महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक आणि त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य social reformers maharashtra
डॉ. भाऊ दाजी लाड (१८२४ ते १८७४)
• जन्म: ७ सप्टेंबर १८२४; मांजरी (मांजरे-गोवा) येथे.
• मूळ नाव: रामचंद्र विठ्ठल लाड
विज्ञानशाखेत पदवी घेऊन एलफिन्स्टन संस्थेत विज्ञानाचे शिक्षक म्हणून नोकरी.
१८४५ मध्ये मुंबईत ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना. या कॉलेजात प्रवेश घेऊन १८५१ साली भाऊ दाजी ‘डॉक्टर’ बनले (GGMC ही वैद्यकीय पदवी).
• कुष्ठरोगावर त्यांनी गुणकारी औषध शोधल्यामुळे त्यांना ‘धन्वंतरी’ असे म्हटले जाते.
१८४८ मध्ये ज्ञानप्रसारक सभेचे अध्यक्ष बनल्यानंतर या संस्थेमार्फत भाऊंनी शिक्षण प्रसार व सामाजिक जागृतीसाठी प्रयत्न करताना त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली.
१८५२ मध्ये जगन्नाथ शंकरसेठ यांच्या सहकार्याने ‘बॉम्बे असोसिएशन’ ही भारतातील पहिली राजकीय संघटना स्थापन,
१८५५ मध्ये व्यापार व उद्योगावर कर बसविणाऱ्या ‘लायसेन्स बिलास’ भाऊंनी विरोध केला.
इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात भाऊंचे कार्य मोलाचे आहे.
• गिरनार पर्वतावरील रुद्रदामनाच्या शिलालेखावरून रुद्रदामन हा चेस्टनचा नातू होता हे त्यांनी सिद्ध केले.
• लग्नमुंजीत कलावंतीणींचा नाच करण्याच्या प्रथेस भाऊंनी विरोध केला.
• निधन: ३१ मे १८७४.
• डॉ. भाऊ दाजी हे सनदशीर राजकीय चळवळीचे प्रवर्तक होते. तसेच ते स्वातंत्र्याचे आद्य द्रष्टे होते.
• डॉ. भाऊ दाजी यांचे वाङ्मय ‘द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी’ या नावे
विष्णुबुवा ब्रह्मचारी (१८२५ ते १८७१)
प्रकाशित करण्यात आले आहे.
जन्म: १८२५, रायगड ( कुलाबा) जिल्ह्यातील शिरवली येथे. मूळ नाव ज्यावेळी ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी वैदिक धर्माविरोधी प्रचार सुरू केला, त्या काळात विष्णुबुवांनी मुंबईत जाहीर
विष्णु भिकाजी गोखले.
व्याख्यानातून वैदिक धर्मावरील आक्षेपांचे खंडन केले. ‘वर्तमानदीपिका’ या वृत्तपत्रामधून विष्णुबुवांनी वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले.
विष्णुबुवांचे साहित्य : भावार्थ सिंधू, वेदोक्त धर्मप्रकाश, सुखदायक राज्यप्रकरणी निबंध, सहजस्थितीचा निबंध, बोधसागर रहस्य, सेतुबंधानी टीका. • निधन : १८ फेब्रुवारी १८७१.
महात्मा जोतिबा फुले (१८२७ ते १८९०)
एकोणिसाव्या शतकात अस्पृश्यता निर्मूलन आंदोलनाची पायाभरणी महात्मा फुले यांनी केली. या मुक्ती
संग्रामाचे मूळ स्त्रोत ज्योतीरावांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यातच आढळतात.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी महात्मा फुलेंचा गौरव करताना म्हणतात, हिंदू समाजातील बहुजन समाजात आत्मप्रत्यय व आत्मावलोकन उत्पन्न करणारा पहिला माणूस म्हणजे महात्मा फुले.
• जन्म : ११ एप्रिल १८२७, पुणे. मूळ गाव कटगुण (जि. सातारा) •
मुळ आडनाव : गो-हे
जोतिबा क्षत्रिय माळी समाजातील होते.
जोतिबांचे पूर्वज पुणे येथे फुलांचा व्यवसाय करत, त्यामुळे गोन्हे आडनाव मागे पडून ते फुले बनले..
जोतिबांचे आजोबा : शेरीबा; पिता गोविंदराव, माता चिमणाबाई (जोतिबा १ वर्षाचे असताना मातोश्रींचे निधन
१८४० : वयाच्या १३ व्या वर्षी धनकवडीच्या खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाईंशी विवाह.
१८४१ : उर्दू शिक्षक गफार बेग मुन्शी व धर्मोपदेशक लिजिट साहेच यांच्या प्रयत्नाने जोतिबांच्या शिक्षणास पुन्हा सुरुवात. (पुण्यात स्कॉटिश मिशनरी शाळेत प्रवेश)
जोतिबा हे उक्ती आणि कृती यामध्ये एकवाक्यता साधणारे सुधारक होते.
ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, सत्सार या ग्रंथांमधून जोतिबांनी बहुजन समाजावर लादली गेलेली मानसिक गुलामगिरी निदर्शनास आणली.
• स्त्री-पुरुष समानता, जातीभेदास विरोध, स्वातंत्र्य, समता व बंधूता यांचे महत्त्व पटवून मानवाचे स्वत्व जागविणारे जोतिबा हे भारतीय समाजक्रांतीचे जनक होते.
सावित्रीबाई फुले (१८३१ ते १८९७)
जन्म: ३ जानेवारी १८३१, नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे.
• महात्मा फुलेंनी पुण्यात मुलींसाठी सुरू केलेल्या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून कार्य केले. त्या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका तसेच पहिल्या मुख्याध्यापिका होत.
• ‘काव्यफुले’, ‘बावन्नकशी’, ‘सुबोध रत्नाकर’ या काव्यसंग्रहातून सावित्रीबाईंनी समाज प्रबोधनाचे विचार मांडले.
• महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांनी सत्यशोधक समाजाची धुरा समर्थपणे सांभाळली, विधवा पुनर्विवाह घडवून आणणारी संस्था स्थापन केली. हळदी-कुंकू, चहापान असे कार्यक्रम घेऊन स्त्रियांना एकत्रित केले. १० मार्च १८९७ रोजी प्लेगच्या रुग्णांची सुश्रुषा करताना प्लेगची बाधा होऊन या क्रांतिज्योतीचे निधन झाले.
सावित्रीबाई फुले यांनी अज्ञानाच्या अंधःकारात खितपत पडलेल्या स्त्री-शुद्रांना ज्ञानाचा प्रकाश दाखविला. महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती आंदोलनाची पहिली अग्रणी म्हणून सावित्रीबाईंचा गौरव केला जातो.
विष्णुशास्त्री पंडित (१८२७ ते १८७६)
जन्म: १८२७, सातारा येथे.
• मूळ गाव : बावधन (सातारा)
स्त्रीउद्धारासाठी हयातभर प्रयत्न करणाऱ्या समाजसुधारकांत विष्णुशास्त्री हे अग्रणी होते.
प्राचीन धर्मग्रंथांचे सखोल अध्ययन करून स्त्रियांच्या सुधारणांना परंपरेचा आधार असल्याचे सिद्ध केले.
• ‘इंदुप्रकाश’ या साप्ताहिकाचे संपादक असताना त्यांनी स्त्रियांच्या सुधारणांविषयी विचार परखडपणे मांडले. विष्णुशास्त्रींनी ‘पुनर्विवाह उत्तेजक मंडळी’ या संस्थेची स्थापना करून विधवांच्या समस्यांना वाचा फोडली.
सनातन्यांनी या संघटनेस विरोध करताना ‘हिंदूधर्म व्यवस्थापक सभा’ ही संघटना स्थापन केली.
• विष्णुशास्त्रींनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ‘विधवा विवाह’ या बंगाली ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला.
ब्रिटिशांनी विधवा विवाहास मान्यता देणारा कायदा केल्यानंतर उक्ती व कृती यामध्ये एकवाक्यता दर्शविणाऱ्या
विष्णुबुवांनी स्वतः विधवेशी विवाह केला. बालविवाह प्रथेविरोधी त्यांनी आवाज उठविला.
विष्णुशास्त्री पंडित यांचे वाङ्मयीन कार्य विधवा विवाह, ब्राह्मण कन्या विवाह विचार, पुरुष सुक्त व्याख्या, हिंदुस्थानचा इतिहास, तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा, संस्कृत व धातुकोश, इंग्रजी व मराठी कोश.
सार्वजनिक काका (गणेश वासुदेव जोशी)
जन्म: ९ एप्रिल १८२८, सातारा येथे. • पूर्ण नाव: गणेश वासुदेव जोशी. १८७० मध्ये पुणे येथे औंध संस्थानाचे श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक
सभेची स्थापना झाली. सनदशीर मार्गाने जनतेचे प्रश्न सोडविणे हे या सभेचे उद्दिष्ट होते.
सार्वजनिक सभेच्या स्थापनेत हिरीरीने भाग घेतल्याबद्दल गणेश वासुदेव जोशी यांना ‘सार्वजनिक काका’ या नावे ओळखले जाते,
न्या. रानडे व सार्वजनिक काका यांनी सार्वजनिक सभेला सामाजिक व राजकीय स्वरूपाची संघटना बनविली.
बाबा पद्मनजी (१८३१ ते १९०६)
जन्म: १८३१, बेळगाव येथे.
• मूळ आडनाव : मुळे
१८५४ मध्ये बाबा पद्मनजी यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला.
‘यमुना पर्यटन’ ही मराठीतील पहिली स्वतंत्र सामाजिक कादंबरी लिहून त्यांनी विधवांच्या स्थितीवर प्रकाश टाकला.
त्यांनी ‘अरुणोदय’ हे आत्मचरित्रही लिहिले. • सत्यदीपिका, ज्ञाननिती निबंध संग्रह हे अन्य लेख.
डॉ. रा. गो. भांडारकर (१८३७-१९२५)
• रामकृष्ण गोपाळ भांडारकर, जन्म ६ जुलै १८३७, मालवण (जि. सिंधुदुर्ग) मूळ आडनाव पत्की धर्म व समाजसुधारक, भाषातज्ज्ञ, प्राच्यविद्या संशोधक, प्राचीन इतिहास संशोधक, संस्कृत पंडित अशा
विविध स्वरूपात त्यांना ओळखले जाते. त्यांनी ‘आत्म्याच्या उन्नतीस’ महत्त्व दिले.
शिक्षण: मुंबई विद्यापीठाची एम. ए., जर्मनी विद्यापीठाची पीएच. डी. पदवी.
• . प्रार्थना समाजाच्या स्थापनेत पुढाकार घेऊन या समाजाची तत्त्वे, उद्दिष्टे व प्रतिज्ञा तयार करण्याचे कार्य भाडांरकरांनी केले.
• मूर्तिपूजा, अवतारकल्पना, बहुदेवतावाद यास डॉ. भांडारकरांनी कडाडून विरोध केला.
• बालविवाहास बंदी, विधवा पुनर्विवाह, वयाचा कायदा, अस्पृश्यता निवारण, मद्यपानबंदी, देवदासी प्रथाबंदी,
स्त्री शिक्षण या सुधारणांचा त्यांनी आग्रह धरला.
• विधवा विवाहाचा पुरस्कार करताना डॉ. भांडारकरांनी स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह घडवून आणला.
• इतिहास व प्राचीन संस्कृती यावर संशोधन करून त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले.
डॉ. भांडारकरांचे साहित्य : अर्लि हिस्ट्री ऑफ डेक्कन, हिस्ट्री ऑफ इंडिया, , शैविझम अॅण्ड ऑदर मायनर रिलिजन्स. • मृत्यू: २४ ऑगस्ट १९२५
न्या.महादेव गोविंद रानडे (१८४२ ते १९०१)
• महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील अग्रणी.
• मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये इंग्रजी व इतिहास विषयांचे प्राध्यापक. पुण्यात न्यायाधीश म्हणून कार्य. • १८९६ साली न्या. रानडेंनी पुण्यात ‘डेक्कन सभा’ ही मवाळवाद्यांची संघटना स्थापन केली.
राजकारण, अर्थकारण, समाजकारण व धर्मकारण हे घटक एकमेकांना पूरक आहेत असे मत त्यांनी मांडले.
• समाजाच्या उन्नतीसाठी सद्सद्विवेकबुद्धी, समता, न्याय, बंधूता यावर आधारित समाजरचना होणे आवश्यक
गोपाळ गणेश आगरकर (१८५६-१८९५)
प्रखर ध्येयवाद, स्पष्टवक्तेपणा, बुद्धीवाद, भौतिक ऐहिकतेचे सुखसंवर्धन इ. गुणांमुळे आगरकरांना तत्कालीन समाजाचा रोष पत्करावा लागला. तरीदेखील पारंपरिक अंधरुढी, चालीरितींना कवटाळून बसणाऱ्या समाजाला
आपल्या विचारांनी धक्के देण्याचा प्रयत्न आगरकरांनी केला.
आगरकरांचा जीवनवृत्तांत जन्म: १४ जुलै १८५६, टेंभू (ता. कराड, जि. सातारा) येथे ब्राह्मण कुटुंबात.
पित्याचे नाव : गणेश, माता सरस्वतीबाई
प्राथमिक शिक्षण कराड येथे पूर्ण केले. •
कराड येथे काही काळ मुन्सफ कोर्टात कारकूनी केली.
• पुढील शिक्षणासाठी रत्नागिरी येथे गेले
, परंतु गरीबी आड आल्याने पुन्हा कराडला परतून काही काळ अकोला येथून उत्तीर्ण.
कंपौंडरची नोकरी केली. • १८७५ : मॅट्रिक परीक्षा
महाविद्यालयीन शिक्षणासाठी आगरकरांनी पुणे येथे प्रयाण केले.
१८७८ : डेक्कन कॉलेजमधून (पुणे) बी. ए. उत्तीर्ण. १८७८ लो. टिळकांशी परिचय होऊन स्नेह जुळला.
१८८०: इतिहास व तत्त्वज्ञान हे विषय घेऊन एम. ए. उत्तीर्ण.
१ जानेवारी १८८० : लो. टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या सहाय्याने आगरकरांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. • आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली.
पंडिता रमाबाई (१८५८ ते १९२२)
जन्म: २३ एप्रिल १८५८, गंगामुळे (जि. मंगळूर, कर्नाटक) वडिलांचे नाव अनंत शास्त्री डोंगरे आईवडिलांच्या मृत्यूनंतर बंधू श्रीनिवास यास सोबत घेऊन रमाबाईंनी तीर्थयात्रेच्या निमित्ताने भारतभ्रमण केले.
• कोलकाता मुक्कामी आपल्या पांडित्याने त्यांनी विद्वानांना प्रभावित केले. त्यामुळे त्यांना ‘सरस्वती’ व ‘पंडिता’ या पदव्या देण्यात आल्या.
कोलकात्याच्या बिपीन बिहारीदास या शुद्र समाजातील वकिलाबरोबर झालेल्या त्यांच्या विवाहाने खळबळ उडाली. पतीनिधनानंतर रमाबाई पुण्यात आल्या. त्यांची कन्या ‘मनोरमा’ हिचेदेखील अकाली निधन झाले.
देशाच्या उन्नतीसाठी स्त्रियांची स्थिती सुधारणे गरजेचे आहे, असे त्यांचे मत होते. १८८२ साली हंटर कमिशनपुढे साक्ष देताना त्यांनी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला.
मिशनऱ्यांच्या प्रभावामुळे त्या इंग्लंड व अमेरिकेत गेल्या.
सप्टेंबर १८८३ मध्ये इंग्लंडमधील बॉटिज चर्चमध्ये रमाबाईंनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर स्त्री-शिक्षणासाठी व स्त्रियांच्या उन्नतीसाठी त्यांनी हयातभर काम केले.
पंडिता रमाबाईंचे वाङ्मयीन कार्य श्रीधर्मनीती, हाय कास्ट हिंदू वुमन, बायबलचे मराठी भाषांतर.
१८९७ च्या दुष्काळात रमाबाईंनी जनतेला मदत केली.
‘हाय कास्ट हिंदू वुमन’ हा हिंदू बालविधवांच्या समस्यांवर प्रकाश टाकणारा ग्रंथ रमाबाईंनी अमेरिकेतील वास्तव्यादरम्यान लिहिला.
रमाबाईंच्या कार्याची दखल घेऊन १९१९ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना ‘कैसर-इ-हिंद’ ही पदवी दिली.
५ एप्रिल १९२२ रोजी केडगाव येथे रमाबाईंचे निधन.
‘स्त्रियांच्या मुक्तीची आद्य प्रवर्तक’ या शब्दात महाराष्ट्रात रमाबाईंचा गौरव केला जातो.
उस्ताद लहुजीबुवा. साळवे
जन्म: १८००, पुणे येथे.
पुण्यातील शनिवार वाड्यावर इंग्रजांनी ‘युनियन जॅक’ फडकविल्यामुळे चिडलेल्या लहूजींनी राष्ट्रवादी विचारांच्या
भावनेतून पुण्यात तालीम (आखाडा) बांधली व तेथे बलोपासना, शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण कार्यास प्राधान्य दिले. महात्मा फुले यांनी लहूजींबुवांकडेच तालमीचे प्रशिक्षण घेतले होते.
स्वामी रामानंद तीर्थ
• मूळ नाव: व्यंकटेश भवानराव खेडगीकर. जन्म: ३ ऑक्टोबर १९०३, सिंदगी (जि. विजापूर) येथे. १४ जानेवारी १९३२ रोजी हिप्परगा येथे नारायण स्वामी यांच्या हस्ते ‘विद्वत संन्यास’ घेतल्यानंतर त्यांचे नाव
स्वामी रामानंद तीर्थ असे झाले. • मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वामीजींचे कार्य अनमोल आहे.
१९३८ मध्ये स्वामीजींनी हैदराबाद संस्थानात ‘स्टेट काँग्रेस’ची स्थापना केली.
१९४० च्या वैयक्तिक सत्याग्रह चळवळीत स्वामीजींनी हैदराबाद संस्थानात वैयक्तिक सत्याग्रह केला.
• १९४६ मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसवरील बंदी उठविल्यानंतर या संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष
म्हणून त्यांची निवड झाली.
• १९५२ मध्ये गुलबर्गा, तर १९५७ मध्ये औरंगाबाद या मतदारसंघातून स्वामीजी लोकसभेवर निवडून गेले.
१९६७ साली आंध्र प्रदेशात ‘स्वामी रामतीर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पीस’ ही संस्था स्वामीजींनी स्थापन केली.
१९७० साली मराठवाडा विद्यापीठाने स्वामी रामानंद तीर्थ यांना ‘डॉक्टर ऑफ लॉज’ ही पदवी दिली.
२२ जानेवारी १९७२ रोजी हैदराबाद येथे निधन. • हैदराबादमधील बेगमपेठ येथे स्वामीजींची समाधी आहे.
महर्षी धोंडो केशव कर्वे (१८५८-१९६२)
• स्त्री शिक्षण व स्त्री स्वातंत्र्याचा उद्गाता, विधवाविवाहाचा पुरस्कर्ता व उक्ती आणि कृती यामध्ये एकवाक्यता साधणारा ऋषितूल्य समाजसुधारक म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतीय समाजसुधारणा चळवळीत मानाचे स्थान आहे.
• महषीं कर्वे म्हणतात, ‘स्त्रीशिक्षणासाठी केलेले विचार व उच्चार हिच परमेश्वराची प्रार्थना होय.’
महर्षी कर्वेचा ऋषितूल्य जीवनवृत्तांत जन्म १८ एप्रिल १८५८, शेरवली (जि. रत्नागिरी) येथे.
• मुरूड (ता. दापोली) येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण.
मुरूड येथील सोमण गुरुजींकडून त्यांना निःस्वार्थीपणाची व लोकसेवेची प्रथम प्रेरणा मिळाली.
१८७३ : कर्वेचा राधाबाईंशी विवाह. •
१८८०: मुंबईत मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज (१८७४-१९२२)
आधुनिक महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उद्धारासाठी कोणतीही तडजोड न
करता आयुष्याच्या अखेरीपर्यंत झटणारा सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष म्हणून राजर्षी शाहू महाराजांना समाजसुधारकांमध्य
अग्रस्थान द्यावे लागते. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची प्रतिभा साकारली गेली.
राजर्षी शाहू महाराजांचा विस्तृत जीवनक्रम खालीलप्रमाणे :
• जन्म : २६ जून १८७४ (कागलच्या घाटगे घराण्यात)
• जन्मस्थळ : लक्ष्मीविलास पॅलेस, कोल्हापूर. (संदर्भ: डॉ. धनंजय कीर यांच्या ‘राजर्षी शाहू छत्रपती’ या ग्रंथातून)
मूळ नाव : यशवंतराव पित्याचे नाव जयसिंगराव ऊर्फ आबासाहेब घाटगे