नवनियुक्त शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर प्रेरण कार्यक्रमा अंतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत navniyukta shikshak prashikshan gr 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवनियुक्त शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर प्रेरण कार्यक्रमा अंतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत navniyukta shikshak prashikshan gr 

संदर्भ- मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांचे कडील पत्र जा. क. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE) / 2024-25/05070 दि. 17/10/2024

वरील संदर्भीय विषयास अनुसरून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील मुद्दा क्र. 5.15 ते 5.21 मध्ये नमूद केल्याप्रमाणे नवनियुक्त शिक्षकांसाठी प्रेरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यासंदर्भात कळवण्यात आले आहे. त्यानुसार पवित्र पोर्टल द्वारे इयत्ता 1 ली ते 12 वी ला नियुक्ती मिळालेल्या जिल्ह्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील नवनियुक्त शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर 7 दिवसाचे प्रशिक्षण दि. 04 नोव्हेंबर ते दि. 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत नूतन विद्यालय, जुन्या तहसील समोर, संजय नगर, जालना येथे आयोजित करण्यात आले आहे. सदरील प्रशिक्षण सर्व नवनियुक्त शिक्षकांना अनिवार्य आहे.

तरी आपल्या तालुक्यातील नवनियुक्त पात्र शिक्षकांना कार्यमुक्त करून दि. 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:00 वाजेपर्यत प्रशिक्षण स्थळी उपस्थित राहण्यास आदेशित करावे.

प्रशिक्षणाबाबत सूचनाः

1. प्रशिक्षणाची वेळ सकाळी 10.00 ते 5.30 अशी आहे.

2. प्रशिक्षण पुर्णतः ऑफलाईन पद्धतीचे सात दिवसाचे राहील.

नवनियुक्त प्रशिक्षणाबाबत शासन परिपत्रक येथे पहा click here 

3. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थ्यांना कोणतीही रजा अनुज्ञेय राहणार नाही.

आपल्या तालुक्यातून प्रशिक्षणासाठी कार्यमुक्त केलेल्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची यादी या कार्यालयास तात्काळ सादर करावी.

नवनियुक्त शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर प्रेरण कार्यक्रम (Induction Program) अंतर्गत प्रशिक्षणाबाबत….

उपरोक्त विषयान्वये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील मुद्दा क्रमांक ५.१५ ते ५.२१ मध्ये नवनियुक्त शिक्षकांसाठी प्रेरण कार्यक्रमाचे आयोजन करणे अपेक्षित आहे. आपल्या जिल्ह्यातील नवनियुक्त शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर ०७ दिवस, (५० तासांचे) प्रशिक्षण दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीत दि.०४.११.२०२४ ते १०.११.२०२४ या कालावधीत आयोजित करावयाचे आहे.

प्रशिक्षणाबाबत जिल्हास्तरावरील सूचना पुढीलप्रमाणे

१) इयत्ता १ली ते ८वी व इयत्ता ९ वी ते १२ वी साठी नवनियुक्त शिक्षकांचे ०७ दिवसांचे प्रशिक्षण सोबत दिलेल्या

वेळापत्रक व प्रशिक्षण घटकसंचाप्रमाणे आयोजित करण्यात यावे. २) पहिले ६ दिवस इयत्ता १ ते ८ व इयत्ता ९ ते १२ वी ला शिकविणा-या शिक्षकांचे समान घटकांचे एकत्रित

प्रशिक्षण घ्यावयाचे आहे. सातवा दिवस हा स्वतंत्र घटकांसाठी असेल, ३) वेळापत्रकांची Soft Copy या पत्रासोबत पाठविण्यात येत आहे.

४) प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शक पुस्तिका उपलब्ध करून देण्यात यावी. त्याचप्रमाणे प्रशिक्षणाचे नियोजन करावे.

५) आपल्या स्तरावर वर्ग संख्येनुसार आवश्यक सुलभकांची निवड करावी व त्यांना प्रशिक्षण घटक संचातील

समाविष्ट घटकांची माहिती करून द्यावी.

६) सुलभकांना संदर्भ साहित्याचे वाचन करण्यास सांगावे.

७) सदर प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपात द्यावयाचे असून सलग ०७ दिवसांचे राहील. प्रशिक्षण कालावधीत कोणत्याही प्रकारची रजा अनुज्ञेय राहणार नाही (रविवार वगळून).

८) सदर प्रशिक्षणासाठी होणाऱ्या खर्चात दोन वेळचा चहा, कर्तव्य भोजन याचा. समावेश करता येईल. सदरचा खर्च समग्र TE Program Activity या लेखाशीर्षाखाली भागविण्यात यावा.

९) राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था शाळांतील

सर्व नवनियुक्त शिक्षकांना हे प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य राहील.

१०) आपल्या जिल्ह्यातील १००% नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होईल याची जबाबदारी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांची राहील. त्याअनुषंगाने आवश्यक ते समन्वय ठेवून यादी प्राप्त करून घ्यावी.

११) आपल्या मागणीप्रमाणे मार्गदर्शक पुस्तिका SCERT मार्फत संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील.

१२) घटकसंचाची वाहतूक १८.१०.२०२४ पासून सुरु होईल व दिनांक २६.१०.२०२४ पर्यंत सर्व साहित्य संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या ठिकाणी पोहोच होईल.

नवनियुक्त शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर प्रेरण कार्यक्रम (Induction Program) अंतर्गत प्रशिक्षणाबाबत….

उपरोक्त विषयान्वये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील मुद्दा क्रमांक ५.१५ ते ५.२१ मध्ये नवनियुक्त शिक्षकांसाठी प्रेरण कार्यक्रमाचे आयोजन करणे अपेक्षित आहे. आपल्या जिल्ह्यातील नवनियुक्त शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर ०७ दिवस, (५० तासांचे) प्रशिक्षण दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीत दि.०४.११.२०२४ ते १०.११.२०२४ या कालावधीत आयोजित करावयाचे आहे.

जिल्हास्तरावरील सूचना पुढीलप्रमाणे

१) इयत्ता १ली ते ८वी व इयत्ता ९ वी ते १२ वी साठी नवनियुक्त शिक्षकांचे ०७ दिवसांचे प्रशिक्षण सोबत दिलेल्या

वेळापत्रक व प्रशिक्षण घटकसंचाप्रमाणे आयोजित करण्यात यावे. २) पहिले ६ दिवस इयत्ता १ ते ८ व इयत्ता ९ ते १२ वी ला शिकविणा-या शिक्षकांचे समान घटकांचे एकत्रित

प्रशिक्षण घ्यावयाचे आहे. सातवा दिवस हा स्वतंत्र घटकांसाठी असेल, ३) वेळापत्रकांची Soft Copy या पत्रासोबत पाठविण्यात येत आहे.

४) प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शक पुस्तिका उपलब्ध करून देण्यात यावी. त्याचप्रमाणे प्रशिक्षणाचे नियोजन करावे.

५) आपल्या स्तरावर वर्ग संख्येनुसार आवश्यक सुलभकांची निवड करावी व त्यांना प्रशिक्षण घटक संचातील

समाविष्ट घटकांची माहिती करून द्यावी.

६) सुलभकांना संदर्भ साहित्याचे वाचन करण्यास सांगावे.

७) सदर प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपात द्यावयाचे असून सलग ०७ दिवसांचे राहील. प्रशिक्षण कालावधीत कोणत्याही प्रकारची रजा अनुज्ञेय राहणार नाही (रविवार वगळून).

८) सदर प्रशिक्षणासाठी होणाऱ्या खर्चात दोन वेळचा चहा, कर्तव्य भोजन याचा. समावेश करता येईल. सदरचा खर्च समग्र TE Program Activity या लेखाशीर्षाखाली भागविण्यात यावा.

९) राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था शाळांतील

सर्व नवनियुक्त शिक्षकांना हे प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य राहील.

१०) आपल्या जिल्ह्यातील १००% नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होईल याची जबाबदारी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांची राहील. त्याअनुषंगाने आवश्यक ते समन्वय ठेवून यादी प्राप्त करून घ्यावी.

११) आपल्या मागणीप्रमाणे मार्गदर्शक पुस्तिका SCERT मार्फत संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील.

१२) घटकसंचाची वाहतूक १८.१०.२०२४ पासून सुरु होईल व दिनांक २६.१०.२०२४ पर्यंत सर्व साहित्य संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या ठिकाणी पोहोच होईल.

👉👉नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षण बाबत शासन परिपत्रक येथे पहा Click here 

शासन स्तरावरून महत्त्वाची परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकानुसार अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक असून या परिपत्रकामध्ये नवनियुक्त शिक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेले आहेत सदर शिक्षकांना प्रशिक्षण आयोजन करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकानुसार शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे यामध्ये इयत्ता पहिली ते आठवी व इयत्ता नववी ते बारावी या शिक्षकांसाठी  प्रशिक्षण असणार आहे या प्रशिक्षणानुसार शिक्षकांना नवनवीन धडे देण्यात येणार आहेत

सदर प्रशिक्षण हे आयोजित करण्यात आलेले आहे यानुसार हे प्रशिक्षण सात दिवसाच्या असणार आहे सात दिवस हे प्रशिक्षण शिक्षकांना घेणे बंधनकारक असणार आहे नवनियुक्त शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण असणार आहे यासंबंधी शासन स्तरावरून परिपत्रक देखील निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकानुसार कार्यवाही करणे गरजेचे असणार आहेत.

सदर प्रशिक्षणाचे एक मार्गदर्शिका असणार आहे सदर मार्गदर्शिका ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर मार्गदर्शिका ही जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या मार्गदर्शकेनुसार शिक्षकांना प्रशिक्षण घेणे गरजेचे असणार आहे.

राज्यातील सर्व नवनियुक्त शिक्षकांसाठी प्रशिक्षण असणार असल्याने सर्व स्तरावरून या प्रशिक्षणासाठी उपस्थिती असणे आवश्यक आहे यामध्ये जिल्हा परिषद शाळा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा संस्था तसेच खाजगी शाळा कटक मंडळे नगरपरिषद महानगरपालिका या सर्व स्तरावर नवनियुक्त शिक्षकांसाठी सदर प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेली आहे यामुळे या सर्व शाळांमधून येणाऱ्या शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण असणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे प्रशिक्षण होणार असल्यामुळे सदर प्रशिक्षणाची जबाबदारी फिक्स करण्यात आलेली आहे सदर प्रशिक्षणाची जबाबदारी ही त्या त्या जिल्ह्यातील प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे प्राचार्य तसेच शिक्षण अधकारी या यंत्रणेवर जबाबदारी ठेवण्यात आलेली आहे सदर प्रशिक्षण हे शंभर टक्के पूर्ण करण्याचे दृष्टीने आयोजन करण्यात आलेले आहेत आणि आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व नवनियुक्त शंभर टक्के शिक्षकांचे प्रशिक्षण होणे गरजेचे असल्यामुळे सदर प्रशिक्षणासाठी उच्च स्तरावरून वेळोवेळी परिपत्रके निर्गमित करण्यात आलेली आहे या परिपत्रकाची दखल घेऊन आपल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करून घ्यावयाचे असल्याने सदर कार्यवाही करण्यात येणार आहे.

निवृत्त कर्मचाऱ्यांची निवृत्तीविषयक कागदपत्रे

महालेखापाल कार्यालयाकडे पाठविताना निवृत्त

कर्मचाऱ्याचे नाव सेवापुस्तकातील पहिल्या पानावरील

नोंदीप्रमाणेच असण्याची दक्षता घेण्याबाबत

वाचा –

१) शासन परिपत्रक क्रमांकः सेनिवे २०११/प्र.क्र.५६/सेवा ४, दि.१६.०७.२०११.

शासन परिपत्रक-

सेवानिवृत्त / मृत्यु पावलेल्या कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतन/कुटुंबनिवृत्तीवेतन विषयक कागदपत्रे ज्या नमुन्यात महालेखापाल कार्यालयाकडे पाठवावयाची आहेत, ते सर्व नमुने महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मध्ये विहीत करण्यात आले आहेत. तथापि त्यानुसार संबंधित निवृत्तीवेतनधारकाची माहिती विहीत प्रपत्रात भरुन महालेखापाल कार्यालयाकडे पाठविण्यात येत नसल्याने निवृत्तीवेतनाचे लाभ प्राधिकृत करण्यामध्ये विलंब लागत असल्याचे आढळून आल्याने संदर्भाधीन दि.१६.०७.२०११ च्या परिपत्रकासोबत चेक लिस्ट जोडली आहे. निवृत्त/मृत कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन/कुटुंबनिवृत्तीवेतन विषयक लाभासंदर्भातील माहिती विहीत प्रपत्रात भरुन महालेखापाल कार्यालयाकडे पाठविताना कार्यालय प्रमुखांनी ही माहिती या चेक लिस्टप्रमाणे असल्याची खात्री करुन घेण्याच्या सूचना संदर्भाधीन दि.१६.०७.२०११ च्या परिपत्रकानुसार देण्यात आल्या आहेत.

२. उपरोक्त सूचना देऊनही निवृत्तीवेतनाची प्रकरणे महालेखापाल कार्यालयाकडे पाठविताना त्यावरील कर्मचाऱ्याचे नाव व सेवापुस्तकाच्या पहिल्या पानावर त्या कर्मचाऱ्याचे जे नाव नोंदविलेले असते त्यात फरक आढळून येत असल्याचे महालेखापालांनी शासनाच्या निदर्शनास आणले आहे. अनेकदा नाव इंग्रजीमध्ये लिहीताना त्यात स्पेलिंगच्या चुका असतात तर मराठीमध्ये देखील नाव लिहीण्यामध्ये फरक असल्याचे

आढळते. अनेक प्रकरणांमध्ये कर्मचाऱ्याने अधिकृतरित्या नाव बदललेले असते परंतु सेवापुस्तकामध्ये त्याप्रमाणे नोंद झालेली नसते. तसेच नाव बदलण्यासंदर्भातील शासकीय राजपत्राची (Government Gazette) प्रतही निवृत्तीवेतनाच्या प्रस्तावासोबत जोडलेली नसते. त्यामुळे निवृत्तीवेतनाची प्रकरणे अंतिम करण्यामध्ये महालेखापाल कार्यालयास अडचणी येत आहेत.

३. संदर्भाधीन दि.१६.०७.२०११ च्या परिपत्रकासोबत जोडलेल्या चेकलिस्टमधील प्रपत्र-1 (General) मधील अ.क्र.१ मध्ये निवृत्तीवेतनधारकाचे नाव लिहीण्यासंदर्भात स्वयंस्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही होणे आवश्यक आहे. सर्व कार्यालय प्रमुखांना या परिपत्रकाद्वारे पुन्हा सूचना देण्यात येत आहेत की, निवृत्तीवेतनधारकांची प्रकरणे महालेखापाल कार्यालयाकडे पाठविताना निवृत्त कर्मचाऱ्याचे नाव सेवापुस्तकातील पहिल्या पानावरील नोंदीप्रमाणेच असण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव, पद व प्रकरण पाठविणाऱ्या कार्यालयाचे नाव ही सर्व माहिती निवृत्तीवेतनाचा नमुना क्र. ६ किंवा १६ (प्रकरणपरत्वे) मध्ये इंग्रजी Capital letters मध्ये किमान एका ठिकाणी तरी लिहीण्याची दक्षता कार्यालय प्रमुखांनी घ्यावी. तसेच कर्मचाऱ्याने त्याचे नाव बदलले असल्यास (सेवापुस्तकामध्ये नोंद नसल्यास) बदललेल्या नावाबाबतच्या शासन राजपत्राची प्रत प्रस्तावासोबत जोडावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१४०११०१६३२१९७६०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

६. अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे, मुंबई (२५ प्रती),

७. संचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई, (१० प्रती)

८. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई (१० प्रती),

९. उप-मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती (प्रत्येकी १० प्रती),

१०. वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे/नागपूर/औरंगाबाद/ नाशिक (प्रत्येकी १५ प्रती),

११. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),

१२. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (प्रत्येकी १० प्रती),

१३. सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई

१४. राज्यपालांचे सचिव,

१५. मुख्य मंत्र्यांचे सचिव,

१६. उप मुख्य मंत्र्यांचे सचिव,

१७. सर्व मंत्री व राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव,

१८. *प्रबंधक,, उच्च न्यायालय (मूळ न्याय शाखा) मुंबई,

१९. “प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा), मुंबई,

२०. ‘सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,

२१. *सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,

२२. *प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,

२३. *प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई/नागपूर/औरंगाबाद

२४. मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई.

२५. आयुक्त, राज्य माहिती आयोग (सर्व)

२६. सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, १ला मजला, मंत्रालयासमोर, मुंबई ४०० ०३२

२७. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई

२८. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, सहावा मजला, विधान भवन, मुंबई- ४०० ०३२. (१० प्रती)

२९. कार्याध्यक्ष, महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन, १४४९, सदाशिव पेठ,

३०. ‘संकल्प’ खजिना महाल बोळ, एस. पी. कॉलेज समोर, पुणे ४११ ०३०

३१. ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),

३२. शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),

३३. उच्च व तंत्र शिक्षण आणि सेवायोजन विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),

३४. कृषि व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),

३५. मंत्रालयातील सर्व विभाग,

३६. सर्व विभागीय आयुक्त (प्रत्येकी ५ प्रती),

३७. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रत्येकी २५प्रती)

३८. सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष