भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय शैक्षणिक सामाजिक कार्य महत्त्वाच्या सनावळ्या bharatratna do babasaheb ambedkar social and educational work 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय शैक्षणिक सामाजिक कार्य महत्त्वाच्या सनावळ्या bharatratna do babasaheb ambedkar social and educational work 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (१८९१-१९५६)

इतिहासकार धनंजय कीर डॉ. आंबेडकरांबद्दल म्हणतात, या युगातील पहिल्या श्रेणीतील अलौकिक पुरुषांमध्ये आंबेडकरांचे स्थान आहे. जगात आजवर जे पददलितांचे रक्षणकर्ते व कैवारी होऊन गेले त्या सर्वांत आंबेडकरांचे धार उच्च आहे. महात्मा फुले यांच्या पश्चात समतेची चळवळ ही जनआंदोलन चळवळ बनली. या चळवळीचे नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जात, वर्ण व वर्ग यांचा शेवट करण्याचा निर्धार केला.

• जन्म : १४ एप्रिल, १८९१, मध्य प्रदेशातील इंदूरजवळील महू येथे. मूळ गाव: आंबावडे (जि. रत्नागिरी) (डॉ. आंबेडकरांचे वडील लष्करात सुभेदार पदावर काम करत होते. त्या दरम्यान आंबेडकरांचा जन्म महू येथे झाला.)

• आईचे नाव : भीमाबाई

• मूळ नाव : भीमराव रामजी सकपाळ ऊर्फ आंबावडेकर.

प्राथमिक शिक्षणासाठी काही काळ दापोली व त्यानंतर साताऱ्यातील अॅग्रीकल्चर स्कूलमध्ये प्रवेश. या शाळेतील आंबेडकर या प्रेमळ गुरुंबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी भीमरावांनी आपल्या गुरूंचे आंबेडकर हे नाव स्वीकारले.

१९०५ : रमाबाई यांच्याशी विवाह.

(या शाळेतील केळूसकर नावाच्या शिक्षकांच्या प्रयत्नाने भीमरावांना बडोदाधिपती सयाजीराव गायकवाड यांची दरमहा रु. २५ ची शिष्यवृत्ती मिळाली व एल्फिन्सटन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला.)

१९०७ : मुंबईच्या एल्फिन्सटन हायस्कूलमधून मॅट्रिक परिक्षा उत्तीर्ण.

१९१३ : पर्शियन व इंग्रजी हे विषय घेऊन बाबासाहेब एल्फिन्सटन कॉलेजमधून बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.

जानेवारी १९१३ : बडोदा संस्थानात काही काळ नोकरी.

२ फेब्रुवारी १९१३ : आंबेडकरांना पितृशोक, बडोद्यास जाण्याचे नाकारले.

जुलै १९१३ ते जुलै १९१६ : या काळात महाराज सयाजीरावांच्या मदतीने आंबेडकरांनी उच्च शिक्षणासाठी

अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. • १९१५ : प्राचीन भारतातील व्यापार (Trade in Ancient India) हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला

व एम. ए. ची पदवी संपादन केली.

१९१६ : कोलंबिया विद्यापीठाची पीएच. डी. मिळविण्यासाठी आंबेडकरांनी ‘National Dividend of India, a Historical and Analitycal study’ (भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा एक ऐतिहासिक पृथक्करणात्मक

परिशीलन) हा प्रबंध लिहिला. १९१७ : वरील प्रबंध ‘Evolution of Provincial Finance in British India’ या नावाने प्रसिद्ध झाल्यावर त्यांना कोलंबिया विद्यापीठाची पीएच. डी. ही पदवी मिळाली.

ऑक्टोबर १९१६ : लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये आंबेडकरांनी प्रवेश घेतला दरम्यान शिष्यवृत्तीची

मुदत संपल्याने वर्षभरातच त्यांना भारतात परतावे लागले. १९१७ : मुंबईत ‘वर्स कॉलेज’ या खाजगी व्यापारी शिक्षण संस्थेत काही काळ अर्थशास्त्र, बँकिंग व कायदा या विषयांचे अध्यापन.

नोव्हेंबर १९१८ : मुंबईच्या सिडनेहॅम कॉमर्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती. सिडनेहॅम कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्र हा विषय शिकवत असत.

३१ जानेवारी १९२० : राजर्षी शाहू महाराज यांच्या सहाय्यामुळे आंबेडकरांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले, सप्टेंबर १९२०. या वर्षीच राजर्षी शाहूंच्या आर्थिक सहाय्यामुळे आंबेडकर पुढील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी

इंग्लंडला रवाना झाले.

(या दरम्यान काही काळ जर्मनीतील बॉन विद्यापीठात कायद्याचा अभ्यास केला.) १९२३ : बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण. १९२४ भारतात परतल्यावर काही काळ मुंबई उच्च न्यायालयात वकिली.

• • १९२१ : लंडन विद्यापीठाची एम. एस्सी. पदवी प्राप्त. १९२३ : लंडन विद्यापीठाची डी. एस्सी. ही पदवी. (विषय द प्रॉब्लेम ऑफ रूपी भारतीय रुपयाचा प्रश्न)

यापुढील काळात अस्पृश्यता निवारण हे डॉ. आंबेडकरांनी आपले जीवित कार्य मानले. २० जुलै १९२४ : मुंबई येथे बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना. या सभेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तर सचिव होते सीताराम शिवतरकर,

(उद्देश : अस्पृश्यात नवजागृती करणे व त्यांची शैक्षणिक प्रगती साधणे) बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातून अस्पृश्यांसाठी वाचनालये, प्रौढ रात्रशाळा सुरू करण्यात आल्या.

१९२६ : मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती (१९२६-१९३६) ३ एप्रिल १९२७ : बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केले. • १९२७ : समाज समता संघाची स्थापना.

१९२८ : या संघातर्फे समता, जनता व प्रबुद्ध भारत ही पत्रे सुरू केली. १९२८ : मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य.

आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसह महाड (जि. रायगड) येथे चवदार तळे सत्याग्रह केला.

२० मार्च १९२७ : २५ डिसेंबर १९२७ : अस्पृश्यतेचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे आंबेडकरांनी महाड येथे दहन केले. २ मार्च १९३० : नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह. याचे नेतृत्व दादासाहेब गायकवाड यांनी केले,

(काळाराम मंदिर १९३५ साली अस्पृश्यांना खुले झाले.)

डॉ. आंबेडकरांनी केलेली हिंदू मंदिर प्रवेशाची चळवळ ही अस्पृश्यांच्या सामाजिक गुलामगिरीची बंधने तोडण्यासाठीकेलेली चळवळ होती.

१९३३ : आंबेडकरांनी विधीमंडळात ग्रामपंचायत बिलावर भाषण केले. १९३५ : बाबासाहेबांच्या प्रथम पत्नी रमाबाई (रामीबाई) यांचे निधन झाले.

१९३० ते १९३२ : लंडन येथील तिन्ही गोलमेज परिषदांना अस्पृश्यांचे अतिनिधी म्हणून आंबेडकर उपस्थित होते. २५ सप्टेंबर १९३२ : म. गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यात येरवडा कारागृहात ऐक्य करार.

२३ ऑक्टोबर १९३५ : येवला (जि. नाशिक) येथे प्रतिज्ञा : ‘हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. १९३५-३८ : या काळात मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयाचे प्राचार्य. • १५ ऑगस्ट १९३६ : स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना (Independent Labour Party). या पक्षाने १९३७ च्या प्रांतिक निवडणुका लढवून १३ जागा जिंकल्या.

१९३३ : हिंदू धार्मिक ग्रंथाच्या पारायणासाठी मुखेड येथे सत्याग्रह. १८ जुलै १९४२ : अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना. (मुख्यालय नागपूर) १९४२-१९४६ : या काळात गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळावर मजुरमंत्री म्हणून नियुक्ती.

संस्थेमार्फत मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज (१९४६) तर औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेजची (१९५०) स्थापना केली. (२०१० मध्ये मिलिंद महाविद्यालयाचा हीरकमहोत्सव संपन्न झाला.)

१९४६। मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना. या

१९४७ : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पं. नेहरूंच्या मंत्रिमंडळात कायदामंत्री.

२९ ऑगस्ट १९४७ घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड.

१५ एप्रिल १९४८ : डॉ. शारदा कबीर या ब्राह्मण विदुषीशी दुसरा विवाह. लग्नानंतर सविता आंबेडकर असे नाव. १९४८ : हिंदू कोड बिलाची निर्मिती. (हिंदू कोड बिल हे अविभक्त कुटुंब पद्धती विरुद्ध होते. या बिलानुसार

स्त्रिया व समाजातील इतर घटकांना समान हक्क मिळणार होते.)

१९५१ : हिंदू कोड बिलास विरोध झाल्याने आंबेडकरांनी मंत्रिपदाचा त्याग केला. १९५५ : बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) ची स्थापना.

१४ ऑक्टोबर १९५६ : नागपूर येथे डॉ. आंबेडकरांनी आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. (नागपूरला दीक्षाभूमी असे संबोधले जाते.) १४ ऑक्टोबर हा धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. ब्रहादेशचे (म्यानमार) चंद्रमणी महास्थवीर यांनी आंबेडकरांना बौद्धधर्माची दीक्षा दिली. नागपूर येथे त्यांनी व्यापक तत्त्वज्ञानावर आधारित नव्या ‘रिपब्लिकन पार्टी’ या पक्षाची घोषणा केली होती, पण

त्याआधीच त्यांचे निधन झाले. • ६ डिसेंबर १९५६ दिल्ली येथे डॉ. आंबेडकरांचे महापरिनिर्वाण. ७ डिसेंबर १९५६ रोजी मुंबईतील दादर (चैत्यभूमी) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अंतिम संस्कार पार पडले. डॉ. बाबासाहेबांची ग्रंथसंपदा द इव्होल्यूशन ऑफ प्रॉव्हिन्सियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया.

• व्ह वेअर द शुद्राज ? (शुद्र कोण होते?)

• थॉटस् ऑन पाकिस्तान रिडल्स इन हिंदूइजम

• बुद्ध अँड हिज धम्म (१९५६) द अनटचेबल्स • अॅनिहिलेशन ऑफ कास्टस् (जातीव्यवस्थेचे निर्मूलन) अनटचेबल्स अॅण्ड इंडियन कन्स्टिट्युशन • घॉटस् ऑन लिंग्विस्टिक स्टेटस् स्टेट अॅण्ड मायनॉरिटिज् Federation Versus Freedom (1939) The Children of India’s Ghetto (द अनटचेबल्स) स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया अॅण्ड देअर रिमेडिज् (१९१८) अॅडमिनिस्ट्रेशन अॅण्ड फायनान्स ऑफ द इस्ट इंडिया कंपनी रानडे, गांधी आणि जीना • ‘बुद्ध अँड हिज धम्म’ हा डॉ. बाबासाहेब

• कास्टस् इन इंडिया

• द प्रॉब्लेम ऑफ रूपी

यांचा शेवटचा ग्रंथ मृत्यूनंतर प्रकाशित झाला. • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्र: Waiting For A Visa • ब्रिटिशांना भारतातील परिस्थितीचे ज्ञान व्हावे यासाठी डॉ. बाबासाहेबांनी आपले सर्व ग्रंथ इंग्रजी भाषेत लिहिले. डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता मूकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), जनता (१९३०), समता, प्रबुद्ध भारत १९५६ मध्ये जनता या वृत्तपत्राचे नाव बदलून ते ‘प्रबुद्ध भारत’ असे केले.

• मूकनायक पाक्षिकाच्या शिर्षभागी संत तुकारामांची वचने होती (काय करूं आतां धरुनियां भीड ।…) बहुतांश ठिकाणी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक होते असा संदर्भ मिळतो. राजर्षी शाहू महाराज यांनी ‘मूकनायक’ साठी रु. २५०० ची आर्थिक मदत केली. बहिकृष्त भारत पाक्षिकाच्या शिर्षभागी संत ज्ञानेश्वरांची वचने होती.

मूकनायकचे पहिले संपादक श्री नंद्र भाटकर. दुसरे संपादक : ज्ञानदेव घोलप डॉ. आंबेडकरांना ‘आधुनिक मनू’ असे संबोधले जाते. बाबासाहेबांचे दिल्लीतील निवासस्थान २६, अलीपूर रोड. ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या स्थापनेमागे आप्पादुराई यांची प्रेरणा होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बंगाल प्रांताच्या विधीमंडळातून घटना समितीवर निवडून आले. येवला येथे १९३५ ची हिंदू धर्म त्यागण्याची प्रतिज्ञा केल्यावर आंबेडकरांनी सुमारे १२ वर्षे बहुतेक सर्व धर्मांचा अभ्यास केला व बौद्ध धर्मात अस्पृश्यतेचे खंडन केलेले आढळल्यामुळे त्यांनी या धर्माचा स्वीकार केला. शीख धर्माचा स्वीकार करावा असे डॉ. बाबासाहेबांच्या मनात होते. मात्र त्यांनी तो निर्णय बाजूला सारला. बौद्ध धर्माच्या दीक्षेसाठी नागपूरची निवड करण्यामागचे कारण म्हणजे नागा लोकांनी आपल्या या भूमीत बौद्ध

धर्माचा प्रसार केला होता. • बाबासाहेबांचे मुद्रणालय भारत भूषण प्रिंटिंग प्रेस १९९० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

१९९०-१९९१ हे आंबेडकरांचे जन्म शताब्दी वर्ष सामाजिक न्याय वर्ष म्हणून पाळले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबई येथील समाधी स्थळ चैत्यभूमी (दादर)

डॉ. बाबासाहेब हे त्यांच्या आई-वडिलांचे १४ वे व शेवटचे अपत्य होते. ‘शिका, चेतवा व संघटीत व्हा’ हे बहिकृष्त हितकारिणी सभेचे ब्रीदवाक्य होते.

आंबेडकरांनी गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले यांना गुरूस्थानी मानले. १९२० च्या माणगाव अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

डॉ. आप्पासाहेब पाटील यांनी ही परिषद भरविण्यात पुढाकार घेतला होता. मंदिर प्रवेश चळवळीमुळे १९३५ मध्ये काळाराम मंदिर अस्पृश्यांना खुले झाले. त्यानंतर एलिचपूर येथील

दत्तमंदिर, अमरावतीचे अंबेचे मंदीर, सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर इ. मंदिरांच्या सत्याग्रहाच्या चळवळी पुढे आल्या, आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत दलितांना प्रोटेस्टंट किंवा नॉन कनफर्मिस्ट हिंदूंचा दर्जा मिळावा अशी मागणी केली. १९२८ च्या सायमन कमिशनला भारतभर विरोध होत असताना डॉ. बाबासाहेबांनी कमिशनसमोर अस्पृश्यांच्या समस्या मांडल्या.

देण्यासंबंधी शिफारस केली.

‘रिपब्लिकन पार्टी’ स्थापन करण्याचे डॉ. बाबासाहेब यांचे स्वप्न त्यांच्या मृत्यूनंतर प्रत्यक्षात आले. डॉ. बाबासाहेबांनी साऊथबरो समितीसमोर साक्ष मांडताना प्रांतिक कायदेमंडळात अस्पृश्यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व

मे १९५० : श्रीलंकेतील कोलंबो, १९५४: म्यानमारमधील यांगून (रंगून) येथील जागतिक बौद्ध धर्म परिषदांना उपस्थिती, १९५६ : नेपाळमधील काठमांडू येथील चौथ्या जागतिक बौद्ध धर्म परिषदेस उपस्थिती. ‘मजूर वगनि संघटित होऊन कायद्याच्या आधारे सामाजिक सुधारणा घडवून आणणे गरजेचे आहे.’ या उद्देशाने

डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. • कलम ३७०

(जम्मू काश्मीरचा दर्जा) या कलमास डॉ. बाबासाहेब यांनी नेहमीच विरोध दर्शविला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रसिद्ध वचने: राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरूकिल्ली आहे. भाकरी पेक्षा इज्जत प्यारी. देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढले पाहिजे. शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा. (दलित बांधवांना संदेश) भिक्षेने गुलामी मिळते, स्वातंत्र्य नाही. आम्हाला सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करा म्हणजे आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावूर •

राजकीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करतो. ‘राजकीय सत्तेच्या मोक्याच्या आणि महत्त्वाच्या जागा काबीज करा आणि शासनकर्ती जमात बना.’ (दलित बांधवांना आवाहन) जर माझ्या मनात द्वेष व सूडबुद्धी असती तर पाच वर्षांच्या आत मी या देशाचे वाटोळे केले असते. तिरस्करणीय गुलामगिरी व अन्यायाच्या अमानुष गर्तेत पिचत पडलेल्या ज्या समाजात मी जन्मास आलो, त्या

समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यात मी अपयशी ठरलो, तर स्वतःलाच गोळी घालीन.

Relegion is meant for man, but man is not meant for Relegion. ‘वाचन मनाला अन्न पुरविते. या अन्नाचे चर्वण केले तरच ते पचते. अन्न पचले तरच बुद्धी प्रगत होते.’ ३० मार्च १९२७ रोजी महिलांना उद्देशून ‘तुमचा नवरा व मुले दारू प्यायली तर त्यांना जेवण देऊ नका.’ •

आंबेडकरांचे प्रसिद्ध अग्रलेख पुनःश्च हरिओम् (बहिष्कृत भारत) आम्ही शासनकर्ती जमात बनणार (जनता) डॉ. आंबेडकरांबद्दल गौरवोद्‌गार: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ‘दलितांचा मुक्तिदाता’ असा गौरब सयाजीराव गायकवाडांनी केला. • मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार ‘आंबेडकरांमध्ये तुम्हाला तुमचा उद्धारकर्ता लाभलेला आहे.’ (१९२० च्या माणगाव परिषदेत राजर्षी शाहू

महाराजांचे अस्पृश्यांना आवाहन) १९५७ मध्ये ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ हा पक्ष बरखास्त होऊन ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ या पक्षाची स्थापना झाली. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनने १३

जागा जिंकल्या. (डॉ. बाबासाहेब उत्तर-मध्य मुंबई या राखीव मतदारसंघातून पराभूत झाले होते. बाबासाहेबांचे एकेकाळचे सहकारी व काँग्रेस नेते नारायण सादोबा काजरोळकर यांनी त्यांना पराभूत केले.) मार्च १९५२ मध्ये डॉ. बाबासाहेब राज्यसभेवर निवडून गेले.

दुसऱ्या महायुद्धात भारताने ब्रिटीशांना सहकार्य करावे असा मनोदय डॉ. आंबेडकरांनी व्यक्त केला होता. • भाषावार प्रांतरचनेबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर फारसे उत्सुक नव्हते. त्यांच्या मते भाषावर प्रांतरचनेमुळे

ऐक्य भावना वाढीस लागण्याऐवजी हिंदूस्थानचे अधिक तुकडे पडतील. मात्र प्रांतरचना केल्यास मुंबईचा संयुक्त महाराष्ट्रात समावेश करावा, असे निवेदन त्यांनी दार कमिशनला सादर केले.