राजर्षी छत्रपती शाहू महाराज संपूर्ण जीवन परिचय शैक्षणिक सामाजिक कार्य rajarshi shahu maharaj jivanparichay
राजर्षी छत्रपती शाहू महाराज (१८७४-१९२२)
आधुनिक महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उद्धारासाठी कोणतीही तडजोड न करता आयुष्याच्या अखेरीपर्यंत झटणारा सर्वागपूर्ण राष्ट्रपुरुष म्हणून राजर्षी शाहू महाराजांना समाजसुधारकांमध्ये आग्रस्थान द्यावे लागते. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची प्रतिभा साकारली गेली.
राजर्षी शाहू महाराजांचा विस्तृत जीवनक्रम खालीलप्रमाणे :
२६ जून १८७४ (कागलच्या घाटगे घराण्यात)
जन्म: जन्मस्थळ : लक्ष्मीविलास पॅलेस, कोल्हापूर. (संदर्भ डॉ. धनंजय कीर यांच्या ‘राजर्षी शाहू छत्रपती’ या ग्रंथातून) मूळ नाव: यशवंतराव पित्याचे नाव जयसिंगराव ऊर्फ आबासाहेब घाटगे
आईचे नाव: श्रीमंत राधाबाईसाहेब
• दत्तक विधान : १७ मार्च १८८४ (कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी श्रीमंत आनंदीबाईसाहेब यांनी कागलच्या घाटगे घराण्यातील यशवंतराव यांस दत्तक घेऊन त्यांचे नाव शाहू महाराज असे ठेवले.)
१८८५ ते १८८९: या काळात राजकोट येथील राजपुत्रांसाठीच्या महाविद्यालयात शिक्षण.
प्रिन्सिपल मॅकनॉटन यांच्या मार्गदर्शनाखाली राजांनी राजकोट येथील शिक्षण पूर्ण केले.
मार्च १८८६ : राजांना पितृवियोग सहन करावा लागला. (जन्मदात्रीचे निधन राजांच्या बालपणीच झाले होते.)
१८९० ते १८९४ : महाराजांनी धारवाड येथे सर एस. एम. फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी भाषा, राज्य कारभार व जागतिक इतिहास आदी विषयांचे परिपूर्ण अध्ययन केले.
• १ एप्रिल १८९१ : बडोद्याचे गुणाजीपंत खानविलकर यांची कन्या श्रीमंत लक्ष्मीबाई साहेब यांच्याशी शाहू महाराजांचा विवाह. • २ एप्रिल १८९४ : वयाच्या २० व्या वर्षी कोल्हापूर संस्थानाची सूत्रे हाती घेऊन राजे कायदेशीर वारसदार बनले.
१८९४ : पासूनच वेठबिगाराची पद्धती बंद करून राजांनी अब्राह्मणांना संस्थानात नोकऱ्या देण्यास सुरुवात केली. (भारतीय संसदेने मात्र वेठबिगारी बंदी कायदा जानेवारी १९७६ मध्ये संमत केला, यावरून राजांची दूरदृष्टी लक्षात येते.)
• १८९५: मोतीबाग तालमीची स्थापना. • १८९५ : शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ स्थापन केली. १८९६ : राजांनी कोल्हापुरात सर्व जाती-जमातींच्या विद्याथ्यांसाठी वसतीगृह सुरू केले.
(त्यापुढील काळात राजांनी निरनिराळ्या जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अशी सुमारे २० वसतीगृहे स्थापन केली.)
१८९९ ते १९०१ या काळात राजांच्या जीवनाला कलाटणी देणारे वेदोक्त प्रकरण घडले. (वेदोक्त प्रकरण : महाराजांचा पुरोहीत नारायण भटजी पूजाअर्चेच्या वेळी वेदोक्त मंत्रांऐवजी पुराणोक्त मंत्र
म्हणत असे. वैदिक मंत्र हे केवळ क्षत्रियांसाठी असून महाराज हे क्षत्रिय नसल्याने त्यांना बेदोक्त मंत्राची गरज नाही असे नारायण भटजीने स्पष्ट केले. यातूनच राजांनी ब्राह्मणेतर चळवळीस प्राधान्य दिले.)
• १९०१ : वैदिक वाङ्मय प्रवीण अशा नारायण भट्ट सेवेकरी या ब्राह्मणाकडून महाराजांनी वेदोक्त श्रावणी करून घेतली.
१९०१ : या वर्षीच महाराजांनी आप्पासाहेब राजोपाध्ये यांना वेदोक्त विधीसाठी निमंत्रित केले असता त्यांनी नकार दिला. (या प्रकरणात राजे क्षत्रिय नसल्याने त्यांना वेदोक्त विधीची परवानगी नाही असे मत मांडून लो. टिळक व
श्रृंगेरीचे जगद्गुरू शंकराचार्य यांनी राजांच्या विरुद्ध म्हणजे ब्राम्हणांची बाजू घेतली.)
• १९०५ : मध्ये महाराजांनी राजोपाध्ये यांचे सर्व वंशपरंपरागत हक्क काढून घेऊन त्यांचे इनाम जप्त केले.
क्षात्रजगद्गुरू पीठावर सदाशिवराव पाटील-बेनाडीकर या मराठा समाजातील व्यक्तीची निवड केली.
• पुरोहितांची शाळा काढून विविध जाती-जमातीतील नवे पुरोहित निर्माण केले.
• १९०१ : महाराजांनी कोल्हापूर संस्थानात गोवध बंदी कायदा केला.
• • १९०१ : मध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी असलेल्या व्हिक्टोरिया वसतीगृहात अस्पृश्य व मुस्लिम विद्यार्थ्यांची सोय केली. मिस लिटल यांच्या राजीनाम्यानंतर संस्थानाच्या शिक्षणाधिकारीपदी राजांनी श्रीमती रखमाबाई केळवकर यांची नेमणूक केली..
• २६ जुलै १९०२ : महाराजांनी संस्थानात मागासवर्गीयांसाठी नोकरीत ५० टक्के जागा राखीव ठेवण्याचा आदेश दिला. (२६ जुलै २००२ रोजी कोल्हापुरात मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणाची शताब्दी श्रीमती मायावती यांच्या
अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.)
• मे १९०२: सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणास लंडन येथे राजांनी हजेरी लावली.
• सप्टेंबर १९०६: कोल्हापूर येथे शाहू मिलची स्थापना केली.
महाराष्ट्र शासनाने २००३ मध्ये शाहू मिल बंद केली.) ११ जानेवारी १९११ कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन केली.
१९१२: खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना.
१९११ : संस्थानात १५ टक्के विद्यार्थ्यांना नादारीची घोषणा. १९१२ : ब्राह्मणेत्तरांची पहिली श्रावणी वेदोक्त पद्धतीने मराठा पुरोहिताने केली.
१९१२ : पाटील शाळांची स्थापना,
• १९१३ : कोल्हापुरात सत्यशोधक समाज शाळा सुरू.
१९१६ : बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली.
१९१६ : कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचे आदेश (प्रत्यक्ष अंमलबजावणी : १९१९ पासून) सक्तीच्या शिक्षणाची पहिली शाळा संस्थानात चिपरीपेटा येथे सुरू केली. शिक्षण सक्तीचे करण्यात आले.
२५ जुलै १९१७ : च्या वटहुकूमाने संस्थानात प्राथमिक जुलै १९१७ : पुनर्विवाह व विधवा विवाहास मान्यता देणारा कायदा संस्थानात संमत.
फेब्रुवारी १९१८ : आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा संस्थानात संमत. (स्वतःच्या घराण्यातील मुलगी (चुलत बहीण) इंदोरच्या होळकर या धनगर घराण्याची सून बनविली.)
मार्च १९१८ : बलुतेदारी पद्धती बंद केली.
• २५ जून १९१८: महार वतने रद्द केली.
१९१८ : संस्थानात तलाठी शाळांची स्थापना.
फेब्रुवारी १९१८ : पारंपरिक कुळकर्णी पद्धती रद्द करून त्यावर पगारी तलाठ्याची नेमणूक केली.
२५ जून १९१८ : कोल्हापूर संस्थानातील कुळकर्णी वतने कायद्याने रद्द.
१९१८ : कोल्हापुरात आर्य समाजाची शाखा स्थापना केली. वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा संमत.
१९१९ : स्त्रियांना क्रूरपणे एप्रिल १९१९ : उत्तर प्रदेशातील कानपूर येथे भरलेल्या १३ व्या अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय परिषदेचे अध्यक्षपद शाहू
राजांनी भूषविले. या सभेत राजांच्या भाषणाने प्रभावित होऊन कानपूरच्या जनतेने त्यांना ‘राजर्षी’ ही पदवी दिली.
१९२० : संस्थानात घटस्फोटाचा कायदा संमत केला.
ऑक्टोबर १९२० : महाराजांनी कोल्हापुरातील शंकराचार्यांचे पीठ रद्द करून क्षात्रजगद्गुरुचे नवे पीठ निर्माण केले.
मार्च १९२० : कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथील अस्पृश्यांच्या परिषदेत भाषण करताना शाहू महाराजांनी
अस्पृश्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व स्वीकारण्याचे आवाहन केले.
मार्च १९२० : गुजरातमध्ये भावनगर येथे आर्यधर्म परिषदेचे अध्यक्षपद राजांनी भूषविले.
६ मे १९२२ : लोकराजा राजर्षी शाहूंचे मुंबई येथील ‘पन्हाळा लॉज’ मध्ये निधन.
• १८९६ ते १९२१ या काळात सुमारे २० वसतीगृहांची स्थापना.
विविध जातीधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेली वसतीगृहे
राजाराम होस्टेल (१९०१) व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग (१९०१), वीरशैव लिंगायत बोर्डिंग (१९०६), मुस्लीम बोर्डिंग (१९०६), मिस क्लार्क होस्टेल (१९०८), दैवज्ञ बौर्डिंग (१९०८), नामदेव बोर्डिंग (१९११),
सरस्वतीबाई गौड सारस्वत बोर्डिंग (१९१५), प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग (१९२०). • शाहू महाराजांचा राज्याभिषेक समारंभ मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न,
• उद्योगांना चालना देताना संस्थानातील गडहिंग्लज व शिरोळ • या गावातून जिनिंग फॅक्टरी सुरू केली. शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी बलभीम को-ऑपरेटीव्ह व अबॅन को-ऑपरेटिव्ह या सहकारी सोसायट्यांची स्थापना.
• कोल्हापूर व्यतिरिक्त पुणे, नाशिक, अहमदनगर या ठिकाणीदेखील वसतीगृहे स्थापन केली.
नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वसतिगृह स्थापन केले. लोकसंघ या मुंबई येथील कामगार संघटनेस सहाय्य केले, • राजर्षी शाहूंचे अनुयायी: केशवराव ठाकरे, भास्करराव जाधव, केशव विचारे, दिनमित्रकार मुकुंदराव पाटील इ. थिऑसॉफिकल सोसायटीच्या विचारांचा राजांवर पगडा होता.
महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याचा महाराजांवर प्रभाव होता.
महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा महाराजांवर विशेष प्रभाव होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘मुकनायक’ व आगरकरांच्या ‘सुधारक’ या वृत्तपत्रांना राजांनी आर्थिक सहाय्य केले. व्हॅलेंटीन चिरोलच्या ‘Unrest In India’ या ग्रंथाचे मराठीत भाषांतर राजांनी रा. र. डोंगरे यांच्याकडून करवून घेतले.
• कोल्हापुरात छत्रपती मेळाव्याची स्थापना केली. शिक्षकांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले,
१९१८ ला राजाराम कॉलेज (कोल्हापूर) आर्य समाजाकडे हस्तांतरीत केले.
लष्करी शिक्षणासाठी संस्थानात इन्फंट्री स्कूलची स्थापना केली.
संस्थानातील शैक्षणिक क्षेत्रावर महाराज दरवर्षी सुमारे एक लाख रुपये खर्च करीत असत.
अस्पृश्यांच्या समस्या नष्ट करून त्यांना समाजात आणण्यासाठी महाराजांनी :
• गंगाधर कांबळे या हरिजन व्यक्तीस ‘हॉटेल सत्यशोधक’ (‘सत्यसुधारक’) हे चहाचे दुकान उघडून दिले. हरिजन पैलवानांना जाट पैलवान, चर्मकारांना सरदार, भंग्यांना पंडित अशा पदव्या दिल्या.
१९०८ मध्ये राजांनी भोगावती नदीवर धरण बांधून तेथे राधानगरी हे गाव वसविले.
धरणाच्या जलाशयाचे नाव महाराणी लक्ष्मीबाई तलाव.
१९१७ पासून सुरू झालेल्या ब्राह्मणेत्तर चळवळीस दक्षिण भारतात सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. १९१८ च्या मुंबई येथील पिपल्स युनियन सभेचे अध्यक्षस्थान राजांनी भूषविले.
१९२० च्या हुबळी येथील सामाजिक परिषदेचे अध्यक्षपदही राजांनी भूषविले. १९१७ च्या खामगाव मराठा परिषदेचे अध्यक्षपद राजांनी भूषविले.
नागपूर, दिल्ली येथील विविध ब्राह्मणेतर परिषदांचे अध्यक्षपद राजांनी भूषविले.
जून १९०२ मध्ये केंब्रिज विद्यापीठाने शाहू महाराजांना एल. एल. डी. (L.L.D.) ही पदवी दिली.
• शाहू महाराजांची प्रसिद्ध वचने ‘राज्य सोडावे लागले तरी बेहत्तर, परंतु मागासलेल्या आणि अविकसित समाजाच्या
सेवेचे स्वीकारलेले व्रत मी कदापि सोडणार नाही.’
‘माझी सर्व प्रजा मराठी तिसरी इयत्ता जरी शिकून तयार झाली असती तरी तिच्या हाती राज्य कारभाराचे हक्क
आनंदाने देऊन मी आजच विश्रांती घेतली असती.’
• ‘कामगारांनो, संघटित व्हा आणि आपले हक्क प्राप्त करून घ्या. तुम्हाला हे सांगताना मला कसलेच भय वाटत नाही की हे युग संघटनेचे आहे. या उद्गाराबद्दल मला माझी राजवस्त्रे जरी उतरावी लागली तरी त्याची पर्वा नाही.’ • ‘फासेपारध्यांना माणसासारखे जगू दया.’
राजर्षी शाहूंबद्दलचे गौरवोद्गार (उपाध्या) :
‘माणसातील राजा आणि राजातील माणसू.’
• ‘लोकांचा राजा.’ (लोकराजा)
• ‘सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष’ या शब्दात महर्षि वि. रा. शिंदे यांनी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव केला. “He was a king but a Democratic king” या शब्दात भाई माधवराव बागल यांनी राजांच्या
कार्याचा गौरव केला. • छत्रपती शाहू महाराज यांच्यासारखा सखा अस्पृश्यांना पूर्वी लाभला नव्हता व पुढेही लाभेल की नाही याबद्दल आम्हास शंका आहे, असे गौरवोद्गार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काढले.
राजर्षी शाहू महाराज हे एक थोर समाज सुधारक होऊन गेले राजर्षी शाहू महाराज यांनी गोरगरिबांच्या दिंडलितांच्या शिक्षणासाठी आपला देह जिजवला राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या राज्यामध्ये गोरगरिबांना 50 टक्के सवलत दिली होती तसेच गोरगरिबांच्या मुलांसाठी वस्तीग्रह बांधली होती प्रत्येक समाजासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची वस्तीगृह बांधली तसेच रंकाळा तलाव निर्माण केला कोल्हापूर संस्थानांमध्ये अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी घडवून आणल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते स्वतःहून लक्ष घालत व त्या गोष्टी स्वतःहून करून घेत त्यामुळे शाहू महाराज यांनी खूप मोठे सामाजिक कार्य केले त्यांची जयंती आपण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करत असतो महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यालयामध्ये व जिल्हा परिषद शाळा असेल कोणत्याही शाळा खाजगी शाळा असतील नगरपरिषद शाळा असतील जिल्हा परिषद शाळा असतील या सर्व शाळांमध्ये त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते राजर्षी शाहू महाराज यांनी आपले कार्य अविरतपणे चालू ठेवले होते त्यांच्या विचार आचार आचरणात आणण्यासाठी आपण वाचन केले पाहिजे त्यांनी केलेले कार्य फक्त वाचन करून चालणार नाही तर ते प्रत्यक्षात आणावे लागेल यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे त्यामुळेच जयंती आपण साजरी करत असतो. शाहू महाराज यांचे कार्य अगाध आहे त्यांनी केलेली सामाजिक सुधारणा ही देखील वापरण्याजोगी आहे त्यांचे शैक्षणिक कार्य देखील खूप मोठे आहे आपल्या संस्थानांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी उपलब्ध करून दिल्या अनेक विद्यार्थ्यांना प्रदेशात पाठवले शिष्यवृत्ती आहे दिल्या त्यामुळे विद्यार्थ्यांचा विकास झाला विद्यार्थी मोठ्या पदावर बाहेरच्या देशात शिक्षणासाठी काही नोकरीसाठी देखील त्याकाळी गेले होते राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य सर्व देशला विकास करण्यासाठी कारणीभूत ठरले राजर्षी शाहू महाराज यांनी गोरगरिबांच्या दिन दलितांच्या कल्याणासाठी शिक्षणासाठी अनेक सवलती उपलब्ध करून दिल्या यामध्ये वस्तीग्रह असतील शिष्यवृत्ती असतील हे महत्त्वाचे घटक होते महाराजांनी अनेक सामाजिक सुधारणा देखील केल्या यामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली अनेक तलावे बांधली झाडांची लागवडी केल्या.
राजर्षी शाहू महाराज हे खूप मोठे समाज सुधारक होते त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून राज्य सरकारने देखील 26 जून ही सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेतली व त्यांच्या जन्मतार दिवशी म्हणजे 26 जूनला सर्व राज्यांमध्ये सामाजिक न्याय दिन म्हणून पाळला जातो हाच खऱ्या अर्थाने महाराजांचा गौरव दिन होय त्यांच्या कार्याचा हा गौरव आहे त्यांच्या सामाजिक कार्य असेल शैक्षणिक कार्य असेल या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव केलेला आहे.
राजश्री शाहू महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.