जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे आनंद बाजार व खाऊ गल्ली उपक्रमास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद z.p primary school kambleshwar
*स्वर्गीय अशोक काका देशमुख व स्वर्गीय धनंजय भाऊ देशमुख यांच्या स्मरणार्थ
जिल्हा परिषद शाळा कांबळेश्वर येथे आज स्व.धनंजय(भाऊ) देशमुख मेमोरियल ट्रस्टतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व वह्या वाटप –
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे आनंद बाजार व खाऊ गल्ली उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . सदर उपक्रमास पालक ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांच्या विविध वस्तू उस्फूर्तपणे खरेदी करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला .
सदरच्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी मा . उपसरपंच श्री किरण आगवणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ दिपाली खलाटे ,चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप, सुभाष मदने अमीर, पप्पु वाघमारे, गणा पैलवान, सचिन खलाटे सर, वैभव राजे घोरपडे, तुषार खलाटे, निलेश जगताप, छोटू खलाटे, बापूराव खलाटे शाळा व्यवस्थापन सर्व सदस्य पदाधिकारी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले .
शाळेचे मुख्याध्यापक श्री .ज्ञानदेव सस्ते उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्जे सौ . सुनीता शिंदे सौ मनिषा चव्हाण शिक्षक स्टाफ व समस्त माता पालक वर्ग या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कष्ट घेतले .
आनंद बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी वांगी कोथिंबीर बटाटे ,खरबूज, कलिंगड, पपई, कैरी याबरोबरच खाऊगल्ली पदार्थांमध्ये माता पालकांनी स्वतः बनवलेले पाणीपुरी, इडली ,पावपॅटीस,दाबेली,ज्यूस ,चहा,विविध चटण्या, लाडू गुलाबजाम ,शेंगदाणे, फुटाणे बिस्किट ,चॉकलेट याबरोबरच विद्यार्थ्यांना विविध खेळणी, फुगे चेंडू, शालेपयोगी साहीत्य , बांगड्या, निलपेंट अशा विविध वस्तूंची विद्यार्थ्यांनी विक्री केली सदर विक्रीस सर्व पालकांनी उस्फूर्तपणे विद्यार्थ्यांच्या वस्तूंची खरेदी केली.
खाऊगल्लीमधील विविध पदार्थावर पालक ग्रामस्थ पदाधिकारी हायस्कूल मधील विद्यार्थी शिक्षक स्टाफ या सर्वांनी खाऊ गल्लीमधील पदार्थावर ताव मारला .
चांडाळ चौकडी करामती चे प्रमुख श्री रामदास जगताप यांनी आनंद बाजार गल्लीमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या वस्तूंची खरेदी केली .पालक ग्रामस्थ पदाधिकारी यांनी केलेल्या खरेदी मधून विद्यार्थ्यांच्या आनंद बाजारामध्ये 20000 पेक्षा जास्त रुपयांची उलाढाल झाली .विद्यार्थी वर्गामध्ये चढाओढिच्या वातावरणामध्ये आपल्या वस्तू विक्री करताना दिसून आले . विक्री करत असताना दिलेली पैसे परत द्यायचे पैसे ,वस्तूंची झालेली विक्री यामधून हिशोबाची जाण त्यांच्यामध्ये निर्माण झाली .काटेकोरपण चिकिस्तक वृत्ती, विक्रीतील कौशल्य आदी बाबत विद्यार्थी जागरूकता बाळगताना दिसून आले .शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता या दृष्टिकोनातून घेतलेल्या उपक्रमाचा फायदा विद्यार्थी वर्गास झाले मुळे पालकांनी समाधान व्यक्त केले .
स्वर्गीय अशोक काका देशमुख व स्वर्गीय धनंजय भाऊ देशमुख यांच्या स्मरणार्थ
जिल्हा परिषद शाळा कांबळेश्वर येथे आज स्व.धनंजय(भाऊ) देशमुख मेमोरियल ट्रस्टतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व वही वाटप करण्यात आले . श्री तुषार खलाटे यांच्या माध्यमातून वरील साहित्य ट्रस्टमार्फत देण्यात आले .
*एमटीएस (ऑलिंपियाड) -2025 स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर शाळेचे घवघवीत यश……*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथील विद्यार्थी एम टी एस (ऑलिंपियाड) 2025 अंतर्गत झालेल्या परीक्षेमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले . सदर परीक्षा 5 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आली होती .महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त परीक्षेत पालकांच्या इच्छेवरून शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली होती . नुकताच या परीक्षेचा ऑनलाईन रिझल्ट घोषित झाला असून या परीक्षेमध्ये शाळेमधील इयत्ता पहिली ते चौथी 57 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता .या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी राज्य जिल्हा व केंद्रस्तरावर प्राविण्य मिळवले असून विद्यार्थ्यांना ट्रॉफी बरोबर गोल्ड मेडल, सिल्वर मेडल,ब्राँझ मेडल देऊन गौरविण्यात येते .*
*सन 2018 पासून शाळेमध्ये सातत्याने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याचे काम शाळेतील सर्व शिक्षक करत असतात . त्याचबरोबर पालकांचीही मोलाची साथ लाभते. म्हणूनच विद्यार्थी विविध खाजगी शासकीय परीक्षांना बसवून विद्यार्थ्यांचा बेसिक पाया तयार करून घेणेवर शाळेच्या वतीने भर देण्यात येतो. स्पर्धा परीक्षा उपक्रमामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे अनेक प्रवेश खाजगी / इंग्रजी माध्यमातून होताना दिसून येतात. विद्यार्थ्यांची तयारी शाळेतील सर्व शिक्षकांच्या वतीने करण्याचे काम मुख्याध्यापक श्री . ज्ञानदेव सस्ते उपशिक्षक श्री. रेवणनाथ सर्जे उपशिक्षिका सौ .सुनिता शिंदे सौ .मनीषा चव्हाण या सर्व शिक्षकांच्या सहकार्यांमधून ,सकारात्मक दृष्टिकोन बाळगून करण्याचे काम सातत्याने होत असल्यामुळे विद्यार्थ्यांची भविष्यकालीन स्पर्धा परीक्षेची तयारी होत असते .*
*सदर परीक्षेमध्ये 80 ते 100 मार्क मिळालेले विद्यार्थी गोल्ड मेडल पात्र. 61 ते 79 गुण मिळवलेले सिल्वर मेडल पात्र आणि 50 ते 60 गुण ब्राँझ मेडल विद्यार्थी पात्र ठरले असून गोल्ड मेडल पात्र मध्ये मध्ये अर्जुन चव्हाण, दुईता आडके, देवराज खलाटे,अद्वेय घोरपडे, आदित्य कुंभार, स्मायली घोरपडे, खुशी धोत्रे शरण्या तांबे, तृप्ती जगताप, श्वेता वाघमारे, चव्हाण ,अमन पठाण, अल्फीया शेख , संकल्प देशमुखअथर्व निंबाळकर, कैवल्य देशमुख, जोया शेख, श्रेयांश भोसले, श्रुती चव्हाण, अथर्व धोत्रे, शिवन्या काकडे, वैष्णवी घोरपडे, प्रबुद्ध साळवे, स्वरा शिंदे, ईश्वरी धायगुडे, श्रेयश नरुटे, वेदांत जगताप, विराज उकिरडे, पियुष इंगळे, सोफीया शेख ,अन्वेष चव्हाण कशिश पवार, ऋतुजा सरडे, शिवम खलाटे, अंकिता वाघमारे, योगेश्वरी तावरे, अल्फिया शेख, आयुष इंगळे, विहान तावरे, आजान शेख, श्रेया नरुटे, जयवर्धन काकडे, अभिमन्यू भगत, आरिश लाडखान, कार्तिक कुंभार हे विद्यार्थी पात्र ठरले . सिल्वर मेडल साठी विराज जगताप, आराध्या शिंदे, विघ्नेश खलाटे, राजनंदिनी जगताप, आरोही धुमाळ, राजवर्धन निकाळजे,आरोही खुडे, भावेश जाधव, आदित्य इंगळे, शाहीद शेख,विवेक खरात हे विद्यार्थी तर ब्रॉझ मेडल साठी प्रणिती खलाटे, आकांक्षा खरात हे विद्यार्थी पात्र ठरले.*
*सर्व यशस्वी विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक यांचे कौतुक कांबळेश्वर गावच्या सरपंच सौ.मंदाकिनी कानडे उपसरपंच श्री किरण आगवणे सर्व सन्माननीय पदाधिकारी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. दिपाली खलाटे, सर्व सदस्य ,पालक तसेच पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्री. निलेश गवळी साहेब , विस्तार अधिकारी श्री. संजय जाधव साहेब, केंद्रप्रमुख सौ. नफिसा तांबोळी, श्री संतोष खलाटे या सर्वांनी कौतुक केले .
*💥🔥 ब्रेकींग न्यूज..🔥💥*
👇👇👇👇👇👇👇
*NIPUN भारत प्रकल्प ऑनलाईन app वर माहिती भरणेच्या कामावर पूर्णपणे बहिष्कार – जि.प. प्राथमिक, म. न. पा., खाजगी प्राथमिक शिक्षक संघटना प्रतिनिधींच्या समन्वय बैठकीत एकमुखी निर्णय….*
*याविषया संदर्भाने आज दुपारी १२ वाजता जि. प. कर्मचारी सोसायटी सभागृहात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जि. प. प्राथमिक, म. न. पा., खाजगी प्राथमिक शिक्षक संघटना नेते, प्रतिनिधी यांची ऑफलाईन बैठक संपन्न झाली…*
*या बैठकीत वरील निर्णय सर्वानुमते घेणेत आला…*
*जिल्हयातील लोकप्रतिनिधी तसेच शिक्षण संचालक,SCERT,पुणे*
*यांची तात्काळ भेट घेऊन सदर प्रायोगिक प्रकल्पातील त्रुटींबाबत सविस्तर चर्चा करून या प्रकल्पाबाबत पुर्नविचार करणेविषयी मागणी करणेत येईल…*
*सदर NIPUN ऑनलाईन प्रकल्पासंदर्भाने समन्वय समितीचे अधिकृत पत्र प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत सर्वांनी NIPUN BHARAT APP वर कोणतीही माहिती भरू नये व online च्या कामावर तसेच याविषयानुषंगाने V.C. बैठकीवरही बहिष्कार कायम ठेवावा….*
*या बहिष्काराच्या अनुषंगाने तालुका, केंद्र, शाळा स्तरावर शिक्षकात जागृती होणेकरीता तालुका समन्वय समितीने तात्काळ बैठकीचे आयोजन करावे…*
*💥🔥 ब्रेकींग न्यूज..🔥💥*
👇👇👇👇👇👇👇
*NIPUN भारत प्रकल्प ऑनलाईन app वर माहिती भरणेच्या कामावर पूर्णपणे बहिष्कार – जि.प. प्राथमिक, म. न. पा., खाजगी प्राथमिक शिक्षक संघटना प्रतिनिधींच्या समन्वय बैठकीत एकमुखी निर्णय….*
*याविषया संदर्भाने आज दुपारी १२ वाजता जि. प. कर्मचारी सोसायटी सभागृहात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जि. प. प्राथमिक, म. न. पा., खाजगी प्राथमिक शिक्षक संघटना नेते, प्रतिनिधी यांची ऑफलाईन बैठक संपन्न झाली…*
*या बैठकीत वरील निर्णय सर्वानुमते घेणेत आला…*
*जिल्हयातील लोकप्रतिनिधी तसेच शिक्षण संचालक,SCERT,पुणे*
*यांची तात्काळ भेट घेऊन सदर प्रायोगिक प्रकल्पातील त्रुटींबाबत सविस्तर चर्चा करून या प्रकल्पाबाबत पुर्नविचार करणेविषयी मागणी करणेत येईल…*
*सदर NIPUN ऑनलाईन प्रकल्पासंदर्भाने समन्वय समितीचे अधिकृत पत्र प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत सर्वांनी NIPUN BHARAT APP वर कोणतीही माहिती भरू नये व online च्या कामावर तसेच याविषयानुषंगाने V.C. बैठकीवरही बहिष्कार कायम ठेवावा….*
*या बहिष्काराच्या अनुषंगाने तालुका, केंद्र, शाळा स्तरावर शिक्षकात जागृती होणेकरीता तालुका समन्वय समितीने तात्काळ बैठकीचे आयोजन करावे…*
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर ही शाळा अतिशय उत्कृष्ट आणि आदर्श शाळा म्हणून गौरवण्यात आलेले आहे कारण या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कौशल्यांना त्या ठिकाणी वाद येतो या ठिकाणी शिक्षकांचा स्टाफ देखील चांगला आहे विद्यार्थ्याकडून वेगवेगळे उपक्रम करून घेतले जातात विद्यार्थ्यांना स्टेज उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे विद्यार्थी न घाबरता आपले स्किल दाखवतो.
जिल्हा परिषद शाळा कांबळेश्वर ही अतिशय सुंदर शाळा आहे या शाळेमध्ये राबवले जाणारे उपक्रम अनेक शाळा राबवतात शाळेतील विद्यार्थी देखील चांगल्या प्रकारचे गुणवत्ता आहे विद्यार्थी अनेक नवनवीन उपक्रमात सहभागी होतात विद्या विद्यार्थी वाचन या उपक्रमांमध्ये देखील सहभागी होतात वाचनामध्ये देखील अग्रेसर आहेत सदर शाळेला वाचनालय लाभलेले आहे वाचनालयाचा पुरेपूर लाभ घेतला जातो विद्यार्थी स्वतः या ठिकाणी पुस्तके घेतात नोंदी करतात स्वतःहून काम करत असल्यामुळे विद्यार्थ्यांना देखील आनंद निर्माण झालेला आहे.
जिल्हा परिषद शाळा कांबळेश्वर या शाळेला उत्कृष्ट अशी परसबाग लाभलेली आहे यापूर्वी विविध प्रकारचे पालेभाज्या फळभाज्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत सदर पालेभाज्या फळभाज्या या दररोजच्या शालेय पोषण आहारामध्ये वापरले जातात त्यामुळे विद्यार्थ्यांना खिचडीची चांगली चव मिळते विद्यार्थी दुपारच्या सुट्टीत घरी न जाता शाळेमध्येच थांबून खिचडी खातात. खिचडी मध्ये विविध प्रकारचे दररोजचे वेगवेगळे मेनू असतात विद्यार्थ्यांना पूरक आहाराचे वाटप देखील करण्यात येते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर या शाळेमध्ये क्रीडा कौशल्यांना देखील वाव आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांचे खेळा घेतले जातात विद्यार्थी खेळामध्ये देखील निपून झालेले आहेत विद्यार्थी खेळ कौशल्यानुसार खेळतात त्यामध्ये खेळाचे कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेले आहे शिक्षक देखील मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून देतात अनेक नवनवीन कौशल्य देखील सांगतात स्वतः सहभागी होऊन विद्यार्थ्यांना खेळ घेतला जातो.
विद्यार्थ्याचे नवनवीन उपक्रम देखील घेतले जातात विद्यार्थ्यांमध्ये असलेले कला कौशल्य वेगवेगळ्या स्पर्धेद्वारे घेतले जातात विद्यार्थ्यांच्या वेळोवेळी स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात या स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत सदर पुस्तके विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत विद्यार्थी अवांतर वाचनासाठी या वाचनालयाचा उपयोग करतात विद्यार्थ्यांना अवांतर वाचन मिळाल्यामुळे वाचनाची गती देखील वाढलेली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर ही शाळा नेहमीच पालकांना आपल्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेत असल्यामुळे पालकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे पालक नेहमीच कार्यक्रमांना उपस्थिती देतात तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे देखील शाळा शालेय व्यवस्थापन समिती शिक्षक विद्यार्थी पालक जागरूक असतात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील वेळोवेळी समिती स्थापन करण्यात आलेले आहेत आणि सर्व समित्यांच्या सभा देखील घेतल्या जातात त्यामुळे पालकांना देखील जागरूकता निर्माण झालेली आह या ठिकाणचे पालक जागरूक आहेत असल्याने शाळेला ते नेहमी सहकार्य करतात शाळेला नेहमी मदत करतात आर्थिक असेल सामाजिक असेल त्यामुळे जिल्हा परिषद शाळा कांबळेश्वर ही नावारूपास आलेली आहे.
शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाते सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जातात त्यामध्ये विद्यार्थी उत्साहाने सहभागी होतात विद्यार्थ्यांच्या कलाकू कौशल्यांना वाव मिळन यामध्ये विद्यार्थ्यांचे स्पर्धा देखील लावली जाते त्यामध्ये पारितोषिके दिले जातात प्रमाणपत्र वाटप केली जातात त्यामुळे विद्यार्थी देखील आनंदी वृत्तीने सहभागी होतात.
शाळेमध्ये पिण्याचे पाण्याची देखील सोय चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे शाळेमध्ये झाडांची संख्या देखील चांगली आहे नवीन झाडांची लागवड देखील करण्यात आलेली आहे यामुळे विद्यार्थ्यांना उत्साह निर्माण होतो शालेय वातावरण चांगले राहते अशाप्रकारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर एक नावारूपाला आलेली शाळा म्हणजे जिल्हा परिषद ची शाळा होय.