MPSC मार्फत 1333 पदांसाठी मोठी भरती परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर वेळापत्रक पहा mpsc recruitment jobs
प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील सोबतच्या परिशिष्ट-एक मध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे :- परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येइल.
३ . संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य ३.१ प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणा-या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
३.२ अर्ज सादर करण्याची प्रक्रिया/कालावधी :-
अ.क्र.
तपशील
१.अर्ज सादर करण्याचा कालावधी विहित कालावधी दिनांक १४ ऑक्टोबर, २०२४ रोजी १४.०० पासून
२. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक-दिनांक ०४ नोव्हेंबर २०२४ रोजी २३:५९ वाजेपर्यंत
३.भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक -दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२४ रोजी २३:५९ वाजेपर्यंत
४.चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक- दिनांक ०७ नोव्हेंबर, २०२४ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये
४. पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी :-
४.१ पदसंख्या, संवर्ग व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल/वाढ होण्याची शक्यता आहे.
४.२ पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये करण्यात येईल. तसेच याबाबतची घोषणा सूचना वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या घोषणा/सूचनांच्या आधारे प्रस्तुत
परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. ४.३ केवळ प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद विविध संवर्गाच्या संदर्भात पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित/अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील.
४.४ प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद संवर्गामध्ये काही मागास प्रवर्ग व समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नाहीत. तथापि, जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणा-या मागणीपत्रांमध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या मागास प्रवर्ग तसेच समांतर आरक्षणाकरीता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान पदसंख्येमध्ये बदल/वाढ होण्याची शक्यता आहे. सदर बदललेली पदसंख्या/अतिरिक्त मागणीद्वारे प्राप्त पदे पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करताना विचारात घेतली जाईल. यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे अथवा पदसंख्या कमी असल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात
घेतली जाणार नाही.
राज्यामध्ये 1333 पदांसाठी मोठी भरती जाहिरात पाण्यासाठी येथे क्लिक करा Click here
४.५ विविध सामाजिक प्रवर्ग, महिला, प्राविण्यप्राप्त खेळाडू, अनाथ इत्यादीसाठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील, ४.६ शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग, क्रमांक-महिआ२०२३/प्र.क्र.१२३/कार्या-२, दिनांक ०४ मे, २०२३ अन्वये विहित कार्यपद्धतीनुसार
अराखीव महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीसाठी अराखीव महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांकरीत नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आली आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या ४.७
४.८ महिलांना संबंधित मागास प्रवर्गासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्याबाबतच्या तरतुदी लागू राहतील. महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणा-या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे
अधिवासी (Domiciled) असल्याबाबत तसंच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून इतर सर्व मागास प्रवर्गातील महिलांसाठी नॉन- क्रिमिलेअरमध्ये मोडत असल्याबाबतचा स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे. ४.९ विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क) व भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून
आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल, ४.१० अर्ज करताना एखादी जात/जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यासच तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान
केलेले प्रमाणपत्र उमेदवाराकडे उपलब्ध असेल तर संबंधित जात/जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील, ४.११ समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही-१०१२/प्र.क्र.१६/१२/१६-अ, दिनांक १३ ऑगस्ट, २०१४ तसेच शासन शुध्दीपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण-१११८/प्र.क्र.३९/१६-अ, दिनांक १९ डिसेंबर, २०१८ आणि तदनंतर शासनाने
यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल. ४.१२ आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील (इंडब्लूएस) उमेदवारांकरीता शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांकः राआधी-४०१९/प्र.क्र.३१/१६-अ. दिनांक १२ फेब्रुवारी, २०१९ व दिनांक ३१ मे, २०२१ आणि तदनंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही
करण्यात येईल. तसेच सदर संवर्गातील उमेदवारांकरीता शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहोल, ४.१३ सदर जाहिरात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अधिनियम दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ व संबंधित शासन निर्णय दिनांक २७ फेब्रुवारी,
२०२४ संदर्भात मा. उच्च न्यायालयात दाखल झालेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे. या जाहिराती संबंधित शिफारशी व नियुक्त्या उक्त उल्लेखिल न्यायिक प्रकरणाच्या अधीन राहून करण्यात येतील. त्या अनुषंगाने आयोगामार्फत दिनांक २६ एप्रिल, २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले प्रसिद्धीपत्रक जाहीरातीस लागू राहतील.
४.१४ शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांकः बीसीसी/प्र.क्र.७५/१६-क, दिनांक २७ फेब्रुवारी, २०२४ अन्वये सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरीता आरक्षण विहित करण्यात आले असून शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक बीसीसी-२०२४/प्र.क्र.७५/आरक्षण-५. दिनांक २८ जून, २०२४ अन्वये विहित करण्यात आलेले जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
४.१५ शासन शुद्धिपत्रक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, क्रमांक संकीर्ण-२०२३/प्र.क्र.७६/मावक, दिनांक ०९ मार्च, २०२३ अन्वये शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती/गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाचे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
४.१६ सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादेमध्ये सवलत घेतलेल्या उमेदवारांचा अराखीव (खुला) पदावरील निवडीकरीता विचार करणेबाबत शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात येईल. याबाबतचा तपशील वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
४.१७ अराखीव (खुला) सर्वसाधारण पदावरील शिफारशीकरीता गुणवत्तेच्या आधारे सर्व उमेदवारांचा (मागासवर्गीय उमेदवारांसह) विचार होत असल्याने, सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित/उपलब्ध नसले तरी, अर्जामध्ये त्यांच्या मूळ प्रवर्गासंदर्भातील माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे.
४.१८ कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधत्व कायदा १९५० च्या कलम २० अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल. ४.१९ सामाजिक अथवा समांतर आरक्षणाचा अथवा सोयी सवलतीचा दावा करणा-या उमेदवाराकडे संबंधित कायदा / नियम / आदेशानुसार विहित
नमुन्यातील पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे. वैध प्रमाणपत्रांचा कालावधी संबंधित शासन आदेशावरील तरतुदीनुसार (लागू असेल त्याप्रमाणे) ग्राह्य समजण्यात येईल. ४.२० सामाजिक व समांतर आरक्षणासंदर्भात विविध न्यायालयामध्ये दाखल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदभरतीची कार्यवाही
करण्यात येईल, ४.२१ खेळाडू आरक्षण :-
४.२१.१ शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः राक्क्रोधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक १ जुलै, २०१६, तसेच शासन
शुध्दीपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक १८ ऑगस्ट, २०१६, शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक संकीर्ण-१७१६/प्र.क्र.१८/क्रोयूसे-२. दिनांक ३० जून, २०२२ आणि तदनंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्राविण्य प्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादतील सवलतीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल.
४.२१.२ प्राविण्य प्राप्त खेळाडू व्यक्तींसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणा-या उमेदवारांच्या बाबतीत क्रीडा विषयक विहित अहंता धारण करीत असल्यावाचत सक्षम प्राधिका-याने प्रमाणित केलेले पात्र खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र पूर्व परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचे किंवा तत्पूर्वीचे असणे बंधनकारक आहे.
४.२१.३ विहित दिनांकास खेळाचे प्रमाणपत्र योग्य दर्जाचे असल्यासबाबत तसेच उमेदवार खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरीता पात्र ठरतो. याविषयीच्या पडताळणीकरीता त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र संबंधित विभागीय विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याच्या दिनांकापूर्वीच सादर केलेले असणे बंधनकारक आहे अन्यथा प्राविण्यप्राप्त खेळाडू आरक्षणाकरीता पात्र समजण्यात येणार नाही. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचे किंवा तत्पूर्वीचे सक्षम क्रीडा प्राधिकरणाने निर्गमित केलेले क्रीडा प्रमाणपत्र नसल्यास अथवा सदर प्राधिकरणाकडे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी केलेल्या अर्जाची पोचपावती सादर केली नसल्यास, संबंधित उमेदवाराचा खेळाडूकरीता आरक्षित पदावर विचार करण्यात येणार नाही.
४.२१.४ एकापेक्षा जास्त खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे असणा-या खेळाडू उमेदवाराने एकाच वेळेस सर्व खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे प्रमाणित करण्याकरीता
संबंधित उपसंचालक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे.
४.२१.५ मुख्य परीक्षेकरीता अर्ज सादर करतांना खेळाडू उमेदवारांनी विहित अर्हता धारण करीत असल्याचाबत सक्षम प्राधिका-याने प्रमाणित केलेले
प्राविण्य प्रमाणपत्र तसेच त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य असल्याबाबत तसेच खेळाडू कोणत्या संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरीता पात्र ठरतो, याविषयीचा सक्षम प्राधिका-याने प्रदान केलेले प्राविण्य प्रमाणपत्र पडताळणीबाबतचा अहवाल सादर केला तरच उमेदवारांचा संबंधित संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावर शिफारशी/नियुक्तीकरीता विचार करण्यात येईल. ४.२२ दिव्यांग आरक्षण:-
४.२२.१ दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या आधारे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक दिव्यांग २०१८/प्र.क्र.११४/१६ अ, दिनांक २९ मे,
२०१९, शासन परिपत्रक दिव्यांग कल्याण विभाग, क्रमांक दिव्यांग-२०१९/प्र.क्र.२५१८/दि.क.२. दिनांक २९ फेब्रुवारी, २०२४ अनुसार तसेच यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तीच्या आरक्षणासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. ४.२२.२ प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणा-या विविध संवर्ग पदांकरीता दिव्यांग सुनिश्चिती संदर्भातील तपशील सोबतच्या परिशिष्ट-दोन प्रमाणे आहे.
४.२२.३ दिव्यांग व्यक्तीसाठी असलेली पदे भरावयाच्या एकूण पदसंख्येपैकी असतील,
४.२२.४ दिव्यांग व्यक्तीची संबंधित संवर्ग/पदाकरीता पात्रता शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहील.
४.२२.५ दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित पदांवर शिफारस करताना उमेदवार कोणत्या सामाजिक प्रवर्गातील आहे, याचा विचार न करता दिव्यांग गुणवत्ता क्रमांकानुसार त्यांची शिफारस करण्यात येईल.
४.२२.६ संबंधित दिव्यांगत्वाच्या प्रकारचे किमान ४०% दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र धारक उमेदवार / व्यक्ती आरक्षण तसेच नियमानुसार अनुज्ञेय सोयी ।
सवलतीसाठी पात्र असतील.
४.२२.७ लक्षणीय दिव्यांगत्व असलेले उमेदवार / व्यक्ती खालील सवलतीच्या दाव्यास पात्र असतीलः- (१) दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४०% अथवा त्यापेक्षा जास्त असल्यास तसेच पद लक्षणीय दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित असल्यास नियमानुसार
अनुज्ञेय आरक्षण व इतर सोयी सवलती.
(२) दिव्यांगत्याचे प्रमाण किमान ४००% अथवा त्यापेक्षा जास्त असल्यास तसेच पद संबंधित दिव्यांग प्रकारासाठी सुनिश्चित केले असल्यास नियमानुसार
अनुज्ञेय सोयी सवलती. लक्षणीय दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या वयोमर्यादचा अथवा इतर कोणत्याही प्रकारचा फायदा घेऊ इच्छिणा-या उमेदवारांनी शासन निर्णय,
४.२२.८ सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक अप्रकि-२०१८/प्र.क्र. ४६/आरोग्य-६, दिनांक १४ सप्टेंबर, २०१८ मधील आदेशानुसार केंद्र शासनाच्या www.swavlambancard.gov.in अथवा SADM या संगणकीय प्रणालीदवारे वितरित करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे
प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे, ४.२२.९. शासन परिपत्रक, दिव्यांग कल्याण विभाग, क्रमांकः दिव्यांग-२०२४/प्र.क्र.८६/वि.क. २. दिनांक २७ जून, २०२४ अन्वये सार्वजनिक आरोग्य
विभागाच्या दिनांक १४ सप्टेंबर, २०१८ च्या शासन निर्णयान्वये भविष्यात वेळोवेळी स्थापन करण्यात आलेल्या येणाऱ्या वैद्यकीय मंडळामार्फत दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID Card) प्राप्त करुन घेणे अनिवार्य आहे. वैश्विक ओळखपत्र (UDID Card) प्राप्त करुन घेण्यासाठी नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्षात सदर ओळखपत्र प्राप्त होईपर्यन्तच्या कालावधीसाठी दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्वाच्या सवलती / योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांचेकडे असलेले दिव्यांगत्व प्रमाणपत्रासोबत वैश्विक ओळखपत्रासाठीचा नाव नोंदणी क्रमांक (Enrollment Number) सादर करणे अनिवार्य राहील. दिव्यांग उमेदवारांनी अर्ज करताना शासन परिपत्रक, दिव्यांग कल्याण विभाग, क्रमांकः दिव्यांग-२०२४/प्र.क्र.८६/ दि.क. २, दिनांक २७ जून, २०२४ मधील सर्व तरतुदींचे अवलोकन करण्यात यावे. त्यातील
तरतुदींनुसार दिव्यांग व्यक्तीच्या आरक्षणासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. ४.२२.१० लक्षणीय दिव्यांगत्व असणा-या उमेदवारांना अर्जामध्ये नमूद केलेला दिव्यांगत्याचा प्रकार / उप प्रकार बदलणे अनुज्ञेय नाही.
४.२३.१ लक्षणीय दिव्यांगत्त्व असलेल्या उमेदवारांना परीक्षेच्यावेळी लेखनिक आणि/अथवा इतर सोयी सवलती उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक दिव्यांग २०१९/प्र.क्र. २००//दि.क. २. दिनांक ०५ ऑक्टोबर, २०२१ अन्वये जारी करण्यात आलेल्या “लक्षणीय (Benchmark) दिव्यांग व्यक्तींच्याबाबत लेखी परीक्षा घेण्याबाबतची मार्गदर्शिका-२०२१” तसेच कार्यवाही करण्यात येईल..
४.२३ दिव्यांग उमेदवार लेखनिक आणि / अथवा अनुग्रह कालावधीबाबत
तदनंतर शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार ४.२३.२ प्रत्यक्ष परीक्षेच्यावेळी उत्तरे लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या, पात्र दिव्यांग उमेदवारांना, लेखनिकाची मदत आणि/अथवा अनुग्रह कालावधीची आवश्यकता असल्यास संबंधित उमेदवाराने ऑनलाईन पध्दतीने आयोगास अर्ज सादर केल्याच्या दिनांकापासून सात (७) दिवसाच्या आत आवश्यक
प्रमाणपत्र/कागदपत्रांसह विहित नमुन्यामध्ये आयोगाकडे लेखी विनंती करुन पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. ४.२३.३ लेखनिकाची व्यवस्था उमेदवारांकडून स्वतः केली जाणार आहे की आयोगाच्या कार्यालयामार्फत लेखनिकाची व्यवस्था करावी लागणार आहे. याचा स्पष्ट उल्लेख जाहिरातीस अनुसरुन ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जामध्ये असल्यासच विहित नमुन्याद्वारे प्राप्त लेखी विनंतीचा विचार
केला जाईल.
४.२३.४ अर्जामध्ये मागणी केली नसल्यास तसेच आयोगाची विहित पध्दतीने पूर्व परवानगी घेतली नसल्यास ऐनवेळी लेखनिकाची मदत घेता येणार नाही
अथवा अनुग्रह कालावधी अनुज्ञेय असणार नाही. ४.२३.५ परीक्षेकरीता लेखनिकाची मदत आणि/अथवा अनुग्रह कालावधीची परवानगी दिलेल्या पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध
करुन देण्यात येईल. तसेच लेखनिकाची मदत आणि/अथवा अनुग्रह कालावधीच्या परवानगीबाबत संबंधित उमेदवाराला आयोगाकडील
नोंदणीकृत ई-मेलवर कळविण्यात येईल.
४.२३.६ प्रत्यक्ष परीक्षेच्यावेळी लेखनिक व अनुग्रह कालावधीचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यापूर्वी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या दिव्यांग उमेदवारांकरीता मार्गदर्शक सूचना चे अवलोकन करणे उमेदवारांचे हिताचे राहील.
४.२४ अनाथ आरक्षण:- ४.२४.१ अनाथ व्यक्तीचे आरक्षण शासन निर्णय, महिला व बालविकास विभाग, क्रमांक अनाच-२०२२/प्र.क्र.१२२/का-०३, दिनांक ०६ एप्रिल, २०२३.
दिनांक १० मे, २०२३ अनुसार तसेच शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणा-या आदेशानुसार राहील. ४.२४.२ अनाथ आरक्षण धोरण शासन निर्णय, महिला व बालविकास विभाग, पूरक पत्र, क्रमांक अनाथ-२०२२/प्र.क्र.१२२/का-०३, दिनांक १० मे, २०२३
अन्वये एखाद्या भरती प्रक्रियेमध्ये अनाथ आरक्षणाच्या एका प्रवर्गासाठी उपलब्ध जागांवर गुणवत्तेनुसार त्या प्रवर्गातील अनाथ उमेदबार पर्याप्त.
प्रमाणात उपलब्ध होऊ शकले नाहीत, तर त्या भरती प्रक्रियेमध्ये ती पदे अनाथांच्या दुसऱ्या प्रवर्गातील उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात
येतील, ४.२४.३ अनाबांसाठी आरक्षित पदावर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गाचा आहे; त्या प्रवर्गातून करण्यात
येईल.
४.२४.४ पूर्व परीक्षेच्या अर्जाद्वारे अनाथ आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांनी दिनांक ०६ सप्टेंबर, २०२२, दिनांक ०६ एप्रिल, २०२३ आणि दिनांक १० मे, २०२३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे विहित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार विहित नमुन्यातील अनाथ प्रमाणपत्र व महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आयोगाकडून निश्चित करण्यात येणाऱ्या विहित कालावधीत सादर करणे आवश्यक राहील. अन्यथा अनाथ आरक्षणाचा दावा विचारात
घेतला जाणार नाही, माजी सैनिक आरक्षण:-
४.२५ ४.२५.१ उमेदवार स्वतः माजी सैनिक असल्यास त्याने त्याचाबत स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यास माजी सैनिकांना अनुज्ञेय असलेले लाभ मिळणार नाहीत,
४.२५.२ माजी सैनिकांकरीता आरक्षणासंदर्भातील तरतुदी शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार असतील.
४.२६ प्रकल्पग्रस्तांसाठीचे आरक्षण :-
शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एईएम-१०८०/३५/१६-अ, दिनांक २० जानेवारी, १९८० तसेच यासंदर्भात शासनाकडून वेळोवळी नमूद करण्यात येणा-या आदेशानुसार प्रकल्पग्रस्तांसाठीचे आरक्षण राहील. ४.२७ भूकंपग्रस्तांसाठीचे आरक्षण:-
शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक भूकंप-१००९/प्र.क्र. २०७/२००९/१६-अ, दिनांक २७ ऑगस्ट, २००९ तसेच यासंदर्भात शासनाकडून
वेळोवेळी जारी करण्यात येणा-या आदेशानुसार भूकंपग्रस्तांसाठीचे आरक्षण राहील.
४.२८ पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्याकरीता आरक्षण :- , क्रमांक पअंक-१००९/प्र.क्र. २००/२००९/१६-अ. दिनांक २७ ऑक्टोबर, २००९ तसेच यासंदर्भात शासनाकडून
शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग वेळोवेळो जारी करण्यात येणा-या आदेशानुसार भूकंपग्रस्तांसाठीचे आरक्षण राहील. ४.२९ प्रकल्पास्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्याकरीता असलेले आरक्षण तसेच सोयी-सवलती या केवळ बृहन्मुंबई क्षेत्राबाहेरील शासकीय
कार्यालयातील लिपिक-टंकलेखक संवर्गासाठीच लागू आहेत.
५. वेतनश्रेणी :-
६. पात्रता :-
अ.क्र.
पदाचे नाव
१ उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय
२
४
तांत्रिक सहायक, विमा संचालनालय
कर सहायक
बेलिफ व लिपिक/ लिपिक-टंकलेखक
६.१ भारतीय नागरिकत्त्र, ६.२ वयोमर्यादा :-
वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर
९-१३ : ३५४००-११२४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.
९-१० : रुपये २९२००-९२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
९-८:२५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते ९-६ : १९९०००६३२०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
६.२.१ वयोमर्यादा गणण्याचा दिनांक: दिनांक ०१ फेब्रुवारी, २०२५ ६.२.२ विविध अराजपत्रित प्रवर्ग / उपप्रवर्गासाठी किमान व कमाल मर्यादा :-
६.२.३ विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही.
६.३ अर्हता :-
६.३.१. शेक्षणिक अर्हता :-
(एक) उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. (दोन
) उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील:
(अ) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा
(च) विज्ञान शाखेतोल सांविधिक विद्यापीठाची पदवी,
(तीन) पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील, परंतु मुख्य परीक्षेकरीता अहंताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या
प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदविका/पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. (चार) अंतवर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने ही अट मुख्य परीक्षेचा अर्ज/माहिती स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे.
(पाच) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
६.३.२. टंकलेखन अर्हता :-
( एक) कर सहायक, बेलिफ व लिपिक व लिपिक-टंकलेखक संवर्गासाठी उपरोक्त शैक्षणिक अर्हतेसोबत खालीलप्रमाणे टंकलेखन अर्हता असणे
आवश्यक आहे :-
कर सहायक
मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रत्ति
मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
बेलिफ व लिपिक / लिपिक-टंकलेखक
मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
(दोन) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक एसपीई १०१२/ (१०८/१२)/साशि-१. दिनांक ३१ ऑक्टोबर, २०१३ अथवा तदनंतर शासनाने वेळोवेळो आदेश काढून विहित केलेली संगणक टंकलेखन अर्हता- बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग मराठी ३० शब्द प्रति मिनिट अथवा बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट (लागू असेल त्याप्रमाणे) समकक्ष अर्हता म्हणून स्वीकारार्ह आहे. (तीन ) शासन निर्णय , सामान्य प्रशासन विभाग, क्रमांकः एसआरव्ही-२०२३/प्र.क्र. १/कार्यासन-१२, दिनांक १२ जानेवारी, २०२३ अनुसार केवळ
इंग्रजो टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवाराची बेलिफ व लिपिक / लिपिक-टंकलेखक संवर्गामध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्याने नियुक्तीच्या दिनांकापासून ४ वर्षात मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे विहित प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे आहे. तसेच, केवळ मराठी टंकलेखन धारण करणाऱ्या उमेदवाराची इंग्रजी भाषेत बहुतांश कामकाज होत असलेल्या विशिष्ट कार्यालयात (उदा. न्यायालय व न्यायाधिकरणातील सरकारी वकिलांची कार्यालये इत्यादी) बेलिफ व लिपिक / लिपिक-टंकलेखक संवर्गामध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्याने नियुक्तीच्या दिनांकापासून ४ वर्षात इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे विहित प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे राहील. अन्यथा संबंधितांची वेतनवाढ रोखण्यात येईल.
६.३.३ अर्हता/पात्रता गणण्याचा दिनांक:-
(एक) मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे. (दोन) शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची विहित टंकलेखन अहंता आयोगाकडून निश्चित करण्यात येणा-या विशिष्ट दिनांकास अथवा त्यापूर्वी धारण करणे
अनिवार्य आहे.
६.३.४ टंकलेखन अर्हता धारण करण्यातून तात्पुरती सूट (कर सहायक, बेलिफ व लिपिक तसेच लिपिक-टंकलेखक पदाकरीता) :- (१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक अपंग-२०१६/प्र.क्र.११६/१६-अ. दिनांक १६ नोव्हेंबर, २०१६ नुसार दिव्यांग उमेदवारांना टंकलेखनाची
परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे दिव्यांग आरक्षणाचा दावा करणाऱ्या पात्र उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही. (२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांकः संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१८०/२८, दिनांक १३ जून, २०१९ अन्वये माजी सैनिक उमेदवारांना टंकलेखनाची
परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाचा कालावधी व २ संची अनुज्ञेय असल्यामुळे माजी सैनिक आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन अहंता अनिवार्य नाही. (३) शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग, क्रमांकः अनाथ-२०२२/प्र.क्र.८४/का-०३, दिनांक ०७ जुलै, २०२२ अन्वये अनाथ उमेदवारांना
टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे अनाथ आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही. ४) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, संकीर्ण- १११४/प्र.क्र. २००/१६-अ, दिनांक ४ सप्टेंबर, २०१५ अन्वये प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर
( अंशकालीन कर्मचारी प्रवर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्याराठी त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाचा कालावधी अनुज्ञेय असल्यामुळे प्रस्तुत आरक्षणाचा दावा करणा-या उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही,
७. निवडप्रकिया :-
७.१ जाहिरातीमध्ये नमूद अर्हता पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही. ७.२ सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया खालील सेवा प्रवेश नियम अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणा-या सुधारणा तसेच आयोगाकडून वेळोवेळी
सुधारण्यात येणाऱ्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार राबविण्यात येईल
(१) उद्योग संचालनालयातील उद्योग निरीक्षक, गट-क (सेवाप्रवेश) नियम, २०२१ (२) विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क (सेवाप्रवेश) नियम २०१३.
(३) वित्त विभागातील तांत्रिक सहायक, गट-क, विमा संचालनालय (सेवाप्रवेश) नियम, २००१,
८.२ कर सहायक, बेलिफ व लिपिक तसेच लिपिक टंकलेखक संवगांतील पदभरतीसाठी विहित टंकलेखन कौशल्य चाचणी अनिवार्य आहे. ८.३ आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजना/ पध्दती तसेच अभ्यासक्रमानुसार पूर्व व मुख्य परीक्षेची निकाल प्रक्रिया राबविण्यात येईल,
८.४ मुख्य परीक्षेस प्रवेश :-
८.४.१ मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी आयोगाकडून निश्चित केलेल्या गुणांच्या सीमारेषा व मर्यादेनुसार संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्हताप्राप्त
ठरणाऱ्या तसेच जाहिरात/अधिसूचनेतील तरतुदीनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता व अन्य अटीची पूर्तता करणा-या उमेदवारांस संबंधित मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल. ८.४.२ मुख्य परीक्षेकरीता आयोगाच्या कार्यालयाकडून अधिसूचना निर्गमित झाल्यानंतर आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळाद्वारे मुख्य परीक्षेच्या
प्रवेशासाठी पात्र उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईलद्वारे अर्ज करता येईल, त्यावेळी मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी आयोगाने विहित केलेल्या पद्धतीने परीक्षा केंद्र निवडून परीक्षा-शुल्क विहित मुदतीत सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. ८.४.३ संबंधित संवर्गाच्या संयुक्त मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारास स्वतंत्रपणे अर्ज सादर करुन प्रत्येक संवर्गाच्या परीक्षेसाठी स्वतंत्र
विहित परीक्षा शुल्क भरावे लागेल.
८.५ टंकलेखन कौशल्य चाचणी (केवळ बेलिफ व लिपिक, लिपिक-टंकलेखक व कर सहायक पदाकरीता):-
८.५.१ बेलिफ व लिपिक, गट-क लिपिक-टंकलेखक तसेच कर सहायक या संवर्गातील पदभरतीकरीता संगणक प्रणालीवर आधारित स्वतंत्र टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येईल.
८.५.२ कर सहायक संवर्गाकरीता मराठी व इंग्रजी अशा दोन्ही टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये अहंताकारी/पात्र (Qualifying) ठरणे आवश्यक आहे. ८.५.३ टंकलेखन कौशल्य चाचणी ही केवळ अर्हताकारी/पात्रता (Qualifying) स्वरुपाची असेल.
८.५.४ वेलिफ व लिपिक/लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवाराना शासनाच्या धोरणानुसार टंकलेखन कौशल्य चाचणीतून सूट असल्यामुळे सदर प्रवर्गातून आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणी देण्याची आवश्यकता नाही.
८.५.४ कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या दिव्यांग, माजीसैनिक, व अनाथ प्रवर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांना शासनाच्या धोरणानुसार टंकलेखन कौशल्य चाचणीत सूट असल्यामुळे सदर प्रवर्गातून आरक्षणाचा दावा
करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणी देण्याची आवश्यकता नाही मात्र प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी या प्रवर्गातील उमेदवारांना कर सहायक संवर्गासाठी मराठी व इंग्रजी भाषेतील टंकलेखन कौशल्य चाचणी अनिवार्य राहील. ८.५.६ टंकलेखन कौशल्य चाचणीचा सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावरील प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजना / पद्धतीमध्ये उपलब्ध करुन देण्यात
आला आहे. ९. पूर्व परीक्षेकरीता अर्ज करण्याची पध्दत:-
९.१ अर्ज सादर करण्याचे टप्पे :-
(एक) आवश्यक असल्यास खाते अद्ययावत करणे,
(दोन) विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने खालीलप्रमाणे लागू असेल त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अर्ज सादर करणे.
(तीन) परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे,
(चार) जिल्हा केंद्र निवड करणे.
(पाच) संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरुन, अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आयोगाच्या संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेकरीता अर्ज सादर करणे आवश्यक राहील.
( सहा) संयुक्त पूर्व परीक्षेकरीता भरावयाच्या अराखीव व आरक्षित एकूण पदसंख्येच्या आधारे, मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करुन, सामाईक पूर्व परीक्षेमधील उमेदवारांच्या गुणांच्या आधारे गट-क सेवेकरीता एकत्रित निकाल जाहीर करण्यात येईल. ९.२ विहित कागदपत्रे/प्रमाणपत्रे अपलोड करणे:-
(एक) प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाच्यांच्या अनुषंगाने पूर्व परीक्षेकरीता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांव्यतिरिक्त अन्य उमेदवारांना कोणतीही कागदपत्रे अपलोड
करण्याची आवश्यकता नाही. (दोन) विविध सामाजिक व समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर (Check eligibility) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे/प्रमाणपत्रे (लागू असलेली) अपलोड करणे अनिवार्य आहे:
९.५.२ उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बैंक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
९.५.३ परीक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे.
९.५.४ अर्ज सादरीकरणाचे टप्पे पूर्ण झाल्यावर उपलब्ध होणाऱ्या ‘Submit and Pay fees’ या बटनवर क्लिक केल्यानंतर किंवा मुख पृष्ठावरील ‘माझे खाते’ या सदराखालील अर्ज केलेल्या पदांच्या यादीतील ‘Fees not Paid’ अशी सद्यस्थिती लिहिलेल्या जाहिरात/पद/परीक्षेसमोरील Pay Now’ या लिंकवर क्लिक
करुन परीक्षा शुल्काचा भरणा करता येईल,
९.५.५ परीक्षा शुल्काचा भरणा खालील दोन पध्दतीने करता येईल:-
(एक) ऑनलाईन पध्दतीने :-
(१) भारतीय स्टेट बँक तसेच प्रणालीद्वारे उपलब्ध करुन दिलेल्या कोणत्याही एका पेमेंट गेटवेच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अथवा नेटबॅकिंगद्वारे परीक्षा शुल्क अदा करता येईल.
(२) परीक्षा शुल्काचा भरणा करताना बैंक खात्यामधून परीक्षा शुल्काच्या रकमेची वजावट झाल्यावर परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीपणे झाला (Payment Successful) असल्याचा संदेश आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या पृष्ठावर प्रदर्शित झाल्याशिवाय व परीक्षा शुल्काची पावती तयार झाल्याशिवाय संकेतस्थळावरील संबंधित पृष्ठावरून आणि/अथवा खात्यातून लॉगआऊट होऊ नये,
(३) परीक्षा शुल्काचा भरणा केल्यानंतर उमेदवाराला त्याच्या प्रोफाईलमध्ये परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वी झाला आहे किंवा कसे, याची स्थिती
(status) लगेचच अवगत होईल, खात्यातून Logout होण्यापूर्वी परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बँकेकडून व्यवहार (Transaction)
पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जवाबदारी उमेदवाराची आहे.
(४) कोणत्याही कारणामुळे विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्काचा भरणा चशस्वीपणे करणे शक्य न झाल्यास अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकानंतर दोन दिवसापर्यंत परीक्षाशुल्काचा भरणा ऑफलाईन पद्धतीने करण्याकरीता चलनाची प्रत घेता येईल.
(दोन) ऑफलाईन पध्दतीने चलनाद्वारे
चलनाद्वारे परीक्षा शुल्काचा भरणा करण्याचा विकल्प निवडल्यास उपलब्ध होणारी चलनाची प्रत घेऊन भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत बँकेच्या कार्यालयीन वेळेत विहित अंतिम दिनांकापूर्वी परीक्षा शुल्काचा भरणा करता येईल. तथापि, चलनाची प्रत घेणे व बँकेत शुल्क जमा करणे, यामध्ये किमान
तीन तासांचे कालावधी राहील, याची दक्षता घ्यावी.
९.५.६ परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वी न झाल्यास पुन्हा शुल्क भरण्याची अथवा चलन घेण्याबाबतची कार्यवाही प्रस्तुत जाहिरातीच्या/अधिसूचनेच्या अनुषंगाने विहित दिनांकापूर्वीच करणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणास्तव व्यवहार अयशस्वी ठरल्यास यासंदर्भातील तक्रारीची आयोगाकडून दखल घेतली
जाणार नाही.
९.५.७ विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित भरतीप्रक्रियेकरीता विचार केला जाणार नाही. यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचनांमधील संबंधित तरतुदींचे अवलोकन करणे उमेदवारांच्या हिलाचे राहील.
१०. सेवाप्रवेशोत्तर शती :-
१०.१ नियुक्त झालेल्या व्यक्तीस खालील अर्हता/परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहोल :-
१०.१.१ जेथे प्रचलित नियमानुसार विभागीय/व्यावसायिक परीक्षा विहित केली असेल अथवा आवश्यक असेल तेथे त्यासंबंधी केलेल्या नियमानुसार
विभागीय/व्यावसायिक परीक्षा. १०.१.२ हिंदी आणि मराठी भाषा परीक्षेसंबंधी केलेल्या नियमानुसार जर ती व्यक्ती अगोदर परीक्षा उत्तीर्ण झाली नसेल किंवा तिला उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळाली नसेल तर ती परीक्षा,
१०.१.३ महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेले संगणक हाताळणीबाबतची प्रमाणपत्र परीक्षा, १०.३ बेलिफ व लिपिक, गट-क तसेच लिपिक टंकलेखक संवर्गामध्ये निवड झालेल्या उमेदवारास संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयातील कामकाजाच्या अनुषंगाने कर्तव्ये व जबाबदा-या पार पाडाव्या लागतील. याबाबतचा तपशील संबंधित नियक्ती प्राधिका-याकडून उमेदवाराना नियुक्ती पत्र/आदेशासोबत पुरविण्यात येईल.
१०.४ राज्यस्तरीय संवगांमध्ये नियुक्त केलेली व्यक्ती महाराष्ट्र राज्यात कोठेही बदली होण्यास पात्र राहील. ११. प्रवेशप्रमाणपत्र:
११.१ परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशप्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर (s://mpsconline.gov.in) उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे परीक्षेपूर्वी सर्वसाधारणपणे ७ दिवस अगोदर उपलब्ध करुन देण्यात येईल, त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाऊनलोड करुन घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे,
११.२ परीक्षेच्या वेळी उमेदवाराने स्वतःचे प्रवेशप्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे. त्याशिवाय, परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
११.३ प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर उमेदवाराला त्याच्या आयोगाकडील नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे कळविण्यात
येईल, याबाबतची घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर परीक्षेपूर्वी एक सप्ताह अगोदर प्रसिद्ध करण्यात येईल,
११.४ परीक्षेच्या दिनांकापूर्वी ३ दिवस अगोदर प्रवेश प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास अर्ज सादर केल्याच्या आवश्यक पुराव्यासह आयोगाच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा.
११.५ परीक्षेच्यावेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसेन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. १९.६ आधार कार्डच्या ऐवजी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड केलेले ई-आधार सादर करणा-या उमेदवारांच्या
बाबतीत ई-आधार वर उमेदवाराचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्मदिनांक वा तपशीलासह आधार निर्मितीचा दिनांक (Date of Aadhaar generation) व आधार
डाऊनलोड केल्याचा दिनांक असल्यासच तसेच सुस्पष्ट फोटोसह रंगीत प्रिंट मध्ये आधार डाऊनलोड केले असल्यासच ई-आधार वेध मानण्यात येईल. ११.७ नावांमध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला (विवाहित स्त्रियांच्या बाबतीत), नावांत बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र किवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावांत बदल झाल्यासंबंधीचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्यावेळी सादर करणे आवश्यक आहे.
१२. परीक्षेस प्रवेश संबंधित परीक्षेच्या प्रवेशप्रमाणपत्रावर नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून उमेदवारांना परीक्षेच्या उपस्थितीसाठी पात्र समजण्यात येईल.
१३. प्रस्तुत जाहिरातीमध्ये परीक्षेसंदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे. अर्ज स्वीकारण्याची पध्दत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची
सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा योजना, अभ्यासक्रम इत्यादीबाबतच्या सविस्तर तपशिलासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील “उमेदवारांकरीता माहिती” विभागातील “सूचना” अंतर्गत सर्वसाधारण सूचना” तसेच “परीक्षा” या सदराखालील परीक्षा योजना” विभागातील “महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा” मध्ये तसेच पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम “उमेदवारांकरीता माहिती” विभागातील “परीक्षा” अंतर्गत “अभ्यासक्रम येथे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीचे तसेच टंकलेखन कौशल्य चाचणीबाबतच्या सूचनांकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकाचे कृपया अवलोकन करावे.
१४. आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली माहिती/जाहिरात अधिकृत समजण्यात येईल, १५. प्रस्तुत परोक्षेच्या आयोजनाच्या दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारास कोणती परोक्षा द्यावयाची आहे; याबाबतचा निर्णय उमेदवाराने स्वतः घेणे आवश्यक राहील. १६. सदर जाहिरात आयोगाच्या https://mpsc.gov.in तसेच https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ठिकाण : मुंबई.
दिनांक: ०९ ऑक्टोबर, २०२४
उप सचिव, जाहिरात
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
(१) आयोगाच्या कार्यालयात, परीक्षा कक्षात, परीक्षा केंद्राच्या परिसरात, तसेच, शारीरिक चाचणी व मुलाखतीच्या वेळी मोबाईल फोन, अथवा इतर कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधने आणण्यास व वापरण्यास सक्त मनाई आहे. (२) प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रतेसंदभांतील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास शिफारस/नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.