30 मराठी उतारे व त्यावर आधारीत 10 प्रश्न सराव marathi paragraph questions 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

30 मराठी उतारे व त्यावर आधारीत 10 प्रश्न सराव marathi paragraph questions 

उतारा 1: पावसाळा

पावसाळ्याच्या दिवसांत बातावरण थंड आणि आनंदी असते. झाडे हिरवीगार होतात आणि नद्या पाण्याने भरतात. लोक छत्र्या घेऊन बाहेर पडतात, पावसाळा शेतक-यांसाठी फार महत्त्वाचा ऋतू आहे.

प्रश्नः

1. पावसाळ्यात वातावरण कसे असते?

2. झाडे कशा रंगाची होतात?

3. पावसाळ्यात लोक काय घेऊन बाहेर पडतात?

4. नद्या कशाने भरतात?

5. पावसाळा कोणासाठी महत्त्वाचा आहे?

6. पावसाळ्यातील थंड वातावरणाचा उल्लेख आहे का?

7. झाडांची हिरवळ कधी दिसते?

8. पावसाळ्यातील नद्या कशा होतात?

9. छत्री कोणत्या ऋतुत वापरतात?

10. शेतकन्यांसाठी पावसाळयाचे महत्त्वच काय आहे?

उतारा 2: आंबा

आंबा हा भारताचा राष्ट्रीय फळ आहे. उन्हाळ्यात आंबा खूप आवडता फळ असतो. हापूस, पायरी, लंगडा अशी आंब्याच्या विविध जाती आहेत. आंब्याचा रस, लोणचं आणि चटणी खूप चविष्ट असते. आंचा जीवनसत्त्वे अ आणि सी यासाठी प्रसिद्ध आहे.

प्रश्नः

1. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?

2. आंबा कोणत्या ऋतूमध्ये जास्त मिळतो?

3. आंब्याच्या कोणत्या जातीचा उल्लेख आहे?

4.आंब्यापासून कोणकोणते पदार्थ बनवले जातात?

5. आंबा कोणत्या जीवनसत्त्वांसाठी प्रसिद्ध आहे?

6. आंब्याचा रस कसा लागतो?

7. हापूस आंब्याला कोणता रंग असतो?

8. आंब्याचे उत्पादन भारतात कुठे जास्त होते?

9. आंबा का आवडत्ता फळ आहे?

10. तुम्हाला आंब्याचे कोणते प्रकार आवडतात?

उत्तारा 3: दिवाळी

दिवाळी हा हिंदू धर्माचा मोठा सण आहे, लोक दिवाळीत घर सजवतात आणि दिवे लावतात. फटाके फोडले जातात, फराळ बनवला जातो, आणि नवीन कपडे घातले जातात, लक्ष्मीपूजन हा या सणाचा महत्चाचा भाग आहे. दिवाळी आनंद आणि प्रकाशाचा सण मानला जातो.

प्रश्नः

1. दिवाळी कोणता धर्माचा सण आहे?

2. दिवाळीत लोक काय सजवतात?

3. दिवाळी सणात कोणता पदार्थ बनवला जातो? ?

4. लक्ष्मीपूजनाचा या सणात का महत्त्व आहे

5. दिवाळी कशाचा सण मानला जातो?

6. लोक दिवाळीत नवीन काय घालतात?

7. फटाके कधी फोडले जातात?

8. फराळात कोणते पदार्थ असतात?

9. घरात दिवे का लावले जातात?

10. तुम्ही दिवाळी कशी साजरी करता?

उतारा 4: शाळा

शाळा ही ज्ञान मिळवण्यासाठीची जागा आहे. येथे विद्यार्थी विविध विषय शिकतात. शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करतात. शाळेत ग्रंथालय, क्रीडांगण, आणि विज्ञान प्रयोगशाळा असते. शाळा ही विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचे ठिकाण आहे.

प्रश्नः

1. शाळा कोणत्या गोष्टीसाठी महत्त्वाची आहे?

2. विद्याथ्यांना शाळेत काय शिकवले जाते?

3. शाळेत कोण मार्गदर्शन करतात?

4. शाळेत कोणकोणत्या सुविधा असतात?

5. शाळेत क्रीडांगणाचे महत्त्व काय आहे?

6. ग्रंथालयात काय असते?

7. विज्ञान प्रयोगशाळेत काय करता येते?

8. शाळा विद्यार्थ्यांचे भविष्य कसे घडवते?

9. तुम्हाला शाळा का आवडते?

10. तुमच्या शाळेत काय खास आहे?

उलारा 5: झाड

झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात. ती फळे, फुले आणि सावलीही देतात. झाडांमुळे पृथ्वी हिरवीगार होते. झाडांवर पक्षी घरटे बांधतात. झाडे लावल्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते.

प्रश्नः

1. झाडे आपल्याला काय देतात?

2. झाडांवर कोण राहतात?

3. पृथ्वी हिरवीगार कशी होते?

4. झाडांमुळे पर्यावरणाचे कसे रक्षण होते?

5. झाडांवर कोणती फळे येतात?

6. झाडांवर कोणकोणती फूले असतात?

7. झाडांचे पर्यावरणीय महत्त्व काय आहे?

8. झाडे लावल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो?

9. झाडे कापल्यामुळे काय नुकसान होते?

10. तुम्हाला कोणते झाड आवडते?

उतारा 6: छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. ते धाडसी आणि दूरदृष्टीचे योद्धा होते, त्यांनी स्वराज्य स्थापन केले आणि लोकांचे रक्षण केले. महाराजांनी अनेक गड किल्ले बांधले आणि त्यांचा उपयोग स्वराज्यासाठी केला.

प्रश्नः

1. शिवाजी महाराज कोणत्या साम्राज्याचे संस्थापक होते?

2. त्यांचा जन्म कोठे झाला?

3. शिवाजी महाराज कसे योद्धा होते?

4. त्यांनी कोणते स्वप्न साकार केले?

5. गड किल्ल्यांचा उपयोग त्यांनी कशासाठी केला!

6. शिवाजी महाराजांचा मुख्य उद्देश काय होता?

7. स्वराज्याचे महत्त्व त्यांनी कसे पटवून दिले?

8. शिवनेरी किल्ल्याचे महत्त्व काय आहे?

9. महाराजांनी लोकांसाठी काय केले?

10. तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल काय आवडते?

उतारा 7: वाघ

वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. तो खूप शक्तिशाली आणि वेगवान आहे. चाघ जंगलातील शिकार करतो आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करतो. वाघाचे पट्टेदार शरीर त्याला जंगलात लपण्यास मदत करते. सध्या वाघांचे संरक्षण करणे गरजेचे आहे.

प्रश्नः

1. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?

2. वाघ कसा प्राणी आहे?

3. वाच कशाचे रक्षण करतो?

4. वाघाचे शरीर कसे असते?

5. वाघ को लपून राहतो?

6. सध्या वाघांचे संरक्षण का गरजेचे आहे?

7. वाघ जंगलात काय करतो?

8. वाघाचे वैशिष्ट्य काय आहे?

9. वाचाचे संरक्षण कसे करता येईल?

10. तुम्ही वाघाला पाहिले आहे का?

उतारा 8: गणेशोत्सव

गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आवडता सण आहे. गणपती बाप्पा घरोघरी आणले जातात. लोक उत्साहाने गणेशाची पूजा करतात. दहा दिवस परात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. विसर्जनाच्या दिवशी लोक गणपती बाप्पा मोरया” अशा घोषणा देतात.

प्रश्नः

1. गणेशोत्सव कोणत्या राज्याचा आवडता सण आहे?

2. गणपती बाप्पा कसे आणले जातात? 3. गणेशोत्सव किती दिवस

4. सार्वजनिक मंडळे गणपतीचे विसर्जन कसे करतात?

चालतो?

5. विसर्जनाच्या वेळी कोणत्या घोषणा दिल्या जातात?

6. लोक गणपतीची पूजा कशाने करतात?

7. गणपतीच्या पूजेत कोणते विशेष पदार्थ असतात?

8. विसर्जन का केले जाते?

9. तुम्ही गणेशोत्सव कसा साजरा करता?

10. तुम्हाला गणेशोत्सव का आवडतो?

उतारा 9: इंद्रधनुष्य

इंद्रधनुष्य हे पावसाच्या वेळी दिसणारे एक नैसर्गिक चमत्कार आहे. त्यात सात रंग असतातः जांभळा, निळा, हिरवा, पिवळा, नारंगी, तांबडा आणि निळसर जांभळा. इंद्रधनुष्य फक्त सूर्यप्रकाश आणि पावसाच्या थेंबांमुळे तयार होते. याचा आकार अर्धवर्तुळासारखा असतो.

प्रश्नः

1. इंद्रधनुष्य कधी दिसते?

2. इंद्रधनुष्याचे किती रंग असतात? 3. इंद्रधनुष्य कसे तयार होते?

4. याचा आकार कसा असतो?

5. इंद्रधनुष्याचे मुख्य घटक कोणते आहेत?

6. तुम्ही इंद्रधनुष्य कधी पाहिले आहे का?

7. इंद्रधनुष्याचे कोणते रंग तुम्हाला आवडतात?

8. पावसाच्या वेळी इंद्रधनुष्य का दिसते?

9. इंद्रधनुष्याला मराठीत दूसरे काय महणतात?

10. सूर्यप्रकाशाशिवाय इंद्रधनुष्य दिसेल का?

उत्तारा 10: जंगल

जंगल ही अनेक प्राण्यांची आणि पक्ष्यांची घरटी असतात. तिथे मोठी झाडे, गवत, आणि फूले असतात. जंगलामुळे आपल्याला स्वच्छ हवा मिळते. जंगलात वाघ, हरीण, ससा, आणि हत्ती असे अनेक प्राणो राहतात, जंगलतोड केल्यामुळे पर्यावरणावर परिणाम होतो.

प्रश्नः

1. जंगलात कोण राहतात?

2. जंगलात कोणत्या प्रकारची झाडे असतात?

3. जंगलाचे पर्यावरणीय महत्त्व काय आहे? 4. जंगलात कोणते प्राणी पाहायला मिळतात?

5. जंगलतोड का केली जाते?

6. जंगलतोड केल्याचे परिणाम काय आहेत?

7. तुम्ही जंगल पाहिले आहे का?

8. जंगलातील हवा कशी असते?

9. जंगलाचे संरक्षण कसे करता येईल?

10. हत्तीला जंगलात काय आवडते?

उतारा 11: महात्मा गांधी

महात्मा गांधी यांना भारताचे राष्ट्रपिता म्हणतात. त्यांनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. ते साध्या जीवनशैलीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी खादीचा प्रचार केला आणि ब्रिटिशांविरुद्ध असहकार चळवळ उभारली. गांधीर्जीच्या नेतृत्वाने भारत स्वतंत्र झाला.

प्रश्नः

1. महात्मा गांधींना काय म्हणतात?

2.त्यांनी कोणत्या मार्गाचा अवलंब केला?

3. ते कोणत्या प्रकारच्या जीवनशैलीसाठी प्रसिद्ध होते?

4.त्यांनी कोणत्या प्रकाराच्या कपड्यांचा प्रचार केला?

5. गांधीजीनी कोणती बळवळ उभारली?

6. सत्याग्रह म्हणजे काय?

7. भारत स्वतंत्र होण्यासाठी गांधीजींची भूमिका काय होतो?

8. अहिंसेचा त्यांचा संदेश कसा महत्त्वाचा आहे?

9. खादोचा उपयोग का करावा, असे गांधीजी म्हणत असत?

10 . तुम्हाला महात्मा गांधीच्या व्यक्तिमत्वातील कोणते गुण आवडतात?

उतारा 12: सुभाषचंद्र बोस

सुभाषचंद्र बोस यांना “नेताजी” म्हणून ओळखले जाते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी आजाद हिंद सेना स्थापन केली. “तुम मुझे खून दो, में तुम्हें आजादी दूंगा” हे त्यांचे प्रसिद्ध वाक्य आहे. त्यांचा पराक्रम भारतीयांना नेहमीच प्रेरणा देतो.

प्रश्नः

1. सुभाषचंद्र बोस यांना काय म्हणतात?

2. त्यांनी कोणती सेना स्थापन केली?

3. त्यांचे प्रसिद्ध वाक्य काय आहे?

4. ते स्वातंत्र्य चळवळीत कसे सहभागी झाले?

5. आजाद हिंद सेना कशासाठी होती?

6. नेताजीनी कोणत्या देशांना मदतीसाठी विनंती केली?

7. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी काय योगदान दिले?

8. सुभाषचंद्र बोस यांचा पराक्रम कोणत्या गोष्टींना प्रेरणा देतो?

9. तुम्हाला सुभाषचंद्र बोस यांचे कोणते गुण आवडतात?

10. तुम्ही “तुम मुझे खून दो या वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.

उतारा 13: होळी सण

होळी हा रंगांचा सण आहे. हा सण फाल्गुन महिन्यात साजरा केला जातो. होळीच्या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात आणि मिठाई वाटतात. होळीच्या आदल्या दिवशी होलिकादहन केले जाते. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो.

प्रश्नः

1. होळी सणाला काय महणतात?

2. हा सण कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? 3. होळी साजरी करण्यासाठी लोक काय करतात?

4. होळिकादहन का केले जाते?

5. हा सण कोणत्या गोष्टीचे प्रतीक आहे?

6. होळी सणात कोणते पदार्थ खालने जातात?

7. तुम्हाला होळी सण का आवडतो?

8. रंग खेळताना काय काळजी घ्यायला हवी?

9. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजे काय?

10. होळीच्या दिवशी तुम्ही काय करता?

उतारा 14: सौरमाला

सौरमाला म्हणजे आपल्या सूर्यमालेतील ग्रहांचा समूह, सूर्य हा सौरमालेचा केंद्रबिंदू आहे. त्याभोवती पृथ्वीसह आठ ग्रह फिरतात. या ग्रहांमध्ये बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, यूरेनस आणि नेपच्यून पांचा समावेश होतो, पृथ्वीवर जीवसृष्टी आहे.

प्रश्नः

1. सौरमाला म्हणजे काय?

2. सौरमालेचा केंद्रबिंदू कोण आहे?

3. सौरमालेत किती ग्रह आहेत?

पृथ्वीवर काय आहे?

5. सौरमालेतील पहिले तीन ग्रह कोणते आहेत?

6. सूर्याचे महत्त्व काय आहे?

7. सौरमालेत कोणता ग्रह सर्वात मोठा आहे?

8. तुम्हाला सौरमालेतील कोणता ग्रह पाहायला आवडेल?

9. सौरमालेचे नाव कशामुळे ठेवले आहे?

10. घुरेनस आणि नेपच्यून कुठे आहेत?

उतारा 15: वैज्ञानिक शोध

जगात अनेक वैज्ञानिक शोधांनी आपले जीवन सोपे केले आहे. वीज, टेलिफोन, रेडिओ, इंटरनेट हे शोध अतिशय महत्त्वाचे आहेत, संशोधनामुळे मानव प्रगत होत आहे. नवीन शोधांमुळे शिक्षण, आरोग्य, आणि दळणवळणात सुधारणा झाली आहे.

प्रश्नः

1. वैज्ञानिक शोधांनी काय बदल घडवले?

2. कोणते वैज्ञानिक शोच महत्त्वाचे आहेत?

3. बीज आणि इंटरनेट यांचे उपयोग काय आहेत?

4. संशोधनामुळे आपले जीवन कसे बदलले?

5. वैज्ञानिक शोधांचे शिक्षणात महत्त्व काय आहे?

6. आरोग्य क्षेत्रात संशोधनाचे योगदान काय आहे?

7. कोणता शोध तुम्हाला सर्वात महत्त्वाचा वाटतो?

8. नवीन शोध मानवासाठी कसे फायदेशीर आहेत?

9. वैज्ञानिक संशोधनाचा कोणता एक उदाहरण द्या.

10. तुम्हाला वैज्ञानिक बनायचे आहे का?

उतारा 16: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे संविधान निर्माते आहेत. ते सामाजिक सुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि भारतातील दलित वर्गाचे नेते होते. त्यांनी शिक्षणाला फार महत्त्व दिले. भारतीय समाजात समानता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या नेतृत्वाने भारतीय संविधानाला न्याय, समता, आणि स्वातंत्र्य यांचे तत्त्व दिले.

प्रश्नः

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोण होते?

2. त्यांनी संविधानासाठी काय केले?

3. ते कोणत्या वर्गाचे नेते होते? बाबासाहेबांनी शिक्षणाला का महत्त्व दिले?

5. भारतीय समाजात त्यांनी कोणते बदल केले?

6. भारतीय संविधानाचे प्रमुख तत्त्व कोणते आहेत?

7. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणासाठी कोणता संदेश दिला?

8. समाजात समानता का आवश्यक आहे?

9. संविधान निर्मितीत बाबासाहेबांचे योगदान का महत्वाचे आहे?

उतारा 17: दसरा सण

दसरा हा विजयाचा सण आहे. हा सण अश्विन महिन्यात साजरा केला जातो. रावणावर श्रीरामांनी विजय मिळवल्याची आठवण म्हणून दसरा साजरा होतो. लोक या दिवशी शस्त्रांची पूजा करतात आणि सोन्याच्या झाडाची पाने देतात. दस-याला बाईटावर चांगल्याचा विजय मानले जाते.

प्रश्नः

1. दसरा कोणता सण आहे?

2. हा सण कोणत्या महिन्यात साजरा केला जातो?

3. दसन्याचा श्रीरामांशी संबंध कसा आहे?

4. या दिवशी लोक काय पूजा करतात?

5. सोन्याच्या झाडाची पाने का देतात?

6. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजे काय?

7. दस-याचा सण कोणत्या गोष्टीचे प्रतीक आहे?

8. दसऱ्याच्या दिवशी तुम्ही काय करता?

9. रावणावर विजय मिळवण्याचा अर्थ काय आहे?

10. तुम्हाला दसरा का आवडतो?

उतारा 18: महानगर

महानगर म्हणजे मोठे शहर. येथे मोठमोठ्या इमारतों, दुकाने, आणि उद्योग असतात, लोक अनेक कारणांसाठी महानगरांकडे स्थलांतर करतात. महानगरांमध्ये वाहतूक कोंडी आणि प्रदूषण मोठ्या समस्या आहेत. तरीही येथे रोजगाराच्या आणि शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

प्रश्नः

1. महानगर म्हणजे काय?

2. येथे कोणत्या प्रकारच्या सुविधा असतात?

3. लोक महानगरांकडे का स्थलांतर करतात?

4. महानगरातील मोठ्या समस्या कोणत्या आहेत?

5. येथे कोणत्या संधी उपलब्ध असतात?

6. वाहतूक कोंडी का होते?

7. महानगरात रोजगाराचा प्रश्न कसा सुटतो?

8. महानगर आणि खेड्यांतील जीवनात काय फरक आहे?

9. प्रदूषण टाळण्यासाठी काय करता येईल?

10. तुम्ही कोणत्या महानगरात राहायला आवडेल?

उतारा 19: चंद्रावर मनुष्य

चंद्रावर पहिल्यांदा पाऊल ठेवणारा माणूस नील आर्मस्ट्रॉग होता. हे कार्य १९६९ मध्ये झाले. नासाच्या अपोलो ११ मोहिमेत त्यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. त्यांनी चंद्रावर हे मानवजातीचे मोठे पाऊल आहे” असे म्हटले, चंद्रावर जाऊन माणसाने विज्ञानात नवा इतिहास घडवला.

प्रश्नः

1. चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे कोण होते? 2. हो घटना कोणत्या वर्षी घडली?

3. नासाच्या कोणत्या मोहिमेचा हा भाग होता?

4. नील आर्मस्ट्रॉग यांनी काय म्हटले?

5. चंद्रावर जाण्याचे महत्त्व काय आहे?

6. चंद्र मोहिमेत आणखी कोण सहभागी होते?

7. चंद्रावर संशोधन कसे सुरू झाले?

8. चंद्रावरचे वातावरण कसे आहे?

9. तुम्हाला चंद्रावर जावेसे वाटते का?

10. विज्ञानात चंद्र मोहिमेचा उपयोग काय आहे?

उतारा 20: पक्षी

पक्षी हे निसर्गातील सुंदर जीव आहेत. ते वेगवेगळ्या रंगांचे आणि आकारांचे असतात. काही पक्षी गोड गाणे गातात, तर काही पक्षी उंच आकाशात झेप घेतात. पक्ष्यांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. काही पक्षी स्थलांतर करतात, तर काही पक्षी ठराविक प्रदेशातच राहतात.

प्रश्न:

1. पक्षी कसे असतात?

2. कोणते पक्षी गोड गाणे गातात?

3. पक्ष्यांचे पर्यावरणासाठी महत्त्व काय आहे?

4.कोणते पक्षी स्थलांतर करतात?

5. पक्ष्यांचे रंग आणि आकार वेगवेगळे का असतात?

6. उंच आकाशात कोणते पक्षी उडतात?

7. तुम्हाला कोणता पक्षी आवडतो?

8. पक्ष्यांचे संरक्षण का करावे?

9. पक्ष्यांना आकाशात उडायला कोणते अवयव मदत करतात?

10. तुम्ही पक्ष्यांसाठी काही करत असाल, तर काय करता?

उतारा 21: जलसंपदा

पाणी हे जीवनाचे मुख्य घटक आहे. पृथ्वीवर सुमारे ७१% भाग पाण्याने व्यापलेला आहे. तरीही फक्त १०% पाणी पिण्यायोग्य आहे, नद्या, तलाव, विहिरी आणि भूजल हे पाण्याचे मुख्य स्रोत आहेत. पाण्याचा अपव्यय टाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

प्रश्नः

1. पाणी जीवनासाठी किती महत्त्वाचे आहे?

2. पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे?

3. किती पाणी पिण्यायोग्य आहे?

4. पाण्याचे मुख्य स्रोत कोणते आहेत?

5. पाण्याचा अपव्यय का टाळावा?

6. भूजलाचे महत्त्व काय आहे?

7. पाण्यासाठी शेतक-यांना कोणत्या अडचणी येतात?

8. पाणी वाचवण्यासाठी तुम्ही काय करता?

9. पाण्याचा उपयोग कोणत्या गोष्टीसाठी केला जातो?

10. पाणीप्रदूषण थांबवण्यासाठी काय उपाययोजना कराल?

उतारा 22: खेळांचे महत्त्व

खेळ हो शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी उपयुक्त गोष्ट आहे. खेळांमुळे शरीर सुदृढ राहते आणि मन प्रसन्न होते. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि खो-खो हे भारतातील प्रसिद्ध खेळ आहेत. खेळांनी संघभावना, शिस्त, आणि नेतृत्वगुण विकसित होतात.

प्रश्न:

1. खेळांचे महत्त्व काय आहे?

2. खेळांमुळे शरीराला काय फायदा होतो?

3. भारतातील प्रसिद्ध खेळ कोणते आहेत?

4. खेळांनी कोणते गुण विकसित होतात?

5. शिस्त खेळांसाठी का महत्त्वाची आहे?

6. तुम्हाला कोणता खेळ सर्वाधिक आवडतो? का?

7. तुमच्या शाळेत कोणते खेळ खेळले जातात?

8. संघभावना म्हणजे काय?

9. खेळांमध्ये नेतेपण कसे शिकता येते?

10. नियमित खेळल्यामुळे कोणते फायदे होतात?

उतारा 23: झाडे लावा, झाडे जगवा

झाडे हे पृथ्वीवरील जीवनाचे मुख्य स्रोत आहेत. झाडे आपल्याला प्राणवायू, फळे, आणि औषधे देतात. झाडांमुळे पृथ्वी चंड राहते आणि पावसाचे प्रमाण योग्य राहते. झाडतोड थांबवणे आणि झाडे लावणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

प्रश्नः

1. झाडांचे महत्व काय आहे?

2. झाडे आपल्याला काय देतात?

3. झाडांमुळे पृथ्वीवर काय परिणाम होतो?

4. झाडतोड का टाळायला हवी?

5. तुम्ही झाडे लावण्यास का प्रोत्साहन द्याल?

6. झाडांची काळजी घेण्यासाठी कोणते उपाय करू शकता?

7. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी झाडांचे योगदान काय आहे?

8. झाडे जगवण्यासाठी कोणत्या मोहिमा चालवल्या जातात?

9. तुम्हाला आवडते झाड कोणते? का?

10. झाडतोड यांबवण्याचे परिणाम काय होतील?

उतारा 24: कंप्यूटरचे महत्त्व

कंप्यूटर हा आधुनिक काळातील एक महत्त्वाचा शोध आहे. शिक्षण, व्यापार, आणि संशोधन क्षेत्रात कंप्यूटरचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. परंतु, याचा अतिरेकी वापर केल्याने शारीरिक आणि मानसिक नुकसान होऊ शकते.

प्रश्नः

1. कंप्यूटरचे महत्त्व काय आहे?

2. कोणत्या क्षेत्रांत कंप्यूटरचा उपयोग होतो?

3. इंटरनेटचा उपयोग कशासाठी होतो?

4. कंप्यूटरचा अतिरेकी वापर का टाळावा?

5. कंप्यूटरमुळे जीवन कसे सोपे झाले आहे?

6. शिक्षण क्षेत्रात कंप्यूटरचा कसा उपयोग होती? . ऑनलाइन शिक्षण्णाचे फायदे आणि तोटे काय आहेत?

7. तुम्ही कंप्यूटर कशासाठी वापरता?

8. कंप्यूटर आणि मोबाइलमध्ये काय फरक आहे?

10. तुम्हाला कंप्यूटर शिकण्याची इच्छा का आहे?

उतारा 27: गणपती उत्सव

गणपती उत्सव हा महाराष्ट्रातील एक मोठा सण आहे. लोक गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणि मंडळांमध्ये बसवतात. दहा दिवस या उत्सवाचा आनंद साजरा केला जातो. गणपती विसर्जनाच्या दिवशी गणपती वाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा घोषणा दिल्या जातात.

प्रश्नः

1. गणपती उत्सव कोठे मोठ्या प्रमाणावर साजरा होतो?

2. गणपतीची मूर्ती किती दिवस बसवतात?

3. विसर्जनाच्या दिवशी लोक काय म्हणतात?

4. गणपती उत्सवाच्या परंपरा कोणल्या आहेत?

5. तुम्हाला गणपती उत्सव का आवडतो?

6. पर्यावरणपूरक गणपती साजरा कसा करावा?

7. मंडळांमध्ये कोणते कार्यक्रम होतात?

8. गणपतीची पूजा का केली जाते?

9. विसर्जनाचा अर्थ काय आहे?

10. तुम्ही तुमच्या घरात गणपती साजरा करता का?

उतारा 28: विद्यार्थ्यांचे जीवन

विद्यार्थ्यांचे जीवन म्हणजे शिकण्यासाठीचा सुवर्णकाळ आहे. विद्याथ्यांनी नियमित अभ्यास, चांगले वाचन, आणि शिस्त या गोष्टींचा अंगीकार करावा, त्यांच्या भविष्यासाठी मेहनत आणि ज्ञान मिळवणे आवश्यक आहे. खेळ, वाचन, आणि मित्रांसोबत वेळ घालवणेही महत्त्वाचे आहे.

प्रश्नः

1. विद्याध्यांचे जीवन कसे असते?

2. विद्याथ्यांनी कोणत्या गोष्टींचा अंगीकार करावा?

3. मेहनत आणि ज्ञान का महत्त्वाचे आहे?

4. अभ्यास कसा करावा?

5. खेळ आणि वाचनाचे महत्त्व काय आहे?

6. तुम्ही कसे नियमित अभ्यास करता?

7. मित्रांसोबत वेळ घालवण्याचे फायदे काय आहेत?

8. भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी काय योजना आखावी?

9. विद्याध्यांनी कोणत्या चुका टाळाव्या?

10. तुम्ही शिस्त कशी पाळता?

उतारा 29: कृषीचे महत्त्व

कृषी ही भारताची प्रमुख ओळख आहे. भारतातील बहुतांश लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेतकरी आपल्या अन्नधान्यासाठी मेहनत करतात. मात्र, शेतीमध्ये पाणीटंचाई आणि हवामान बदलामुळे अनेक अडचणी येतात. आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती अधिक उत्पादनक्षम होत आहे.

प्रश्नः

1. भारताची प्रमुख ओळख काय आहे?

2. भारतातील किती लोक शेतीवर अवलंबून आहेत?

3. शेतकरी कोणत्या गोष्टीसाठी मेहनत करतात?

4. शेतीतील अडचणी कोणत्या आहेत?

5. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीत कसा होतो?

6. पाणीटंचाई कशी दूर करता येईल?

7. हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना काय नुकसान होते?

8. तुम्हाला शेतकरी जीवन कसे वाटते?

9. कृषी क्षेत्राचा विकास कसा करता येईल?

10. शेतकऱ्यांसाठी सरकारने कोणत्या योजना आणल्या आहेत?

उतारा 30: भारताचा तिरंगा

भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणजे तिरंगा, यात केशरी, पांढरा, आणि हिरवा असे तीन रंग आहेत, केशरी रंग चेयांचे, पांढरा रंग शांततेचे, आणि हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. तिरंग्यामध्ये अशोकचक्र असून त्याला २४ आरे आहेत. हा ध्वज भारताच्या एकतेचे प्रतीक आहे.

प्रश्नः

1. भारताचा राष्ट्रीय ध्वज कसा आहे?

2. तिरंग्यामध्ये कोणते रंग आहेत?

3. केशरी रंगाचे महत्त्व काय आहे?

4. पांढऱ्या रंगाचे प्रतीक काय आहे?

5. हिरव्या रंगाचे महत्त्व सांगा.

6. अशोकचक्राला किती आरे आहेत?

7. तिरंगा भारतासाठी महत्त्वाचा का आहे?

8. राष्ट्रीय ध्वजाचा आदर कसा करावा?

9. तुम्ही तिरंगा कधी फडकवला आहे का?

10. एकतेचे प्रतीक म्हणजे काय?