संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून “घर घर संविधान” कार्यक्रम साजरा करणेबाबत शासन निर्णय indian constitution day celebration 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून “घर घर संविधान” कार्यक्रम साजरा करणेबाबत शासन निर्णय indian constitution day celebration 

संदर्भ : १. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांकः बीसीएच-२०.क्र.प्र/२४२५९२-शिक्षण / मंत्रालय विस्तार, मुंबई दिनांक: १०/१०/२०२४

२. उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचे पत्र संकीर्ण २०२४/प्र.क्र.३३४/एसडी-४ दि.२२/११/२०२४

३. शालेय शिक्षा व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र दि.२१/११/२०२४

दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत करुन दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असुन भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते.

राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयं अर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरुकता, तसेच घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबददल सर्व नागरिकांमध्ये जागरुकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ “घर घर संविधान” साजरा करण्यासाठी संदर्भ क्र १ अन्वये कळविले आहे. तसेच संविधान अमृत

महोत्सव सन २०२४-२५ “घर घर संविधान” अंतर्गत घ्यावयाचे स्पर्धा व उपक्रम याबाबत विस्तृत सूचना दिलेल्या आहेत.

संदर्भ क्र ३ अन्वये संविधान अमृत महोत्सवी वर्षात शाळास्तरावर घ्यावयाच्या विविध उपक्रमांबाबत सूचना दिलेल्या आहेत. संदर्भ क्र.१ व ३ नुसार दिलेल्या सूचनांप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी सर्व संबंधीतांना आपल्या स्तरावरुन निर्देश देण्यात यावेत.

भारतीय संविधान दिनाचे महत्त्व

संविधान दिन म्हणजे 26 नोव्हेंबर होय 26 नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण दिवस होय या दिवशी आपल्या देशाचे संविधान स्वीकारण्यात आले होते त्यामुळे हा दिवस खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने देखील याची दखल घेऊन 26 नोव्हेंबर हा दिन 2015 पासून संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने संविधान स्वीकारले व 26 जानेवारी 1950 रोजी ते अमलात आणले गेले म्हणजे ते प्रजेला बहाल करण्यात आले त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने प्रजा ही प्रजासत्ताक बनली व खऱ्या अर्थाने प्रजेच प्रजेची सत्ता स्थापन झाली म्हणून हा दिनाला एवढे महत्त्व आहे म्हणून संविधान दिन साजरा केला जातो भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण आपल्या संविधानाने आपल्याला प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र्य भारतात राहण्याचा समान अधिकार दिलेला आहे पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्य रजवणे हा या मागचा खरा उद्देश होता

संविधानाची गरज

देशावर 150 वर्ष राज्य करून गेलेल्या इंग्रज राजवटीमध्ये आपला देश पातंत्रात होता अशांमध्ये देशांमध्ये सर्व धर्मीयांमध्ये एकता राहावी समांतर राहावी व एकता व समानता टिकून राहावी यासाठी आपल्याला एका राज्यघटनेची गरज होती संविधानाची गरज होती. देश एकसंध होवा यासाठी जनतेमध्ये कोणताही भेदभाव न करता सर्व हक्क मिळावेत याचा विचार तत्कालीन लोकांमध्ये होता देश स्वतंत्र होत असतानाच संविधान सभेच्या स्थापनेची मागणी करण्यात आली या संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये एकूण 207 सदस्य उपस्थित होते संविधान सभा स्थापन झाली तेव्हा या विधानसभेत 389 सदस्य होते पण नंतर त्यांची संख्या 299 पर्यंत कमी झाली स्वातंत्र्यानंतर देशाची फाळणी झाली तेव्हा काही संस्थाने व विधानसभेचा भाग नव्हता त्यामुळे सदस्य संख्या देखील कमी झाली.

संविधान दिन दरवर्षीप्रमाणे भारतामध्ये साजरा केला जातो या दिवशी संविधानाच्या बाबत लोकांमध्ये जागरूकता केली जाते लोकांना संविधानाविषयी माहिती दिली जाते तसेच संविधान आपल्यासाठी का गरजेचे आहे याविषयी देखील माहिती दिली जाते प्रत्येक व्यक्तीला संविधान माहिती असणे गरजेचे आहे संविधानामध्ये किती भाग आहेत संविधान विषयी सर्व माहिती आपल्याला आवश्यक आहे संविधानाचे महत्त्व किती आहे तसेच संविधानामुळे आपल्याला आपल्या घरचा पूर्ण करण्यासाठी तसेच आपले मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य आपल्याला समजतात आपण दररोजचे जीवन जगत असताना आपणासाठी अनेक अडचणींचा सामोरे जावे लागते त्या अडचणींना मात करण्यासाठी संविधानाचा उपयोग आपण करू शकतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान बनवण्याचे कार्य केले संविधान बनवण्यासाठी खूप दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अभ्यास केला आपल्या राज्यांमध्ये देखील संविधान दिन साजरा केला जातो संविधान दिन साजरा करण्याच्या मागील हेतू हा आहे की लोकांना संविधानाविषयी जागरूक करणे तसेच संविधानाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे संविधानाचे महत्त्व लोकांना पटवून देणे व आपला देश कशाप्रकारे एकस याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी आपण हा दिवस साजरा करतो आपली राज्यघटना म्हणजे संविधान ही जगातील सर्वात मोठे विस्तृत राज्यघटना आहे एवढे मोठी राज्यघटना कोणत्याही देशाची नाही.

संविधान दिन 2024: लोकशाही राष्ट्रासाठी, राज्यघटना देशातील नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये ठरवते. तसेच सरकारच्या विविध अवयवांचे अधिकार आणि कर्तव्ये परिभाषित करतात. संविधान हे कोणत्याही देशाची शासन व्यवस्था आणि राज्य चालवण्यासाठी बनवलेले दस्तऐवज आहे. संविधानाची गरज ओळखून भारतानेही स्वातंत्र्यानंतर संविधान स्वीकारले. राज्यघटना बनवण्यासाठी अनेक देशांच्या संविधानांचा अभ्यास करून त्यातून चांगले नियम व कायदे काढले गेले आणि भारताची राज्यघटना तयार करण्यात आली.

भारतीय राज्यघटनेची जाणीव करून देणे आणि संविधानाचे महत्त्व आणि आंबेडकरांचे विचार आणि संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने दरवर्षी संविधान दिन साजरा केला जातो. प्रथमच संविधान दिन कधी साजरा झाला ते जाणून घेऊया. हा दिवस साजरा करण्यामागचे कारण काय होते आणि भारतीय संविधानाचे गुण काय आहेत.

संविधान दिन कधी साजरा केला जातो?

भारतात दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. 1949 मध्ये या दिवशी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटनेची गरज भासू लागली. राज्यघटना तयार करण्यासाठी दोन वर्षे 11 महिने आणि 18 दिवस लागले. त्यानंतर २६ जानेवारी १९४९ रोजी भारतीय प्रजासत्ताक राज्यघटना तयार झाली. तथापि, ते अधिकृतपणे 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. हा दिवस दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

संविधान दिन 26 नोव्हेंबरलाच का साजरा केला जातो?

26 नोव्हेंबर रोजी संविधानाची अनधिकृतपणे अंमलबजावणी करण्यात आली कारण तो संविधान निर्माण समितीचे ज्येष्ठ सदस्य डॉ. सर हरिसिंग गौर यांचा वाढदिवस आहे. मात्र, 2015 पासून प्रथमच संविधान दिन साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.

संविधान दिन का साजरा केला जातो?

2015 मध्ये संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात करण्याचे कारण होते. 2015 हे वर्ष राज्यघटनेचे निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर यांची 125 वी जयंती होती. आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी यावर्षी संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश संविधानाचे महत्व आणि डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणे हा आहे.

भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचे श्रेय डॉ.भीमराव आंबेडकर यांना जाते. बाबासाहेब संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांना भारतीय राज्यघटनेचे जनक देखील म्हटले जाते. संविधान सभेत 299 सदस्य होते आणि डॉ. राजेंद्र प्रसाद तिचे अध्यक्ष होते.

भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. यात 448 लेख, 12 वेळापत्रक आणि 25 भाग आहेत. भारतीय राज्यघटना संघराज्य आणि एकात्मक दोन्ही आहे. मूलभूत अधिकारांसोबतच मूलभूत कर्तव्येही आपल्या राज्यघटनेत नमूद केलेली आहेत.

भारतामध्ये दरवर्षीप्रमाणे 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान म्हणून दिन म्हणून साजरा केला जातो आजच्या दिवशी सर्व कार्यालयांमध्ये शाळांमध्ये मोठमोठ्या महाविद्यालयांमध्ये देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते हा दिवस भारतीयांसाठी मोठ्या उत्साहाचा दिवस असतो भारतीय देश भारत देश खूप मोठा आहे आणि या देशाला एकत्र ठेवण्याचे काम संविधान करते भारतातील प्रत्येक नागरिकाला त्याचे हक्क कर्तव्य यांची जाणीव करून देण्याचे काम तसेच न्याय देण्याचे काम संविधान करते संविधानामध्ये विस्तृत प्रकारे सर्व माहिती अंतर्भूत केली गेलेली आहे त्यामुळे संविधान दिनाचे महत्त्व भारतामध्ये खूप मोठे आहे भारत देश हा एक मोठा अखंड देश आहे आणि या देशाला एक संघ ठेवण्याचे काम संविधान करते भारतातील प्रत्येक लहान थोर पुरुष मंडळी व्यक्तींना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं कार्य संविधान करत असते संविधानावर आपला देश चालतो संविधानामुळेच आपल्या देशांमध्ये प्रत्येक नागरिकाला न्याय मिळतो गोरगरिबांना न्याय मिळतो वंचितांना न्याय मिळतो भारताचे संविधान तयार करण्यासाठी एकूण जवळजवळ दोन वर्षे 11 महिने आणि 18 दिवस लागले होते हे काम पूर्ण करण्याचे धाडस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते तर घटना समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान लिहिण्याचे कार्य अविरत चालले यामध्ये त्यांनी भारताचे संविधान लिहिण्याचे कार्य केले संविधान दिन साजरा करण्याच्या मागचा मुख्य उद्देश म्हणजे पश्चिमात्य संस्कृतीच्या युगात आपल्या देशातील युवकांमध्ये संविधानाची मूल्य आणि तत्वे रुजवणे हा होय आपल्या भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य भारतात राहण्याचा समान अधिकार दिलेला आहे तसेच सर्वांना आपले विचार मांडण्याचा अधिकार दिलेला आहे फिरण्याचा विहार करण्याचा अधिकार संविधानाने आपल्याला दिलेला आहे. आपल्या देशामध्ये आहार विहाराचे स्वातंत्र्य आहे आज आपण हा भारतीय संविधान दिन साजरा करतो

संविधान दिनाचा उद्देश

संविधान दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान सभेने संविधान स्वीकारले म्हणजेच राज्य घटना स्वीकारली तो दिवस म्हणजे 26 नोव्हेंबर हा होय हा 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो संविधान सभेने ही राज्यघटना स्वीकारल्यानंतर देशांमध्ये त्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली अंमलबजावणी म्हणजे खऱ्या अर्थाने भारत देशातील जनता ही प्रजेच्या हाती सत्ता अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो त्यामुळे 26 जानेवारी 1950 हा दिन प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो दरवर्षी 26 जानेवारी हा दिन भारत देशामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो कारण या दिवशी खऱ्या अर्थाने भारतीय जनता प्रजा ही प्रजासत्ताक बनली होती संविधान दिवस साजरा करण्याची परंपरा खरंतर 2015 पासून सुरू झालेली आहे त्यामुळे तेव्हापासूनच हा दिवस आपल्या भारतामध्ये दरवर्षीप्रमाणे संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

संविधान दिन व भारतीय जनता

भारतीय राज्यघटनेत अनेक महत्त्वपूर्ण तत्वे आहेत त्याच्या आधारे देशातील सरकार आणि नागरिकांसाठी मूलभूत राजकीय तत्वे कार्यपद्धती अधिकार मार्गदर्शक तत्वे कायदे इत्यादी ठरवण्यात आलेले आहेत आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्माण करण्यामागे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थाने त्यांच्य गौरव केला जातो.