राज्यभरात UPS / GPS (RNPS) योजनेचे ऑप्शन फॉर्म भरणे सुरूUPS / GPS (RNPS) Pension calculater
नमस्कार मित्रांनो..
सध्या राज्यभरात UPS / GPS (RNPS) योजनेचे ऑप्शन फॉर्म भरणे सुरू आहे.. खरं तर अद्याप पर्यंत (25 मार्च 2025) राज्य सरकार च्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन GPS (RNPS) योजनेच्या अटी शर्ती अजूनही पूर्णपणे स्पष्ट नाहीत, कारण त्याबाबतचा अंमलबजावणी / कार्यपद्धती शासन निर्णय आलेला नाही.. त्यामुळे या विकल्प भरण्याच्या तारखेस मुदतवाढ मिळावी ही मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे, कदाचित एक दोन दिवसात मुदतवाढ पत्र / GR निघेल ही..
तूर्तास GPS योजनेतील उपलब्ध माहितीच्या आधारे आणि भविष्यात त्यात समाविष्ट होऊ शकणाऱ्या अटी चा विचार करून दोन कंडिशन मध्ये सदर calculater तयार केलेले आहे..
जुन्या पेन्शन ची बरोबरी ना NPS करू शकत होती, ना आता आलेल्या या UPS किंवा GPS (RNPS) करतील..
तथापि सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीनुसार कर्मचाऱ्यांना सर्व योजना समजून सांगणे , त्यातील अटी समजून सांगणे हे महत्वाचे आहे, व त्यानुसार विकल्पाची निवड करणे सोयीचे होईल.. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत , त्याबाबत कार्यशाळा, चर्चासत्र जिल्हा जिल्ह्यात आयोजित करीत आहोत.. व कोणत्या योजनेत कोणत्या अटीवर किती पेन्शन मिळेल हे स्पष्ट करीत आहोत..
मात्र हे सर्व करत असतांना प्रत्यक्ष पेन्शन किती मिळेल हे सगळ्याच कर्मचाऱ्यांना गणितीय आकडेमोड करणे शक्य होत नाही त्यामुळे ‘पेन्शन कॅल्क्युलेटर’ सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी आम्ही गेल्या अनेक महिन्यापासून प्रयत्न करीत होतो, त्यात वेळोवेळी व आज अखेर होत असलेले बदल / अटी समाविष्ट करीत ते अपडेट करीत गेलो.. केंद्र सरकारने 19 मार्च रोजी UPS कार्यपद्धती आणली व त्यातून जवळपास सर्व बाबी स्पष्ट झाल्यात, पण महाराष्ट्र शासनाच्या GPS (RNPS) योजनेच्या बाबतीत अजूनही काही बाबी अस्पष्ट आहेत- जसे की ‘बेंचमार्क कॉर्पस..’ GPS मध्ये UPS प्रमाणे बेंचमार्क कॉर्पस अट असेल की नसेल हे स्पष्ट नाही.. बेंचमार्क कॉर्पस विषयी आपण यापूर्वीच स्पष्टता दिली आहे..
थोडक्यात बेंचमार्क म्हणजे आपल्या खात्यात जमा होत असलेली नियमित अंशदान कपात व त्यावर वेळेवर मिळणारे शासन अंशदान व व्याज / रिटर्न..
अशी आदर्श जमा रक्कम म्हणजे थोडक्यात बेंचमार्क कॉर्पस रक्कम .. या कॉर्पस रकमेची गणना कर्मचारी नियमित वेतनश्रेणी वर आल्यापासून आपोआप सुरू होते, ही आभासी रक्कम असेल व त्या रकमेएवढी रक्कम आपल्या वैयक्तिक खात्यात असेल तर आपल्याला अपेक्षित पेन्शन मिळेल.. जर आपली कॉर्पस रक्कम बेंचमार्क च्या तुलनेत कमी असेल तर त्याप्रमाणात कमी पेन्शन मिळेल..
UPS मध्ये ही बेंचमार्क कॉर्पस ची अट आहे मात्र राज्याच्या GPS (RNPS) मध्ये ती अट आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नाहीय.. जर बेंचमार्क ची अट नसली तर त्यात कर्मचाऱ्यांचा फायदा हा होणार आहे, कारण अश्यावेळी केवळ 20 वर्ष कपात आहे की नाही हे बघितले जाईल व ज्यांची मूळ सेवा 30 वर्ष मात्र कपात 20 वर्ष , अश्या कर्मचाऱ्यांना कपात जप्त करून 50% पेन्शन मिळेल.. मात्र जर GPS मध्ये बेंचमार्क अट आली तर अश्या वेळी मात्र 50% पेन्शन साठी सुरुवात ते शेवटपर्यंत नियमित कपात एवढी रक्कम आपल्या कॉर्पस मध्ये असणे गरजेचे आहे, जर त्यापेक्षा (बेंचमार्क पेक्षा) कमी रक्कम असेल तर त्याप्रमात कमी पेन्शन मिळेल..
*केंद्र सरकारने आणलेली नवीन फायनल WITHDRAWAL (FW) टक्केवारी चे option..*
केंद्र सरकारने आता नव्याने एक पर्याय UPS योजनेत समाविष्ट केला आहे.. तो म्हणजे Final Withdrawal.. आज जसे NPS मध्ये 60% रक्कम काढता येते तसा हा प्रकार आहे.. UPS मध्ये वैयक्तिक कॉर्पस ( IC) मधून एकूण कॉर्पस च्या जास्तीत जास्त 60% पर्यंत ची रक्कम काढता येईल , मात्र त्याप्रमाणात मिळणारी पेन्शन ची टक्केवारी कमी होईल..
उदा- FW न करता 20,000 रु पेन्शन देय असेल, मात्र जर त्या कर्मचाऱ्याने त्याच्या निवृत्तीवेळी वैयक्तिक कॉर्पस (IC) मधून 50% रक्कम काढली तर त्याची ही देय पेन्शन 50% ने कमी होईल म्हणजेच त्याला 20,000 रु ऐवजी 10,000 रु पेन्शन (+ DA) मिळेल..
जर त्याने 60% कॉर्पस काढला तर त्याला मंजूर पेन्शन च्या 40% पेन्शन मिळेल, अर्थात 8000 रु + DA..
*पेन्शन CALCULATER बाबत..*
*_पेन्शन calculater मध्ये एकूण 9 शीट समाविष्ट आहेत.._*
*1) शीट A..*
शीट A मध्ये दोन पार्ट आहेत..
पार्ट १. *INPUT (इनपुट) :-*
या इनपुट मध्ये एकूण 11 + 2 मुद्द्यांचे इनपुट आहे.. ही माहिती प्रत्येक कर्मचाऱ्यांने भरावयाची आहे.. त्याबाबत च्या स्वतंत्र सूचना त्याखाली देण्यात आलेल्या आहेत..
( पैकी मुद्दा क्र 11 मध्ये या आधी सेवानिवृत्त झालेल्या व 60% NPS ची 60% रक्कम घेतलेल्या कर्मचाऱ्याने अनिवार्यपणे 60 लिहावे.. तर अन्य कर्मचाऱ्यांना तो मुद्दा ऑप्शनल असणार आहे.. जे कर्मचारी तिथे FW चा ऑप्शन घेतील त्यांची पेन्शन टक्केवारी तितक्या टक्क्यांनी कमी होईल एवढं लक्षात असू द्यावं.. )
*पार्ट २. Output*
यात NPS , UPS , GPS आणि OPS या चारही योजनांत किती पेन्शन मिळेल हे आउटपुट आकडेवारी आहे..
यात केवळ पेन्शन च नाही तर किती लमसम / अंशदान मिळेल, किती जप्त होईल, पहिली पेन्शन किती असेल, एकूण किती पेन्शन कमावणार, पहिली फॅमिली पेन्शन किती मिळेल, एकूण किती फॅमिली पेन्शन प्राप्त होईल, एकूण नफा किती, एकूण तोटा किती.. अशी गणना एकत्रित करण्यात आलेली आहे.. जी उर्वरित 8 शीट वरून एकत्रीकरण केली आहे..
*2) शीट 2 – Payment*
यात कर्मचाऱ्याचे आजपासून ते भविष्यात सेवानिवृत्ती पर्यंत चे आभासी वेतन गणना केली आहे, ही शीट वेतन शीट सोबतच NPS कॉर्पस ची सुद्धा बॅलन्स शीट आहे..
*NPS मध्ये वार्षिक 7.5% चा परतावा* गृहीत धरून चक्रवाढ व्याजाने ही NPS ची रक्कम वाढवत नेण्यात आली आहे..
सोबतच *वेतन आयोगाची आभासी गणना ही यात करण्यात आलेली आहे, ज्यात 1.82 चा फिटमेंट फॅक्टर लावण्यात आलेला आहे.. व DA दरवाढ ही 3% सेट केली आहे..*
*3) शीट 3 NPS*
यात NPS ची फायनल कॉर्पस नुसार मिळणाऱ्या पहिल्या पेन्शन ची गणना केली आहे..
*4) शीट 4 – NPS Pension*
या शीट मध्ये सेवानिवृत्ती नंतर कर्मचारी / जोडीदार जिवंत असेपर्यंत ( इनपुट आकड्या नुसार) NPS मध्ये मिळणारी दरमाह पेन्शन ची शीट बनवण्यात आली आहे.. यात दोन भाग केले आहेत..
पहिला भाग हा सर्व 100% NPS कॉर्पस गुंतवणूक करून मिळणारी पेन्शन नुसार आहे तर दुसरा भाग हा NPS च्या 40% कॉर्पस वर मिळणाऱ्या पेन्शन वर आहे..
इथे NPS चा Annuity rate हा 5.5% सेट केलेला आहे..
इथे एक लक्षात घ्यावे की NPS मध्ये Annuity खरेदी चे वेगवेगळे प्रकार आहेत, ज्यात
पहिला प्रकार नुसार 40% कॉर्पस परत मिळण्याच्या अटीवर पेन्शन आहे, ज्यात Annuity दर हा कमी असतो, साधारणपणे 5.5% तर
दुसरा प्रकार हा 40% कॉर्पस रक्कम परत न मिळण्याचा असतो, ज्यात annuity दर हा जास्त असतो ( साधारणपणे 7.5 ते 8%)..
त्यामुळे जे कर्मचारी NPS घेतील त्यांनी ही बाब लक्षात ठेवणे गरजेचे आहे..
*5) शीट 5 – UPS :-*
यात दरमाह वेतन शीट व त्यात वाढत जाणाऱ्या वैयक्तिक कॉर्पस ( IC ) ची गणना आहे..
इथे लक्षात घ्यावे की UPS मध्ये 1 एप्रिल 2025 पासून UPS खाते धारकांची IC कॉर्पस मध्ये 10% कर्मचारी अंशदान आणि 10% शासन अंशदान अशी 20% अंशदान जमा केली जाईल, व यात पूर्वीची NPS जमा बॅलन्स ही add होईल..
*6) शीट 6 :- UPS pension option 1*
या शीट मध्ये UPS मध्ये सेवानिवृत्ती नंतर दरमाह मिळणारी पेन्शन व फॅमिली पेन्शन गणना केली आहे..
यात कर्मचाऱ्यांने जर वैयक्तिक कॉर्पस मधून कोणतीही रक्कम काढली नाही तर अश्या वेळी मिळणारी पेन्शन ची ही गणना आहे..
*7) शीट 7 – UPS pension option 2*
यात कर्मचाऱ्यांने जर वैयक्तिक कॉर्पस मधून रक्कम काढली तर अश्या वेळी मिळणारी पेन्शन ची ही गणना आहे..
(याबाबत इनपुट मध्ये तसा ऑप्शन दिलेला आहे, जे कर्मचारी FW ( Final Withdrawal ) टक्केवारी तिथे टाकतील त्यांच्यासाठी ही शीट आहे.. जर FW मध्ये 0% टाकले
तर UPS option 1 आणि option 2 दोन्ही मध्ये रक्कम सारखीच असेल…
*8) शीट 8 GPS pension*
या शीट मध्ये आपल्याला GPS अंतर्गत मिळणारी दरमाह पेन्शन बघता येणार आहे..
सध्या GPS मध्ये बेंचमार्क कंडिशन बाबत स्पष्टता नसल्याने इथे दोन्ही कंडिशन मध्ये गणना केली आहे..
*9) शीट 9 – OPS pension*
ही शीट खूप महत्त्वाची आहे.. कारण या शीट वरून आपल्याला खऱ्या अर्थाने समजेल की UPS / GPS च्या तुलनेत OPS किती आणि कशी फायदेशीर आहे ते..
या OPS pension शीट मध्ये निवृत्तीनंतर दरमाह मिळणाऱ्या पेन्शन ची गणना केली आहे..
यात फक्त एक टेक्निकल बाब अशी आहे, की निवृत्त कर्मचाऱ्याच्या मृत्यू नंतर मिळणाऱ्या फॅमिली पेन्शन चा रेट किचकट कंडिशन मुळे सेट करतांना अडचणी होत्या म्हणून
फॅमिली पेन्शन चा रेट इथे सरसकट 60% असा आहे..
ज्या कर्मचाऱ्यांने आपले आयुष्यमान 65 वर्ष नमूद केले त्यांच्याबाबतीत ही OPS फॅमिली पेन्शन शीट बरोबर पेन्शन दाखवेल मात्र ज्यांचे 65 च्या आत आयुष्यमान असेल त्यांना ops नुसार 65 वय होई पर्यंत निवृत्तिवेतन च्या 100% फॅमिली पेन्शन रेट आहे, व 65 वया नंतर 60% फॅमिली पेन्शन रेट आहे, जो इथे सरसकट 60% च दिसेल.. बाकी इतर कुठलीही अडचण येत नाही..
अश्या प्रकारे प्रत्येक कर्मचारी सर्व शीट वर जाऊन वेगवेगळ्या पेन्शन स्कीम मध्ये दरमाह मिळणारी पेन्शन बघू शकतो.. आणि या सर्वांचे एकत्रीकरण पहिल्या A शीट वर केलेले आहे ते क्रॉस चेक करू शकतो..
या पेन्शन कॅल्क्युलेटर च्या निर्मितीसाठी लाभलेले सहकार्य-
या पेन्शन कॅल्क्युलेटर साठी गेल्या अनेक महिन्यांची मेहनत आहे, यात मला प्रामुख्याने तांत्रिक मदत लाभली ती माझे मित्र श्री संदीप जाधव सर यांची.. त्यांच्या अनमोल अश्या सहकार्यमुळे या Calculater मध्ये तारखेनुसार पेन्शन सेट करण्यास मोलाची मदत झाली..
मार्गदर्शन:- या पेन्शन कॅल्क्युलेटर साठी मला जे पाठबळ मिळाले ते संघटनेतील राज्याध्यक्ष वितेशजी खांडेकर , राज्यसचिव गोविंद जी उगले व अन्य सर्वच राज्य पदाधिकारी बांधवांचे..
या सर्व ज्ञात अज्ञात सर्वांचे या प्रसंगी आभार..
सर्वांनी या pension calculater चा स्वतः ही अभ्यास करावा.. व यातुन जर आपल्याला वाटत असलेली खात्री होत असेल तर त्याचा आनंद नक्की मला होईल.. आपण आपली जीवित राहण्याचे आयुष्यमान आकडा , त्यापुढे आपल्या जोडीदाराचे जीवित कालखंड यात बदल करून आपल्या सर्व पेन्शन शीट बघा, व त्यानुसारही तुलना करा..
*Disclaimer:- हे calculater आज रोजी उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित आहे, सरकारने भविष्यात या UPS/GPS/NPS योजनात काही बदल केले तर यात बदल होईल तसेच हे Calculater केवळ एक मार्गदर्शन म्हणून आहे, ते परफेक्शन नाही.. त्यामुळे आपण स्वतः ही अभ्यास करून मग अंतिम निर्णय घ्यावा..*
जुनी पेन्शन योजना हा प्रत्यक्ष शिक्षकाचा हक्क आहे आणि तो शिक्षकांना मिळाला पाहिजे तसेच महाराष्ट्रातील इतर कर्मचाऱ्यांना देखील जुनी पेन्शन योजना देऊन शासनाने आपले मत व्यक्त करायला पाहिजे तसेच जुनी पेन्शन हा आधार आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवनामध्ये त्यांना शेवटपर्यंत उपयोगी पडेल असा हा निर्णय होईल या दष्टीने महाराष्ट्र शासनाने व भारतीय सरकारने पावले उचलायला हवीत जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या जीवनाचा प्रश्न सुटेल कर्मचाऱ्यांना पेन्शन घेऊन सरकारने एक पाऊल पुढे उचलले पाहिजे कारण जुनी पेन्शन योजनेमध्ये चे लाभ आहेत ते नवीन पेन्शन मध्ये मिळत नाहीत तसेच अनेक बाबींसाठी जुनी पेन्शन योजना ही महत्त्वपूर्ण आहे कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे जुनी पेन्शन योजना ही अनेक राज्यांमध्ये लागू केलेली आहे काही मोजकेच राज्य लागू करण्याचे बाकी आहे त्यामुळे भारत सरकारने या जुन्या पेन्शनचा विचार करून कर्मचाऱ्यांच्या भवितव्य चा विचार करून योग्य तो निर्णय घेणे क्रमप्राप्त होईल. कर्मचाऱ्यांचा आधार म्हणजे जुनी पेन्शन योजना होय कर्मचाऱ्यांचा हक्क म्हणजे योजना होय कर्मचाऱ्यांचा अधिकार म्हणजे जुनी पेन्शन योजना होईल या पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना विविध गोष्टी मिळणार आहेत ज्यामध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत मिळू शकते तसेच अकाली मृत्यू आल्यास त्याच्या कुटुंबीयांना यामध्ये आधार मिळू शकतो अशा प्रकारचे सेवा उपदान निवृत्तीवेतन व नोकरी नवीन पेन्शन योजनेमध्ये मिळत नसल्यामुळे कर्मचारी हातबल झालेले आहेत या कर्मचाऱ्यांना जर विश्वास द्यायचा असेल तर सरकारने लवकरात लवकर जुनी पेन्शन योजनेची घोषणा करून अधिकृत रीतीने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे क्रम प्राप्त होईल.
नवीन पेन्शनचे अनेक गोंधळ निर्माण झाला आहे कारण या योजनेमध्ये शिक्षकांना विकल्प भरून देण्याबाबत शासनाकडून कल्पना देण्यात आलेली आहे परंतु अद्याप पर्यंत कोणत्या दिवशी शिक्षकांन विकल्प भरून घेण्यात आलेला नाही कारण शिक्षकांची अवस्था ही गोंधळल्याची झालेली आहे शासनाने विविध योजना आणून शिक्षकांसमोर एक संघर्ष निर्माण केलेला आहे ज्यामध्ये शिक्षकांना कोणता विकल्प द्यावा हा त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. या योजनेतील शिक्षकांना स्पष्टता दिसत नाही त्यामुळे कोणीही नवीन विकल्प भरून दिलेला नाही. शासनाने खऱ्या अर्थाने जुनी पेन्शन योजना लागू करून कर्मचाऱ्यांना उपकृत करायला पाहिजे
खूप खूप धन्यवाद!
*एकच मिशन जुनी पेन्शन..*