वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण 2024-25 ऑफलाईन पध्दतीने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांमध्ये आयोजित आयोजनाबाबत offline varishtha nivad shreni training
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण 2024-25 ऑफलाईन पध्दतीनेच जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांमध्ये आयोजित करण्यात येणार परिपत्रक शासन निर्णय पहा
संदर्भ: १) शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.४३/ प्रशिक्षण दि.२३/१०/२०१७. २) शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.४३/प्रशिक्षण दि.२०/०७/२०२१.
👉👉शासन परिपत्रक येथे पहा Click here
३) महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी (डायट) संघटना यांचे दि.२१/०२/२०२४ चे निवेदन
४) जिल्हा २ शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) जळगांव यांचे पत्र क्र. जिशिप्रसं/जळगाव/ २०२३-२४/६६,दि.२३/०२/२०२४. व.नि.श्रेणी प्र./
५) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) धुळे यांचे पत्र क्र. जिशिवप्रसंधु/ववेनिश्रेप/२०८, दि.२३/०२/२०२४.
६) विभागीय शिक्षण उपसंचालक, अमरावती यांचे पत्र क.जा.क्र. जिशिपर्स/अम / ववेश्रेवनिश्रे प्रशिक्षण/ १५३/२४, दि.०१/०३/२०२४.
👉👉वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नाव नोंदणीसाठी लिंक येथे पहा Click here
उपरोक्त विषयानुसार संदर्भ क्र.२ अन्यये वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाची जबाबदारी राज्य शासनाकडून परिषदेस सोपविण्यात आली आहे. संदर्भ क्र.२ नुसार किमान १० दिवसांचे किंवा ५० घड्याळघ तासांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक करण्यात आले. यापूवी कॉविड १९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीमुळे सदर प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आले होते. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने घेणेबाबत संदर्भ पत्र क्र.३ अन्वये महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारो (डायट) संघटना यांचेकडून तसेच संदर्भ पत्र क्र.४ ते ६ अन्वये वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने घेणेबाबत क्षेत्रिय कार्यालयांकडून विनंती करण्यात आली आहे.
प्रत्यक्ष वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण प्रभावीपणे दिले जाऊन, प्रशिक्षणांतर्गत तज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणार्थीचे परस्परांमधील संभाषणात्मक शैलीतून अनुभव व विचारांची देवाण-घेवाण सहजगत्या व्हावी तसेच सदर प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा उपयोग २ शैक्षणिक सेवेत होऊन शिक्षक अधिक सक्षम व्हावा या उद्देशाने वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन सन २०२४-२५ पासून ऑफलाईन पध्दतीने जिल्हास्तरावर (जिल्हा ९ शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमध्ये) घेण्याचे नियोजित आहे. यार्कारता सर्व प्राचार्य, जिल्हा ९ शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी ५ तज्ञ अभ्यासक / तज्ञ मार्गदर्शक यांची नावे परिषदेस दि.५ जून २०२४ पर्यंत preservicedept@maa.ac.in या ई- मेल आयडीवर सादर करावी. यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील वरिष्ठ अधिव्याख्याता/अधिव्याख्याता इत्यादी ३ तसेच याव्यतिरिक्त आपल्या जिल्ह्यातील इतर २ तज्ज्ञ मार्गदर्शकांचे नावांचा समावेश असावा.
ऑनलाईन वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नावनोंदणी करणेबाबत शासन परिपत्रक व नोंदणी लिंक
संदर्भ
:- १) शासन निर्णय क्र. चवेआ-१०८९/१११/माशि-२, दि.२.०९.१९८९.
२) शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र. ४३/प्रशिक्षण, दि.२०.७.२०२१.
३) शासन पत्र क्रमांकः शिप्रधो २०२१/ प्र.क्र. ६७/ प्रशिक्षण, दि.०८.०५.२०२३.
उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयातील परिच्छेद क्र.२ नुसार वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे. यानुसार २०२१-२०२२ दरम्यान ऑनलाईन स्वरूपामध्ये एकूण ९४,५४२ प्रशिक्षणार्थी यांनी प्रस्तुत प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सद्यस्थितीमध्ये संदर्भ क्रमांक ३ अन्वये शासनामार्फत वरिष्ठ व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाचा द्वितीय टप्प्याची प्रक्रिया सुरु करणेसाठीची मान्यता देण्यात आलेली आहे. यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापक/प्राध्यापक/प्राचार्य यांनी नोंदणी करावयाची आहे. यासंदर्भातील सूचना पुढीलप्रमाणे –
१. प्रशिक्षणाकरिता नोंदणी करणेसाठी परिषदेच्या
https://training.scertmaha.ac.in या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर देखील सदरचा सर्व तपशील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
२. दि. ३१ मार्च, २०२४ रोजी सेवेचे एकूण १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले प्रशिक्षणार्थी वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
३. दि. ३१ मार्च, २०२४ रोजी सेवेचे एकूण २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले प्रशिक्षणार्थी निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
४. प्रशिक्षण नोंदणी दिनांक २९ मे,२०२३ ते १२ जून, २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे. प्रशिक्षण लिंक नोंदणी दिनांक २९ मे, २०२३ रोजी दुपारी २.०० वाजेपासून सुरु होईल.
५. सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. याबाबत नोंदणीनंतर नोंदणी केलेल्या ई-मेलवर या कार्यालयामार्फत ई-मेलद्वारे प्रशिक्षणाबाबत पुढील सूचना संबंधितांना देण्यात येतील.
६. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत
गट क्र.१- प्राथमिक गट (इ. १ ली ते ८ वी च्या वर्गांना अध्यापन करणारे)
गट क्र. ३-उच्च माध्यमिक गट (इ. ११ वी ते १२ वी च्या वर्गांना अध्यापन करणारे)
गट क्र. ४- अध्यापक विद्यालय गट (प्रथम व द्वितीय वर्ष अध्यापन करणारे)
७. प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करतेवेळी शिक्षकाने आपला स्वतःचा शालार्थ ID, शाळेचा UDISE क्रमांक, अचूक ई-मेल आय.डी इत्यादी माहिती सोबत ठेवावी. ८. ज्या शिक्षकांना स्वतःचा शालार्थ ID उपलब्ध नाही अशा शिक्षकांसाठी देखील सदरच्या ऑनलाईन
पोर्टलवर “शालार्थ आय. डी. नसलेल्या शिक्षकांसाठीची नोंदणी” हा पर्यायाचा वापर करून आपली नावनोंदणी करावी.
९. नावनोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ येणार असल्याने आपला कार्यान्वित असणारा मोबाईल सोबत ठेवावा.
१०. प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरात असणारा ई- मेल आय.डी. असणे आवश्यक आहे. सदरच्या प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नावनोंदणी करत असताना नोंदविलेल्या ई-मेल आय.डी. वर पाठविण्यात येतील.
११. आपण नोंदणी करत असलेला ई-मेल आयडी पडताळणीसाठी सदरच्या ई-मेल आयडी वर OTP येईल. व सदरचा प्राप्त OTP दिलेल्या प्रणालीवर नोंदवून आपला ई-मेल आयडी अचूक असल्याची पडताळणी केली जाईल.
१२. नावनोंदणी करत असताना आपला ई-मेल आय. डी अचूक असल्याची खात्री करावी. चुकीचा ई-मेल आय.डी. / यापूर्वी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वरील कोणत्याही प्रशिक्षणासाठी वापरण्यात आलेला ई-मेल आय.डी चा वापर करू नये अन्यथा प्रशिक्षणार्थ्याचे प्रशिक्षण सुरु होणेसाठी समस्या उद्भवेल.
१३. नोंदणी फॉर्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात यावी. आपल्या माहितीमध्ये काही बदल / दुरुस्ती असल्यास “माहितीत बदल करा” या बटणावर क्लिक करून
सुधारित माहिती भरता येईल.
१४. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय व मार्गदर्शनपर आधारित सर्व व्हिडीओ https://training.scertmaha.ac.in या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.
१५. या प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई हे जिल्हा नोडल अधिकारी असतील.
१६. प्रशिक्षण शुल्क भरणा करणेसाठी प्रशिक्षणार्थी यांचेकडे स्वतःच्या बँक खात्याचा सर्व तपशील- इंटरनेट बँकिंग / क्रेडीट / डेबिट कार्ड/UPI payment ने सदर प्रशिक्षण शुल्क ज्या बँक खात्यावरून भरणार आहे त्याचा आवश्यक तपशील सोबत ठेवावा. उदा. युझर आयडी, पासवर्ड इ.
१७. सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.२,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार मात्र) शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Credit & Debit Card, Internet Banking, UPI Payment) अदा करणे आवश्यक आहे. एकदा भरण्यात आलेल्या प्रशिक्षण शुल्क
परताव्याबाबत परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये. त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी.
१८. प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणी ची रीसिप्ट अथवा स्क्रीनशॉट जतन करून ठेवावा म्हणजे भविष्यातील दुबार नोंदणी, ई- मेल, प्रशिक्षण गट / प्रशिक्षण प्रकार बदलासाठी ग्राह्य धरण्यात येतात.
१९. नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर Email आय. डीवरून trainingsupport@maa.ac.in या ई-मेल आयडीवर संपर्क करावा.
२०. वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी व निवड श्रेणीसाठी पात्र होणेकरिता विहित गटातील संदर्भीय शासन निर्णयातील प्रशिक्षण पूर्ण करणे ही एक अट आहे. केवळ प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे संबंधित शिक्षक वरिष्ठ/ निवड श्रेणीसाठी पात्र ठरणार नाहीत. त्याकरिता उपरोक्त शासन निर्णयातील इतर नमूद अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे.
२१. नोंदणी केलेल्या शिक्षकांचे उपरोक्त प्रशिक्षण
गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल.
२२. शासन निर्णयातील अटी व शर्ती तपासून त्याबाबत वरिष्ठ / निवडश्रेणी मंजूर करण्याची कार्यवाही विभागीय / जिल्हा स्तरावर करण्यात येईल.
२३. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय झाला असे नाही तर जिल्हास्तरावरील सक्षम प्राधिकारी यांचेमार्फत पुढील प्रशासकीय कार्यवाही यादृष्टीने केली जाईल याची नोंद घेण्यात यावी.
२४. सदर प्रशिक्षणासंबंधी अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी https://training.scertmaha.ac.in हे संकेतस्थळ पहावे.
उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शानास आणून द्याव्यात व सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नावनोंदणी करण्यास आदेशित करण्यात यावे. प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी परिषदेतील खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
वरिष्ठ श्रेणी प्रस्ताव सादर करणेसाठी आवश्यक कागदपत्रे
१) शाळा मुखपत्र (कव्हरींग पत्र)
२) प्रपत्र-अ नमुन्यात माहिती
३) वरिष्ठ वेतनश्रेणी संस्था ठराव (नमुना १ मध्ये) (सदर संस्था ठरावामध्ये प्रथम नेमणूक दिनांक, वरिष्ठ श्रेणी पात्र दिनांक, लागू केलेली वरिष्ठ वेतनश्रेणी, वरिष्ठ वेतनश्रेणीचे किमान तीन आठवडयांचे प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे, त्यांचे मागील पाच वर्षाचे गोपनीय अहवाल पाहता त्यांची सेवा समाधानकारक आहे, त्यांचे सेवेत दिनांक ते अखेर सेवाखंड असून सदर सेवाखंड क्षमापित करण्यात येत आहे, विनाअनुदानित सेवा असल्यास त्याचा तपशील, संबंधित कर्मचारी वरिष्ठ वेतनश्रेणी मिळणेस पात्र आहे इत्यादी सविस्तर संपूर्ण तपशील असणे आवश्यक आहे. संस्था ठराव सोबत असलेल्या नमुना-१ प्रमाणेच आवश्यक आहे. अपूर्ण संस्था ठराव सादर करु नये.
४) सेवांतर्गत प्रशिक्षण प्रमाणपत्र (किमान तीन आठवडयाचे आवश्यक आहे)
५) कर्मचारी वैयक्तिक मान्यता प्रत (शिक्षण सेवक, नियमित, शैक्षणिक वर्षापूर्ती मान्यता असल्यास त्या सर्व मान्यता प्रती सादर कराव्यात.)
६) विनावेतन रजा/असाधारण रजा, सेवाखंड इ. तपशील (नमुना रमध्ये) (विनावेतन / असाधारण रजा, सेवाखंड असलेस तेवढे दिवस वरिष्ठ वेतनश्रेणी दिनांक पुढे दर्शविणे आवश्यक आहे.)
७) मुख्याध्यापक व कर्मचारी प्रमाणपत्र (नमुना ३ मध्ये) (या मध्ये वेतन जादा अदा झालेस परत करणेचे हमीपत्र, न्याय प्रविष्ठ प्रकरण नसलेचे प्रमाणपत्र, यापूर्वी पदोन्नती नाकारली नसलेचे प्रमाणपत्र, उशिराबाबतचा खुलासा, सेवा समाधानकारक असलेचे प्रमाणपत्र, किमान तीन आठवडयांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेले असलेचे हमीपत्र इत्यादी तपशील आवश्यक आहे.)
८) सेवा समाधानकारक असलेचे संस्था प्रमाणपत्र (नमुना-४ मध्ये)
९) मूळ सेवापुस्तक
१०) वेतन निश्चिती प्रस्ताव दोन प्रतीत सेवापुस्तकातील वेतन निश्चिती नोंदीसह (विकल्प वरिष्ठ
श्रेणी मंजुरी संस्था ठराव दिनांकापासून एक महिन्याच्या आत देणे आवश्यक आहे.)
सदरचे प्रस्ताव संबंधित शाळेच्या लिपीका मार्फतच सादर करावेत.
प्रस्तावासोबत असणा-या सर्व झेरॉक्स प्रती साक्षांकित (True Copy) असणे आवश्यक आहे. तसेच सेवापुस्तकत काही उणिवा/त्रुटी आढळलेस उदा. न्यायालयीन प्रकरण, वेतनवाढ रोखली असलेस त्याअनुषंगाने इतर कागदपत्रे, माहिती आवश्यक राहील.
वरिष्ठ वेतनश्रेणी मंजर करणेपर्व प्रस्तावाची चेक लिस्ट
1.मूळ सेवा नौद पुस्तकाच्या पहिल्या पानाची साक्षांकित प्रत जोडली.
2.सेवा नोंद पुस्तकांमधील प्रथम नेमणूक आदेशाची नोंद ज्या पानांवर आहे त्या दोन्ही पानांची साक्षांकित प्रत जोडली.
3.मूळ नियुक्ती आदेशाची संपूर्ण झेरॉक्स प्रत जोडली.
4.शिक्षण सेवक पदी प्रशिक्षित/अप्रशिक्षित नेमणूक आदेशाची प्रत जोडली आहे.
5.बी. एड. शैक्षणिक पात्रतेवर अप्रशिक्षित शिक्षण सेवक पदी सेवेत रुजू झाले असलेस / प्राथमिक शिक्षक पदावर निश्चित कोणत्या दिनांकापासून सेवा नियमित करण्यात आली आहे. असे सक्षम अधिकारी यांचे मूळ आदेशाची साक्षांकित प्रत जोडली आहे.
6.ज्या उपशिक्षकांची सेवेत लागले नंतर सेवेत खंड असलेस त्यांचे 61 सेवाखंड क्षमापित केल्याच्या आदेशाची साक्षांकित प्रत जोडली.
7.जे उपशिक्षक मानधनावर सेवेत दाखल झालेले आहे, त्यांची नियमित वेतनश्रेणी आदेशाची साक्षांकित प्रत जोडली.
8.जिल्हा बदली आदेशाची साक्षांकित प्रत जोडली.
9.संबंधित प्राथमिक शिक्षक जिल्हा बदलीने आले असल्यास जिल्हा बदलीने रुजू झालेल्या आदेशाची सेवा नाँद पुस्तकातील पानाची नौद साक्षांकित प्रत जोडली.
10.डी. एड. अथवा बी. एड. उत्तीर्ण प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडली,
11.स्थायीत्वाच्या आदेशाची साक्षांकित प्रत जोडली.
12.सलग 21 सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केले बाबत प्रमाणपत्राची साक्षांकित 1. प्रत जोडली. जर संबंधित शिक्षक हा दिनांक 23.10.2017 नंतर वरिष्ठ वेतन श्रेणी मिळण्यास पात्र असलेस DIECPD व विद्या प्राधिकरण संस्थेचे प्रशिक्षणाची झेरॉक्स प्रत जोडली
13.प्रगत शाळा व शाळा सिद्धी प्रमाणे A ग्रेड मध्ये असलेबाबत प्रमाणपत्र जोडले. रद
14.मता दायित्वाची माहिती कार्यालयास सादर केले बाबत ग.शि.अ. यांचे प्रमाणपत्र जोडले आहे.
वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करणेसाठी आवश्यक माहिती प्रपत्र
1.कर्मचा-याचे नाव
2.पदनाम
3.शैक्षणिक पात्रता
4.मूळ नेमणूक दिनांक
5.मूळ नेमणूक दिनांक रोजी दिलेली वेतनश्रेणी
6.ज्या पदावर / वेतनश्रेणीमध्ये १२ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण होत आहे त्या पदावर / वेतनश्रेणीमध्ये नेमणूकीचा दिनांक व वेतनश्रेणी
7.सेवेतील असाधारण / विनावेतन रजा, सेवाखंड तपशील, सेवाखंडाचे कारण व एकूण कालावधी
8.वरिष्ठ वेतनश्रेणीस पात्र दिनांक (असाधारण रजा, सेवाखंड कालावधी वगळून)
9.सध्याची वेतनश्रेणी व त्या वेतनश्रेणीस देय असणारी वरिष्ठ वेतनश्रेणी
10.अर्हताकारी १२ वर्षाच्या सेवेमध्ये विनाअनुदानित सेवा असल्यास त्याचा तपशील
11.सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केले आहे काय (किमान तीन आठवडयांचे)
12.वरिष्ठ श्रेणी मंजूर समितीने उमेदवाराचे कामकाज समाधानकारक ठरविले आहे काय
13.इतर तपशील
प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीबाबत निर्माण होणारी त्रुटी दूर करण्याबाबत प्रस्ताव सादर करणेबाबत
– मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल रिट याचिका क्र.११५१८/२०२२
श्री. महेश देखमुख व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन सातव्या वेतन आयोगामध्ये जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीबाबत निर्माण होणारी त्रुटी दूर करण्याबाबत प्रस्ताव सादर करणेबाबत…
महोदय,
दि.०१.०१.२०१६ ते दि.३०.०१.२०१९ या कालावधीत वरिष्ठ वेतनश्रेणी प्राप्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांची सातव्या वेतन आयोगामध्ये पुनश्च वेतननिश्चिती झाल्यानंतर वेतन कमी निश्चित झाल्याने आजादा वेतन अदा केलेल्या शिक्षकांच्या वेतनातून वसूली करण्याबाबत पंचायत समिती, बदनापूर, जिल्हा परिषद, जालना यांचेकडून आदेशित केले गेले. त्यामुळे सदर वसुलीच्या विरोधात याचिकाकर्त्यांनी मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्र.११५१८/२०२२ दाखल केली. २. मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्रमांक १३०३१/२०२२,
१३०३२/२०२२, ११५१८/२०२२, ११५१९/२०२२, १७३५/२०२३, १३०३३/२०२२, १०४९५/२०२२, १०४९६/२०२२, १०४९७/२०२२, १०४९८/२०२२ यांची एकत्रित सुनावणी झाली. सदर सुनावणीच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालयाने दि.१०.०२.२०२३ रोजी राज्यातील जिल्हा परिषदांमधील शिक्षकांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने वाढीव वेतन मंजूर करण्यासाठी याचिकाकत्यांच्या तक्रारीचा राज्य सरकारद्वारे स्थापन केलेल्या समितीद्वारे विचार केला जाऊन त्यावर दि.३०.०६.२०२३ पूर्वी निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले आहेत. तसेच तोपर्यंत जादाचे अदा झालेल्या वेतनाची वसुली करण्यात येवू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यानुषंगाने महाराष्ट्र राज्य वेतन त्रुटी कृती समिती यांचे दिनांक ०३.०४.२०२३ व दि.२२.०९.२०२३ रोजीचे निवेदन व
वेतनत्रुटीबाबतचा प्रस्ताव दि.०६.०५.२०२४ रोजी अध्यक्ष, वेतनत्रुटी निवारण समिती, वित्त विभाग यांचेकडे सादर करण्यात आला आहे.
तरी सदर प्रकरणी मा. न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येवू नये, अशी आपणांस विनंती करण्यात येत आहे.
वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी प्रस्ताव निकाली काढनेबाबत
राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी प्रस्ताव जिल्हयातील शिक्षणाधिकारी यांनी बोलवून घेऊन डिसेंबर, २०२३ पूर्वी कॅम्पमध्ये निकाली काढण्यासाठी आदेश होणेबाबत दिनांक ३०.१०.२०२३ रोजीचे पत्र
संदर्भ :- १) श्री. श्रीकांत देशपांडे, माजी वि.प.स. यांचे
२) शासन समक्रमांक दिनांक ०५.०१.२०२४
उपरोक्त विषयावरील संदर्भ क्र. २ चे कृपया अवलोकन करावे.
०२. राज्यातील ब-याच संस्था/शाळा कर्मचा-यांची, पात्र असतानाही वरिष्ठ / निवडश्रेणी /नियमित वेतनश्रेणी याबाबतची प्रलंबित प्रकरणे निकाली काढलेली नाहीत. सदर प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी कॅम्प आयोजित करण्याबाबत उक्त पत्रान्वये कळविण्यात आले आहे.
०३. सबब, उक्त विनंतीच्या अनुषंगाने प्रत्यक्षात क्षेत्रिय स्तरावरील वस्तुस्थिती तपासून कॅम्प आयोजित करुन प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा. सदर कार्यवाही करण्यास दिरंगाई झाल्यास संबंधितांवर शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी
शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांच्या वेतन श्रेणीला मंजुरी बाबत
जालना/प्रतिनिधी जिल्ह्यातील आठही तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक, प्राथमिक पदवीधर, मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख यांच्या दरिष्ठ वेतनश्रेणीच्या १ हजार १८५ प्रस्तावास आज सोमवारी (ता. ३०) मंजुरी देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मिना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) राजेंद्र तुबाकले यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिकचे शिक्षणाधिकारी
कैलास दातखिळ, शिक्षणाधिकारी श्रीमती मंगल धुपे, उपशिक्षणाधिकारी शाम देशमुख, श्रीमती विनया वडजे आणि आर. पी. व्यास यांनी ही प्रक्रिया पार पाडली. ज्या कर्मचाऱ्याने त्याच्या नौकरीची २४ वर्षे सेवा पुर्ण केली, अशा कर्मबान्यांचे पंचायत समितीनिहाय गट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा परिषदेत प्रस्ताव सादर केले जातात. त्यानंतर प्रस्तावांची छाननी करून ते वेतनश्रेणी पथकसमोर
मान्यतेसाठी सादर केले जातात. ज्या कर्मचाऱ्यांनी परिपुर्ण कागदपत्रासह प्रस्ताव सादर
जिल्ह्यातुन वरिष्ठ वेतनश्रेणीचे एकुण ७१४ आणि निवडश्रेणीचे ६३० प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले होते. त्याची छाननी करून वरिष्ठ श्रेणीचे ७१४ पैकी ७१० पात्र प्राथमिक शिक्षक, प्राथमिक पदवीधर आणि केंद्र प्रमुखांचे आदेश तसेच
निवडश्रेणीचे एकुण प्रस्ताव ६३० प्राप्त झाले आहेत. प्राप्त प्रस्तावाची शासन निर्णयानुसार २० टक्के प्रमाणे पात्र एकुण ४६५ शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ
मंजुर करण्यात आला आहे. वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणीचे एकुण १ हजार ९८५ शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना वरिष्ठ श्रेणी निवडश्रेणीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
या प्रक्रियेसाठी सहाय्यक प्रशासन अधिकारी दुर्गानंद सोनवणे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी नरेश केशपागे, नितिन श्रीमंगले, वरिष्ठ सहाय्यक आनंद रायते, पंजाब खिल्लारे, कनिष्ठ सहाय्यक माधव वाघमारे आणि विठ्ठल खरात यांनी परिश्रम घेतले.
वरिष्ठ वेतनश्रेणी प्राप्त झालेल्या प्राथ.शिक्षकांची सातव्या वेतन आयोगामध्ये पुनश्च वेतननिश्चिती वसुली बाबत परिपत्रक
– मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल रिट याचिका क्र.११५१८/२०२२
श्री. महेश देखमुख व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन सातव्या वेतन आयोगामध्ये जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीबाबत निर्माण होणारी त्रुटी दूर करण्याबाबत प्रस्ताव सादर करणेबाबत…
महोदय, दि.०१.०१.२०१६ ते दि.३०.०१.२०१९ या कालावधीत वरिष्ठ वेतनश्रेणी प्राप्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांची सातव्या वेतन आयोगामध्ये पुनश्च वेतननिश्चिती झाल्यानंतर वेतन कमी निश्चित झाल्याने आजादा वेतन अदा केलेल्या शिक्षकांच्या वेतनातून वसूली करण्याबाबत पंचायत समिती, बदनापूर, जिल्हा परिषद, जालना यांचेकडून आदेशित केले गेले. त्यामुळे सदर वसुलीच्या विरोधात याचिकाकर्त्यांनी मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्र.११५१८/२०२२ दाखल केली.
२. मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्रमांक १३०३१/२०२२, १३०३२/२०२२, ११५१८/२०२२, ११५१९/२०२२, १७३५/२०२३, १३०३३/२०२२, १०४९५/२०२२, १०४९६/२०२२, १०४९७/२०२२, १०४९८/२०२२ यांची एकत्रित सुनावणी झाली. सदर सुनावणीच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालयाने दि.१०.०२.२०२३ रोजी राज्यातील जिल्हा परिषदांमधील शिक्षकांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने वाढीव वेतन मंजूर करण्यासाठी याचिकाकर्त्यांच्या तक्रारीचा राज्य सरकारद्वारे स्थापन केलेल्या समितीद्वारे विचार केला जाऊन त्यावर दि.३०.०६.२०२३ पूर्वी निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले आहेत. तसेच तोपर्यंत जादाचे अदा झालेल्या वेतनाची वसुली करण्यात येवू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यानुषंगाने महाराष्ट्र राज्य वेतन त्रुटी कृती समिती यांचे दिनांक ०३.०४.२०२३ व दि.२२.०९.२०२३ रोजीचे निवेदन व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांचे दिनांक १०.०४.२०२४ च्या निवेदनान्वये
वेतनश्रुत्रुटीबाबतचा प्रस्ताव दि.०६.०५.२०२४ रोजी अध्यक्ष, वेतनत्रुटी निवारण समिती, वित्त विभाग यांचेकडे सादर करण्यात आला आहे.
तरी सदर प्रकरणी मा. न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येवू नये, अशी आपणांस विनंती करण्यात येत आहे.
राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी प्रस्ताव बाबत परिपत्रक
विषय :- राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी प्रस्ताव जिल्हयातील शिक्षणाधिकारी यांनी बोलवून घेऊन डिसेंबर, २०२३ पूर्वी कॅम्पमध्ये निकाली काढण्यासाठी आदेश होणेबाबत
– १) श्री. श्रीकांत देशपांडे, माजी वि.प.स. यांचे दिनांक ३०.१०.२०२३ रोजीचे पत्र २) शासन समक्रमांक दिनांक ०५.०१.२०२४
उपरोक्त विषयावरील संदर्भ क्रू. २ चे कृपया अवलोकन करावे.
०२. राज्यातील ब-याच संस्था/शाळा कर्मचा-यांची, पात्र असतानाही वरिष्ठ / निवडश्रेणी / नियमित वेतनश्रेणी याबाबतची प्रलंबित प्रकरणे निकाली काढलेली नाहीत. सदर प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी कॅम्प आयोजित करण्याबाबत उक्त पत्रान्वये कळविण्यात आले आहे.
०३. सबब, उक्त विनंतीच्या अनुषंगाने प्रत्यक्षात क्षेत्रिय स्तरावरील वस्तुस्थिती तपासून कॅम्प आयोजित करुन प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा. सदर कार्यवाही करण्यास दिरंगाई झाल्यास संबंधितांवर शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.