निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेबाबत चावडी वाचनाची तारीख पहा nipun maharashtra abhiyan chavadi vachan
संदर्भ :- 1) दिनांक ०६/०३/२०२५ रोजीची मा. आयुक्त (शिक्षण) महोदय यांचे अध्यक्षतेखाली आयोजित VC
उपरोक्त विषयांवन्वये आपणास कळविण्यात येते कि, निपुण महाराष्ट्र शासन निर्णय ०५/०३/२०२५ च्या अनुषंगाने आपल्या जिल्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी दिनांक ५ मार्च ते ३१ जून २०१५ या कालावधीत करण्यात यावी. सदर कृती कार्यक्रम स्वयंअर्थसहाय्यित, विना अनुदानित शाळा व तुकड्याव्यतिरिक्त तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या इयत्ता २ री ते ५ वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू करावा. इ.६ वी ते ८ वीच्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना ऐच्छीक स्वरुपात लागू राहील. निपुण महाराष्ट्र शासन निर्णयातर्गत पुढीलप्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.
१. शाळेच्या मुख्याध्यापकांनी इयत्ता २ री ते ५ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना नियमितपणे शिकविणाऱ्या शिक्षकांची विशेष आदेशाने शिक्षकांच्या नावनिहाय प्रत्येक वर्गासाठी नेमणूक मुख्याध्यापकांनी तात्काळ करावी.
२. इयत्ता २ री ते ५ वीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर पडताळणी दिलेल्या परिशिष्ट १,२,३,४ प्रमाणे करावी.
३. अध्ययन स्तर पडताळणी करताना विद्यार्थ्याला जी क्षमता प्राप्त असेल तोच स्तर नमूद करावा. उदा. परिशिष्ट । मधील इयत्ता २ रि साठी वाचनाची अपेक्षित अध्ययन क्षमता एकूण १४ असून विद्यर्थ्याला ७ व्या क्रमांकापर्यंतच्या अध्ययन क्षमता प्राप्त आहेत तर अशा विद्यार्थ्यांचा वाचनाचा अध्ययन स्तरक्रमांक (१ ते १४ पैकी) ७ याप्रमाणे लिहावा. ७ पूर्वीचे अध्ययन स्तर क्रमांक नमूद करण्याची आवश्यकता नाही.
४. नेमणूक केलेल्या शिक्षकांनी इयत्ता २ री ते ५ वीच्या वर्गातील सर्व विद्याथ्यर्थ्यांची पहिल्या अध्ययन क्षमता पडताळनीची नोंद विद्यार्थी निहाय व अपेक्षित स्तरनिहाय अध्ययन क्षमता परीशिष्ट १
व ३ (या पत्राशी संलग्न करण्यात आलेले आहेत) मध्ये नमूद अध्ययन स्तरानुसार करावी व परिशिष्ट २ व ४ (या पत्राशी संलग्न करण्यात आलेले आहेत) मध्ये दिलेल्या नमुन्यात अध्ययन स्तर पताळनीच्या नोंदी घ्याव्यात.
५. विद्यार्थी व त्यांना अध्यापन करणारे शिक्षक यांची नोंदणी (Mappping) तसेच अपेक्षित स्तरनिहाय अध्ययन क्षमता परिशिष्ट १,२,३,४ मध्ये नमूद केलेल्या स्वरुपात तात्काळ शिक्षकांनीकरून ठेवावी व विद्या समीक्षा केंद्र (VSK) च्या माध्यमातून देण्यात आलेले BOT active होताच त्यावर नोंद करावी.
६. अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांचे वेळोवेळी स्वतंत्र गट करावे व त्यांचे नियमित अध्ययन कामकाज सुरु राहील अशी योजना करावी.
७. वर्गातील विद्यार्थी जसेजसे अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करतील तसा प्रगती अहवाल “चावडी वाचन व गणन” कार्यक्रमात सादर करावा.
८. ३० जून २०२५ पर्यंत इयत्ता २ री ते ५ वीच्या वर्गातील वर्गनिहाय किमान ७५% विद्यार्थी या कृतीकर्यक्रमातर्गत अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त करतील याची खात्री करावी.
९. मार्च, एप्रिल, मे व जून च्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये या कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने चर्चा व आढावा घेणेकरिता निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम तासिका घेण्यात यावी.
१०. निपुण महाराष्ट्र शासन निर्णयाचे तपशीलवार वाचन करून त्याप्रमाणे कृतीकार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा.
११. कृतीकार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होणेकरिता तालुकास्तरीय पर्यवेक्षीय यंत्रनेचे शाळाभेटीचे नियोजन करावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.
भाषा विषय अध्ययन निष्पत्ती
१. वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्याचे ध्वनी (उच्चार) ओळखत नाही.
२. वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्याचे ध्वनी (उच्चार) ओळखतो.
३. सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द वाचतो.
४. सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे तीन ते चार अक्षरी शब्द वाचतो.
५. मजकुरातील साध्या विरामचिन्हांची दखल घेतो.
६. परिचित मजकूरातील २ ते ३ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो.
७. परिचित मजकूरातील २ ते ३ सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये वाचतो.
८. परिचित मजकूरातील २ ते ३ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे, विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचतो.
९. परिचित मजकूरातील ३ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो.
१०. परिचित मजकूरातील ३ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये वाचतो.
११. परिचित मजकूरातील ३ ते ५ सोप्या शब्दांनी व तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे, विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचतो.
१२. अपरिचित मजकूरातील ४ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो.
१३. अपरिचित मजकूरातील ४ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये वाचतो.
१४. अपरिचित मजकूरातील ४ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे, विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचतो.
१. वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही.
२. वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो.
३. सोपे शब्द पाहून लिहितो.
४. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरांच्या ध्वनीला (उच्चार) ऐकून अक्षरे लिहितो.
५. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील काही अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो.
६. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो.
७. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे, स्वरचिन्हेयुक्त व जोडाक्षरयुक्त शब्द लिहितो.
८. २-३ शब्दांची व सोप्या जोडाक्षरांची एक ते दोन सोपी वाक्ये पाहून लिहितो.
९. ४-५ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेली दोन ते तीन वाक्ये पाहून लिहितो.
१०.२-३ शब्दांची एक ते दोन सोपी वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो.
११. २-३ शब्द व जोडाक्षरयुक्त एक ते दोन वाक्ये ऐकून विरामचिन्हांसह योग्य गतीने लिहितो.
१२. २-३ सोप्या शब्दांची दोन ते तीन सोपी वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो.
१३.२-३ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त विरामचिन्हांसह तीन ते चार वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो.
१४. श्रुतलेखनाकरिता ४-५ शब्दांची एक ते दोन सोपी वाक्ये योग्य गतीने लिहितो.
१५. ४-५ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त एक वाक्य विरामचिन्हांसह ऐकून योग्य गतीने लिहितो.
१६.४-५ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त दोन ते तीन वाक्ये विरामचिन्हांसह योग्य गतीने लिहितो.
१. ० ते ९ संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाहीत.
२. ० ते ९ संख्यानामे क्रमाने म्हणतो.
३. ० ते ९ पर्यंतच्या वस्तू मोजतो.
४. ९ पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्येएवढ्या वस्तू काढून दाखवितो.
५. ० ते ९ पर्यंतच्या संख्या ओळखतो/वाचतो.
६. ० ते ९ पर्यंत संख्या लिहितो. (अंकी)
७. १० ते २० संख्यानामे क्रमाने म्हणतो.
८. १० ते २० पर्यंतच्या वस्तू मोजतो.
९. २० पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्येएवढ्या वस्तू काढून दाखवितो.
१०. १० ते २० पर्यंतच्या संख्या ओळखतो/वाचतो.
११. १० ते २० पर्यंत संख्या लिहितो. (अंकी)
. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही.
२. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो.
३. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो.
४. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
५. ० ते ९ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरजेची उदाहरणे सोडवितो.
६. ० ते ९ पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो.
७. ० ते ९ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
८. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकीची उदाहरणे सोडवितो.
९. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो.
१०.० ते ४ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
११.० ते ९ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो.
१२.० ते ९ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो.
१३.० ते ९ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
अध्ययनाचे स्तर
१. वर्णमालेतील काही अक्षरे व संबंधित ध्वनी ओळखत नाही.
२. वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्याचे ध्वनी ओळखतो.
३. सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द वाचतो.
४. सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे तीन ते चार अक्षरी शब्द वाचतो.
५. मजकूरातील साध्या विरामचिन्हांची दखल घेतो.
६. परिचित मजकूरातील २ ते ३ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो.
७. परिचित मजकूरातील २ ते ३ सोप्या शब्दांनी तयार झालेली व जोडाक्षरासह लहान वाक्ये वाचतो.
८. परिचित मजकूरातील २ ते ३ सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे, विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने आकलनासह वाचतो.
९. परिचित मजकूरातील ३ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो.
१०. परिचित मजकूरातील ३ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षर युक्त लहान वाक्ये वाचतो.
११. परिचित मजकूरातील ३ ते ५ सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे, विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने आकलनासह वाचतो.
१२. अपरिचित मजकूरातील ४ ते ५ सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये वाचतो.
१३. अपरिचित मजकूरातील ४ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे, विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने आकलनासह वाचतो.
१४. अपरिचित मजकूरातील ६-८ सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये वाचतो.
१५. अपरिचित मजकूरातील ६-८ सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे, विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह, योग्य गतीने व आकलनासह वाचतो.
5 १. वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही.
२. वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो.
३. सोपे शब्द पाहून लिहितो.
४. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरांच्या ध्वनीला (उच्चार) ऐकून अक्षरे लिहितो.
५. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील काही अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो.
६. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो.
७. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे, स्वरचिन्हयुक्त व जोडाक्षरयुक्त शब्द लिहितो.
८. २-३ शब्दांची व सोप्या जोडाक्षरांची एक ते दोन सोपी वाक्ये पाहून लिहितो.
९. ४-५ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेली दोन ते तीन वाक्ये आकलनासह पाहून लिहितो.
१०.२-३ शब्दांची एक ते दोन सोपी वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो.
११. २-३ शब्द व जोडाक्षरयुक्त एक ते दोन वाक्य विरामचिन्हांसह व आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो.
१२. २-३ सोप्या शब्दांची दोन ते तीन सोपी वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो.
१३.२-३ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त विरामचिन्हांसह व आकलनासह तीन ते चार वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो.
१४. श्रुतलेखनाकरिता ४-५ शब्दांची एक ते दोन सोपी वाक्ये योग्य गतीने लिहितो.
१५. ४-५ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त एक वाक्य विरामचिन्हांसह व आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो.
१६.४-५ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त दोन ते तीन वाक्ये विरामचिन्हांसह व आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो.
१७. ६-८ शब्दांची चार ते पाच सोपी वाक्ये ऐकून लिहितो.
१८. श्रुतलेखनाकरिता ६-८ शब्द व जोडाक्षरे यांनी युक्त चार ते पाच वाक्ये विरामचिन्हांसह व आकलनासह लिहितो.
१. ० ते ९ संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाहीत.
२. ० ते ९ संख्यानामे क्रमाने म्हणतो.
३. ० ते ९ पर्यंतच्या वस्तू मोजतो.
४. ९ पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्येएवढ्या वस्तू काढून दाखवितो.
५. ० ते ९ पर्यंतच्या संख्या ओळखतो/वाचतो.
६. ० ते ९ पर्यंत संख्या लिहितो. (अंकी)
७. १० ते २० संख्यानामे क्रमाने म्हणतो.
८. १० ते २० पर्यंतच्या वस्तू मोजतो.
९. २० पर्यंतच्या वस्तूच्या समूहातून ठराविक संख्येएवढ्या वस्तू काढून दाखवितो.
१०. १० ते २० पर्यंतच्या संख्या ओळखतो/वाचतो.
११. १० ते २० पर्यंत संख्या लिहितो. (अंकी)
१२. २१ ते ५० पर्यंतची संख्यानामे क्रमाने म्हणतो.
१३. स्थानिक किंमत संकल्पना वापरून २१ ते ५० पर्यंतच्या संख्या ओळखतो/वाचतो.
१४. २१ ते ५० पर्यंतच्या संख्या लिहितो. (अंकी)
१५. ५१ ते ९९ पर्यंतची संख्यानामे क्रमाने म्हणतो.
१६. स्थानिक किंमत संकल्पना वापरून ५१ ते ९९ पर्यंतच्या संख्या ओळखतो/वाचतो.
१७. ५१ ते ९९ पर्यंतच्या संख्या लिहितो. (अंकी)
१८. ० ते ९ संख्यानामे लिहितो. (अक्षरी)
१९. ० ते २० संख्यानामे लिहितो. (अक्षरी)
२०. ० ते ५० संख्यानामे लिहितो. (अक्षरी)
पेक्षा ही की या
१. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही.
२. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो.
३. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो.
४. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
५. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो.
६. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो.
७. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
८. ० ते ९ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरजेची उदाहरणे सोडवितो.
९. ० ते ९ पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो.
१०.० ते ९ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
११.० ते ९ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो.
१२.० ते ९ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो.
१३.० ते ९ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
१४.० ते २० पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो.
१५.० ते २० पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज
करतो.
१६.० ते २० पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
१७.० ते २० पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो.
१८.० ते २० पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो.
१९.० ते २० पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
२०.० ते ५० पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो.
२१.० ते ५० पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
२२.० ते ५० पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो.
२३.० ते ५० पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
२४. स्थानिक किमत संकल्पना वापरून ० ते ९९ पर्यंतच्या संख्यांची बेरीज करतो. (बिनहातच्याची)
२५. स्थानिक किमत संकल्पना वापरून ९९ पर्यंतच्या संख्यांची बेरीज करतो. (हातच्याची) (यांचे उत्तर ९९ पर्यंत आहे)
२६.० ते ९९ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो. (ज्यांचे उत्तर ९९ पर्यंत आहे)
२७. स्थानिक किमत संकल्पना वापरून ९९ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी करतो. (बिनहातच्याची)
२८. स्थानिक किमत संकल्पना वापरून ९९ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी करतो. (हातच्याची)
२९.९९ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.