयत्ता दहावी) उत्तीर्ण होऊ न शकलेला उमेदवार राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रवेशित होऊ शकेल. या विद्यार्थ्यांना TOC (Transfer of Credit) चा फायदा देण्यात येईल. म्हणजे आधी उत्तीर्ण झालेल्या विषयांपैकी २ विषयांत सूट दिली जाईल. मात्र परीक्षेत प्रतिबंधित (डीबार) केलेल्या विद्यार्थ्यांस प्रवेश दिला जाणार नाही.
* नोंदणी *
१. प्रवेशासाठी नोंदणी http://msbos.mh-ssc.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) करावी. या वेबसाईटच्या नावाशी साधर्म्य असलेल्या इतर अनेक वेबसाईट आढळून येतात. त्यामुळे प्रवेशासाठी नोंदणी करताना वरील अधिकृत वेबसाईट असल्याची खात्री करावी.
२. नोंदणी केल्यापासून सहा महिन्यांनंतर उमेदवार परीक्षेसाठी पात्र होईल. तसे पात्रता
प्रमाणपत्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाकडून संपर्क केंद्रांना पाठवले जाईल. ३. एकदा केलेली नोंदणी एका इयत्तेसाठी पाच वर्षांसाठी वैध राहील. (प्रत्येक इयत्तेसाठी
स्वतंत्रपणे नोंदणी करावी लागेल.) ४. या नोंदणीद्वारे एका इयत्तेसाठी सलग पाच वर्षे किंवा सलग नऊ परीक्षांची संधी दिली
जाईल.
. वरील कालावधीत विद्यार्थी उत्तीर्ण न झाल्यास पुन्हा नोंदणीची सुविधा उपलब्ध राहील. ५
पुनर्नोदणीचा कालावधी आणि परीक्षाची संधी वरीलप्रमाणेच राहील.
६. नोंदणी करतेवेळी उमेदवाराचे नाव कोणत्याही शाळेच्या पटावर नसल्याचे प्रतिज्ञापत्र देणे
आवश्यक असेल. ७
. पुर्ननोंदणी केल्यानंतरही या पूर्वीच्या परीक्षेस मिळालेली सूट ग्राह्य धरली जाईल.
* अभ्यासक्रम *
१. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे, यांचेमार्फत निश्चित केलेल्या विषय योजनेतील विषयांसाठी त्यांनी तयार केलेला अभ्यासक्रमावर आधारीत महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाने तयार केलेली पाठ्यपुस्तके, स्वयंअध्ययन पुस्तिका लागू राहतील.
* Online प्रवेशाची कार्यपद्धती
१. http://msbos.mh-ssc.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जावे व सर्व
सुचना व्यवस्थित वाचाव्यात.
२. अर्ज भरण्यासाठी http://msbos.mh-ssc.ac.in/Appication_Form.aspx या लिंकवर क्लिक करा.
३. अर्ज भरण्याची भाषा निवडा. (मराठी किंवा इंग्रजी)
४. अर्ज भरताना आपली वैयक्तिक माहिती अचूक भरावी. उदा. स्वतःचे नाव, पत्ता, जन्मतारीख, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, इयत्ता, विषय, माध्यम व संपर्क केंद्र क्रमांक, इत्यादी.
५. अर्जावर अलीकडच्या काळातील स्वतःचा फोटो स्कॅन करून अपलोड करावा व तो सबमिट करावा.
६. मराठीतून माहिती भरण्यासाठी युनिकोड उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे ती माहिती बरोबर असल्याची खात्री करावी. तसेच आवश्यकतेनुसार दुरुस्ती करून माहिती
अंतिम करावी.
७. उमेदवाराने कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी स्कॅनर अथवा मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो
काढून ते अपलोड करावे. उमेदवाराने अर्जामध्ये मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी पुढील संपर्कासाठी नोंदविणे अनिवार्य आहे.
शैक्षणिक संधी व सुविधांचा प्रचार व प्रसिध्दी करणेबाबत
७. उमेदवाराने कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी स्कॅनर अथवा मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावे. उमेदवाराने अर्जामध्ये मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी पुढील संपर्कासाठी नोंदविणे अनिवार्य आहे.
८. उमेदवार नाव नोंदणी शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शुल्क पुढील तीन प्रकारे भरू शकतात. (१) ऑनलाईन भरणा (Online Payment), (२) NEFT द्वारे (३) संपर्क केंद्रावर रोखीने शुल्क भरल्यास त्याची पावती उमेदवाराने संपर्क केंद्रावरून उपलब्ध करून द्यावी. अर्ज भरून झाल्यावर त्याची प्रिंट काढावी.
९. उमेदवाराने ऑनलाईन भरलेल्या नोंदणी अर्जाची प्रत (Print Out) नोंदणी शुल्क व इतर आवश्यक कागदपत्रे (मूळ प्रमाणपत्रांसह) संपक केंद्रावर दोन प्रतीत त्वरित/निर्धारित मुदतीत जमा करावीत व एक प्रत स्वतःकडे ठेवावी.
१०. पात्र उमेदवारास ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) उपलब्ध करून देण्यात येईल.
११. पात्र उमेद्वारांनी संपर्क केंद्रामार्फत महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाकडे स्वयंअध्ययन साहित्याची मागणी करावी व पुढील संपर्क शिबिरासाठी नियोजनाप्रमाणे उपस्थित रहावे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षाग मंडळ, लातूर विभागीय मंडळ, लातूर – 413531
शासन निर्णयानुसार मुक्त विद्यालयाकडून सदर परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकानुसार उमेदवाराचे वय उमेदवाराचे पात्रता अटी शर्ती सर्व देण्यात आलेले आहेत यानुसार प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांना माहिती देण्यात आलेली आहे पात्र उमेदवारांनी संपर्क करावयाचा आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे सदर उमेदवाराचे डोमेसाईल महाराष्ट्राचे असणे गरजेचे आहे तसेच या परिपत्रकानुसार उमेदवार हा महाराष्ट्राचा राज्याचा रहिवासी असावा यासंबंधी माहितीपत्रक मध्ये नमूद करण्यात आलेली आहे डोमेसाईल असणे गरजेचे आहे तसेच पालकाचे उत्पन्नाचे देखील नमूद या ठिकाणी करण्यात आलेले आहेत यानुसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे सदर निवडीसाठी उमेदवार आकडे डोमेसाईल असणे आवश्यक आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे असणार आहे यासंबंधी सर्वांनी या ची नोंद घ्यायची आहे.
सदर प्रकारचे नोंदणी करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय पंधरा वर्षे असणे गरजेचे असणार आहे तसेच कमाल वय यासंबंधी कोणत्याही प्रकारची अट असणार नाही असे या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेली आह सदर नोंदणी ऑनलाइन प्रकारे करण्यात येणार असल्यामुळे उमेदवाराने आपले किमान वय 15 असणे गरजेचे असणार आहे तसेच कमाल वयोमर्यादा ची आठ राहणार नाही कोणत्याही प्रकारची अशी राहणार असणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घेणे आवश्यक आहे सतत परिपत्रकानुसार या प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे.
अर्ज भरण्यासाठी वेबसाईट लिंक देखील देण्यात आलेली आहे सदर लिंक वर जाऊन आपण आपला अर्ज भरू शकता अर्ज हा ऑनलाइन रीतीने भरणे बंधनकारक असणार आहे अर्ज भरताना चुका टाळाव्यात तसेच अर्ज भरताना आपली इत्यंभूत माहिती आपल्याला देणे गरजेचे आहे आपल्या आधार नुसार आपले नाव त्या ठिकाणी नमूद करणे आवश्यक आहे तसेच अर्ज भरत असताना नोंदणी करणे गरजेचे असणार आहे.
अर्जदाराने आपला फोटो अलीकडच्या काळातील असला पाहिजे सदर फोटो हा अर्जावर चिटकवून तो अपलोड करायचा आहे सदर फोटो हा स्कॅन करून अपलोड करणे बंधनकारक असणार आहे सदर गोष्टीकडे उमेदवारांनी लक्ष देणे गरजेचे असणार आहेत उमेदवाराने आपला अर्ज भरताना सर्व गोष्टींचा विचार करावा यासंबंधी परिपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व माहिती अर्जामध्ये भरणे बंधनकारक असणार आहेत कोणत्याही प्रकारच्या चुका यामध्ये होणार नाहीत याची दक्षता देखील घेणे गरजेचे आहे त्यामुळे उमेदवारांनी आपली माहिती भरताना अचूक कशी भरली जाईल याची दक्षता घेणे गरजेचे आहे सदर परिपत्रकानुसार कार्यवाही करण्यात यावी.
पात्र उमेदवार नोंदणी करणे गरजेचे असणार आहे सदर नोंदणी करताना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे गरजेचे असणार आहे सदर नोंदणी करत असताना आपले अधिकृत नाव आपल्या रेकॉर्ड प्रमाणे आहे की नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे सदर नाव आपल्या रेकॉर्ड प्रमाणे असणार आहे आपली जन्म प्रमाणपत्रानुसार जन्मतारीख नमूद करणे आवश्यक असणार आहे सर्व माहिती व्यवस्थित भरणे गरजेचे आहे अशाप्रकारे उमेदवारांनी परिपत्रकानुसार माहिती भरणे गरजेचे असणार आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
उमेदवाराने ऑनलाईन भरलेल्या अर्जाची नोंदणीकृत प्रत दोन प्रतीमध्ये घेणे बंधनकारक असणार आहे सदर प्रत एक प्रत आपल्याकडे ठेवावी व एक प्रत कार्यालयाकडे जमा करणे आवश्यक असणार आहे सदर माहिती नुसार आपली माहिती अपलोड झाली का नाही याची प्रत घेणे आवश्यक आहे सर्व माहिती अपलोड केल्यानंतर दोन प्रति मध्ये कागदपत्रे घेणे आवश्यक आहे सदर एक प्रत आपल्याकडे ठेवणे बंधनकारक असणार आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घेणे आवश्यक आहे.