महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुंदर सूत्रसंचालन mahaparinirvan din sutrasanchalan
स्वागत
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम
शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, ते जो माणूस पिणार….
तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा……..
अशी भीमगर्जना करून शिक्षणाची महती सांगणारे विश्ववंदनीय महामानव ज्ञानीपंडित युगपुरुष तसेच युगप्रवर्तक, दीनदलितांचे कैवारी कोटीकोटी कुळांचे उद्धारक व अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर अर्थातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय.
दीनदलितांचे कैवारी म्हणजे…. बाबासाहेब !! माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे…. बाबासाहेब !! गुलाम बनून न जगता स्वाभिमानाने जगायला शिकवणारे…. बाबासाहेब !! भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजे…. बाबासाहेब !!
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती होय. भारताच्या पावन भूमीवर देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासणाऱ्या थोर महापुरुषांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. डॉ. बाबासाहेब हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान होते. त्यांच्या प्रेरक व स्फूर्तीदायक स्मृतींना वंदन करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे मी
श्री. / सौ……………………
मी मनपूर्वक स्वागत करतो / करते.
• अध्यक्षीय निवड :
ज्यांची उपस्थिती वाढविते आजच्या कार्यक्रमाची शान स्विकारुनी आमुची विनंती आपण भुषवावे अध्यक्षस्थान
विद्यार्थी मित्रांनो योजीलेले कुठलेही कार्य असो अथवा कार्यक्रम ते सिद्धीस जाण्याचे सर्व श्रेय त्या कार्यास अथवा कार्यक्रमास लाभलेल्या सारथ्यासच जात असते. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे सारथ्य म्हणजेच अध्यक्षस्थान आपणा सर्वाना सुपरिचित असलेले / असलेल्या व आपल्या स्नेहपूर्वक विनंतीस मान देऊन कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेल्या श्री. / सौ. यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो/ करते.
( सहकारी शिक्षक / शिक्षिकेने विनंतीस अनुमोदन द्यावे )
• दीपप्रज्वलन / प्रतिमा पूजन :
कार्यक्रमाचे अध्यक्ष • प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करतो । करते की त्यांनी त्यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करावे व अज्ञानाच्या बंदिस्त कवाडांना ज्ञानरूपी प्रकाश देवून अज्ञानास दूर सारावे.
सुमंगल वातावरणात
समईच्या उजळल्या वाती
मान्यवरांनी शुभहस्ते
प्रज्वलीत कराव्या ज्ञानज्योती
( बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करतांना खालील कोट्स वापरावे….)
नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला
नमन त्या ज्ञान सागराला, नमन त्या कोटींच्या उद्धारकाला नमन माझे महामानवाला, नमन माझे विश्वरत्नाला
• मान्यवर परिचय व स्वागत :
( व्यासपिठावरील मान्यवरांचा त्यांच्या कार्यकर्तृत्वानुसार परिचय करून देण्यात यावा.)
अध्यक्ष श्री / सौ.➖➖➖➖➖➖➖➖➖➖
प्रमुख पाहुणे : श्री. / सौ.
अतिथींच्या आगमनाने झाले वातावरण प्रसन्न उल्हासित करुनी उपकृत आम्हा स्विकारावे आमुचे स्वागत
(पुस्तक स्वरूपात / झाडाचे रोप देऊन यथोचित स्वरुपात स्वागतनियोजन
प्रास्ताविक :
सुख दुःखाच्या छायेतून कळते जसे सार अवघ्या जीवनाचे आत्मा कार्यक्रमाचा दर्शविते तसे हे महत्व प्रास्ताविकाचे
आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपल्या शाळेचे श्री. / सौ. करतील
देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, कायदा, शैक्षणिक, संस्कृतिक, विद्युत, जल, कृषी, स्त्रीउद्धार, कामगार, शेतकरी, औद्योगिकीकरण, दलितोद्धार अशा अनेक क्षेत्रात अतुलनिय योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आधुनिक भारताचे जनक असेही संबोधिले जाते.
इ.स. २०१२ मध्ये झालेल्या सर्वात महान भारतीय (The Greatest Indian) या भारताच्या आंतराराष्ट्रीय सर्वेक्षणात स्वातंत्र्यानंतर सर्वात महान भारतीय म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विजयी घोषित झालेले आहेत. कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या शिर्ष १०० विद्वानांची यादी तयार तयार केली त्यात त्यांनी प्रथम स्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ठेवून त्यांना जगातला नंबर १ महाविद्वान म्हणून त्यांचा गौरव केला. इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाने गेल्या १० हजार वर्षामधील जगातल्या सर्वात प्रभावशाली १०० विश्वमानवांची यादी प्रकाशित केली, त्यात चौथ्या स्थानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर प्रथमस्थानावर बुद्धांचे नाव होते. प्रचंड कुशाग्र बुद्धीमत्ता, प्रगाढ विद्वता, तल्लख स्मरणशक्ती असलेले बहुआयामी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञानक्षेत्रातील तब्बल ६४ विषयांवर प्रभुत्व (मास्टरी) होते, एवढ्या साऱ्या विषयांवर प्रभुत्व असणारे जगाच्या इतिहासातील ते प्रथम व एकमेव व्यक्ती आहेत, असे इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापिठाने संशोधनातून सिद्ध केले असून या विद्यापिठाने त्यांना जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून घोषित केले आहे. भारतीय बौद्धांसाठी डॉ. आंबेडकर हे महान बोधिसत्व आहेत, ही बौद्ध धर्मातील सर्वोच्छ उपाधी त्यांना नेपाळमध्ये इ.स. १९५४ मध्ये संपन्न झालेल्या जागतिक बौद्ध धर्म परिषदेसाठी आलेल्या बौद्ध भिक्खूंनी प्रदान केली होती. त्यानंतर इ.स. १९५५ मध्ये दलाई लामा बाबासाहेबांना भेटले तेव्हा लामांनी त्यांना बोधिसत्व संबोधले होते. जातिव्यवस्थेविरुद्ध प्रखर संघर्ष, महान भारतीय संविधान निर्माण अशा अनेक अतुलनीय देशसेवेसाठी दिलेल्या योगदानामुळे इ.स. १९९० साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातीलच नव्हे तर जगातील कोट्यवधी शोषित, पीडित, क्रांतीकारी व मानवतावादी लोकांचे प्रेरणास्थान झालेले आहेत. बाबासाहेबांचा जन्मदिवस भीम जयंती किंवा आंबेडकर जयंतीसुद्धा जगातल्या ६५ पेक्षा अधिक देशांत दरवर्षी साजरी केली जाते.
सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. नंतर कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांतील अभ्यास व संशोधन यांसाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स येथून विविध पदव्या मिळवलेल्या आहेत.
बाबासाहेबांनी केलेला त्याग व समाजपरिवर्तनासाठी सोसलेल्या अगणित यातना याची जाणं आपण सर्वांनीच सतत मानत ठेवली पाहिजे. स्वतः बाबासाहेब सांगत कि माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा मी घालून दिलेली तत्वे प्राणपणाने जपा, त्यांचे आचरण करा. हीच मला खरी आदरांजली ठरेल. शिका संघटीत व्हा संघर्ष करा असे सांगतांनाही बाबासाहेबांनी शिक्षणालाच प्रथम व महत्वाचे स्थान दिलेले आहे. सदैव त्यांच्या विचारांचे व तत्वांचे आचरण आपल्या जीवनात आणून राष्ट्रविकास करण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध होवूयात. इतके बोलून मी माझ्या प्रास्ताविकास पूर्णविराम देतो / देते…… धन्यावद ।
• विद्यार्थी व शिक्षक भाषणे :
(प्रास्ताविक वाचनानंतर क्रमवार विद्यार्थी व शिक्षक यांची भाषणे घ्यावीत.)
…………………………………………….
अध्यक्षीय / मान्यवर भाषणे :
तेज तुमचे आहे, सुर्य-चंद्राहूनही जास्त तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे, जीवनाचे संपूर्ण शास्त्र ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा त्यासाठी मान आहे अध्यक्षीय मार्गदर्शनाचा
विद्यार्थ्यांच्या यशप्राप्तीसाठी यथायोग्य मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष
श्री. / सौ. यांनी करून त्यांच्या ज्ञानकुंभातील काही मार्गदर्शनपर मौलिक विचार आमच्या विद्यार्थ्यांसमोर मांडावेत जेणेकरून त्यांचे अनमोल व प्रेरक विचार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरतील. मी त्यांना विनंती करतो । करते कि त्यांनी आपले बहुमोल मार्गदर्शनपर विचार
विद्यार्थ्यांसमोर मांडावेत धन्यवाद !!
• आभार प्रदर्शन :
माझे सहकारी शिक्षक शिक्षिका श्री. सौ.
आभार प्रदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो/ करते.
यांनी
व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ देऊन व विद्यार्थ्यांप्रती अनमोल मार्गदर्शन केल्याबद्दल मी विद्यालयाच्यावतीने आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो व आपले असेच मार्गदर्शन सदैव आम्हाला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
ज्ञानकुंभ रिता करुनी अनमोल, प्रेरक ज्ञान दिले बोधामृत पाजूनी ज्ञानाचे आम्हा उपकृत केले तुम्ही पाठीराखे आमुचे सदा तुमचाच आधार मार्गदर्शन असू द्यावे नित्य स्विकारुनी हे आभार
आपण केलेल्या मार्गदर्शनाचा प्रेरक विचारांचा व अनुभवाचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल व त्यांची सर्वांगीण समाज व राष्ट्रहितावह अशीच प्रगती साधली जाईल याची आम्हाला निशंक खात्री आहे.
तसेच आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी परिश्रम घेतले व प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरित्या ज्यांचे
सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानने देखील याप्रसंगी क्रमप्राप्त ठरते.
थेंबाथेंबाने तलाव भरतो
हाताहाताने कार्यक्रम फुलतो
जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार
तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचेही आभार
• समारोप :
शिल्पकार ते घटनेचे उद्धारक ते उपेक्षितांचे विरोधक ते वर्णभेदाचे भारतरत्न ते देशाचे ।।१।।
दूत ते शांतीचे प्रचारक ते समतेचे प्रसारक ते धम्माचे भारतरत्न ते देशाचे ।।२।।
सागर ते ज्ञानाचे पंडित ते कायद्याचे अभिमान ते भारतीयांचे भारतरत्न ते देशाचे ।।३।।
महामानवाच्या स्मृतींना व कार्याला वंदन करून कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी एवढेच म्हणेन कि….
आतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली आपल्या मार्गदशर्नाने आम्हाला दिशा मिळाली शेवटी आता समारोपाची वेळ आली
आजच्या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम / राष्ट्रगीताने होईल.
सन्माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आजच्या कार्यक्रमाची येथे सांगता होतेय असे मी जाहीर करतो/ करते.
!! जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र !!