प्राथमिक शिक्षकांच्या सर्वसाधारण बदली प्रक्रिया २०२४ अंतर्गत बदली पोर्टलवरील कार्यवाही वेळोवेळी विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याबाबत teacher online transfer
संदर्भ :- व्ही.सी. दि. १३.११.२०२४ अन्वये.
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रीया २०२४ अंतर्गत अद्यापपर्यंत बदली पोर्टलवर खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आली
जिल्हाअंतर्गत भरली बाबतचे शासन निर्णय येथे पहा
👉जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक दिनांक 07 नोव्हेंबर 2024 शासन निर्णय
👉जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण दि. 18 जुन 2024 चा शासन निर्णय
👉जिल्हा परिषद शिक्षक जिल्हाअंतर्गत बदली शासन परिपत्रक 7 एप्रिल 2021 शासन निर्णय
१. शिक्षकांच्या माहितीचा डेटा अद्यावत करणे.
२. शाळानिहाय रिक्त पदे व समानीकरणाची पदे प्रसिध्द करणे.
३. जिल्हयातील अवघड व सुगम क्षेत्रातील शाळांची यादी प्रसिध्द करणे.
४. बदली पात्र, बदली अधिकार पात्र व टप्पा क्र. ७ साठी (अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी) पात्र असणाऱ्या बदली पात्र शिक्षकांची यादी प्रसिध्द करणे.
वरीलप्रमाणे बदली पोर्टलवर कार्यवाही दि. १३.११.२०२४ रोजी पर्यंत पूर्ण झाली आहे.
तद्नंतर दि. १४.११.२०२४ ते १६.११.२०२४ या कालावधीत संवर्ग १ व संवर्ग २ चा लाभ घेण्यासाठी संबंधित शिक्षकांनी बदली पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा व ऑफलाईन अर्ज आवश्यक पुराव्यासह गटशिक्षणाधिकारी कार्यालयास विहित मुदतीत सादर करणे बंधनकारक आहे.
करिता आपण आपल्या स्तरावरुन शिक्षक बदली प्रक्रीये संदर्भात झालेली कार्यवाही व करावयाची कार्यवाही याबाबत तात्काळ सर्व शिक्षकांना लेखी अवगत करावे.
पं.स. कार्यालयातील सर्व संबंधित कर्मचारी तसेच पर्यवेक्षकिय यंत्रणेतील विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख यांचेकडून बदली प्रक्रीये संदर्भातील आवश्यक ती कार्यवाही वेळोवेळी विहित कालमर्यादेत करुन घेण्यात यावी.
सदर कार्यवाहीबाबत विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी.
*✳️जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली अपडेट – 2024*
*विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 व भाग 2 बदली करिता आवश्यक पुरावे खालील प्रमाणे फॉर्म भरल्यानंतर तत्काळ सादर करावे.*
*✳️जिल्हाअंतर्गत शिक्षक संवर्ग बदली 2024 मध्ये दिनांक 18 जून 2024 च्या सुधारित धोरण शासन निर्णयानुसार शिक्षकांच्या विशेष संवर्ग भाग 1 किंवा भाग 2 मधून बदली हवी असल्यास गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांचे त्रिस्तरीय समितीसमोर आपण संवर्ग 1 किंवा संवर्ग 2 मध्ये मोडत असल्याचा सक्षम पुरावा कार्यालयाकडे सादर करावे. त्याकरिता संवर्गातील उपप्रकारानुसार खाली पुरावे दिलेले आहेत ते आपण अद्यावत ठेवावेत*
*✳️विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 बदली करिता आवश्यक पुरावे.*
*➡️1) पक्षाघाताने आजारी शिक्षक( Paralysis )*
*पुरावा- जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र.*
*➡️2) दिव्यांग शिक्षक /अपंग शिक्षक*
*पुरावा-सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय दिनांक 14 जानेवारी 2011 मधील नमूद प्रारूपाप्रमाणे सक्षम प्राधिकार्याचे प्रमाणपत्र आवश्यक*
*➡️मानसिक विकलांग मुलाचे पालक म्हणजेच आई वडील किंवा ते नसल्यास बहीण भाऊ तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक*
*पुरावा- ऑनलाइन अपंग प्रमाणपत्र तथा मतिमंद व अपंग मुलांचे पालक असल्यास पाल्य अठरा वर्षापेक्षा अधिक असल्यास न्यास अधिनियम 1999 अन्वय सक्षम प्राधिकारी यांचे कडील पालकत्वाचा दाखला*
*➡️3) हृदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी -*
*पुरावा- जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र.*
*➡️4) जन्मापासून एकच मूत्रपिंड किडनी असलेले किंवा मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक/डायलिसिस सुरू असलेले शिक्षक -*
*पुरावा-जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र.*
*➡️5) यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक -*
*पुरावा-जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र.*
*➡️6) कॅन्सर म्हणजेच कर्करोगाने आजारी शिक्षक -* *पुरावा-जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र.*
*➡️7) मेंदूचा आजार झालेले शिक्षक*
*पुरावा-जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र.*
*➡️8) थॅलेसेमिया स्वीकार ग्रस्त मुलांचे पालक जन्मजात गुणसूत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार(Methyl Malonic Acidemia (MMA) Classic Type (Mutase Defiency)*
*पुरावा-जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कडील प्रमाणपत्र.*
*➡️9) आजी-माजी सैनिक व अर्ध सैनिक जवानांच्या पत्नी अथवा विधवा*
*पुरावा-सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र.*
*➡️10) विधवा शिक्षिका*
*पुरावा-पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र.*
*➡️11) कुमारीका शिक्षिका*
*पुरावा-स्वयंघोषणापत्र.*
*➡️12) परित्यक्ता/घटस्फोटीत महिला कर्मचारी* *पुरावा-घटस्फोटाबाबत न्यायालयीन निर्णयाची प्रत.*
*➡️13) वयाची 53 वर्षे पूर्ण झालेली शिक्षक*
*पुरावा-सेवा पुस्तकाचे पहिल्या पानाची झेरॉक्स.*
*➡️14) स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा मुलगी नातू नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत)*
*पुरावा-सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र*
*✳️खालील आजाराने ज्या शिक्षकांची जोडीदार व्याधीग्रस्त आहेत असे शिक्षक.*
*➡️15) हृदय शस्त्रक्रिया झालेले*
*पुरावा-जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र. व विवाह नोंदणी प्रमाणपत्र*
*➡️16) जन्मापासून एकच मूत्रपिंड किडनी असलेले मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी/डायलिसिस सुरू असलेले*
*पुरावा-जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र व विवाह नोंदणी प्रमाणपत्र*
*➡️17) यकृत प्रत्यारोपण झालेले*
*पुरावा-जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र व विवाह नोंदणी प्रमाणपत्र*
*➡️18) कॅन्सर म्हणजेच कर्करोगाने आजारी असलेले*
*पुरावा-जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र व विवाह नोंदणी प्रमाणपत्र*
*➡️19) मेंदूचा आजार झालेले*
*पुरावा- जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र व विवाह नोंदणी प्रमाणपत्र*
*➡️20) थॅलेसेमिया विकारगस्त असलेले*
*पुरावा-जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र व विवाह नोंदणी प्रमाणपत्र*
*✳️विशेष संवर्ग शिक्षक भाग 2 बदली करिता आवश्यक पुरावे.*
*✳️विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन म्हणजेच पती-पत्नी एकत्रीकरण यामध्ये जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकांपासून 30 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग भाग शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल.*
*➡️1) पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर*
*पुरावा-कार्यरत पं.स. मधील गटशिक्षणाधिकारी यांचे दोघांचेही प्रमाणपत्र. व विवाह नोंदणी प्रमाणपत्र*
*➡️2) पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर* *पुरावा-एकाचे ग.शि.अ. प्रमाणपत्र व जोडीदाराचे कार्यालय प्रमुख यांचे प्रमाणपत्र व विवाह नोंदणी प्रमाणपत्र*
*➡️3) पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर* *पुरावा-एकाचे ग.शि.अ. प्रमाणपत्र व जोडीदाराचे कार्यालय प्रमुख यांचे प्रमाणपत्र व विवाह नोंदणी प्रमाणपत्र*
*➡️4) पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर उदाहरणार्थ महानगरपालिका नगरपालिका*
*पुरावा-एकाचे ग.शि.अ. प्रमाणपत्र व जोडीदाराचे कार्यालय प्रमुख यांचे प्रमाणपत्रव विवाह नोंदणी प्रमाणपत्र*
*➡️5) पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी असेल तर*
*पुरावा-एकाचे ग.शि.अ. प्रमाणपत्र व जोडीदाराचे नियुक्ती प्राधिकारी यांचे आदेशाची प्रत/दाखला व विवाह नोंदणी प्रमाणपत्र*
*➡️6) पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक अथवा कर्मचारी असेल तर*
*पुरावा– एकाचे ग.शि.अ. प्रमाणपत्र व जोडीदाराचे सक्षम प्राधिकारी यांचे वैयक्तिक मान्यता प्रत (अप्रुव्हल APPROVAL) व विवाह नोंदणी प्रमाणपत्र*
*✳️विशेष संवर्ग भाग २अंतर्गत संबंधित शिक्षकांनी जोडीदाराच्या शाळेपासून ३०कि.मी. अंतराबाबत सादर केलेले प्रमाणपत्र / दाखला याची पडताळणी गटशिक्षणाधिकारी यांचेद्वारा तालुकास्तरावर करण्यात येईल. ३० कि.मी. रस्त्यांचे अंतर हे सर्वात्त नजीकच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात यावे. सदरच्या ३० कि.मी. रस्त्याच्या अंतराचा दाखला देण्यास कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग/कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, बांधकाम हे सक्षम प्राधिकारी राहतील*
*धन्यवाद*