30 नोव्हेंबर 2024 परिपाठ वार शनिवार shaley paripath 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

30 नोव्हेंबर 2024 परिपाठ वार शनिवार shaley paripath 

आजचे पंचांग

आजचा वार : शनिवार

दिनांक : ३० नोव्हेंबर २०२४

सूर्योदय : सकाळी ६:५५

सूर्यास्त : सायंकाळी ५:५९

तिथी : कार्तिक कृ. चतुर्दशी

शके : १९४६

आजचा सुविचार

गरज हि शोधाची जननी आहे.

Necessity is the mother of invention.

आवश्यकता ही आविष्कार की जननी है।

आजचे दिनविशेष

घटना

१९१७: कलकत्ता येथे ‘आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्युट’ची स्थापना

१९३९: सोव्हिएत युनियन ने सीमा विवादामुळे फिनलंड वर आक्रमण केले होते.

१९९६ः ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान. हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार आहे.

जन्म

१८५८: जगदीशचंद्र बोस नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ, वनस्पतींमधील प्रतिक्षिप्त क्रियांवर मूलभूत संशोधन

१९१०: कविवर्य बा. भ. बोरकर ऊर्फ ‘बाकीबाब’

१९३५: आनंद यादव – लेखक

१९३६: भारतीय पार्श्वगायक सुधा मल्होत्रा यांचा जन्म.

मृत्यू

१९०९: इंग्रजी आणि बंगाल मध्ये लिखाण करणारे प्रसिध्द लेखक रमेश चन्द्र दत्त यांचे निधन.

१९६७: राजीव दिक्षीत सामाजिक कार्यकर्ता

२००१: मध्ये जगप्रसिद्ध संगीतकार जॉर्ज हॅरिसन याचं निधन. २०१२: इंदर कुमार गुजराल भारताचे १२ वे पंतप्रधान

२०१४: अरुणाचल प्रदेशचे ७वे मुख्यमंत्री जर्बोम गॅमलिन यांचे निधन.

आजची प्रार्थना

।। सत्यम शिवम सुंदरा ।।

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा सत्यम शिवम सुंदरा ।। धृ।। शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा ॥१॥ विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास नाव नेई पैलतिरी दयासागरा।। २ ।। होऊ आम्ही नीतिमंत, कला गुणी बुद्धीमंत कीर्तीचा कळस जाई उंच अंबरा ।।३।।

संस्कृत सुभाषित

श्वः कार्यमद्य कुर्वीत पूर्वान्हे चापरान्हिकम् । न हि प्रतीक्षते मृत्युः कृतमस्य न वा कृतम्।।

अर्थ : काल करावयाची कामे व सायंकाळी करावयाची कामे सकाळीच पूर्ण करावीत. कारण मृत्यू आपले काम झाले की नाही हे पाहत नाही.

बोधकथा

त्याग

भगवान बुद्ध देशोदेशी फिरत असताना एका राज्याच्या राज्यात गेले. बुद्ध आपल्या राज्यात आले आहे हे समजताच त्या राजाने त्यांना सन्मानाने आपल्या दरबारात नेले. त्यांचा आदरसत्कार केल्यावर त्यांना विचारले, “मला आपल्या सारखी मनःशांती लाभेल का?” त्यावर बुद्धांनी उत्तर दिले “अवश्य लाभेल.” माझ्याजवळ बरीच संपत्ती होती. पण विचारांनी दरिद्री होतो. आतमध्ये काहीच नव्हते. त्यामुळे मला जे शक्य झाले ते तुलाही जमेलं.

जे एकाला करता येतं ते दुसऱ्यालाही करता येईल.तू हि असाच शांतिवृक्ष बनशील कारण प्रत्येकाची आंतरिक शक्ती चांगली आहे. पण तुला त्यासाठी काहीतरी करावं लागेल. त्यावर राजा म्हणाला, “मी सर्व काही सोडून द्यायला तयार आहे. अगदी माझे राज्यसुद्धा.” त्यावर बुद्ध म्हणाले, “माझे गमवून किंवा त्याचा त्याग करुन शांती मिळणार नाही. कारण त्यात ‘माझे सोडले’ हा भाव शेवटी आहेच. तेव्हा जो ‘स्वतः लाच’ विसरायला तयार असतो त्यालाच शांती मिळते.”

तात्पर्य – ‘स्वतःच’ समर्पित झाल्याशिवाय शांती मिळत नाही.

आजची म्हण

आईजीच्या जिवावर बाईजी उदार

दुसऱ्याचा पैसा दान करून स्वतः चा बडेजाव दाखविणे.

विज्ञान कोडी

समुद्रकिनारी वाढणारे झाड नसतात फांद्या तरी उंच होते वाढ सर्वात मोठी बी असणारी फळ फोडल्यावर मिळेल मधुर जल उपयोग माझ्या प्रत्येक आवयचा मान आहे मला कल्पवृक्षाचा सांगा ते काय आहे ?

प्रश्नमंजूषा

१) राजगडाचे पूर्वीचे नाव काय होते ?

उत्तर — मुरुंबदेवाचा डोंगर

२) शिवराय अफजलखान भेट कोणत्या गडाच्या पायथ्याशी झाली ?

उत्तर – प्रतापगड

३) शायीस्तेखानाने पुण्यात कोठे मुक्काम ठोकला होता?

उत्तर – लाल महल

४) तापमान मोजण्यासाठी कशाचा उपयोग करतात ?

उत्तर – थर्मामीटर

५) पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?

उत्तर – सूर्यप्रकाश

समूहगीत

जय जय महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा …

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

व्यक्ती विशेष

नेल्सन मंडेला

दक्षिण आफ्रिकेतील शतकानुशतके जुन्या वर्णभेदाला विरोध करणारे महान जननेते नेल्सन मंडेला यांचा जन्म 18 जुलै 1918 रोजी दक्षिण आफ्रिकेतील इस्टर्न केप, मेवेझो येथे झाला. त्याचे वडील गेडला हेन्री म्फकेनिस्वा हे म्वेजो शहराचे आदिवासी सरदार होते.

हेन्रीची तिसरी पत्नी नेकुफी नोस्केनी हिच्या पोटी मंडेला यांचा जन्म झाला. नेल्सन मंडेला हेन्रीच्या 13 व्या मुलांपैकी तिसरे होते. सरदारांच्या मुलाला स्थानिक भाषेत मंडेला म्हणत. ज्यावरून त्याला त्याचे आडनाव मिळाले. मंडेला यांचे वडील त्यांना ‘रोलिहला’ या नावाने हाक मारायचे. त्याची आई मेथोडिस्ट होती. मंडेला यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण क्लार्कबेरी मिशनरी स्कूलमधून पूर्ण केले. नेल्सन रोलिहलाहला मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून वर्णभेद विरोधी नेते होते. 1994 ते 1999 पर्यंत ते देशातील पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रप्रमुख होते आणि पूर्णपणे प्रातिनिधिक लोकशाही निवडणुकीत निवडून आलेले पहिले होते. त्यांच्या सरकारने वांशिक सलोखा वाढवून वर्णभेदाचा वारसा नष्ट करण्यावर लक्ष केंद्रित केले. वैचारिकदृष्ट्या आफ्रिकन राष्ट्रवादीआणि समाजवादी, त्यांनी 1991 ते 1997 पर्यंत आफ्रिकन नॅशनल काँग्रेस (ANC) पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केले. दरवर्षी 18 जुलै रोजी जगभरात नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो.

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ॥२॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥ ३॥

भारताचे संविधान

आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस :

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र ; दर्जाची व संधीची समानता ; निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन ; आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी या द्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमीत करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

पसायदान

आतां विश्वात्मकें देवें। येणें वाग्यज्ञं तोषावें । तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १ ॥ जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परें जडो। मैत्र जीवांचें ॥ २ ॥ दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जें वांच्छील तो तें लाहो। प्राणिजात ॥ ३ ॥ वर्षत सकळमंगळीं। ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥ चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥ चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥ किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥ आणि ग्रंथोपजीविये। विशेषीं लोकीं इयें । दृष्टादृष्ट विजयें। होआवें जी ॥ ८ ॥ येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो। हा होईल दानपसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९

सदरील परिपाठ मध्ये सर्व पायऱ्या अंतर्भूत केलेले आहेत शालेय जीवनामध्ये परिपाठाला खूप महत्त्व आहे परिपाठ व्यवस्थित असेल तर दिवस देखील चांगला होतो त्यामुळे परिपाठामध्ये जास्तीत जास्त पायऱ्यांच्या समावेश करून विद्यार्थ्यांच्या कला कौशल्यांना वाव देण्यासाठी सुंदर परिपाठ सादरीकरण केलेले आहे.

शालेय परिपाठ हा जिल्हा परिषद शाळांमध्ये तसेच इतर माध्यमाच्या शाळेमध्ये नियमितपणे घेतला जातो सदर परिपाठ हा सुंदर होण्यासाठी यामध्ये चारोळ्यांचा देखील वापर करण्यात येतो. परिपाठामध्ये विविध घटक असतात तसेच दिवसाची सुरुवात परिपाठाने केल्यानंतर चांगल्या प्रकारे होते विद्यार्थ्यांनाही सुंदर प्रकारे आचरण करण्यासाठी परिपाठाची खूप गरज असते परिपाठामध्ये विविध पायऱ्या येतात या पायऱ्यांचा वापर परिपाठामध्ये केला जातो तसेच मुद्देसूद रीतीने परिपाठ सादर केल्यास परिपाठ परिणामकारक होतो परिपाठ परिणामकारक करण्यासाठी अनेक गोष्टींचा उपयोग करण्यात येतो परिपाठाची तयारी देखील चांगल्या रीतीने करून घेतल्यास विद्यार्थ्यांमध्ये अनुभूत बदल घडून येतो विद्यार्थ्यांना परिपाठाचे आकलन होण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते विद्यार्थी देखील चांगल्या प्रकारे सादरीकरण करतात व विद्यार्थ्यांना स्टेज डेरिंगची सवय लागते विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो विद्यार्थी नियमितपणे समोर येऊन बोलण्याची संधी निर्माण होते त्यामुळे विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी समोर येतात विद्यार्थी परिपाठामध सादरीकरण करत असताना गटाने सादरीकरण करतात त्यामुळे एकमेकांच्या विचारांचा एकमेकांवर परिणाम होतो व एकमेकांचे आदर देखील केला जातो त्यानंतर गटाचे घटना एक यामध्ये असतात म्हणजेच विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध होते त्यानंतर यामध्ये म्हणजेच परिपाठामध्ये संचलन हा एक महत्त्वाचा घटक असतो गटामध्ये एकाला संचलन करण्याची संधी मिळते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये परिपाठ या घटकाचा समावेश होतो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून आणण्यासाठी त्याला स्टेज डेरिंग आत्मविश्वास असणे तसेच बोलण्याचे कौशल्य आत्मसात करणे खूप गरजेचे असते त्यामुळे परिपाठ हा एक उत्कृष्ट नमुना आहे परिपाठामध्ये अनेक पायऱ्या असतात त्या पायऱ्यांचा वापर परिपाठामध्ये केला जातो तसेच परिपाठ हा मुद्देसूद असावा व जास्त वेळ नसावा जास्तीत जास्त दहा ते बारा मिनिटांचा परिपाठ असावा ज्यामध्ये प्रतिज्ञा परिपाठ प्रार्थना अशा विविध घटकांचा समावेश केला जातो खऱ्या अर्थाने परिपाठ म्हणजेच दिवसाची सुंदर सुरुवात असते त्यामुळे परिपाठ कसा असावा यासंबंधी आपण आता माहिती घेणार आहोत परिपाठा संबंधी इतंबूत माहिती खालील प्रमाणे तुम्हाला देण्यात आलेली आहे या माहितीचा उपयोग करून तुम्ही आपल्या शाळेमध्ये परिपाठ सादरी करण्यासाठी उपयोग होऊ शकतो त्यामुळे प्रत्येक मुद्दा आपल्या ओळींमध्ये किंवा रजिस्टर मध्ये लिहून घेतला तर तुम्हाला सादरीकरण करण्यासाठी उपयोगी पडेल व जेणेकरून तुमचा वर्गाचा परिपाठ सुंदर होईल तसेच शिक्षकांना देखील मार्गदर्शक ठरेल.

परिपाठामध्ये सर्वात पहिली पायरी म्हणजे प्रार्थना होय प्रार्थना मध्ये विविधता असावी अनेक भाषांमधून आपण प्रार्थना घेऊ शकतो परी प्रार्थना ही विद्यार्थ्यांच्या मनावर राज्य करणारे असावे तसेच विद्यार्थ्यांच्या अंतकरणात उतरणारे असावी विद्यार्थ्यांना त्या प्रार्थनाचा अर्थ कळवा अशी सुंदर प्रार्थना असावी प्रार्थनेचे शब्द स्पष्ट असावेत प्रार्थना गाताना तालबद्धता असावी लयबद्ता असावी शक्यतो प्रार्थना पाठांतर केलेल्या असावी जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे शक्य होईल प्रार्थनेमध्ये विविधता असावी आपण प्रार्थना हिंदी इंग्रजी आणि मराठी भाषेमधून घेऊ शकतो. प्रार्थना ही प्रार्थना साठी व्यवस्थित बसावे तसेच प्रार्थना गाताना किंवा म्हणताना डोळे मिटवावे.

परिपाठामधील दुसरा मुद्दा म्हणजे सुविचार होय दुसरी पायरी पण म्हणता येईल सुविचार सांगताना सुविचाराचा मतदार आपल्याला समजणे गरजेचे आहे सुविचारांमध्ये विविधता असावी सुविचार हा मार्मिक असावा विद्यार्थ्यांना तो समजव विद्यार्थ्यांना तो समजला पाहिजे व विद्यार्थ्यांशी तो निगडित असला पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांनी ऐकल्यानंतर तो आचारनात आणतील अशा प्रकारचा सुविचार प्रार्थनेमध्ये किंवा परिपाठामध्ये घेणे आवश्यक असते विद्यार्थ्यांना सुविचार पाठांतर करून सांगावा जेणेकरून विद्यार्थ्यापर्यंत ते पोहोचण्यास मदत होते वहीमध्ये बघून सांगितल्यापेक्षा पाठांतर केलेल सुविचार परिणामकारक होऊ शकतो

अशाप्रकारे शालेय स्तरावर आपण परिपाठ घेत असताना विविध पायऱ्यांचा उपयोग करून व परिपाठ परिणामकारक होण्यासाठी चारोळ्यांचा देखील उपयोग करू शकतो जेणेकरून परिपाठ सुंदर रितीने सादरीकरण होईल व प्रेक्षकांच्या देखील टाळ्यांचा गडबड होईल तसेच संचालन करताना परिपाठामध्ये चारोळ्यांचा त्यांनी जास्तीत जास्त वापर करावा विद्यार्थ्यांना चारोळ्या लिहून द्याव्यात पाठांतर करून घ्याव्यात तसेच शिक्षकाने मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये राहावे जेणेकरून विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी अडचणी येतील त्या ठिकाणी त्या सोडवाव्यात व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पाच सादरीकरण प्रार्थना सादरीकरण करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे अशाप्रकारे दररोज परिपाठ घेतल्यास नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये बदल होईल व विद्यार्थी वैचारिक दृष्टीने सखोल अभ्यास करते