जिल्हा परिषद शिक्षक जिल्हा अंतर्गतबदली पात्र शिक्षक संवर्ग ४ महत्त्वाचे मुद्दे online teacher transfer important points
*दि ३० नोव्हेंबर २४*
*💥बदली पात्र शिक्षक महत्त्वाचे मुद्दे*
*➡️टप्पा क्र.१, २, ३ व ४ मध्ये नमुद केलेल्या कार्यपध्दतीमुळे, बदली होत असलेले व बदलीस पात्र शिक्षक यांची कार्यरत जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन प्राधान्यक्रम ठरविण्यात येईल*
*➡️जिल्ह्यातील रिक्त व संवर्ग 1, 2, व 3 यांच्या बदली प्रक्रियेमधील होणाऱ्या रिक्त जागा शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरिता दाखवण्यात येतील*
*➡️बदली पात्र शिक्षकांनी आपला प्राधान्यक्रम दिला व प्राधान्यक्रमानुसार जर शाळा मिळाली नाही तर त्यांची बदली विस्थापित राऊंडमध्ये करण्यात येईल*
*➡️बदली प्रक्रीयेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास सेवा ज्येष्ठत्ता विचारात न घेता प्राधान्याने अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल.*
*➡️सर्व शिक्षकांना किमान ३० शाळांचा प्राधान्यक्रम देणे अनिवार्य आहे ती शाळांचा प्राधान्यक्रम भरल्याशिवाय फॉर्म सबमिट होणार नाही परंतु पोर्टलवर प्राधान्यक्रम भरतीवेळी जिल्ह्यातील ३० पेक्षा कमी रिक्त शाळा उपलब्ध असल्यास त्यावेळी उपलब्ध असलेल्या शाळांचा प्राधान्यक्रम देणे आवश्यक राहील*
*➡️विशेष संवर्ग भाग १ अंतर्गत पात्र शिक्षकांनी बदलीतून सूट घेतल्यास व संबंधित शिक्षकाचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास, जोडीदाराची बदली पात्र संवर्गातून बदली केली जाईल*
*➡️दिलेल्या मुदतीत फॉर्म सबमिट करुन काही चुका झाल्यास किंवा प्राधान्यक्रम बदलायचा असल्यास पुन्हा Withdraw करु शकणार आहात.मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झालेला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील.*
*➡️रिक्त पदांच्या यादीतील काही शाळा पोर्टलवर दिसत नसतील तर ते समानीकरणातंर्गत अथवा अन्य कारणांनी आपल्या पोर्टलवरून वगळण्यात आले आहेत असे समजावे.*
*➡️या बदली प्रक्रियेमध्ये जे शिक्षक कोणत्याही संवर्गातील बदली पात्र शिक्षक असोत अशा शिक्षकांनी बदली घेतांना आपणास पोर्टलवर आपली सेवाजेष्ठता आपण दिलेल्या प्राधान्यक्रम तसेच आपणास उपलब्ध असलेल्या जागांचा योग्य तो अभ्यासकरून बदलीसाठी प्राधान्यक्रम देतांना निर्णय घ्यावा कारण बदली पात्र शिक्षकांना जिल्ह्यातील रिक्त शाळा प्राधान्यक्रमात द्यावयाचा आहे अशावेळी रिक्त शाळा ह्या अवघड क्षेत्रात जास्त प्रमाणात असू शकतात.*
*➡️बदली पात्र शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये बदली मागतांना सेवाजेष्ठ किंवा आपल्यापेक्षा सेवाकनिष्ठ शिक्षकांच्या शाळा मागू शकतो.*
*✳️ एक युनिट स्पष्टीकरण*
*➡️1) दोघेही पती-पत्नी जिल्हा परिषद शिक्षक असल्यास एक युनिट म्हणून अर्ज करणे म्हणजेच दोघांपैकी सेवाजेष्ठ बदली पात्र शिक्षक किंवा बदली पात्र शिक्षकाने पोर्टलवर एक युनिट म्हणून होकार देऊन आपल्या जोडीदाराचा शालार्थ आयडी किंवा मोबाईल क्रमांक सबमिट करून पसंतीक्रम भरणे होय.*
*➡️2) पती-पत्नी( जिल्हा परिषद शिक्षक) दोघांपैकी एक शिक्षक बदली पात्र व जोडीदार बदली पात्र नसेल किंवा दोघेही शिक्षक बदली पात्र असतील तर त्यांना एक युनिट म्हणून बदली करण्याची संधी मिळेल.*
*➡️ 3) वरील एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असणे आवश्यक असून पती-पत्नीच्या कार्यरत शाळांमधील अंतर ३० किलोमीटरच्या आत असणे अनिवार्य आहे.*
*➡️4) एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता बदली पात्र शिक्षकांबरोबर जोडीदाराचे संबंधित शाळेवर तीन वर्ष दिनांक ३० सप्टेंबर २०२४ ला पुर्ण होणे अनिवार्य राहील.*
*➡️5) जर दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघेही शिक्षक बदली पात्र असल्यास दोघांपैकी जो शिक्षक सेवाजेष्ठ असेल त्या शिक्षकाला एक युनिट करिता अर्ज भरावा लागेल.*
*➡️6) तसेच जर दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघांपैकी एक बदली पात्र शिक्षक असेल व त्यांचा जोडीदार बदली पात्र शिक्षक नसेल अशावेळी बदली पात्र शिक्षकाला एक युनिट म्हणून अर्ज करावा लागेल यामध्ये आपल्या जोडीदाराची सेवा जेष्ठता अर्ज करण्याकरिता विचारात घेतली जाणार नाही.*
*➡️7) बदली पात्र टप्प्यामध्ये जो शिक्षक एक युनिट म्हणून अर्ज करेल त्यांचा जोडीदार बदलीस पात्र असेल तर त्यांच्या जोडीदारांनाही पोर्टलवर पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील. तसेच जोडीदार बदली पात्र नसल्यास पसंतीक्रम देऊ नये*
*➡️ 8) एक युनिट म्हणून लाभ घेतांना सर्वप्रथम दोघांनाही एकाच शाळेवर दोन रिक्त जागा सिस्टीम देण्याचा प्रयत्न करेल अथवा दोघांनाही ३० किलोमीटर परिसरात दोन रिक्त जागा असल्यास दोघांनाही बदली दिली जाईल परंतु दोन रिक्त जागा न मिळाल्यास त्यापैकी एक युनिट करिता अर्ज केलेल्या शिक्षकाला जागा देण्याचा प्रयत्न होईल व त्या शिक्षकास जागा मिळाल्यास त्या शिक्षकाची बदली केली जाईल.*
*➡️9) पती-पत्नी यांनी एक युनिट म्हणून अर्ज सादर केला असेल व त्यापैकी बदली पात्र शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदलीस पात्र नसेल व त्यांना शाळा मिळाली नसेल तर त्यांची बदली होणार नाही.*
*➡️ 10) एक युनिट करिता अर्ज केलेल्या शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदली पात्र असतानाही त्याला शाळा मिळाली नसेल व त्यांची असलेली शाळा सुद्धा कोणालाही बदलीने दिलेली नसेल तेव्हा अशा शिक्षकांना विस्थापित राऊंड मधून बदली दिली जाईल*
*➡️11) व जर अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी त्यांची जागा घेतलेली असेल तर त्यांना त्याच टप्प्यामध्ये उपलब्ध असलेल्या जागांवर बदली ने नियुक्ती दिली जाईल.*
*➡️12) पती-पत्नी दोघीही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांनी एक युनिट मध्ये अर्ज करणार असतील तर अशा शिक्षकांना जे शिक्षक एक युनिट करिता अर्ज करणार आहेत त्यांच्या सेवा जेष्ठतेनुसार बदली देण्यात येईल.*
*✳️ बदली पात्र शिक्षकांना बदली करिता नकार (पर्याय अ) किंवा होकार (पर्याय आ) देण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे*
*➡️बदली पात्र शिक्षकांना बदली नको असल्यास अ पर्याय निवडावा. व बदली हवी असल्यास आ पर्याय निवडावा*
*➡️बदली पात्र शिक्षकांना फॉर्म भरती वेळी ही सुविधा पोर्टलवर उपलब्ध असणार आहे परंतु माझ्या मते सर्वांनीच बदली घेताना आ ( मला बदली हवी आहे) पर्याय निवडावा कारण बदली पात्र शिक्षकांच्या कोणत्या ना कोणत्या पद्धतीने बदल्या ह्या शंभर टक्के होणारच*
*➡️तरीही त्या संदर्भात विश्लेषण खालील प्रमाणे*
*✳️ बदली पात्र शिक्षकांनी बदलीस नकार दिला असल्यास.अ पर्याय निवडल्यास*
*➡️ 1) बदली पात्र शिक्षकांनी पर्याय अ मला बदली नको असून प्रशासकीय कारणास्तव माझी बदली होत असल्यास माझ्या खालील प्राधान्यक्रमाचा विचार करण्यात यावा हे निवडले असल्यास अशा शिक्षकांना त्यांची शाळा इतर शिक्षकांनी मागितली नसल्यास किंवा इतर शिक्षकांनी आपल्या पसंतीक्रमात दिलेली असतांना सुद्धा सिस्टीम ती शाळा त्यांच्या पसंती क्रमानुसार न देता इतर पर्यायी शाळा देण्याचा प्रयत्न करेन अशावेळी बदली टप्प्याच्या शेवटपर्यंत ती शाळा इतर शिक्षकांना बदलीने न दिल्यास सदर शिक्षकांची बदली होणार नाही.*
*➡️ 2) परंतु इतर शिक्षकांच्या पसंती क्रमातील त्या शिक्षकाची शाळा सोडून इतर शाळा उपलब्ध नसल्यास किंवा देणे शक्य होत नसल्यास अशावेळी पर्यायाने सदर शिक्षकाची शाळा बदलीने द्यावी लागेल अशा स्थितीमध्ये सदर शिक्षकांनी दिलेला पसंती क्रमातील शाळा इतर शिक्षकांनी घेतलेल्या असतील अशावेळी सदर शिक्षक विस्थापित होऊ शकतो.*
*➡️ 3) बदली पात्र शिक्षकांनी जर अ पर्याय मला बदली नको असा निवडल्यास त्यांची बदली देतांना सेवाजेष्ठता विचारात घेतली जाणार नाही व अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी टॅग केलेले असल्यास त्यांना त्यांच्या प्राधान्य क्रमाने शाळा न मिळाल्यास त्याच टप्प्यामध्ये त्यांना उपलब्ध जागांवर बदली देण्यात येईल.*
*➡️ 4) ज्या बदली पात्र शिक्षकांची शाळा संवर्ग एक, संवर्ग दोन किंवा बदली अधिकार पात्र शिक्षकांनी बदलीने घेतलेली आहे अशा शिक्षकांनी पर्याय क्रमांक अ निवडू नये..*
*➡️ 5) तसेच बदली पात्र शिक्षकांनी जे शिक्षक सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत अशा शिक्षकांनी सुद्धा पर्याय क्रमांक अ मला बदली नको हा पर्याय निवडू नये.*
*➡️कारण सहाय्यक शिक्षक यांची संख्या खूप मोठी असल्यामुळे प्रत्येक शिक्षकांची शाळा कोणत्यातरी शिक्षकांच्या प्राधान्यक्रमामध्ये येऊ शकते व त्यामुळे सेवा कनिष्ठ शिक्षकांनी सेवाज्येष्ठ शिक्षकाची शाळा मागीतली असल्यास व त्यांना त्यांच्या पसंती क्रमाने ती मिळाल्यास सेवाज्येष्ठ शिक्षकांची बदली ही सेवा कनिष्ठ शिक्षकांच्या सेवाज्येष्ठते नुसार होऊ शकते किंवा असे शिक्षक विस्थापित होऊ शकतात.*
*➡️ 6) बदलीपात्र शिक्षकांना जर या टप्प्यांमध्ये पसंतीक्रमानुसार शाळा मिळाली नाही व ते अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी टॅग केलेले नसेल तर ते विस्थापित होऊन त्यांना विस्थापित टप्प्यामध्ये पुन्हा 30 शाळा पसंतीक्रम भरण्याची संधी मिळेल.*
*➡️ 7) 2018 च्या बदली प्रक्रियेमध्ये शासन आदेशात बदली पात्र शिक्षकांच्या टप्प्यामध्ये बदली मागत असतांना सेवा कनिष्ठ शिक्षक हा सेवा जेष्ठ शिक्षकांची शाळा मागू शकत नसल्यामुळे बदलीला नकार दिलेल्या बहुतांशी शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाहीत परंतु सद्यस्थितीत कोणताही शिक्षक कोणत्याही शिक्षकाची शाळा मागू शकत असल्यामुळे या बदली प्रक्रियेमध्ये नकार देऊन ही त्याच शाळेवर कायम राहणाऱ्या शिक्षकांची संख्या नगण्य असेल. किंवा नसेलही*
*✳️ बदली पात्र शिक्षकांनी बदलीस होकार दिला असल्यास. पर्याय आ निवडल्यास*
*➡️ 1) बदली पात्र शिक्षकांनी बदली करिता मला बदली हवी आहे पर्याय आ निवडल्यास त्यांची बदली त्यांच्या दिलेल्या पसंतीक्रमाने त्यांचे जिल्हा सेवाज्येष्ठतेने होतील.*
*➡️ 2) बदली पात्र शिक्षकांना त्यांच्या पसंती क्रमानुसार शाळा न मिळाल्यास अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी टॅग केलेले नसेल तर ते विस्थापित होऊन विस्थापित टप्प्यामध्ये त्यांना पुन्हा तीस शाळांचा पसंती क्रम किंवा त्या टप्प्यामध्ये उपलब्ध शाळांचा पसंतीक्रम भरावा लागेल.*
*परंतु अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी टॅग केलेले असेल तर त्यांना त्याच टप्प्यामध्ये उपलब्ध असलेल्या जागांवर बदली देऊन नियुक्ती दिली जाईल.*
*➡️ 3) ज्या बदली पात्र शिक्षकांची शाळा संवर्ग एक ,संवर्ग दोन किंवा बदली अधिकार पात्र शिक्षकांनी बदलीने घेतलेली असेल अशा शिक्षकांनी पर्याय क्रमांक आ (मला बदली हवी आहे ) निवडावा.*